Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    सार्थ ज्ञानेश्वरी : येथ सत्त्व तें उत्तम, रज तें मध्यम

    October 7, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 07 ऑक्टोबर 2026

    October 7, 2026

    फूल ना फुलाची पाकळी

    October 6, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, October 7
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » कानडा राजा
    अध्यात्म

    कानडा राजा

    डॉ. शिरीष कुलकर्णीBy डॉ. शिरीष कुलकर्णीAugust 20, 2026No Comments5 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठी साहित्य, मराठी आर्टिकल, मी मराठी, अभिजात मराठी, मराठी कथा, मराठी लेख, अध्यात्म साहित्य, शिरीष कुलकर्णी, अध्यात्मिक शिरीष कुलकर्णी, माया, द्वैत अद्वैत, आद्य शंकराचार्य माया, ज्ञानाचा प्रकाश, सत्यज्ञान, खरी साधना, साधना आणि ध्यान
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    कानडा राजा पंढरीचा
    वेदांनाही नाही कळला
    अंतपार ज्याचा…

    निराकार तो निर्गुण ईश्वर
    कसा प्रकटला असा विटेवर
    उभय ठेविले हात कटिवर,
    पुतळा चैतन्याचा…

    परब्रह्म हे भक्तांसाठी
    मुके ठाकले भीमेकाठी
    उभा राहिला भाव सावयव,
    जणू की पुंडलिकाचा…

    हा नाम्याची खीर चाखतो
    चोखोबांची गुरे राखतो
    पुरंदराचा हा परमात्मा,
    वाली दामाजीचा…

    – ग. दि. माडगूळकर

    गदिमांच्या सिद्धहस्त आणि प्रासादिक लेखणीतून अवतरलेले हे गीत आपल्या कानांवर पडले की, विलक्षण असा सात्विक शहारा हमखास येतो… आणि अलौकिक अशा चैतन्यमयी प्रवासाची सुरुवात होते.

    पंढरीचा सावळा पांडुरंग भक्तासाठी अजूनही विटेवर उभा असलेला देव! पुंडलिकाची आठवण देत कोट्यावधी वारकऱ्यांच्या आणि भक्तांच्या हृदयाची धडधड सांभाळत तो आपल्या सर्वांच्या श्वासात मिसळलेला एक शाश्वत असा भाव आहे. पंढरीचा राजा कानडा आहे आणि खुद्द वेदांनाही त्याचा अंत किंवा पार लागलेला नाही, हे आपण ऐकत राहतो. कानडा या शब्दाचा अर्थ गूढ असा आहे, तो कर्नाटकचा आहे म्हणून कानडा नव्हे! कर्नाटक राज्याशी किंवा कन्नड, कानडी भाषेशी संबंधित आहे म्हणून हा कानडा शब्द आलेला नाही.

    कानडा म्हणजे जो अगम्य आहे, ज्याचे आकलन सामान्य बुद्धीला होऊ शकत नाही, असा तो गूढ अनाकलनीय परमेश्वर!

    आपल्या भारतीय संस्कृतीत उपनिषदे आणि वेदांना ज्ञानाचे सर्वोच्च आणि अंतिम स्रोत मानले जाते. ते तसे आहे ही! हजारो वर्षे ऋषीमुनींकडून या अथांग ईश्वरी तत्वाचे वर्णन करण्यासाठी वेदांची आणि उपनिषदांची निर्मिती झाली. पण जेव्हा त्या परब्रह्माचे संपूर्ण स्वरूप शब्दांत मांडण्याची वेळ आली, तेव्हा ते महान वेद सुद्धा थबकले आणि त्यांनी ‘नेति नेति’ म्हणजे हे ते नाही, हे ते नाही असे सांगून आपली असमर्थताही व्यक्त केली.

    हेही वाचा – कान्होपात्रेचे समर्पण

    ज्या अथांग तत्वाचा पार खुद्द वेदांनाही लागला नाही, पण तेच अथांग तत्व एका अत्यंत छोट्याशा विटेवर येऊन उभे राहिले आहे. जो ईश्वर मुळात निराकार आहे, ज्याला कोणताही विशिष्ट आकार नाही आणि …जो निर्गुण आहे, म्हणजे ज्याला प्रकृतीचे कोणतेही गुण बांधून ठेवू शकत नाहीत. पण तोच ईश्वर असा सगुण आणि साकार होऊन एका विटेवर कसा काय प्रकट झाला आणि आजवर तो भक्तांसाठी तिथेच ताटकळत उभा आहे! भक्तांनीही एवढा जीव, एवढा जीव लावला की, त्याची हलण्याची काय बिशाद? भक्त एक कष्ट घेत असेल तर हा कानडा चार कष्ट घेईल. पण तो विटेवर कसा? हा असा अत्यंत भोळा आणि तरीही भारलेला प्रश्न येथे विचारला आहे. या प्रश्नाचे उत्तर केवळ एकाच शब्दात आहे आणि ते म्हणजे भक्ताचे अथांग प्रेम!

    जेव्हा ईश्वराला भक्ताच्या प्रेमाची ओढ लागते, तेव्हा तो आपले निराकार आणि निर्गुण रूप, मर्यादा, कलियुग, नियम, मोठेपण सगळे सगळे विसरून जातो आणि भक्तासाठी सगुण रूप धारण करतो. विटेवर उभे राहणे आणि दोन्ही हात कमरेवर ठेवणे यामागे एक आश्वासन दडलेले आहे, असं भक्त जाणतात. कमरेवर हात ठेवून तो सावळा विठ्ठल आपल्या प्राणप्रिय भक्तांना अगदी प्रेमाने सांगतो की, या भवसागराची किंवा या जन्म-मृत्यूच्या दुःखाची पातळी केवळ माझ्या कमरेइतकीच आहे. तुम्ही जर पूर्ण श्रद्धेने आणि प्रेमाने भक्ती, अहिंसा, श्रद्धा, मानवता जपलीत तर हा दुःखाचा महासागर तुम्हाला कधीही बुडवू शकणार नाही.

    पांडुरंग हा चैतन्याचा पुतळा आहे, असे म्हटले आहे. ती मूर्ती म्हणजे प्रत्यक्ष शुद्ध अशा चैतन्याचे घनीभूत झालेले रूप आहे. साक्षात परब्रह्म हे भक्तांसाठी उभे ठाकले. नकळतपणे ज्या पांडुरंगाला आठवून, स्मरून, पाहून वारकऱ्यांच्या, भक्त मंडळींच्या हृदयातून भक्तीचे वारे वाहू लागतात तो परब्रह्म म्हणजे या संपूर्ण विश्वाची निर्मिती करणारी आणि त्याचे पालन करणारी ती सर्वोच्च आणि अत्यंत प्रबळ अशी चैतन्यमय ऊर्जा.

    पण ही इतकी मोठी ऊर्जा चंद्रभागेच्या आणि भीमेच्या वाळवंटात आपल्या भक्तांसाठी अत्यंत मौन आणि स्तब्ध होऊन उभी राहिली आहे. ईश्वर भक्ताच्या प्रेमात पडतो तेव्हा शब्दांची, कुठल्या नियमांची गरजच उरत नाही.

    भक्त पुंडलिकाने आपल्या मातापित्यांची सेवा करताना जी एक वीट ईश्वराच्या दिशेने भिरकावली होती, त्याच विटेवर तो परमेश्वर युगानुयुगे उभा आहे. पुंडलिकाच्या अंतःकरणातील तो अत्यंत शुद्ध असा मातृपितृभक्तीचा भावच जणू काही प्रत्यक्ष विठ्ठलाच्या रूपाने तिथे साकार झाला आहे.

    पंढरपूरच्या मंदिरात पुंडलिकाच्या अत्यंत उत्कट अशा भक्तीचाच एक सजीव आणि सावयव असा आविष्कार आहे. हा तोच ईश्वर आहे ज्याने संत नामदेवांच्या बालसुलभ हट्टापायी त्यांच्या हातातील दुधाची आणि खिरीची वाटी अत्यंत प्रेमाने चाखली होती. समाजाकडून सतत अवहेलना सहन करावे लागलेले संत चोखामेळा देवाचा धावा करतात, तेव्हा हाच देव स्वतःला हाक येण्याआधीच कितीतरी वेळ आधी गुराखी होऊन त्यांची गुरे राखतो आहे.

    हेही वाचा – चिंचेच्या पानावर देऊळ रचिले

    हा केवळ पुरंदरदासांचा परमात्मा नाही तर भयंकर दुष्काळात जेव्हा दामाजीपंतांनी स्वतःच्या जिवावर उदार होऊन गोरगरिबांसाठी धान्याची कोठारे खुली केली होती, तेव्हा त्या दामाजीला वाचवण्यासाठी हाच ईश्वर स्वतः विठूमहार माऊलीचे रूप धारण करून बादशहाच्या दरबारात हजर झाला होता.

    ईश्वराला तुमच्या संपत्तीची, स्त्री पुरुष असण्याची, तुमच्या जातीची किंवा तुमच्या विद्वत्तेची, ज्ञानाची, साधनेची कोणतीही अट नसते. त्याला केवळ तुमच्या अंतःकरणातील अत्यंत शुद्ध आणि निष्पाप अशा प्रेमाची भूक असते.

