Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    सार्थ ज्ञानेश्वरी : प्रकृति येणें जिये, याचिया सत्ता जग विये

    September 15, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 15 सप्टेंबर 2026

    September 15, 2026

    Movie : ‘The Intouchable’… जगावेगळी कहाणी

    September 14, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, September 15
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 14 सप्टेंबर 2026
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 14 सप्टेंबर 2026

    Team AvaantarBy Team AvaantarSeptember 14, 2026No Comments7 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, पंचांग, दिनविशेष, Panchang, Dinvishesh, दर्शन कुलकर्णी, कुंडली, राशीभविष्य, आजचे राशीभविष्य, ज्योतिष
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दर्शन कुलकर्णी

    • आज, दिनांक : 14 सप्टेंबर 2026; वार : सोमवार
    • भारतीय सौर : 23 भाद्रपद शके 1948; तिथि : तृतीया 07:06; नक्षत्र : चित्रा 13:54;
    • योग : ब्रह्मा 12:45; करण : वणिज 19:20;
    • सूर्य : सिंह; चंद्र : तुळ; सूर्योदय : 06:25; सूर्यास्त : 18:44;
    • पक्ष : शुक्ल; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव;
    • शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128

    हरितालिका तृतीया

    स्वर्णगौरी व्रत

    श्रीगणेश चतुर्थी

    पार्थिव गणपती पूजन

    वेद कन्सल्टन्सी / 9987433660


    दिनविशेष

    नट, दिग्दर्शक पार्श्वनाथ यशवंत आळतेकर

    टीम अवांतर

    मराठीतील नट, दिग्दर्शक, नाट्यसंस्थाप्रवर्तक आणि नाट्यशिक्षक म्हणून ओळखले जाणारे पार्श्वनाथ यशवंत आळतेकर यांचा जन्म 14 सप्टेंबर 1898 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील खारेपाटण या गावात झाला. बी.ए. पर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी रंगभूमी आणि चित्रपटविश्व या दोन्ही क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवला.

    1924 पासून आळतेकर यांनी मूकपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. केवळ नट म्हणूनच नव्हे, तर दिग्दर्शक म्हणूनही त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली. ‘इंपिरियल’, ‘सरस्वती सिनेटोन’, ‘रणजित’ आणि ‘नटराज फिल्म्स’ यांसारख्या नामांकित चित्रपटसंस्थांमध्ये त्यांनी काम केले. याशिवाय त्यांनी दिग्दर्शित केलेल्या मूकपट तसेच बोलपटांमध्ये संभाजी, साथी–सवंगडी (हिंदी-मराठी), सुखाचा शोध (हिंदी-मराठी), गीता (हिंदी-मराठी), महात्मा विदुर (हिंदी-मराठी) हे चित्रपट विशेष उल्लेखनीय ठरले. हिंदी, मराठी व्यतिरिक्त कन्नड तसेच तमिळ चित्रपटांचेही दिग्दर्शन करून त्यांनी आपल्या कर्तृत्वाला कोणत्याही भाषेचे बंधन नाही हे सिद्ध केले.

    हेही वाचा – ‘तहादेर कथा’… आदर्शांच्या मृत्यूची कथा

    आळतेकरांनी  मराठी रंगभूमीच्या क्षेत्रात मोठे योगदान दिले. अगदी सुरुवातीला त्यांनी नंदू खोटे यांच्या ‘रेडिओ स्टार्स’ या नाट्यसंस्थेत काही काळ काम केले. या संस्थेमार्फत श्री. न. बेंडे लिखित ‘बेबी आणि पांचाली’, टिपणीस यांचे ‘स्वस्तिक बँक’, तसेच ठाकरे यांचे ‘खरा ब्राह्मण’ ही नाटके रंगभूमीवर आणली. कालांतराने त्यांनी ‘रेडिओ स्टार्स’ सोडून ‘नाट्यमन्वंतर’ या संस्थेत नट आणि सहकारी म्हणून काम केले.

