Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    सार्थ ज्ञानेश्वरी : हे प्रकृती क्षणीं नीच नवी, रूपाचीच आघवी

    September 13, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 13 सप्टेंबर 2026

    September 13, 2026

    ऑपरेशन

    September 12, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Sunday, September 13
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » शरीरात वात आणि पित्त वाढवण्याचे एक कारण — अहंकार!
    आरोग्य

    शरीरात वात आणि पित्त वाढवण्याचे एक कारण — अहंकार!

    Team AvaantarBy Team AvaantarSeptember 12, 2026Updated:September 12, 2026No Comments2 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मी मराठी, अभिजात मराठी, आरोग्यम् धनसंपदा, आरोग्य काळजी, समर्थ आरोग्य फाऊंडेशन, अहंकाराचे परिणाम, अहंकारामुळे वात, अहंकारामुळे पित्त, सततची चिडचिड, हृदयावरचा ताण, मानसिक ताणतणाव, अतिविचाराचे विपरित परिणाम, मनाचे आरोग्य, प्रसन्न मन, स्वस्थ मन, मनाची अस्वस्थता
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    आयुर्वेदानुसार आणि आधुनिक मानसशास्त्रानुसार, अहंकार (Ego) हा केवळ मनाशी संबंधित नसून त्याच्याशी संंबंधित सततचा ताण, राग, चिंता आणि चिडचिड यांचा शरीरावरही परिणाम होऊ शकतो. अहंकार, राग आणि मानसिक ताणामुळे उद्भवू शकणाऱ्या समस्या –

    हृदयविकार

    • उच्च रक्तदाब
    • सततचा ताण आणि चिडचिड
    • हृदयावर वाढलेला ताण

    पचनाचे विकार

    • आम्लपित्त / ॲसिडिटी
    • पोटातील अस्वस्थता
    • IBS सारख्या तक्रारींमध्ये ताणाची भूमिका

    मानसिक आरोग्यावर परिणाम

    • नैराश्य
    • अतिचिंता
    • एकाकीपणा
    • सतत तुलना आणि असुरक्षिततेची भावना

    हेही वाचा – कावीळसाठी सपोर्टिव्ह ट्रीटमेंट… काही घरगुती उपाय

    निद्रानाश

    • सतत विचार, चिंता आणि मनातील अस्वस्थतेमुळे झोपेवर परिणाम होऊ शकतो.

    स्नायूंचा ताण

    • सततच्या मानसिक ताणामुळे मान, खांदे आणि पाठीच्या स्नायूंमध्ये कडकपणा आणि वेदना जाणवू शकतात.

    आयुर्वेदातील ‘प्रज्ञापराध’ संकल्पना

    आपल्या शरीराच्या आणि निसर्गाच्या गरजांकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करणे, याला आयुर्वेदात ‘प्रज्ञापराध’ असे म्हटले जाते.

    1. पित्त — राग, चिडचिड, जळजळ यांच्याशी संबंधित
    2. वात — भीती, चिंता, अस्वस्थता यांच्याशी संबंधित

    थोडक्यात : आरोग्यासाठी केवळ औषधेच नव्हे, तर मनःशांती, सकारात्मक विचार, संयम आणि अहंकारावर नियंत्रण देखील महत्त्वाचे आहे.


    मन शांत नसेल, तर औषधंही काम करत नाहीत!

    औषध घेतल्यावरही फरक जाणवत नाहीये? रक्त तपासणं, स्कॅनिंग, टेस्ट… सगळं नॉर्मल येतंय, पण तरीही त्रास कमी होत नाहीये? कदाचित त्रास शरीरात नसून, मनात असतो. ताण, चिंता, भीती, राग, अपराधीपणा या सगळ्या मनाच्या विषारी भावना तुमच्या शरीरावर हळूहळू परिणाम करतात. या मानसिक असंतुलनामुळे पचन, झोप, हार्मोन्स, रोगप्रतिकारक शक्ती अशा अनेक शारीरिक गोष्टी बिघडतात आणि मग औषधं दिली तरी, तयार नसलेल्या जमिनीवर पाणी घातल्यासारखं काम होतं.