    अगम्यः पाण्डुरङ्गोऽयं
    वेदैर्नापि च बुध्यते।
    निर्गुणः सगुणो भूत्वा
    इष्टकायां हि तिष्ठते॥
    पुण्डलीकस्य भावेन
    साक्षद्रूपं प्रकाशते।
    भक्तानां प्रेमरज्जुभिः
    बद्धो भूत्वा हि वर्तते॥

    – गीताव्रत

    हा जो पांडुरंग आहे ना, तो अत्यंत अगम्य आहे आणि प्रत्यक्ष वेदांनाही त्याचे आकलन पूर्णपणे होऊ शकत नाही. जो मुळात निर्गुण आणि निराकार आहे, तो केवळ भक्तांच्या प्रेमापोटी सगुण साकार रूप धारण करून एका छोट्याशा विटेवर अत्यंत शांतपणे उभा राहिला आहे.

    भक्त पुंडलिकाच्या अंतःकरणातील त्या अत्यंत शुद्ध अशा भावामुळेच त्या परब्रह्माचे साक्षात रूप या चंद्रभागेच्या वाळवंटात प्रकाशित झाले आहे आणि हा अथांग असा ईश्वर आपल्या भक्तांच्या अत्यंत शुद्ध अशा प्रेमाच्या दोरीने बांधला जाऊन त्यांच्यासाठी तिथे अत्यंत मौन आणि स्तब्ध होऊन उभा राहतो.

    असे पांडुरंगाच्या गूढ आणि गोड, लोभस अशा लीलांचे वर्णन केले आहे. हा चैतन्याचा पुतळा, परब्रह्म आत्मस्वरूपात आपल्याच अंतःकरणात कायमचे विराजमान रहावेत.

    Avatar photo
    डॉ. शिरीष कुलकर्णी

    डॉ. शिरीष कुलकर्णी M.J. M.B.A.B.A. GDC&A., P.HD.... सहकार प्रशिक्षण केंद्रावर प्राचार्य म्हणून पाच वर्ष सेवा. कथा, कादंबरी, कविता, गझल, आध्यात्मिक चिंतन अशा विविध विषयावर 51 पुस्तके लिहिलेली आहे. कर्णधार हे व्यवस्थापनावरील पुस्तक, चौथा स्तंभ हे पत्रकारितेतील अभ्यासक्रमासाठी आवश्यक असलेले पुस्तक, यासोबत संतसम्राज्ञी, संत सत्संग, विश्वाराधन, सजल, गीताव्रत साधना - 3 भाग प्रसिद्ध, हिंदोळा, अमात्र, नामसाधना, नासदीय, ईशोवास्य, कबीराऽ रे, संपादकीय, माया, ब्रह्मजिज्ञासा, Editorials, luminous thoughts हे इंग्रजी संपादकीय लेखा़चे पुस्तक, किंचितरेषा, साधनारंभ, खराखुरा कर्मयोग, संत मीराबाईंच्या जीवनावर सखोल अभ्यास करून लिहिलेली संत मीराबाईंवरील पहिलीच कादंबरी 'संतसम्राज्ञी'. या कादंबरीचे हिंदी, इंग्रजीतून अनुवादही झालेले आहेत. स्वर्गोपनिषद, वीणा आणि वाणी, गीताव्रत साधना ही पुस्तके विशेष उल्लेखनीय ठरली. संशोधन हा त्यांच्या साहित्यनिर्मितीचा मुख्य आत्मा आहे. सजल या गझल संग्रहास अरुण दाते यांनी प्रस्तावना दिली. बायबल, कुराण आणि भगवद्गीता यावर अभ्यासपूर्ण लेखमाला आणि पुस्तके प्रकाशित झाली. ‘मुस्लिम धर्म आणि अहिंसा’, ‘संत कबीर’, ‘येशू ख्रिस्त आणि अहिंसा’, ‘रूमी आणि अद्वैत सिद्धांत’ या विषयावर लेखन आणि व्याख्याने. 2016नंतर सार्वजनिक जीवनातून निवृत्ती घेऊन साहित्यिक आणि अध्यात्मिक संशोधनासाठी पूर्ण आयुष्य अर्पण करण्याचा निर्णय. महाराष्ट्र पत्रकार संघाचे, मुख्य राज्य संघटक म्हणून सलग पंधरा वर्षं सेवा. चित्रपट कथा-पटकथा, संवाद आणि गीतलेखन. काही चित्रपटासाठी त्यांची गाणी रवींद्र साठे, वैशाली माडे, स्वप्निल बांदोडकर, अभिजीत कोसंबी, वैशाली चितळे, यांनी गायलेली आहेत. 14 चित्रपटांमधून छोट्या-मोठ्या भूमिका. ब्रह्मचैतन्यसाठी कथा-पटकथा आणि संवाद लेखन. कथालेखन, कादंबरी लेखन, कविता लेखनाच्या 40पेक्षा जास्त विनामूल्य कार्यशाळा घेतलेल्या आहेत. अथलेटिक्स असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून वीस वर्षं अविरोध सेवारत. लायन्स क्लब योगा आणि मेडिटेशन टेरिटरी चीफ म्हणून सेवा. दोन मंदिरे, अनाथ आश्रम, शाळा, ग्रंथालये, टेक्सटाइल मिलची उभारणी निरपेक्ष भावनेने विनामूल्य केली. लोकव्रत प्रकाशनाचे मानद सचिव म्हणून वीस वर्षे विनामूल्य सेवा. त्या माध्यमातून आजवर हजारो पुस्तके प्रसिद्ध केली. आजवर 1600हून अधिक मुखपृष्ठे तयार केली आहेत. 1500पेक्षा जास्त संपादकीय लेख आणि वृत्तपत्रासाठी तितकेच लेख लिहिलेले आहेत. अनेक वृत्तपत्रांतून स्तंभ लेखन केलेले आहे. स्त्री मुक्ती, समस्या निवारण केंद्र आणि कामगार चळवळीच्या निमित्ताने यशवंतराव चव्हाण, भाऊ फाटक आणि सर्वोदय चळवळीचा प्रदीर्घ सहवास. भारतातील पहिल्या शासकीय पोलीस ठाण्यातील समस्या निवारण केंद्राचा सेक्रेटरी म्हणून सलग पंधरा वर्षे सेवा. अनेक साहित्य संमेलने, आणि ग्रामीण साहित्य संमेलनाची संकल्पना मांडून ती साहित्य संमेलने यशस्वीपणे पार पाडली. स्त्रीभ्रूण हत्या, नकूसा नामबदल चळवळ, स्वयंसहायता बचत गट चळवळ यासाठी पाचशेहून अधिक बचत गट स्थापनेच्या कार्यक्रमांमध्ये मार्गदर्शन आणि व्याख्याने. पन्नासहून अधिक सामाजिक आणि साहित्यिक पुरस्कार. न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, दिल्ली यांच्या शुभहस्ते आणि पू. विष्णू महाराज पारनेरकर यांच्या उपस्थितीत 'अक्षर वाड्.मय' पुरस्कार. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे अनुग्रहीत. त्यांच्या सजल या पेजला 75 हजारपेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत.

