Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    ‘क्लिक’ झालेल्या जोडीदाराकडून नेमक्या अपेक्षा काय?

    September 18, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : मोक्षासकट गती, जेथें येती विश्रांती

    September 18, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 18 सप्टेंबर 2026

    September 18, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Friday, September 18
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » ‘क्लिक’ झालेल्या जोडीदाराकडून नेमक्या अपेक्षा काय?
    पंचांग आणि भविष्य

    ‘क्लिक’ झालेल्या जोडीदाराकडून नेमक्या अपेक्षा काय?

    अस्मिता दीक्षितBy अस्मिता दीक्षितSeptember 18, 2026No Comments5 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठी लेख, मराठी कथा, मराठी साहित्य, मी मराठी, अभिजात मराठी, मराठी लेखक, अस्मिता दीक्षित, लेखिका अस्मिता दीक्षित, ज्योतिष अस्मिता दीक्षित, ज्योतिषशास्त्र, पत्रिकेतील ग्रह, पत्रिका गुणमिलन, ग्रहमिलन, जन्मपत्रिकेचा अभ्यास, विवाह सोहळा, वैवाहिक जीवन,
    फोटो सौजन्य - चॅटजीपीटी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    || श्री स्वामी समर्थ ||

    आज लग्न हा यक्षप्रश्न झालेला आहे. आपल्या मुलांच्या डोक्यावर अक्षता कधी पडतील, याची अक्षरशः चातकासारखी वाट पालक बघताना दिसत आहेत. सुस्वरूप आहे, निर्व्यसनी आहे… सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत, मग घोडे अडतंय तरी कुठे? यामुळे पालकसुद्धा त्रस्त झालेले आहेत. “काय ठरले का मुलाचे / मुलीचे लग्न?” हा प्रश्न मनापासून असो अथवा खवचटपणे विचारला गेलेला असो, तो विचारणे आता बंद झाले पाहिजे. काय आहे, तुमच्या भावना कितीही चांगल्या असतील, पण हे ऐकणारा आता या प्रश्नाने सुद्धा त्रासला आहे. विवाह ठरला की, तुम्हाला नक्की बोलावणार! मग कशाला विचारायचे? यावर नक्की विचार करा.

    अनेकदा मुलगा / मुलगी मला क्लिक (click) म्हणजे पसंत पडत नाही म्हणून स्थळ नाकारले जाते. आजकाल तर फोन उचलत नाहीत, नकाराची साधी कारणं सांगत नाहीत, अशी अनेकविध घटना ऐकायला मिळतात. त्याला मुलगी आवडायला हवी, असे जेव्हा पालक म्हणतात, त्याचवेळी लक्षात येते की, स्थळाच्या पसंतीत पालकांचा सहभाग किंवा त्यांचे मत हे किती अंशी असणार आहे. आज विवाहाची वये पाहता, ही पिढी संपूर्णतः अविवाहित राहणार की काय, अशी भीती वाटू लागलेली आहे.

    असो. आपल्याला क्लिक झालेली मुलगी म्हणजे नेमके काय? तिचे दिसणे, हसणे अर्थात बाह्य रूप. ती जरा सर्वसाधरण आहे की, मॉर्डन लूकची आहे? थोडक्यात, तिची देहबोली आणि रंगरूप. जो चेहरा रोज आयुष्यभर पाहायचा, तो आपल्या पसंतीचा हवा, हे नक्की पण फक्त दिसणे, हसणे, कपडे आणि so called modern look हाच पसंतीचा जर निकष असेल, तर मात्र आपला निर्णय चुकू शकतो. कारण, आपण व्यक्तीचे गुण पहिलेच नाहीत, फक्त बाह्यरूपावर निर्णय घेऊ पाहात आहोत. रंग-रूप शाश्वत नाही. एखादे स्थळ अगदीच प्रथमदर्शनी नाहीच आवडले…. की, मुलगी खूप जाडी आहे, आपल्या व्यक्तिमत्वाला शोभणार नाही… तर, तिथेच थांबा. पण इतर वेळी मुलीला / मुलाला भेटा. एकमेकांचे विचार जाणून घ्या. समोरच्या व्यक्तीचे अनेक चांगले पैलू जे संसार करण्यासाठी उपयुक्त ठरतील, ते त्या भेटीत उलगडतील आणि एक चांगले स्थळ आपण नाकारले नाही, याची खंत वाटणार नाही.

    प्रत्यक्ष भेट महत्त्वाची आहे. लहानसहान गोष्टीतून सुद्धा आपल्याला अनेक बाबी समजतात. आजकालची मुले-मुली तितकी समंजस नक्कीच आहेत. पण त्यात आता थोडे पालकांनी त्यांचे मतसुद्धा मांडले पाहिजे, आपल्या मुलांचे हित त्यांनाही समजते. दर दोन दिवसांनी मुले स्थळे नाकारत आहेत, तर ती का? हाही अभ्यासाचा विषय बनला आहे, आज पालकांसाठी.

