Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    परवशता पाश दैवे ज्यांच्या गळा लागला…

    October 18, 2026

    आठवणींची पेटी… वाट शाळेची!

    October 18, 2026

    Homeopathy : हॅनिमनने उभी केली नवीन उपचारपद्धती!

    October 18, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Sunday, October 18
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » आठवणींची पेटी… वाट शाळेची!
    Blogs

    आठवणींची पेटी… वाट शाळेची!

    नीता चंद्रकांत कुलकर्णीBy नीता चंद्रकांत कुलकर्णीOctober 18, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मी मराठी, मराठी लेख, अभिजात मराठी, नीता चंद्रकांत कुलकर्णी, लेखिका नीता चंद्रकांत कुलकर्णी, लेखिका नीता कुलकर्णी, आठवणींची पेटी, शाळेची आठवण, शाळेच्या आठवणी, शाळेचा रस्ता, शाळेच्या सुखद आठवण, शाळेच्या स्मृती, शाळेजवळ चिंचा विकणारी
    फोटो सौजन्य - AI
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    चिंचा विकत असलेल्या एक ताई रस्त्यावर दिसल्या. त्यांना बघून  माझे मन एकदम खूप मागे गेले. शाळा डोळ्यासमोर आली… शाळेच्या दारात बसून चिंचा, आवळे विकणाऱ्या मावशी आठवल्या. मैत्रिणींबरोबर शाळेत जाताना किती आनंद असायचा नाही का? त्यावेळी घराजवळ असलेल्या शाळेत प्रवेश घेतला जायचा. पायी पायी मैत्रिणींशी गप्पा मारत रमत गमत  शाळेत जायचं. त्यावेळेस गृहपाठ, वर्गपाठाची वही आणि त्या विषयाचं पुस्तक दप्तरात असे. पण त्याचं ‘ओझं’ कधी वाटलं नाही.

    मीना माझ्याकडे येत असे. तिच्याकडे आवळ्याचे झाड होते. ती खिसा भरून आवळे आणायची. रस्त्याने खात खात जायचं. मग आम्ही दोघी वाट वाकडी करून दयाकडे जात असू… दयाचं घर खूप मोठं होतं. मागेपुढे बाग होती. तिच्याकडे स्वयंपाकाला बाई होती, याचं आम्हाला कौतुक वाटायचं. दया आमची वाट पाहात असायची. सगळ्या वर्गात तिचा एकटीचा ड्रेस इस्त्री केलेला असायचा. ती श्रीमंत होती. पण त्याचा कधी ती गर्व बाळगत नसे. हे आता लक्षात येते!

    मग तिथून पुढे आम्ही तिघी सरोजकडे जात असू. ती बाहेर दिसली नाही, की हाक मारायची. “आले… आले” म्हणत ती बाहेर यायची. तिचे केस खूप लांब होते. शाळेचा नियम होता की, दोन वेण्या घालायच्या आणि त्या काळ्या रीबिनीने वर बांधायच्या.

    काही वेळेस तिच्या वेण्या कशातरीच असायच्या. मग ती सांगायची… “काही नाही, नेहमीचंच… आई सकाळीच बाजूला बसलीय…”

    ती हिरमुसायची… “ताईला येत नाही गं माझी वेणी घालायला…” तिची ताई तिच्यापेक्षा फक्त  दीड वर्षांनी मोठी होती. तिच्या वेणीवरून सगळ्या वर्गाला समजायचे…

    हेही वाचा – मैत्रिणींच्या बागेतल्या गप्पा

    आमच्या वर्गात रेळे नावाची मुलगी नवीन आली. तिने सांगितलं की, तिची आई कधी बाजूला बसतच नाही. आम्हाला तेव्हा खूप आश्चर्य वाटलं होतं. घरी गेल्या गेल्या मी आईला विचारलं, तर ती म्हणाली,

    “आधी हात-पाय धू,  डबा घासायला टाक, दप्तर जागेवर ठेव.”

    “अगं पण सांग ना…”

    आई म्हणाली, “मोठी झालीस की, तुला आपोआप कळेल… पोळीचा लाडू ठेवलाय तो खाऊन घे.”

    लाडू म्हटल्यावर तो विषय मी विसरून गेले… किती निरागस मन आणि भोळं वय होतं तेव्हा!

    आमची चौकडी मग प्रभाकडे जात असे. ती शाळेसमोर राहात होती. पण आम्ही आल्याशिवाय ती शाळेत जात नसे. तिची आई खाद्यपदार्थ करून विकायची. त्यावेळेस आम्हाला शाळेत फक्त पोळी-भाजी डब्यात आणायची परवानगी होती. प्रभाच्या आईला खोबऱ्याच्या वड्यांची ऑर्डर असली की, आमच्यासाठी ती वड्या घेऊन यायची. मग आम्ही डबा खाल्ल्यानंतर गुपचूप सर्वांच्या नकळत त्या वड्या खात होतो… त्याची गंमत काही औरच असायची.