    Related Posts

    सार्थ ज्ञानेश्वरी : येथ सत्त्व तें उत्तम, रज तें मध्यम

    October 7, 2026 अध्यात्म

    सार्थ ज्ञानेश्वरी : बंधु कां न बंधिजे, हें जाणणें मज माझें

    October 6, 2026 अध्यात्म

    सार्थ ज्ञानेश्वरी : पैं उंचानीचा डाहाळिया, विषमा वेगळालिया

    October 5, 2026 अध्यात्म
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    अध्यात्म

    सार्थ ज्ञानेश्वरी : येथ सत्त्व तें उत्तम, रज तें मध्यम

    By Team AvaantarOctober 7, 2026

    अध्याय चौदावा सत्त्वं रजस्तम इति गुणाः प्रकृतिसंभवाः । निबध्नन्ति महाबाहो देहे देहिनमव्ययम् ॥5॥ तरी सत्त्वरजतम…

    सार्थ ज्ञानेश्वरी : बंधु कां न बंधिजे, हें जाणणें मज माझें

    October 6, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : पैं उंचानीचा डाहाळिया, विषमा वेगळालिया

    October 5, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : रुखाचा आवांका, जैसी बीजकणिका

    October 3, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    सार्थ ज्ञानेश्वरी : येथ सत्त्व तें उत्तम, रज तें मध्यम

    October 7, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 07 ऑक्टोबर 2026

    October 7, 2026

    फूल ना फुलाची पाकळी

    October 6, 2026

    पुण्यकर्म

    October 6, 2026

    उंबऱ्यापलीकडचा सातबारा

    October 6, 2026

    दूसरा आदमी… मनाला भुरळ घालणारे कथानक

    October 6, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 461
    • अवांतर 216
    • आरोग्य 155
    • पंचांग आणि भविष्य 617
    • फिल्मी 71
    • फूड काॅर्नर 257
    • मैत्रीण 30
    • ललित 975
    • शैक्षणिक 87
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    सार्थ ज्ञानेश्वरी : येथ सत्त्व तें उत्तम, रज तें मध्यम

    October 7, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 07 ऑक्टोबर 2026

    October 7, 2026

    फूल ना फुलाची पाकळी

    October 6, 2026
    Most Popular

    Homeopathy : होमिओपॅथीत महाराष्ट्रही अग्रेसर!

    October 4, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.