Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    वैदिक ज्योतिषशास्त्र : 100 महत्त्वपूर्ण सिद्धांत – वक्तृत्व, नेटवर्किंग, स्वयंरोजगार

    September 7, 2026

    कलियुगातील श्रावणबाळ

    September 7, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : क्षीरसागरींची गोडी, माजीं बहु थडिये थोडी

    September 7, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Monday, September 7
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 07 सप्टेंबर 2026
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 07 सप्टेंबर 2026

    Team AvaantarBy Team AvaantarSeptember 7, 2026No Comments7 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, पंचांग, दिनविशेष, Panchang, Dinvishesh, दर्शन कुलकर्णी, कुंडली, राशीभविष्य, आजचे राशीभविष्य, ज्योतिष
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दर्शन कुलकर्णी

    • आज, दिनांक : 07 सप्टेंबर 2026; वार : सोमवार
    • भारतीय सौर : 16 भाद्रपद शके 1948; तिथि : एकादशी 17:04 ; नक्षत्र : पुनर्वसु 18:13;
    • योग : व्यतिपात 06:40, वरियान 27:37; करण : कौलव 27:52;
    • सूर्य : सिंह; चंद्र : मिथुन 12:38; सूर्योदय : 06:24; सूर्यास्त : 18:50;
    • पक्ष : कृष्ण; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव;
    • शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128

    अजा एकादशी

    श्रावणी सोमवार शिवपूजन / शिवामूठ – गहू

    वेद कन्सल्टन्सी / 9987433660


    दिनविशेष

    आद्यक्रांतिकारक उमाजी नाईक

    टीम अवांतर

    आद्यक्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांचा जन्म 7 सप्टेंबर 1791 रोजी पुरंदर तालुक्यातील भिवडी येथे रामोशी-बेरड समाजात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव दादूजी खोमणे (नाईक) होते आणि ते पुरंदर किल्ल्याचे वतनदार होते. उमाजी हे लहानपणापासून चंचल, हुशार आणि धाडसी होते. भारतीय स्वातंत्र्यलढ्याला 1857च्या उठावाने सुरुवात झाली, अशी नोंद आहे. पण त्याआधीही उठाव झाले आहेत. राजे उमाजी नाईक यांनी उठाव करून सलग 14 वर्षे इंग्रजांच्या नाकीनऊ आणले होते.

    ईस्ट इंडिया कंपनीच्या निमित्ताने इंग्रजांनी भारतात हातपाय पसरण्यास सुरुवात केली. भारतात सत्ता स्थापन करत असताना हळूहळू मराठी मुलूख जिंकत पुणे ताब्यात घेऊन दुसरे बाजीराव पेशवे यांना स्थानापन्न केले. त्याचबरोबर, इतर किल्ल्यांप्रमाणे पुरंदर किल्ल्याच्या वतनदारी आणि संरक्षणाचे काम रामोशी समाजाकडून काढून घेतले आणि आपल्या मर्जीतील लोकांकडे सुपूर्द केले. त्यामुळे रामोशी समाज अडचणीत आला. शिवाय, इंग्रजांचे अत्याचार त्यांना पहावत नव्हते. या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराज स्फूर्तीस्थान असलेल्या राजे उमाजी नाईक यांनी इंग्रंजंविरुद्ध लढण्याचा निर्धार केला.

    त्यांनी नियोजनबद्धरीत्या इंग्रज अधिकाऱ्यांना त्रास देण्यास सुरुवात केली. मोठे सावकार, व्यापारी अशा लोकांना लुटायला सुरुवात केली. यावेळी उमाजी पकडले गेले. त्यांना सक्तमुजरीची शिक्षाही झाली. तुरुंगात असताना उमाजी नाईक लिहायला आणि वाचायला शिकले. तुरुंगातून सुटल्यावर गप्प न बसता उमाजींनी रामोशी, महार, मांग, भिल्ल, आदिवासी आदी सहकारी जमवले आणि इंग्रजांविरुद्धचा लढा आणखी तीव्र केला. 24 फेब्रुवारी 1824ला उमाजी यांनी भांबुर्डे येथील इंग्रजांचा खजिना लुटून तो देवळाच्या देखभालीसाठी जनतेला वाटला होता.