    त्यांच्या नाट्यदृष्टीत सातत्याने प्रयोगशीलता आणि पाश्चात्य नाट्यशैलींचा प्रभाव दिसून येतो. 1938 ते 1944 या कालावधीत त्यांनी ‘नॅशनल थिएटर ॲकॅडमी’ ही संस्था चालवली. अभिनयाचे शास्त्र, आवाजाची जपणूक आणि रंगकलेचे प्रशिक्षण देणारी ही संस्था म्हणजे मराठी रंगभूमीसाठी एक मोलाची देणगी होती. या अकादमीतील विद्यार्थ्यांच्या सहकार्याने त्यांनी 1941 मध्ये ‘लिट्ल थिएटर’ ची स्थापना केली. इंग्लंडमधील ‘लिट्ल थिएटर्स’ आणि अमेरिकेतील ‘कम्युनिटी थिएटर्स’ यांचा प्रभाव या प्रयोगशील संस्थेवर होता. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी माझ्या कलेसाठी आणि सारस्वत  ही मामा वरेरकर यांची नाटके रंगभूमीवर आणली.

    नट म्हणून आळतेकरांच्या अभिनयात योजनाबद्धता, परिश्रम आणि सखोल विचार यांचा संगम दिसतो. त्यांच्या गाजलेल्या भूमिकांमध्ये अण्णासाहेब (आंधळ्यांची शाळा), रामशास्त्री (भाऊबंदकी), बापूसाहेब (रंभा) यांचा विशेष उल्लेख करता येईल. साकारलेल्या प्रत्येक व्यक्तिरेखेचे मनोविश्लेषण अचूक  साकारत त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर  छाप सोडली.

    1957 साली सोलापूरच्या ‘अभिनय साधना मंदिर’ संस्थेतर्फे भरलेल्या नाट्यसंमेलनाच्या एकोणचाळिसाव्या अधिवेशनाचे अध्यक्षस्थान आळतेकरांना लाभले. हे त्यांच्या नाट्यदृष्टीची मोठी मान्यता मानली जाते. 22 नोव्हेंबर 1959 रोजी कोल्हापूर येथे त्यांचे निधन झाले. मात्र त्यांची कला, त्यांचे प्रयोगशील कार्य आजही जिवंत आहे.

    1964 पासून त्यांच्या स्मरणार्थ ‘अभिनय’ संस्थेच्या वतीने मुंबईतील हौशी नाट्यसंस्थांसाठी नाट्यस्पर्धा आयोजित केल्या जात आहेत. या स्पर्धा म्हणजे त्यांच्या कलात्मक वारशाचे जिवंत प्रतीक आहे. पार्श्वनाथ यशवंत आळतेकर यांनी मराठी रंगभूमीकडे मनोरंजनाचे व्यासपीठ म्हणून न बघता, तिला प्रयत्नपूर्वक प्रयोगशीलतेचा आणि शिक्षणाचा वारसा दिला. आधुनिक पाश्चात्य नाट्यप्रणालींचा मराठी रंगभूमीवर केलेला त्यांनी केलेला प्रयोग, शास्त्रशुद्ध अभिनयाची त्यांनी केलेली जपणूक आणि नव्या पिढीस दिलेले प्रशिक्षण हीच त्यांची खरी ओळख बनली.


    आजचे राशिभविष्य

    मेष – गणपती बाप्पांच्या स्वागतासाठी आज तुमचे लक्ष कुटुंब आणि घरगुती बाबींकडे अधिक असेल. आजच्या दिवशी तुमचे विचार व्यावहारिक ठेवा. आर्थिक परिस्थिती स्थिर राहील आणि भविष्यातील योजना आखण्यासाठी दिवस चांगला आहे. भावनेच्या आहारी जाऊन अनावश्यक खर्च टाळा. करिअर अतिशय उत्तम राहील. तणाव, झोप किंवा पचनाशी संबंधित किरकोळ आरोग्य समस्या उद्भवू शकतात, त्यामुळे मन शांत ठेवा.

