Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026

    सेटवरच मिळाली खूप मोठी कॉम्प्लिमेन्ट!

    March 24, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळगटातील जीवनव्यवहार शिक्षण

    March 23, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, March 24
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » गुरू पौर्णिमा… प्रा. म. मो. केळकर
    शैक्षणिक

    गुरू पौर्णिमा… प्रा. म. मो. केळकर

    Team AvaantarBy Team AvaantarJuly 10, 2025No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, मराठीआर्टिकल, Special article, Guru Purnima, गुरुपौर्णिमा, प्राध्यापककेळकर, ममोकेळकर
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    सुरेश महाबळ

    आज गुरू पौर्णिमा… मला अनेक गुरुजनांचा सहवास आणि सेवा करण्याची संधी मिळाली. अशाच एका महान गुरूंची आठवण मी आज सांगणार आहे. शैक्षणिक तफावत असून सुद्धा माझ्या वाचनाची आवड लक्षात घेऊन अनेक विषयांवर त्यांच्यासोबत चर्चा करण्याची संधी मला मिळाली. त्यांनी पण माझी पाठ थोपटून माझ्याकडून अनेक पुस्तके स्वतःच्या संदर्भासाठी वापरली.

    हे गुरू म्हणजे प्रा. म. मो. केळकर. अत्यंत स्वच्छ वर्तन, उंची जेमतेम पाच फूट, वर्ण गोरा, केस मागे फिरविलेले – त्यामुळे कपाळ मोठे दिसायचे. निळे डोळे समोरच्याचा वेध घेणारे. अंगावर कायम आवडता पेहराव म्हणजे झब्बा आणि पायजमा… ते एम. जे. कॉलेज, जळगाव येथे संस्कृत विभागाचे प्रमुख होते. जळगाव, धुळे, नाशिक, पुणे आणि मुंबई येथील अनेक विद्वानांशी प्रत्यक्ष संपर्क होता. कॉलेजचे विद्यार्थी आणि जुने ज्येष्ठ अभ्यासूमंडळी विविध संदर्भांसाठी त्यांच्याकडे येत असत. आता ते हयात नाहीत.

    बालवाडीपासून जुन्या 11वीपर्यंत त्यांचा मुलगा प्रमोद आणि मी सोबत शिकत होतो. 11वीनंतर आमचे रस्ते वेगळे झाले. प्रमोदचे Bits पिलानी येथील शिक्षणानंतर आयआयटी, अहमदाबाद येथे पुढील शिक्षण सुरू झाले.  वयाने मोठे असले तरी, आमचे संबंध कृष्ण-सुदामासारखे होते. प्रमोद शिकत असताना ते 1975 ते 77 या कालावधीत मिसाअंतर्गत नाशिक येथील मध्यवर्ती कारागृहात होते. त्या वेळी प्रमोदच्या आईशी नेहमी आणि नित्यनेमाने भेट होत असे.

    कालांतराने माझं लग्न झालं. मला दोन मुली आहेत. मोठी हर्षा आणि धाकटी मानसी. सरांना मी बाबा म्हणत असे आणि मुली त्यांना आजोबा. हर्षाच्या सातवीनंतर आणि मानसीच्या पाचवीनंतर त्या त्यांच्याकडे संस्कृत शिकण्यासाठी 6 वर्षं जात होत्या. तुझ्या मुली माझ्याकडेच संस्कृत शिकतील हा त्यांचा हट्ट होता, तो त्यांनी पूर्ण केला. संस्कृतसोबतच मराठी, हिंदी आणि इंग्रजी यातील व्याकरणाच्या अत्यंत सुंदर खुबी, तसेच उच्चार, शब्दांचे आघात शिकविले, याची फलश्रुती म्हणजे संस्कृत विषयात हर्षाला 10वी बोर्डाचे बक्षीस मिळाले.

    हेही वाचा – आमच्या मराठी शाळा

    एका गुरू पौर्णिमेला माझी घरामध्ये चर्चा सुरू होती की, आज बाबांकडे जायला पाहिजे, वेळ साधारण सकाळी 8.30 से 9.00 वाजताची. पण अचानक बाबाच घरी आले. बाबा घरात आल्यानंतर आधी आम्ही दोघांनी त्यांना साष्टांग नमस्कार घातला. त्यांच्या आवडीचे पोहे आणि चहा असा बेत केला. साधारण एक तासाने मला सांगितले की, ‘तू कामावर जा. पण आधी मला रिक्षापर्यंत गाडीने सोड.’ हे फर्मान त्यांनी सोडले असले तरी मला ते मान्य नव्हते. कारण, त्यांना घरापर्यंत पोहचविणे माझे परम कर्तव्य होते. त्यानुसार त्यांना घरापर्यंत सोडण्यासाठी गाडीवर बसविले.

    एकतर गुरू पौर्णिमा, सोबत गाडीवर बाबा… त्यामुळे रस्त्यामध्ये अनेक जुने विद्यार्थी गाडी थांबवायला सांगून भर गर्दीमधे सरांच्या पाया पडत होते. हे पाहून अनेक ज्येष्ठ नागरिकही आम्हाला थांबवत होते. सोबत साक्षात गुरू आणि मी सारथी… मला मात्र संकोचल्यासारखे झाले! पण गुरू म्हणून बाबांचा दबदबा बघितल्यावर, मानसपुत्र म्हणून अभिमानही वाटला.

    माझ्या मुलींना त्यांचा सहवास आणि शिकण्याची संधी मिळाली, हे मी मुलींचे भाग्यच समजतो. आज गुरू पौर्णिमेनिमित्त त्यांच्या अनेक आठवणींना उजाळा मिळाला.

    हेही वाचा – दमलेल्या बाबाची कहाणी…

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळगटातील जीवनव्यवहार शिक्षण

    March 23, 2026 शैक्षणिक

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील विज्ञान शिक्षण

    March 16, 2026 शैक्षणिक

    शाळाशाळांमध्ये नाट्यकलावंतांचा शोध घेण्याची गरज

    March 10, 2026 शैक्षणिक
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    शैक्षणिक

    बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळगटातील जीवनव्यवहार शिक्षण

    By रश्मी परांजपेMarch 23, 2026

    मागील तीन लेखांत आपण बालशाळेतील विज्ञान शिक्षण याविषयी सविस्तर माहिती घेतली. या आणि पुढील दोन…

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील विज्ञान शिक्षण

    March 16, 2026

    शाळाशाळांमध्ये नाट्यकलावंतांचा शोध घेण्याची गरज

    March 10, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : शिशुगटातील विज्ञान शिक्षण

    March 9, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026

    सेटवरच मिळाली खूप मोठी कॉम्प्लिमेन्ट!

    March 24, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळगटातील जीवनव्यवहार शिक्षण

    March 23, 2026

    आयुष्यात टवटवीतपणा आणणारा ‘तो’

    March 23, 2026

    एका केरसुणीची कहाणी…

    March 23, 2026

    Dnyaneshwari : आरंभीं बीज एकलें, मग तेंचि विरूढलिया बुड जाहलें…

    March 23, 2026

    POPULAR CATEGORY

    • अध्यात्म 245
    • अवांतर 173
    • आरोग्य 91
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 184
    • मैत्रीण 16
    • ललित 508
    • वास्तू आणि वेध 360
    • शैक्षणिक 73

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Advertise

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn