Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    परवशता पाश दैवे ज्यांच्या गळा लागला…

    October 18, 2026

    आठवणींची पेटी… वाट शाळेची!

    October 18, 2026

    Homeopathy : हॅनिमनने उभी केली नवीन उपचारपद्धती!

    October 18, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Sunday, October 18
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » साप्ताहिक राशीभविष्य : 18 ते 24 ऑक्टोबर 2026
    पंचांग आणि भविष्य

    साप्ताहिक राशीभविष्य : 18 ते 24 ऑक्टोबर 2026

    प्राजक्ता काथेBy प्राजक्ता काथेOctober 18, 2026No Comments5 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठी साहित्य, मराठीलेखक, मराठीआर्टिकल, मराठीस्टोरी, राशीभविष्य, बाराराशी, राशीफळ, राशीअंदाज, Weekly horoscope, horoscope, राशी, साप्ताहिक राशीभविष्य, प्राजक्ता काथे
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    मेष

    • या आठवड्यात मोठ्यांचे आशीर्वाद मिळतील. नोकरदारांना कामानिमित्त परदेश प्रवास घडतील. दुसरीकडे, कामाचा ताण वाढेल, मात्र आधी केलेल्या कामाचे श्रेय देखील मिळेल. व्यावसायिक वर्गाचा भागीदाराच्या संदर्भातला अंदाज बरोबर ठरेल. त्यांनी मांडलेल्या कल्पना उपयोगात येतील. उलाढाल वाढून नफा होईल. जुन्या संबंधांना नवा साज चढेल. महिलांसाठी या सप्ताहात घरी आनंदाचे वातावरण राहील. मात्र प्रवास करताना सावध रहा. विद्यार्थ्यांना वाहनाच्या देखभालीचा खर्च करावा लागेल. कलाकार, खेळाडूंना उत्तम संधी मिळेल.

    वृषभ

    • या आठवड्यात कामामध्ये यश मिळेल. नोकरदार जातकांनी केलेल्या कष्टाचे चीज होईल. त्यांना वरिष्ठांकडून लाभ मिळतील. कामाच्या ठिकाणी मिळालेली जबाबदारी पूर्ण करू शकाल. संवादाच्या माध्यमातून व्यावसायिकांना चांगल्या संधी मिळतील. तुमच्या क्षेत्रात आतापर्यंत केलेल्या कार्याची मोठ्या प्रमाणात दखल घेतली जाईल. त्यामुळे प्रसिद्धी मिळेल. कामानिमित्त प्रवास घडेल. महिलांना कोणत्यातरी कारणाने मानसिक ताण जाणवू शकतो. अशावेळी विचारपूर्वक निर्णय घ्या. विद्यार्थ्यांनी कुसंगत टाळावी. आत्मविश्वासाने निर्णय घ्यावेत.

    मिथुन

    • या आठवड्यात प्रसिद्धी मिळेल आणि आर्थिकदृष्ट्या लाभ होईल. नोकरदारांना सहकारी तसेच वरिष्ठ अशा दोघांकडून सहकार्य मिळेल. वरिष्ठांची मर्जी राहील. कामाच्या ठिकाणी खडतर आव्हाने समोर येतील, मात्र त्यातून तुम्ही योग्य मार्ग काढू शकाल. व्यावसायिकांना शुभ वार्ता समजतील. नवीन कॉन्ट्रॅक्ट मिळेल. कुटुंबाच्या वाढत्या मागण्या पूर्ण करू शकाल. कुटुंबातील विवाहयोग्य तरुणांचे विवाह ठरतील. घरी पाहुणे येतील. त्यामुळे महिला वर्गाची धावपळ होईल. घरात रंगकाम करून घेऊ शकाल. विद्यार्थ्यांची प्रगती होईल. स्पर्धा परीक्षेत त्यांना उत्तम यश मिळेल.

    कर्क

    • या आठवड्यात आत्मविश्वासाने कामे पूर्ण करू शकाल. नोकरदारांनी वस्तुस्थितीकडे सकारात्मक दृष्टीने बघण्याची गरज आहे. ऑफिसमधील वातावरण चांगले राहील. कामे पटापट पूर्ण होतील. सरकारी काम पूर्ण करण्यासाठी एखादी ओळख उपयोगी पडेल. व्यावसायिकांना कुटुंबाचा पाठिंबा मिळेल. नवीन करार करताना मध्यस्थ उपयोगी पडेल. वादग्रस्त कामे तडजोड करून मार्गी लावता येतील. महिलांना मनातील इच्छा पूर्ण करता येतील. नवीन वाहन खरेदीचा योग आहे. विद्यार्थ्यांना मेहनत करावी लागेल. स्वतःची कामे स्वतः करा, इतरांवर अवलंबून राहू नका.