    हेही वाचा – Bookshelf : ‘नॉट विदाऊट माय डॉटर’… सकारात्मक कहाणी

    इंग्रजांनी उमाजी राजे आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात दोन वेळा युद्ध पुकारले आणि दोन्ही वेळेस त्यांच्यावर नामुष्की ओढावली. 28 ऑक्टोबर 1826 रोजी उमाजी यांच्याविरोधात पहिली नोटीस जारी केली. त्यात रोख रक्कम आणि जमिनीच्या इनामाचे आमिष दाखविण्यात आले होते. परंतु नागरिकांचे उमाजी नाईक यांना पाठबळ होते. इंग्रजांनी एकूण पाच नोटिसा जारी केल्या होत्या. विशेष म्हणजे, चौथ्या नोटिशीनंतर उमाजी नाईक यांनीही नागरिकांसाठी आव्हानपत्र जारी कले. लोकांनी इंग्रजांच्या नोकऱ्या सोडाव्यात. सर्व राजे रजवाडे, सरदार, जमीनदार, वतनदार, देशवासीयांनी एकत्र येऊन एकाचवेळी जागोजागी बंड पुकारावे. इंग्रजांचे खजिने लुटावेत. इंग्रजांना शेतसारा, पट्टी देऊ नये. असे करणाऱ्यास नवीन सरकारमधून जहागिरी, इनामे वा रोख पैशांची बक्षिसे मिळतील. इंग्रजांची राजवट आता लवकरच संपुष्टात येणार आहे आणि नवीन न्यायाधीष्ठीत राज्याची स्थापना होइल, असा विश्वास त्यांनी जनेताला दिला.

    प्रत्येकवेळी बक्षिसाची रक्कम आणि इनामामध्ये वाढ करत गेल्याने पाचव्यांदा इंग्रजांना यश आले. त्यांचेच काही साथीदार फिरले आणि त्यांनी उमाजी राजे यांची गुप्त माहिती इंग्रजांना दिली. त्याआधारे 15 डिसेंबर 1831 रोजी भोर तालुक्यातील उतरोली या गावी रात्री इंग्रजांनी त्यांना पकडले. उमाजी नाईक यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालवून त्यांना दोषी ठरविण्यात आले आणि फाशीची शिक्षा सुनावली. 3 फेब्रुवारी 1832 रोजी पुण्याच्या खडकमाळ आळी येथील मामलेदार कचेरीत त्यांना फाशी देण्यात आली. वयाच्या 43व्या वर्षी देशाच्या स्वातंत्र्यासाठी फाशीवर जाणारे उमाजीराजे नाईक हे पहिले स्वातंत्र्यसेनानी ठरले. इतरांना दहशत बसावी म्हणून उमाजी नाईक यांचा मृतदेह इंग्रजांनी कचेरीच्या बाहेर पिंपळाच्या झाडाला तीन दिवस लटकवून ठेवला होता.


    आजचे राशीभविष्य

    मेष – आजचा दिवस नवी आशा आणि दिलासा घेऊन येईल. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेले एखादे काम अखेर पूर्ण झाल्याने आनंद मिळेल. संवाद आणि सामंजस्यामुळे तुम्ही आणि तुमच्या जोडीदारामधील अंतर कमी होईल, तुमच्या नात्यात पुन्हा गोडवा येईल. तुम्ही एकत्र बसून भविष्यासाठी नवीन योजना आखू शकता. राजकारणात असलेल्यांसाठीही आजचा दिवस चांगला आहे. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ पद, जबाबदारी किंवा सन्मान मिळाल्याने तुमचा आत्मविश्वास लक्षणीयरीत्या वाढू शकतो.

    वृषभ – आज काही प्रभावशाली आणि महत्त्वाच्या व्यक्तींना भेटल्याने तुमच्या करिअर किंवा व्यवसायासाठी नवीन संधी निर्माण होऊ शकतात. मात्र नातेवाईकाकडून आलेल्या एखाद्या बातमीमुळे काही प्रमाणात चिंता वाढू शकतात. संततीच्या नोकरीतील बढतीमुळे कुटुंबात अभिमान आणि आनंदाची भर पडेल. प्रिय व्यक्तीसोबतच्या अचानक भेटीमुळे भावनांना उधाण येऊ शकते, परंतु भूतकाळात रमून राहणे योग्य नाही. बँक कर्ज किंवा आर्थिक बाबींशी संबंधित अडथळेही आज दूर होण्याची शक्यता आहे.

    मिथुन – आज, तुमची पारख करण्याची क्षमता आणि वेळेवर निर्णय घेण्याची कला तुम्हाला इतरांपेक्षा पुढे ठेवेल. विरोधकांच्या प्रभावाखाली येऊन कोणताही निर्णय घेऊ नका. संततीच्या करिअरबाबत एक महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागू शकतो. कामाच्या ठिकाणी महत्त्वाची कामे पूर्ण करण्यासाठी कनिष्ठ सहकाऱ्यांचा पाठिंबा खूप उपयुक्त ठरेल. अतिरिक्त कामामुळे थकवा येऊ शकतो, परंतु भावंडांसोबत चांगला वेळ घालवल्याने तुमचा मूड सुधारेल. घरात लग्नाबद्दलच्या चर्चाही तीव्र होऊ शकतात.