    मन जेव्हा अशांत असतं…

    औषध हे ‘support’ आहे – ‘मुख्य उपचार’ नाही. कोणताही डॉक्टर – हृदयाचा असो, त्वचेचा असो, पचनाचा असो, किंवा होमिओपॅथिक – जर पेशंटचा mental state अस्थिर असेल, तर औषधं हळूहळू किंवा कमी काम करतात.

    हेही वाचा – HbA1c… मधुमेह नियंत्रणाचं प्रतिबिंब

    मग उपाय काय?

    • मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा… सकाळी 10 मिनिटं ध्यान, प्रार्थना, किंवा नुसतं शांत बसणं.
    • नेहमी स्वतःशी प्रेमाने बोला – “मी ठीक आहे. मी बरा होतोय. मी माझ्या शरीराचा आदर करतो.”
    • रोज थोडा वेळ निसर्गात घालवा… फुलं बघा, मातीला हात लावा, गच्चीत बसा.
    • सकारात्मक लोकांशी बोला… नकारात्मक लोकांचं तात्पुरतं social detox करा!
    • तुमचा ताण बोलून व्यक्त करा… डायरी लिहा, मित्राशी बोला, गरज लागली तर, थेरपिस्टकडे जा.

    मनाचं आरोग्य म्हणजे शरीराच्या उपचारांचा पाया असतो. मनावर उपचार झाल्यावर औषधं जास्त प्रभावी होतात, आहार पचतो, झोप येते, रोगप्रतिकारक शक्ती सुधारते आणि शरीर बरे होण्याचा वेग दुप्पट होतो.


    (सौजन्य – समर्थ आरोग्य फाऊंडेशन)

    संपर्क – 9150014545

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    शांतता ऐकणारे कान

    September 9, 2026 आरोग्य

    HbA1c… मधुमेह नियंत्रणाचं प्रतिबिंब

    September 5, 2026 आरोग्य

    सत्य नाकारणं सोपं, पण…

    September 2, 2026 आरोग्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    आरोग्य

    शांतता ऐकणारे कान

    By डॉ. प्रज्ञावंत देवळेकरSeptember 9, 2026

    वैद्यकीय व्यवसायात दिवसाची सुरूवातच संवादानं होते… “काय होतंय? कधीपासून होतंय?” थोड्या वेळापूर्वी समोर एक तरुण…

    HbA1c… मधुमेह नियंत्रणाचं प्रतिबिंब

    September 5, 2026

    सत्य नाकारणं सोपं, पण…

    September 2, 2026

    कावीळसाठी सपोर्टिव्ह ट्रीटमेंट… काही घरगुती उपाय

    August 29, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    सार्थ ज्ञानेश्वरी : हे प्रकृती क्षणीं नीच नवी, रूपाचीच आघवी

    September 13, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 13 सप्टेंबर 2026

    September 13, 2026

    ऑपरेशन

    September 12, 2026

    माझा मित्र आणि कोथिंबीर वडी…

    September 12, 2026

    शरीरात वात आणि पित्त वाढवण्याचे एक कारण — अहंकार!

    September 12, 2026

    ‘कदंब’… एक दैवी अनुभूती!

    September 12, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 432
    • अवांतर 208
    • आरोग्य 146
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 578
    • फिल्मी 66
    • फूड काॅर्नर 255
    • मैत्रीण 28
    • ललित 915
    • शैक्षणिक 87
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    सार्थ ज्ञानेश्वरी : हे प्रकृती क्षणीं नीच नवी, रूपाचीच आघवी

    September 13, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 13 सप्टेंबर 2026

    September 13, 2026

    ऑपरेशन

    September 12, 2026
    Most Popular

    पत्रिका गुणमिलन करताना

    September 11, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.