    सिंह

    • या आठवड्यात सूर्य राशी बदलून तुळ राशीत नीचीचा होत आहे. त्यामुळे स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या. नोकरदारांना अपेक्षित अशाच घटना घडतील. त्यामुळे उत्साह आणि आत्मविश्वास वाढेल. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. कुटुंबात विवाह ठरेल. त्यामुळे आनंदी वातावरण असेल. व्यावसायिक वर्गाला आर्थिक लाभ होईल. जुनी येणी वसूल होतील. नवीन संधी मिळेल, नवीन करार होतील. कामात खूपच व्यग्र रहाल. महिलांना जबाबदारी पूर्ण करता येईल. कौटुंबिक आयुष्यात समतोल साधू शकाल. विद्यार्थ्यांना जुन्या मित्र-मैत्रिणींना भेटता येईल, त्यामुळे ते आनंदी रहाल.

    हेही वाचा – वास्तुशास्त्र आणि करिअरमधील यश

    कन्या

    • या आठवड्यात बोलण्यात आणि वागण्यात नियंत्रण ठेवा. नोकरदारांनी कोणाशीही वाद घालू नये. आपले काम प्रामाणिकपणे करा. कार्यालयातील गटबाजी तसेच राजकारण यापासून दूर राहा. व्यावसायिकांनी महत्त्वाच्या कामांमध्ये नियम आणि अटींचे पालन करावे. वसुली करताना कायद्याचे पालन करा. आर्थिक अडचण आली, तर लगेच मदत मिळेल. महिलांना घरातील ज्येष्ठ व्यक्तींना भेटण्याचा योग येईल. कामानिमित्त प्रवासही होईल. विद्यार्थ्यांनी वाहन सावकाश चालवावे, वेगावर नियंत्रण ठेवा. वाहतुकीचे नियम पाळा.

    तुळ

    • या आठवड्यात सूर्य तुमच्या राशीत येत आहे. नोकरदारांवर कामाचा ताण राहील. नवीन सहकाऱ्यांशी जुळवून घेताना त्रास होईल. रागावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. स्वतःसाठी मनासारखी खरेदी करू शकाल. व्यावसायिकांचा व्यवसाय जोरात चालू राहील. नवीन संकल्पना फायदेशीर ठरतील. आर्थिक मदत लगेच मिळेल. नवीन इन्व्हेस्टर मिळतील. व्यवसाय मोठा करू शकाल. महिला सामाजिक आणि धार्मिक कार्यात सक्रिय योगदान देऊ शकतील. त्यांना शुभ समाचार मिळतील. विद्यार्थ्यांना एखादी छोटी नोकरी मिळेल. एकंदरीत सगळ्यांसाठीच चांगला आठवडा असेल.

    वृश्चिक

    • या आठवड्यात काळजीपूर्वक निर्णय घ्या. नोकरदारांसमोर नवीन आव्हाने येतील. वरिष्ठांना मान द्या. कामासाठी इतरांवर अवलंबून राहू नका. आपल्या अधिकाराच्या मर्यादा लक्षात घेऊन स्वतःची कामे पूर्ण करणे हिताचे ठरेल. प्रलोभनांपासून दूर राहा. व्यावसायिकांची जुनी येणी वसूल होतील. वस्तुस्थिती बघून निर्णय घ्या. इतरांच्या मताला प्राधान्य द्या. वादविवाद टाळा. महिलांनी मौल्यवान वस्तू तसेच महत्त्वाची कागदपत्रे जपून ठेवावीत. विद्यार्थ्यांना ज्येष्ठांचा आणि गुरूंचा आशीर्वाद लाभेल, त्यांचे अनमोल मार्गदर्शन मिळेल.

    धनु

    • या आठवड्यात आर्थिक आलेख उंचावेल. नोकरदारांवरील कामाचा ताण कमी असेल. ऑफिसमधील वातावरण छान, उत्साही असेल. नवीन गुंतवणूक करू शकाल. गुंतवणुकीसाठी खूप पर्याय मिळतील. यासाठी जाणकाराचा सल्ला घेणे योग्य होईल. व्यावसायिकांना शेअर बाजार तसेच, म्युच्युअल फंड यांच्यात फायदा होण्याची शक्यता आहे. कामानिमित्त प्रवास होईल. महिला नवीन खरेदी करू शकतील. मैत्रिणींबरोबर वेळ घालवाल. विद्यार्थ्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.

    मकर

    • या आठवड्यात घाईघाईने कोणताही निर्णय घेऊ नका. नोकरदारांवर कामाचा ताण असेल. पुढील कामाचे आणि त्यासाठी लागणाऱ्या वेळेचे आधीच नियोजन करून ठेवा. सरकारी नोकरी असेल तर, बदलीची शक्यता आहे. अधिकारात वृद्धी होईल. व्यावसायिकांना तेजी अनुभवायला मिळेल. नफ्याचे प्रमाण वाढेल. कामगार आणि इतर कर्मचारी वर्गाला बोनस देऊ शकाल. नवीन व्यापार सुरू करताना सर्व बाजूंनी विचार करा. महिला कुटुंबासाठी खरेदी करू शकतील. मात्र त्यांनी स्वतःच्या तब्येतीची काळजी घेणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना घरातील ज्येष्ठ व्यक्तीचा आशीर्वाद मिळेल‌. मनाजोगा पॉकेटमनी मिळेल.

    कुंभ

    • या आठवड्यात कामे पूर्ण करताना सरकारी नियम पाळा. नोकरदारांच्या उत्पन्नात वाढ होईल. त्यांना प्रसिद्धी मिळेल. कुटुंबातील तरुणांच्या प्रश्नांकडे जातीने लक्ष द्या आणि ते सोडविण्याचा प्रयत्न करा. व्यावसायिकांनी बोलण्यावर नियंत्रण ठेवावे. इतरांवर अवलंबून राहू नये. स्पर्धक तसेच हितशत्रू यापासून सावध राहा. जाहिरातीसाठी सोशल मीडियाचा वापर करा. महिलांना घरातील ज्येष्ठ व्यक्तीच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात खूप मेहनत घ्यावी लागेल, शॉर्टकट वापरून चालणार नाही.

    हेही वाचा – पत्रिकेतील ग्रह आणि वास्तू

    मीन

    • या आठवड्यात स्वतःच्या खाण्यापिण्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. नोकरदारांनी वरिष्ठांच्या मताला प्राधान्य द्यावे. महत्त्वाची कामे स्वतः करा. राजकारणापासून लांब राहा. व्यावसायिक वर्गाच्या बाबतीत व्यवसायासाठी नवीन करार होण्याची शक्यता आहे. त्यासाठी काही नवीन संकल्पना राबवू शकाल. प्रदर्शनात भाग घेऊ शकाल. महिलांनी घरातील तरुण मुला-मुलींकडे लक्ष द्यावे. त्यांच्याबरोबर वेळ घालवावा. विद्यार्थी एखादा छोटा व्यवसाय करू शकतील. छंद म्हणून काही गोष्टी बनवल्या असतील तर त्यांची विक्री करून थोडीशी रक्कम जमा करता येईल.

    ईमेल – prajaktakathe3970@gmail.com

    प्राजक्ता काथे

    वाणिज्य शाखेत पदवी (1991), ज्योतिष शास्त्री (2003), हस्तसामुद्रिक प्रवीण (2004), कृष्णमूर्ती ज्योतिष भास्कर (2008), होरा मार्तंड (2016) या पदव्या प्राप्त. 2005पासून पत्रिकेच्या आधारे अभ्यासकरून लोकांच्या अडचणीबाबत मार्गदर्शन करीत आहेत. हस्तसामुद्रिक शास्त्र, कृष्णमूर्ती पद्धती आणि होरा शास्त्र यांचा एकत्रित सखोल अभ्यास असून, जीवनातील प्रश्न आणि आव्हानांचे अचूक विश्लेषण करून, व्यवहार्य मार्गदर्शन देण्याचा दीर्घ अनुभव.

    Related Posts

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 18 ऑक्टोबर 2026

    October 18, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 17 ऑक्टोबर 2026

    October 17, 2026 पंचांग आणि भविष्य

    पत्रिकेतील ग्रह आणि वास्तू

    October 16, 2026 पंचांग आणि भविष्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 18 ऑक्टोबर 2026

    By Team AvaantarOctober 18, 2026

    दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 18 ऑक्टोबर 2026; वार : रविवार भारतीय सौर : 26…

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 17 ऑक्टोबर 2026

    October 17, 2026

    पत्रिकेतील ग्रह आणि वास्तू

    October 16, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 16 ऑक्टोबर 2026

    October 16, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    परवशता पाश दैवे ज्यांच्या गळा लागला…

    October 18, 2026

    आठवणींची पेटी… वाट शाळेची!

    October 18, 2026

    Homeopathy : हॅनिमनने उभी केली नवीन उपचारपद्धती!

    October 18, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 18 ते 24 ऑक्टोबर 2026

    October 18, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : पैं वस्तु वस्तुत्वें असिकें, तें आपणपें गुणासारिखें

    October 18, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 18 ऑक्टोबर 2026

    October 18, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 2
    • अध्यात्म 474
    • अवांतर 217
    • आरोग्य 161
    • पंचांग आणि भविष्य 635
    • फिल्मी 74
    • फूड काॅर्नर 260
    • मैत्रीण 32
    • ललित 999
    • शैक्षणिक 87
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    परवशता पाश दैवे ज्यांच्या गळा लागला…

    October 18, 2026

    आठवणींची पेटी… वाट शाळेची!

    October 18, 2026

    Homeopathy : हॅनिमनने उभी केली नवीन उपचारपद्धती!

    October 18, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.