    कर्क – आज तुमच्या वैवाहिक जीवनात प्रेम, सामंजस्य आणि परस्पर सहकार्याचा एक सुंदर समतोल दिसून येईल.आईला दिलेले वचन पूर्ण करण्याची आज संधी मिळेल. नवीन मालमत्ता खरेदी करण्याचा किंवा विकण्याचा विचार करू शकता, परंतु अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेतल्यानंतरच पुढील कार्यवाही करा. व्यवसायातील नवीन कल्पना तुम्हाला यशाच्या नव्या उंचीवर नेऊ शकतात. कार्यालयातही तुमच्या कामाची प्रशंसा होईल आणि तुमचे वरिष्ठ तुमच्या कामगिरीने प्रभावित होतील. एक विशेष माहिती हा दिवस आणखी संस्मरणीय बनवू शकते.

    सिंह – आज तुम्हाला आनंद आणि यश मिळेल. एका महत्त्वाच्या माहितीमुळे नवीन संधींची दारे उघडू शकतात. कुटुंबासोबत घालवलेला वेळ नातेसंबंध अधिक दृढ करेल. बऱ्याच काळापासून रखडलेले व्यावसायिक करार अखेर पूर्ण होण्याची शक्यता आहे. तुमच्यात भरपूर ऊर्जा आणि उत्साह असेल, ज्यामुळे तुम्ही अनेक महत्त्वाची कामे वेळेच्या आधीच पूर्ण करू शकाल. तुमच्या मुलांसोबत बाहेर फिरायला जाण्याचे नियोजन केल्यास हा दिवस आणखी खास होईल.

    कन्या – आज आर्थिक बाबतीत नशीब तुम्हाला साथ देऊ शकते. वडिलोपार्जित मालमत्तेतून लाभ मिळण्याचे संकेत आहेत. उत्पन्नातील वाढ आनंद घेऊन येईल. जोडीदारासाठी काहीतरी खास खरेदी केल्याने तुमच्या नात्यातील प्रेम आणि आपुलकी वाढेल. गुंतवणुकीचे निर्णय घाईने घेणे टाळा; सखोल संशोधनानंतरच पुढे जा. नोकरीत बदलण्याचा विचार करत असलेल्या जातकांना नवीन संधी निर्माण होऊ शकतात. योग्य पर्याय निवडल्यास तुमच्या करिअरला नवी दिशा मिळू शकते.

    तुळ – आजचा दिवस व्यस्त आणि धावपळीचा असू शकतो. महत्त्वाची कामे स्वतःच हाताळण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक लहानसहान गोष्टीसाठी इतरांवर अवलंबून राहणे टाळा. आज एखाद्या पार्टी किंवा कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची संधी मिळू शकते, जिथे तुमचे संभाषण आणि व्यक्तिमत्त्व लोकांना प्रभावित करेल. प्रवास करताना किंवा स्थळदर्शन करताना तुम्हाला महत्त्वाची माहिती मिळू शकते. वाहन चालवताना विशेष सावधगिरी बाळगा. जुन्या मित्राला भेटल्याने जुन्या आठवणी ताज्या होऊ शकतात आणि तुमचा दिवस आनंददायी होऊ शकतो.

    वृश्चिक – आज आरोग्यात किंचित चढ-उतार होऊ शकतो, त्यामुळे स्वतःच्या आहाराकडे आणि विश्रांतीकडे विशेष लक्ष द्या. आज अचानक प्रवासाचे नियोजन करू शकता. भावंडांच्या पाठिंब्याने एक दीर्घकाळ चाललेली व्यावसायिक समस्या सुटण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना काहीतरी नवीन शिकण्याची आणि काहीतरी वेगळे करून पाहण्याची इच्छा होईल, जे त्यांच्यासाठी भविष्यात फायदेशीर ठरू शकते. कौटुंबिक जिव्हाळा वाढेल आणि नातेवाईकांसोबतचे संबंध अधिक दृढ होतील. प्रियजनांच्या पाठिंब्यामुळे भावनिक बळ मिळेल.

    हेही वाचा – माझा गणपती बाप्पा

    धनु – आज, अपूर्ण राहिलेल्या इच्छांमुळे तुम्हाला थोडे अस्वस्थ किंवा निराश वाटू शकते. जर तुम्हाला कामात रस वाटत नसला  तरी सकारात्मक कामांमध्ये गुंतणे उत्तम राहील. कुटुंबातील सदस्याच्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी तुम्हाला धावपळ करावी लागू शकते. जोडीदारासोबतचे मतभेद छोट्या-छोट्या गोष्टींवरून वाढू शकतात, म्हणून वाद घालण्याऐवजी संयमाने बोला. कामाच्या ठिकाणी,  विरोधकांच्या हालचालींवर लक्ष ठेवणे आणि त्यांच्यापासून दिशाभूल होणे टाळणे महत्त्वाचे आहे.