    आर्थिक बाजू म्हणजे मिळकत हा विषयसुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. कारण तो नेहमी तसाच राहणार नाही, वाढतच जाणार आहे. पण त्याचसोबत आपले वयसुद्धा वाढणार आहे, हेही विसरता उपयोगी नाही. आपल्याला आयुष्यात हौसमौज करण्याची, फिरण्याची, मजा करण्याची, सगळी उमेदीची वर्षं निघून जात आहेत, त्याचाही विचार केला पाहिजे. आपापले so called attitude बाजूला ठेवले, तर अनेक विवाह असेच जुळून येतील. याचा पालक आणि पाल्यांनी सुद्धा विचार करावा.

    ज्योतिष शास्त्राच्या दृष्टीकोनातून गुणमिलन, ग्रहमिलन केले, तर संसारिक आयुष्याची दिशा नेमकी काय ती ठरवता येईल. हे शास्त्र तुमच्या सदैव मदतीला आहे. पुढील चांगल्या वाईट गोष्टींचे सूतवाक्य करणारे, हे शास्त्र तुम्हाला मार्गदर्शक ठरेल, यात वादच नाही.

    हेही  वाचा – जातकांचे ज्योतिष ज्ञान

    आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टी – जसे बाळाचे नामकरण, मुंज, विवाह अशा मंगल कार्यासाठी तसेच घराचे वास्तुशांतीचे मुहूर्त यासाठी आपण ज्योतिषाची मदत घेतो. पूर्वापार चालत आलेले गुणमिलनही करतो, पण आज काळाची गरज ओळखून ग्रहमिलन हे सुद्धा करायला पाहिजे. पूर्वी, मुलगी नोकरी करते का? हा प्रश्नच नव्हता, कारण तेव्हा स्त्रिया चूल आणि मूल यातच गुंतलेल्या होत्या, किंबहुना त्यांच्याकडून तेच अपेक्षित होते. आजचे प्रगत युग आहे, वैचारिक स्वातंत्र आहे. तरीही आज आपल्या समाजाची पाळेमुळे ही रूढी आणि परंपरा मान्य करणारी असल्यामुळे बहुतेक विवाह हे पत्रिका बघूनच जुळवले जातात. शेवटी सर्व गोष्टी जुळून येणे म्हणजेच मनोमिलन होय.

    गुणमिलनाचे निकष लावताना डोळसपणे लावले पाहिजेत, कारण हे गुणमिलन आणि त्याचे नियम हे प्राचीन काळापासून आहेत. तेव्हाची समाजव्यवस्था आणि काळ हा वेगळा होता. ‘एक नाड दोष’ यावरून स्थळे नाकारली जातात; पण एक नाड असेल आणि नक्षत्राचे चरण वेगळे असेल, तर तो दोष मानला जात नाही. तसेच, एक नाड असेल तर शास्त्रात त्यासाठी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, त्या तपासून न बघता स्थळ नाकारू नये.

    सर्वात मुख्य म्हणजे दोघांच्या सद्यस्थितीतील महादशा काय सांगत आहेत आणि पुढे येणाऱ्या सुद्धा बघितल्या पाहिजेत. कारण, शेवटी दशा महत्त्वाच्या आहेत. त्याचप्रमाणे विवाह योग निर्माण करणारे गोचरीचे योग, त्यांना डावलून कसे चालेल? अनेक योग येतात आणि जातात, पण जेव्हा अतिप्रखर योग येतो, तेव्हा विवाह ठरतो आणि होतो सुद्धा.

    वैवाहिक सुख, एकंदरीत आयुष्यातील अर्थार्जन, संतती होणार का? आणि स्वतःचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य या बाबी तपासण्यासाठी पत्रिकेचा अभ्यास उपयोगी पडतो. थोडक्यात, सहजीवन कसे असेल, याचा वैयक्तिक अभ्यास करून मग ग्रहमिलन करावे. त्यात आपल्याला दोघांचेही विचार करण्याची वृत्ती आणि क्षमता समजते. मानसिक दुर्बलता किंवा सक्षमता, हेही समजते. तसेच, एखाद्या समस्येशी दोन हात करण्याची वृत्ती, संसाराकडे असलेली ओढ दिसून येते; म्हणून गुणमिलन अति अतिमहत्त्वाचे आहे. उद्या मुले झाली की, त्यांची आजारपणे आहेत, त्यांचे संस्कार आहेत, शिक्षण आहे… हे दोघांनीही पाहिले पाहिजे. स्त्रीने जन्म दिला म्हणून ती तिची एकटीची जबाबदारी नाही, तर दोघांचाही समान वाटा – जबाबदारी सगळ्या प्रश्नांत असायला हवी. ती असणार आहे का? प्रत्येक वेळेस ‘मला काम आहे’, हे उत्तर चालणार नाही. कारण काम तिलाही असते, किंबहुना काकणभर जास्तीच असते. या बाबतची मानसिकता दोघांच्या भेटीत समजेल, पण पत्रिकेतील ग्रह बोलतील, तेव्हा अनेक गोष्टी अधिक सुस्पष्ट होतील.