    आम्हाला चौघींना घरून कधी खाऊला पैसे मिळायचे नाही. पण दयाला तिचे वडील कधीतरी तिला पैसे द्यायचे. त्या दिवशी ती सांगायची, “आज मला बाबांनी खाऊला दहा पैसे दिलेले आहेत…”

    आम्ही पाच जणी एकदम खूश! कारण दया आम्हाला सोडून कधीही काही खायची नाही. सुट्टीची घंटा झाली की, दया पळत पळत दारातल्या चिंचवाल्या मावशींकडे जाऊन चिंचा घेऊन यायची. त्यादिवशी पोळी-भाजीचा डबा पटकन संपायचा. डबा कट्ट्यावर बसून खायचा. पण चिंचा खायला ‘जंगलजिम’वर जात असू… तिथे बसून चिंचा खाण्यात काहीतरी खूप विशेष गोष्ट केली आहे, असं वाटायचे. तेव्हा साध्या साध्या गोष्टीतही अपार आनंद मिळायचा.

    का कोण जाणे, पण आज चिंचा विकणाऱ्या ताईंमुळे हे सगळं आठवलं… हल्ली मन असंच कधीतरी अचानक मागे जातं… तिथेच रेंगाळतं… आठवणींमध्ये रमून जातं… त्यावेळचं सगळं काही लख्ख नजरेसमोर दिसतं…

    हेही वाचा – ते दोघे…

    शाळेने खूप काही शिकवलं. तसंच हा न विसरता येणारा आनंद आणि मैत्रिणी पण दिल्या. आजही त्या तेवढ्याच आठवतात… आणि मन प्रफुल्लित करतात! शाळेत अभ्यास, परीक्षा होती… पण नंतर सुट्टी असायची. मोठं झाल की, लक्षात येते… जीवन हीच एक परीक्षा आहे तिथे सुट्टी नाहीच… म्हणून आपल्या मनानेच सुट्टी घ्यायची… असंच आपलं आपण कुठेतरी भटकून यायचं. भूतकाळातल्या आठवणी काढत… अपार आनंद  मिळतो…

    तुम्हाला आठवते का तुमची शाळा?

    खरंच सांगते… परत एकदा त्या रस्त्यावरून जाऊन या… खूप छान वाटते… पुण्याच्या मॉडर्न  हायस्कूलसमोरून जाताना अजूनही ही माझी शाळा…. असं मनात येते. चिंचवाल्या मावशी दारात बसल्याचा भासही होतो…

    तुम्ही पण बघा ना… एकदा हा अनुभव घेऊन! त्याच्या इतका निखालस आनंद कशातही नाही…

    Avatar photo
    नीता चंद्रकांत कुलकर्णी

    एमए असून माझे वय 73 आहे. मी किर्लोस्कर, स्त्री, मनोहर इत्यादी मासिकांत कथा लिहित होते. माझा ‘पूजा’ हा कथासंग्रह सरकारी प्रकाशनातर्फे प्रसिद्ध झालेला आहे. पूर्वी छोट्या ग्रुपमध्ये कथाकथन करत होते. माझे मिस्टर स्टेट बँकेत नोकरीला होते. आता रिटायर आहेत. आम्ही सांताक्रुजला रहात असताना काही वर्षं तेथे कौन्सिलिंग करत होते. पुण्यात आल्यानंतर काही वर्षे मी पौरोहित्य करत होते. सध्या थोडेफार लिखाण सुरू आहे. मोबाइल - 9763631255

    Related Posts

    गुरुजी आराध्याला म्हणाले, “सावध रहा”; कारण…

    April 3, 2026 Blogs
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    Blogs

    गुरुजी आराध्याला म्हणाले, “सावध रहा”; कारण…

    By प्रणाली वैद्यApril 3, 2026

    भाग – 19 निशा हळूवारपणे आराध्याच्या उशाखाली हात घालण्याचा प्रयत्न करत होती… तेवढ्यात एक विचित्र…

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    परवशता पाश दैवे ज्यांच्या गळा लागला…

    October 18, 2026

    आठवणींची पेटी… वाट शाळेची!

    October 18, 2026

    Homeopathy : हॅनिमनने उभी केली नवीन उपचारपद्धती!

    October 18, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 18 ते 24 ऑक्टोबर 2026

    October 18, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : पैं वस्तु वस्तुत्वें असिकें, तें आपणपें गुणासारिखें

    October 18, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 18 ऑक्टोबर 2026

    October 18, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 2
    • अध्यात्म 474
    • अवांतर 217
    • आरोग्य 161
    • पंचांग आणि भविष्य 635
    • फिल्मी 74
    • फूड काॅर्नर 260
    • मैत्रीण 32
    • ललित 999
    • शैक्षणिक 87
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    परवशता पाश दैवे ज्यांच्या गळा लागला…

    October 18, 2026

    आठवणींची पेटी… वाट शाळेची!

    October 18, 2026

    Homeopathy : हॅनिमनने उभी केली नवीन उपचारपद्धती!

    October 18, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.