    वृषभ – गणपती बाप्पाच्या कृपेने आजचा दिवस प्रवास, वैयक्तिक प्रयत्न आणि आपले म्हणणे प्रभावीपणे मांडण्यासाठी चांगला असेल. आर्थिक परिस्थिती सुधारण्याची शक्यता आहे. उत्पन्न वाढवण्यासाठी किंवा गुंतवणूक करण्यासाठी चांगल्या योजना आखू शकता. मात्र दिखाऊपणावर जास्त खर्च करणे टाळा. तुमच्या संवाद कौशल्यामुळे एखादी महत्त्वाची चर्चा यशस्वी होऊ शकते. अर्थात घाईने निर्णय घेणे टाळा. मानसिक थकवा टाळण्यासाठी पुरेशी विश्रांती घेणे आवश्यक आहे.

    मिथुन – आज तुमचे लक्ष पैसा, बचत आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांवर असेल. तुमचे  संभाषण कौशल्य आणि आत्मविश्वास लोकांना प्रभावित करेल, ज्यामुळे तुमची सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. मात्र मानसिक ताण किंवा गोंधळामुळे कोणताही निर्णय घेणे टाळा. प्रलंबित रक्कम मिळण्याची शक्यता आहे, परंतु अविचारीपणे खर्च करणे टाळा. तुमची सर्जनशीलता आणि ओळखी तुमच्या करिअरसाठी फायदेशीर ठरतील. तुमचे वरिष्ठ तुमच्या प्रतिभेची प्रशंसा करू शकतात. मनःस्थितीतील चढ-उतार टाळण्यासाठी, शांत वातावरणात स्वतःला वेळ द्या.

    कर्क – गणेशाच्या कृपेने आज अंतर्ज्ञान प्रबळ असेल. स्वतःच्या वैयक्तिक निर्णयांबद्दल पूर्वीपेक्षा अधिक स्पष्टता जाणवू शकते. आर्थिक बाबी स्थिर राहतील, भविष्यात गुंतवणुकीच्या चांगल्या संधी उपलब्ध होऊ शकतात, परंतु भावनेच्या आहारी जाऊन खर्च करणे टाळा. करिअरमध्ये जबाबदाऱ्यांचा दबाव जाणवू शकतो, परंतु तुमची समज आणि भावनिक संतुलन परिस्थिती हाताळण्यास मदत करेल. जास्त विचार केल्याने  झोपेवर किंवा पचनक्रियेवर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे विश्रांतीला प्राधान्य द्या.

    सिंह – आत्मपरीक्षण आणि आध्यात्मिक कार्यांकडे आज कल वाढू शकतो. तथापि, जास्त विचार केल्याने मानसिक थकवा आणि अस्वस्थता येऊ शकते. तुमचा व्यावहारिक दृष्टिकोन तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये पुढे नेईल आणि मोठी जबाबदारी स्वीकारण्याचे धैर्य देईल. चैनीच्या वस्तू किंवा प्रवास यामुळे अचानक खर्च वाढू शकतो, त्यामुळे आपल्या बजेटची काळजी घ्या. ध्यान किंवा शांत वातावरणात वेळ घालवणे तणाव कमी करण्यासाठी फायदेशीर ठरेल.

    कन्या – बाप्पांच्या कृपेने आज, तुम्हाला मित्र, सहकारी आणि सामाजिक संपर्कांमधून महत्त्वपूर्ण लाभ मिळू शकतात. तुमचा आत्मविश्वास वाढेल, निर्णयक्षमता सुधारेल. सामायिक जबाबदाऱ्या किंवा आर्थिक बाबींशी संबंधित काही भावनिक दबाव तुम्हाला जाणवू शकतो, त्यामुळे संयम बाळगा.  करिअरमध्ये तुमच्या मेहनतीची आणि प्रतिभेची दखल घेतली जाऊ शकते. आरोग्य सामान्य राहील, परंतु तणाव आणि मनःस्थितीतील चढउतार टाळण्यासाठी स्वतःच्या आहार आणि विश्रांतीकडे लक्ष द्या.

    तुळ – आज तुमचे संपूर्ण लक्ष तुमच्या करिअर, जबाबदाऱ्या आणि सामाजिक प्रतिष्ठेवर असेल. कामाच्या ठिकाणी तुमची समज आणि भावनिक संतुलन तुम्हाला इतरांपेक्षा वेगळे ठरवू शकते. अनुभवी व्यक्तींचा पाठिंबा आणि तुमची सर्जनशील विचारसरणी तुम्हाला पुढे जाण्यास मदत करेल. आर्थिक परिस्थिती स्थिर राहील. भविष्यातील सुरक्षिततेसाठी गुंतवणुकीचे नियोजन करू शकता, परंतु दिखाऊपणासाठीचा खर्च टाळा.  मानसिक थकवा टाळण्यासाठी, हलका व्यायाम करा, पुरेशी विश्रांती घ्या.

    वृश्चिक – आज बाप्पांची तुम्हाला मोठी साथ मिळणार आहे. धार्मिक किंवा आध्यात्मिक कार्यांमधील तुमची आवड वाढू शकते. वाढलेला कामाचा भार आणि दैनंदिन जबाबदाऱ्यांमुळे शारीरिक थकवा येऊ शकतो. करिअर-संबंधित निर्णयाबाबत तुम्ही संभ्रमात असाल, तर घाई करू नका. आर्थिक परिस्थिती हळूहळू सुधारेल. गुंतवणूक किंवा संयुक्त आर्थिक बाबींमधून फायदा होऊ शकतो. तथापि, जोखमीच्या गुंतवणुकी टाळा. आज अंगदुखी किंवा तणाव जाणवू शकतो, त्यामुळे मानसिक शांतीसाठी ध्यान आणि विश्रांतीचा अवलंब करा.

    हेही वाचा – ऑपरेशन

    धनु – आज तुमच्या मनात दडलेल्या चिंता किंवा असुरक्षिततेची भावना उफाळून वर येऊ शकते, त्यामुळे स्वतःला विनाकारण ताण देणे टाळा. गणपती बाप्पा तुम्हाला आत्मविश्वास आणि सर्जनशील ऊर्जा देईल, परंतु अनावश्यक जोखीम पत्करण्याच्या तुमच्या प्रवृत्तीवर तुम्हालाच नियंत्रण ठेवावे लागेल. काम आणि आरोग्याशी संबंधित बाबींमध्ये शिस्त राखणे आवश्यक असेल. आर्थिकदृष्ट्या, दिवस सामान्य राहील.  जोखमीच्या गुंतवणुकी करणे किंवा भावनिकदृष्ट्या वाहवत जाऊन अनावश्यक खर्च करणे टाळा. करिअरमधील व्यावहारिक विचारसरणी तुम्हाला तुमच्या जबाबदाऱ्या सहजतेने पार पाडण्यास मदत करेल.

    मकर – आज नातेसंबंध आणि भागीदारीशी संबंधित बाबींवर विशेष लक्ष दिले जाईल.  बाप्पांच्या आशीर्वादाने आत्मविश्वास आणि व्यावहारिक निर्णयक्षमता मजबूत राहील. कामाच्या ठिकाणी प्रगतीच्या संधी उपलब्ध होतील, मात्र वाढलेल्या जबाबदाऱ्यांमुळे मानसिक थकवा येऊ शकतो. घरात तणाव किंवा वाद होण्याची शक्यता आहे, त्यामुळे हट्टीपणा टाळा. आर्थिक स्थिरता टिकून राहील, ज्यामुळे दीर्घकालीन योजना अधिक मजबूत होतील, परंतु चैनीच्या वस्तूंवरील अनावश्यक खर्च टाळा. नातेसंबंधातील तणावामुळे मानसिक शांततेवर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे शांत राहण्याचा प्रयत्न करा. तुमचे करिअर स्थिर राहील.

    कुंभ – आज काम, आरोग्य आणि दैनंदिन जबाबदाऱ्या यामुळे  संपूर्ण दिवस व्यस्त असाल. कामाचा ताण वाढू शकतो,  तुम्हाला मध्येच गोंधळल्यासारखे किंवा चिंताग्रस्त वाटू शकते. अर्थात गणेशाच्या कृपेने परिस्थिती व्यवस्थितपणे हाताळू शकाल. तुम्हाला संभाषणात आत्मविश्वास वाटेल, पण कठोर शब्द टाळा. आर्थिक परिस्थिती स्थिर राहील, परंतु घरगुती गरजांसाठी बजेटमध्ये राहूनच खर्च करणे महत्त्वाचे आहे. आज थकवा किंवा पचनाच्या समस्या जाणवू शकतात, त्यामुळे पुरेशी झोप आणि पाणी घ्या.

    मीन – आज तुमची कल्पनाशक्ती, सर्जनशीलता या भावना प्रबळ असतील. संततीशी संबंधित बाबींकडेही लक्ष द्याल. तुमची निर्णयक्षमता सुधारेल, संयमामुळे तुम्ही भावनिक परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळू शकाल. आर्थिक बाबींमध्ये व्यावहारिक दृष्टिकोन ठेवा. अनावश्यक खर्च आणि जोखमीच्या गुंतवणुकी टाळा. मानसिक संवेदनशीलतेमुळे झोपेवर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे योग आणि ध्यान उपयुक्त ठरेल. तुमच्या करिअरमध्ये तुमच्या सर्जनशीलतेचे खूप कौतुक होईल; शिस्त राखणे महत्त्वाचे आहे.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 15 सप्टेंबर 2026

    September 15, 2026 पंचांग आणि भविष्य

    वैदिक ज्योतिषशास्त्र : 100 महत्त्वपूर्ण सिद्धांत – आरोग्याच्या समस्या, मैत्रीची गुणवत्ता

    September 14, 2026 पंचांग आणि भविष्य

    साप्ताहिक राशीभविष्य : 13 ते 19 सप्टेंबर 2026

    September 13, 2026 पंचांग आणि भविष्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 15 सप्टेंबर 2026

    By Team AvaantarSeptember 15, 2026

    दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 15 सप्टेंबर 2026; वार : मंगळवार भारतीय सौर : 24…

    वैदिक ज्योतिषशास्त्र : 100 महत्त्वपूर्ण सिद्धांत – आरोग्याच्या समस्या, मैत्रीची गुणवत्ता

    September 14, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 13 ते 19 सप्टेंबर 2026

    September 13, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 13 सप्टेंबर 2026

    September 13, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    सार्थ ज्ञानेश्वरी : प्रकृति येणें जिये, याचिया सत्ता जग विये

    September 15, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 15 सप्टेंबर 2026

    September 15, 2026

    Movie : ‘The Intouchable’… जगावेगळी कहाणी

    September 14, 2026

    अविघ्न

    September 14, 2026

    वैदिक ज्योतिषशास्त्र : 100 महत्त्वपूर्ण सिद्धांत – आरोग्याच्या समस्या, मैत्रीची गुणवत्ता

    September 14, 2026

    गणपती बाप्पाच्या मनातलं…

    September 14, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 434
    • अवांतर 208
    • आरोग्य 146
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 582
    • फिल्मी 68
    • फूड काॅर्नर 255
    • मैत्रीण 28
    • ललित 919
    • शैक्षणिक 87
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    सार्थ ज्ञानेश्वरी : प्रकृति येणें जिये, याचिया सत्ता जग विये

    September 15, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 15 सप्टेंबर 2026

    September 15, 2026

    Movie : ‘The Intouchable’… जगावेगळी कहाणी

    September 14, 2026
    Most Popular

    पत्रिका गुणमिलन करताना

    September 11, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.