Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    परवशता पाश दैवे ज्यांच्या गळा लागला…

    October 18, 2026

    आठवणींची पेटी… वाट शाळेची!

    October 18, 2026

    Homeopathy : हॅनिमनने उभी केली नवीन उपचारपद्धती!

    October 18, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Sunday, October 18
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » परवशता पाश दैवे ज्यांच्या गळा लागला…
    फिल्मी

    परवशता पाश दैवे ज्यांच्या गळा लागला…

    विशाल कुलकर्णीBy विशाल कुलकर्णीOctober 18, 2026No Comments6 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठी कथा, मराठी साहित्य, विशाल कुलकर्णी, लेखक विशाल कुलकर्णी, परवशता पाश दैवे, संगीत रणदुंदुभि, वीर वामनराव जोशी, संगीत वझेबुवा, पंडित दीनानाथ मंगेशकर, ब्रिटिश राजवट, ब्रिटिश राजवटीला विरोध, पिलू राग, स्वातंत्र्यलढा
    वीर वामनराव जोशी आणि पंडित दीनानाथ मंगेशकर
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    ‘परवशता पाश दैवे ज्यांच्या गळा लागला…’ हे नाट्यगीत निव्वळ एक गीत म्हणून न उरता, मराठी रंगभूमीच्या इतिहासात एक खोल, अस्वस्थ आणि विचारप्रवर्तक अनुभवाच्या रूपात ठामपणे पाय रोवून उभे आहे. ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी, पत्रकार वीर वामनराव जोशी यांनी 1927 साली लिहिलेल्या ‘रणदुंदुभि’ या नाटकातील हे गीत. त्या काळातील समाजमन, पारतंत्र्याची वेदना आणि मानवी विवशतेची जाणीव, असहाय्यतेची भावना अतिशय तीव्रपणे व्यक्त करणारे, मराठी नाट्यसंगीताच्या इतिहासात मैलाचा दगड ठरलेले हे अजरामर गाणे.

    वीर वामनराव जोशींच्या शब्दांना पंडित वझेबुवांच्या संगीताने आणि मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या गायकीने जे काही दिव्य रूप दिले, त्यामुळे हे गीत नाटकांच्या इतिहासाच्या पानांवर सुवर्णाक्षरांनी नोंदले गेलेले आहे.

    त्यांच्या या गीताचा गाभा तसा अंतर्मुख आणि गंभीर आहे. ‘परवशता’ हा शब्दच एका अशा अवस्थेचे चित्र उभे करतो, जी केवळ बाह्यगुलामी नाही, तर आतून गुदमरवणारी असहायता आहे. ‘पाश’ ही प्रतिमा गळ्याभोवती आवळलेल्या फासासारखी आहे. तो फास हळूहळू आवळला जातो. श्वास घेऊ देतो, पण मोकळा श्वास घेऊ देत नाही. ‘दैव’ हा शब्द इथे नशिबापुरता मर्यादित राहत नाही; तो सहज सहजी बदलता न येणाऱ्या व्यवस्थेचे, अन्यायाचे आणि विवशतेचे प्रतीक बनतो. पण तरीही कवितेचा आत्मा शोकात्म नाहीये. कवी आक्रोश करत नाही. तो शांतपणे, पण ठामपणे ही अवस्था समोर ठेवतो. त्यामुळे या शब्दांमध्ये कारुण्य असले तरी शरण जाणे नाहीये, दुर्बलता नाहीये. त्या उलट या शब्दांमध्ये एक गंभीर, बोचरी शांतता आहे.

    एका जुन्या मित्राशी फोनवर बोलताना सहजच ‘रणदुंदुभि’ या संगीत नाटकाबद्दल थोडी चर्चा झाली. अर्थात, सुरुवात मास्टर दीनानाथांच्या गायकीपासूनच झालेली होती. मी स्वतः दीनानाथांच्या गाण्याचा, गायकीचा भक्त आहे. त्यामुळे चर्चेत ‘परवशता पाश दैवे…’चा विषय निघणे साहजिकच होते. त्यानिमित्ताने वीर वामनराव जोशी यांच्याबद्दलही थोडी चर्चा झाली. लोकमान्य टिळकांचे भक्त असलेले वामनराव जोशी मुळचे अमरावतीचे. मॅट्रिक झाल्यावर काही काळ त्यांनी नोकरीही केली. पण देशभक्ती रक्तात मुरलेली असल्यामुळे नंतर “राष्ट्रमत” या दैनिकात देशभक्त गंगाधरराव देशपांडे यांचे प्रमुख सहकारी म्हणून ते काम करू लागले. लोकमान्य टिळकांच्या जहाल राजकारणाचा ते पुरस्कार करत असल्यामुळे 1908मध्ये राजद्रोहाच्या आरोपावरून त्यांना दीड वर्षाच्या कारावासाची शिक्षा झाली. 1920मध्ये टिळकांचे देहावसान झाल्यानंतर ते महात्मा गांधींच्या राजकारणात सहभागी झाले.