    हेही वाचा – पत्रिका गुणमिलन करताना

    एखादा मुलगा जर करिअरमागे खूप धावणारा असेल, व्यवसायात बुडून गेलेला असेल, तर तो बायकोच्या मागे पिंगा घालणार नाही आणि तिची नेमकी तीच अपेक्षा असेल, म्हणजे नवऱ्याने गजरा आणावा वगैरे तिला वाटते, पण ते त्याच्याकडून पूर्ण होत नसेल तर मग दोघांच्यात एक मानसिक दरी निर्माण होते आणि काही काळाने ती मोठी होत जाते. अर्थात, गजरा आणणे हेच प्रेमाचे द्योतक नाही, पण मानसिक दृष्टीने पहिले तर अनेकदा स्त्रिया तेच तेच धरूनही ठेवतात. त्यामुळे संसारात प्रत्येक गोष्टीत समंजसपणा असायला लागतो. कारण संसार शेवटी त्या दोघांचाच असतो. पतीकडून किंवा पत्नीकडून असलेल्या अपेक्षा तसेच आपल्या आयुष्यातील प्राधान्यक्रम – करिअर पैसा वगैरे – सर्व गोष्टी मोकळेपणाने बोलल्या गेल्या पाहिजेत.

    म्हणूनच आजकाल क्लिक झालेले स्थळ हे सर्वार्थाने क्लिक होण्यासाठी वरती नमूद केलेले सर्व परामर्श तपासले पाहिजेत आणि त्यात बहुतांशी अपेक्षा (सगळ्या पूर्ण होणार नाहीत, कारण आपणही परिपूर्ण नाहीत) पूर्ण झाल्या तर स्थळ खर्या अर्थाने ‘क्लिक’ होईल.

    मुळात विवाह करण्याची मानसिकता तयार व्हावी लागते, कारण ही एक मोठी जबाबदारी सुद्धा आहे. विवाह उत्सुक सर्वाना खूप शुभेच्छा आणि त्यांचे विवाह लवकर जुळून यावेत यासाठी महाराजांकडे अंतर्मनापासून प्रार्थना.


    पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230

    antarnad18.blogspot.com

    Avatar photo
    अस्मिता दीक्षित

    जवळपास 18 वर्षं IT क्षेत्रात recruitment मध्ये कार्यरत होते. त्यानंतर केसरी टूर्समध्ये 3 वर्षं लेखन केले. तसेच, ‘antarnad18.blogspot.com’ हा स्वतःचा ब्लॉग सुरू केला. लोकमत, सकाळ या दैनिकांमध्ये लेखन केले. ज्योतिष शास्त्राचे कुतूहल पहिल्यापासून होते, त्यामुळे 1999पासून या शास्त्राचे अध्ययन केले आणि अविरत करत आहे. माझे परमगुरु श्री गजानन महाराज आणि श्री स्वामी समर्थ यांच्या सेवेत रुजू आहे. त्यांची कृपा आहे म्हणून सर्व चालले आहे, हा ठाम विश्वास आहे. गेली 10 वर्षं ‘हसत खेळत ज्योतिष शिकूया’ या कार्यशाळांचे झूमच्या माध्यमातून आयोजन करत आहे.

    Related Posts

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 18 सप्टेंबर 2026

    September 18, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 17 सप्टेंबर 2026

    September 17, 2026 पंचांग आणि भविष्य

    वास्तुशास्त्र… मानसिक तणाव आणि नैराश्य

    September 16, 2026 पंचांग आणि भविष्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 18 सप्टेंबर 2026

    By Team AvaantarSeptember 18, 2026

    दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 18 सप्टेंबर 2026; वार : शुक्रवार भारतीय सौर : 27…

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 17 सप्टेंबर 2026

    September 17, 2026

    वास्तुशास्त्र… मानसिक तणाव आणि नैराश्य

    September 16, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 16 सप्टेंबर 2026

    September 16, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    ‘क्लिक’ झालेल्या जोडीदाराकडून नेमक्या अपेक्षा काय?

    September 18, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : मोक्षासकट गती, जेथें येती विश्रांती

    September 18, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 18 सप्टेंबर 2026

    September 18, 2026

    लग्न – आकड्यांमध्ये अडकलेली भावना!

    September 17, 2026

    नातं भाऊ बहिणीचं…

    September 17, 2026

    आनंदाचे फुगे

    September 17, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 439
    • अवांतर 208
    • आरोग्य 147
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 587
    • फिल्मी 68
    • फूड काॅर्नर 255
    • मैत्रीण 29
    • ललित 926
    • शैक्षणिक 87
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    ‘क्लिक’ झालेल्या जोडीदाराकडून नेमक्या अपेक्षा काय?

    September 18, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : मोक्षासकट गती, जेथें येती विश्रांती

    September 18, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 18 सप्टेंबर 2026

    September 18, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.