    मकर – आज अनपेक्षित आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. व्यवसायातील चांगल्या नफ्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल आणि तुम्हाला पूर्वी अडकलेले काही पैसेही परत मिळू शकतील. नोकरीच्या शोधात असलेल्यांची चांगल्या बातमीची प्रतीक्षा अखेर आज संपू शकते. घरी नवीन पाहुण्यांच्या आगमनाने आनंदात भर पडेल. जोडीदारासोबतचे सध्याचे तणाव सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न कराल. एखाद्या सहकाऱ्याच्या बोलण्यामुळे तुम्ही थोडे अस्वस्थ किंवा भावुक होऊ शकता.

    कुंभ – आजचा दिवस सरासरीपेक्षा चांगला असू शकतो. काही नवीन संधी उपलब्ध होतील. अचानक प्रवासाला जाण्याची शक्यता आहे. जर संततीने परीक्षा दिली असेल, तर निकालामुळे तुम्हाला आनंद होऊ शकतो. नवीन नोकरी मिळवण्याचे प्रयत्नही यशस्वी होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाचे नवीन मार्ग खुले होऊ शकतात, ज्यामुळे भविष्याबद्दलचा उत्साह वाढेल. आर्थिक बाबींमध्ये सावधगिरी बाळगा आणि अत्यंत आवश्यक असल्याशिवाय कर्ज घेणे टाळणेच उत्तम.

    मीन – व्यवसायातील चढ-उतारामुळे तुमचे मन आज थोडे अस्थिर असू शकते. भागीदारीशी संबंधित बाबींमध्ये विशेष सावधगिरी बाळगा. कोणतेही दस्तऐवज किंवा करारविषयक कागदपत्रे पूर्ण वाचल्याशिवाय स्वीकारू नका. इतरांच्या वैयक्तिक बाबींमध्ये जास्त हस्तक्षेप करणे टाळा. आईसोबत एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा करू शकता. आपल्यावरील जबाबदाऱ्या पुढे ढकलू नयेत, कारण आजच्या या निर्णयामुळे पुढे समस्या निर्माण होऊ शकतात.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    वैदिक ज्योतिषशास्त्र : 100 महत्त्वपूर्ण सिद्धांत – वक्तृत्व, नेटवर्किंग, स्वयंरोजगार

    September 7, 2026 पंचांग आणि भविष्य

    साप्ताहिक राशीभविष्य : 06 ते 12 सप्टेंबर 2026

    September 6, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 06 सप्टेंबर 2026

    September 6, 2026 पंचांग आणि भविष्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    पंचांग आणि भविष्य

    वैदिक ज्योतिषशास्त्र : 100 महत्त्वपूर्ण सिद्धांत – वक्तृत्व, नेटवर्किंग, स्वयंरोजगार

    By ज्योतिषी हृषिकेश पानकरSeptember 7, 2026

    जीवनप्रवास उलगडणारे 100 ज्योतिषीय मार्गदर्शक सूत्रे – 40) कोणत्याही वयात – सार्वजनिक वक्तृत्व ज्योतिषीय सिद्धांत…

    साप्ताहिक राशीभविष्य : 06 ते 12 सप्टेंबर 2026

    September 6, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 06 सप्टेंबर 2026

    September 6, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 05 सप्टेंबर 2026

    September 5, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    वैदिक ज्योतिषशास्त्र : 100 महत्त्वपूर्ण सिद्धांत – वक्तृत्व, नेटवर्किंग, स्वयंरोजगार

    September 7, 2026

    कलियुगातील श्रावणबाळ

    September 7, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : क्षीरसागरींची गोडी, माजीं बहु थडिये थोडी

    September 7, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 07 सप्टेंबर 2026

    September 7, 2026

    Bookshelf : ‘नॉट विदाऊट माय डॉटर’… सकारात्मक कहाणी

    September 6, 2026

    माझा गणपती बाप्पा

    September 6, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 424
    • अवांतर 206
    • आरोग्य 144
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 570
    • फिल्मी 66
    • फूड काॅर्नर 254
    • मैत्रीण 28
    • ललित 902
    • शैक्षणिक 87
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    वैदिक ज्योतिषशास्त्र : 100 महत्त्वपूर्ण सिद्धांत – वक्तृत्व, नेटवर्किंग, स्वयंरोजगार

    September 7, 2026

    कलियुगातील श्रावणबाळ

    September 7, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : क्षीरसागरींची गोडी, माजीं बहु थडिये थोडी

    September 7, 2026
    Most Popular

    जातकांचे ज्योतिष ज्ञान

    September 4, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.