    हेही वाचा – पल भर में ये क्या हो गया…

    असहकारितेच्या चळवळीत सक्रिय सहभाग घेतल्याबद्दल त्यांना अनुक्रमे दीड आणि दोन वर्षांच्या कारावासाच्या शिक्षा झाल्या (1923 आणि 1930). लोकजागृतीसाठी त्यांनी ‘स्वतंत्र हिंदुस्थान’ हे साप्ताहिक चालविले होते. त्यांची वाणी आणि लेखणी ओजस्वी होती. ‘वीर वामनराव जोशी’ या नावानेच त्यांची ओळख बनली होती. त्यांनी काही नाटकेही लिहिली आहेत. त्यापैकी ‘राक्षसी महत्त्वाकांक्षा’ (1914) व रणदुंदुभि (1927) ही नाटके प्रसिद्ध आहेत. त्यातल्याच ‘रणदुंदुभि’ या नाटकातील हे अजरामर गीत.

    परवशता पाश दैवे ज्यांच्या गळा लागला ।
    सजिवपणी घडती सारे । मरण-भोग त्याला ॥

    या गाण्याला पंडित वझेबुवां यांनी संगीत दिलेले आहे. वझेबुवांचे संगीत नेहमीच शब्दप्रधान असते. जणू काही शब्दांच्या सेवेत वाहिलेले असते. वझेबुवांनी हे गाणे पिलू रागात बांधलेले आहे. पिलू हा राग मुळातच भावप्रधान, लवचिक आणि करूण आहे. शुद्ध आणि कोमल स्वरांची सरमिसळ, खमाज अंगाचा स्पर्श आणि लोकसंगीताशी असलेली जवळीक यामुळे मानवी वेदना व्यक्त करण्यासाठी तो अतिशय योग्य ठरतो. मात्र हे नाट्यसंगीत आहे, शास्त्रीय प्रदर्शनासाठी बांधलेले नाही. त्यामुळे राग इथे एक रंग बनून येतो. त्याला कसलीही चौकट नाहीये. तो शब्दांना व्यापून टाकतो, पण शब्दांवर अधिराज्य गाजवण्याचा प्रयत्न करत नाही.

    ‘परवशता पाश दैवे ज्यांच्या गळा लागला’

    या ओळीतच संपूर्ण गाण्याचे सार आहे. हे शब्द गुलामगिरीच्या वेदना आणि ब्रिटीश सत्तेच्या अत्याचाराचे प्रतीक म्हणून समोर येतात. परिणामी ब्रिटीश अधिकाऱ्यांना ते आवडले नाही. त्यामुळे, गाण्यावर अगदी थेट बंदी आलेली नसली तरी, या गाण्यातील राष्ट्रप्रेमाच्या भावनेमुळे ते ब्रिटिश काळात गायले जाणे धोक्याचे होते, आणि त्यामुळेच ब्रिटिशविरोधी भावनांचे प्रतीक बनले होते. मास्टर दीनानाथांनी हा धोका अगदी सहज पत्करला होता.

    कवी म्हणतात की, ज्यांच्या गळ्यात परवशतेचा हा फास अडकलेला आहे, त्यांचे जीवन स्वप्नरहित होते. प्रयत्न करूनही वाट सुटत नाही. माणूस जिवंत असतो, पण निर्णयशक्ती, स्वाभिमान आणि आत्मविश्वास गमावलेला असतो. ही वेदना व्यक्तिगत असली, तरी तिचा विस्तार समाजापर्यंत जातो. महत्त्वाचे म्हणजे, वर म्हटल्याप्रमाणे हे गीत शोकात्म नाही. यात आक्रोश आहे, पण तो संयमित आहे. हीच संयमित वेदना दीनानाथांच्या गायकीत प्रकर्षाने जाणवत राहते.

    तसे तर, आजवर हे गीत बऱ्याच जणांनी गायलेले आहे. शास्त्रीय संगीताचे वेड असणाऱ्या आणि गाता येणाऱ्या प्रत्येकासाठी हे गीत एखाद्या आव्हानासारखे असते. अगदी अभिषेकीबुवा अर्थात पंडित जितेंद्र अभिषेकी यांना देखील हा मोह टाळता आलेला नाहीये. त्यांच्या आवाजातील हे गाणे हा एक स्वतंत्र लेखाचा विषय आहे. पण मूळ गाणे दीनानाथांचे आहे. मास्टर दीनानाथ मंगेशकर यांनी गायलेले या गीताचे संस्करण हे या वर दिलेल्या सगळ्या घटकांचे अत्यंत परिपक्व रूप आहे. दीनानाथांची गायकी मुळातच शब्दप्रधान आहे. त्यांच्या स्वरातून मास्टर दीनानाथ नाही, तर गाण्याचा आशय ठळकपणे समोर येत राहतो. ते ‘परवशता’ हा शब्द उच्चारताना, त्याला एक प्रकारचे जडत्व प्राप्त करून देतात. शब्दाला त्यांच्या स्वरांनी दिलेला तो हलकासा दाब आपल्याला त्या अवस्थेची घुसमट समर्थपणे जाणवून देतो. दीनानाथ स्वर उंचावून वेदना व्यक्त करत नाहीत, उलट अनेक ठिकाणी त्यांचे स्वर थोडे खाली झुकतात, जणू काही आवाजही त्या पाशाच्या ओझ्याखाली दबला, दडपला जातो आहे.

    दीनानाथांची गायकी जरी मुक्त आणि वादळी असली तरी इथे ती अत्यंत संयमी आहे. पिलूसारखा मोकळा राग असूनही ते अनावश्यक ताना, मुरक्या किंवा आलाप टाळतात. सर्वसामान्यांनाच नव्हे, तर शास्त्रीय संगीतातील दिग्गजांना देखील दुर्लभ अशी खोल शास्त्रीय जाण असूनही त्याचा दिखाऊ वापर ते करत नाहीत. रागाची पकड सूक्ष्मपणे जाणवत राहते. मध्यम आणि निषादाच्या हालचाली, खमाजच्या अंगाचा स्पर्श ऐकू येतो, जाणवतो, पण तो कधीही शब्दांवर, शब्दांच्या अर्थावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत नाही. ‘राग इथे ऐकू येतो, दाखवला जात नाही’, ही दीनानाथांच्या गायकीची मोठी ताकद आहे.

    ‘परवशता पाश…’ गाताना दीनानाथ शब्दांवर भर देताना दिसून येतात, आधी शब्द आणि मग स्वर. प्रत्येक शब्द स्पष्ट, ठाशीव आणि अर्थासहित पोहोचतो. ‘परवशता’ हा शब्द जड आवाजात, किंचित दाब देऊन उच्चारलेला आहे. त्यामुळे तो केवळ शब्द न राहता एक अवस्था बनून जातो. यात त्यांचे स्वर सरळ, थोडे गंभीर आणि खोल ठेवलेले आहेत हे जाणवून येते. हा संयम गाण्यातील गंभीर आशयाचे, भावनेचे निदर्शक आहे.

    हेही वाचा – मन आनंद आनंद छायो… आत्मशोधाची संगीतमय अनुभूती

    दीनानाथांच्या आवाजात एक नैसर्गिक गांभीर्य आहे. त्यामुळे जेव्हा ते पारतंत्र्याची वेदना गातात, तेव्हा त्यांचे गाणे केवळ एका त्रयस्थ गायकाप्रमाणे न येता, ती वेदना जिवंत होऊन येते. नाट्यसंगीताची गरज लक्षात घेऊन दीनानाथांनी गायनात कुठल्याही प्रकारचा अतिरेकी अभिनिवेश टाळलेला आहे. ही सूक्ष्म अभिव्यक्ती त्यांच्या गायकीत सातत्याने दिसते. त्यांचा आवाज प्रत्यक्ष अनुभवातून आलेला आहे. तो आवाज प्रत्यक्ष संघर्ष पाहिलेला, वेदना सोसलेला आणि तरीही संयम राखणारा आहे. त्यामुळे ते हे गीत ऐकताना श्रोतेदेखील केवळ एक निरीक्षक राहत नाहीत, तर त्या विवशतेचे साक्षीदार बनून जातात. दीनानाथांनी आपल्या सुरांच्या साथीने शब्दांत अक्षरश: प्राण ओतले आहेत.

    या गीतात संगीत, शब्द आणि गायकी यांच्यात विलक्षण संतुलन आहे. ताल साधा आहे, चाल सरळ आहे, पण त्या सरळपणातच एक अस्वस्थ ताण आहे. शास्त्रीय संगीत इथे उद्दिष्ट नाही; ते माध्यम आहे. त्यामुळेच हे गीत गाणाऱ्याला आजही आव्हान देते. कारण इथे फक्त स्वर अचूक लावणे पुरेसे नाहीये; तर त्या स्वरांत परिस्थितीची विवशता, तो संयम आणि ती आतली आग जपण्याचे, प्रज्ज्वलित करण्याचे आव्हान आहे.

    महत्त्वाचे म्हणजे आपणदेखील हे गाणे ऐकताना निव्वळ एक कलाकृती म्हणून त्याच्याकडे न पाहता; त्याकडे तत्कालीन परिस्थितीचा, समाजाचा गुदमरलेला श्वास समजून त्याचा अनुभव घेतो… आणि म्हणूनच, आज काळ बदललेला असला तरी या गीताची वेदना आजही तितकीच खरी वाटते, तितकीच प्रकर्षाने अस्वस्थ करून जाते.

    नाटक : संगीत रणदुंदुभि
    गीतकार : वीर वामनराव जोशी
    संगीत : वझेबुवा
    गायक : पंडित दीनानाथ मंगेशकर

    Avatar photo
    विशाल कुलकर्णी

    विशाल विजय कुलकर्णी राहणार - मु.पो. चिंचवड, पुणे - 33. शिक्षणाने इलेक्ट्रॉनिक्स अभियंता, व्यवसायाने विक्री आणि विपणन (Sales & Marketing) क्षेत्रातील अनुभवी. साहित्य आणि सर्जनशील लेखन ही माझी खरी ओळख आहे. शब्दांशी असलेली नाळ जपत मी कथा, कविता, ललित लेख, सामाजिक विषयांवरील लेखन आणि वैचारिक अभिव्यक्ती अशा विविध साहित्यप्रकारांत सातत्याने लेखन करत आलो आहे. माझ्या ‘Beyond Thresholds’ या इंग्रजी पुस्तकासह ‘यलगार’ आणि ‘ओलेत्या ओळी पावसाच्या...’ ही ई-पुस्तके (अमेझॉन केडीपी) आहेत. काही वेबसाइट्स तसेच फेसबुक सारखी विविध सामाजिक माध्यमे, वृत्तपत्रे, मासिके आणि ‘ऐसी अक्षरे मेळवीन’, ‘कविता माझी सखी’, ‘माझी भटकंती’ या माझ्या वैयक्तिक ब्लॉग्सवर नियमितपणे लेखन करतो. लेखन ही केवळ आवड नसून संवाद घडवण्याचे, विचारांना दिशा देण्याचे आणि ब्रँड्सना प्रभावी शब्दांची ताकद देण्याचे माध्यम आहे, या विश्वासातून मी VKS Storycraft Media या मालकी हक्काच्या (Proprietary) संस्थेची स्थापना केली आहे. VKS Storycraft Media ही संस्था कॉपीरायटिंग, कंटेंट रायटिंग, ब्रँड स्टोरीटेलिंग, कॉर्पोरेट कम्युनिकेशन आणि व्यवसायाभिमुख आशय निर्मिती (Business Content Creation) या क्षेत्रात व्यावसायिक सेवा प्रदान करते.

    Related Posts

    अभिनय अन् नृत्याचा सूर्य अस्ताला गेला…

    October 13, 2026 फिल्मी

    संसार से भागे फिरते हो…

    October 11, 2026 फिल्मी

    दूसरा आदमी… मनाला भुरळ घालणारे कथानक

    October 6, 2026 फिल्मी
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    फिल्मी

    अभिनय अन् नृत्याचा सूर्य अस्ताला गेला…

    By हर्षा गुप्तेOctober 13, 2026

    नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते पुन्हा एकदा तुमच्या भेटीला. काय दिवस आलेत, चार दिवस झाले…

    संसार से भागे फिरते हो…

    October 11, 2026

    दूसरा आदमी… मनाला भुरळ घालणारे कथानक

    October 6, 2026

    एका नदीची गोष्ट…

    October 4, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    परवशता पाश दैवे ज्यांच्या गळा लागला…

    October 18, 2026

    आठवणींची पेटी… वाट शाळेची!

    October 18, 2026

    Homeopathy : हॅनिमनने उभी केली नवीन उपचारपद्धती!

    October 18, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 18 ते 24 ऑक्टोबर 2026

    October 18, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : पैं वस्तु वस्तुत्वें असिकें, तें आपणपें गुणासारिखें

    October 18, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 18 ऑक्टोबर 2026

    October 18, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 2
    • अध्यात्म 474
    • अवांतर 217
    • आरोग्य 161
    • पंचांग आणि भविष्य 635
    • फिल्मी 74
    • फूड काॅर्नर 260
    • मैत्रीण 32
    • ललित 999
    • शैक्षणिक 87
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    परवशता पाश दैवे ज्यांच्या गळा लागला…

    October 18, 2026

    आठवणींची पेटी… वाट शाळेची!

    October 18, 2026

    Homeopathy : हॅनिमनने उभी केली नवीन उपचारपद्धती!

    October 18, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.