Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    आराध्याने शोधला ‘क्षितिज 9’ प्रोजेक्टचा हायजॅकर!

    August 14, 2026

    भैरू आणि पारू

    August 14, 2026

    आनंदाच्या राज्यातले चार मित्र

    August 14, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Saturday, August 15
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » सार्थ ज्ञानेश्वरी : सापाच्या तोंडीं, पडली जे उंडी
    अध्यात्म

    सार्थ ज्ञानेश्वरी : सापाच्या तोंडीं, पडली जे उंडी

    Team AvaantarBy Team AvaantarAugust 14, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीसाहित्य, मराठीआर्टिकल, Dnyaneshwari, ज्ञानेश्वरी, अध्यात्म, महाभारत, व्यास, Mahabharat, Vyas, भगवद्गीता, Bhagavadgita, Krishna, Arjuna, Duryodhana, Chapter Thirteen, तेरावा अध्याय, अध्याय तेरावा, विश्वरूप दर्शन, चतुर्भुज रूप
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    अध्याय तेरावा

    झाडिलीं कोळें झाडी । तया न फळे जेवीं बोंडीं । जाहला अग्नि तरि राखोंडी । जाळील काई ॥585॥ म्हणोनि वृद्धाप्याचेनि आठवें । वृद्धाप्या जो नागवे । तयाचां ठायीं जाणावें । ज्ञान आहे ॥586॥ तैसेचि नाना रोग । पडिघाती पुढां आंग । तंव आरोग्याचे उपेग । करूनि घाली ॥587॥ सापाच्या तोंडीं । पडली जे उंडी । ते लाऊनि सांडी । प्रबुद्धु जैसा ॥588॥ तैसा वियोग जेणें दुःखे । विपत्ति शोक पोखे । तें स्नेह सांडूनि सुखें । उदासु होय ॥589॥ आणि जेणें जेणें कडे । दोष सूतील तोंडें । तयां कर्मरंध्रा गुंडे । नियमाचे दाटी ॥590॥ ऐसऐसिया आइती । जयाची परी असती । तोचि ज्ञानसंपत्ती- । गोसावी गा ॥591॥ आतां आणीकही एक । लक्षण अलौकिक । सांगेन आइक । धनंजया ॥592॥

    असक्तिरनभिष्वङ्गः पुत्रदारगृहादिषु । नित्यं च समचित्तत्वमिष्टानिष्टोपपत्तिषु ॥9॥

    तरि जो या देहावरी । उदासु ऐसिया परी । उखिता जैसा बिढारीं । बैसविला आहे ॥593॥ कां झाडाची साउली । वाटे जातां मीनली । घरावरी तेतुली । आस्था नाहीं ॥594॥ साउली सरिसीच असे । परी असे हें नेणिजे जैसें । स्त्रियेचें तैसें । लोलुप्य नाहीं ॥595॥ आणि प्रजा जे जाली । तियें वस्ती कीर आलीं कां गोरुवें बैसलीं । रुखातळीं ॥596॥

    हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : कुसळें कोरडीं, वारेनि जाती बरडीं

    अर्थ

    तिळाचे झाड एकदा झाडून त्यातील सगळे तीळ निघाल्यावर पुन्हा जर ती कोळे झाडली, तर त्या कोळांच्या बोंडातून जसे तीळ निघत नाहीत, तसेच अग्नि जरी असला, पण तो एकदा राखोंडी झाला, मग तो कोणत्याही पदार्थास जाळू शकेल काय? ॥585॥ (त्याप्रमाणे तारुण्यात शक्ति व बुद्धी विषयसेवनात खर्च झाल्यावर म्हातारपणात शरीर काय करील?) असे वृद्धावस्थेत होणार्‍या दुर्दशेचे त्याला तारुण्यावस्थेत स्मरण असल्यामुळे जो वृद्धावस्थेने ग्रासला जात नाही, त्याच्या ठिकाणी ज्ञान आहे, असे समजावे. ॥586॥ त्याचप्रमाणे नाना प्रकारचे रोग पुढे अंगावर आदळतील तेव्हा ते रोग येण्याच्या आधीच तो आरोग्याचा उपयोग करून घेतो. ॥587॥ सापाच्या तोंडात एकदा पडलेला पदार्थ प्राप्त झाला असता शहाणा मनुष्य जसा तो पदार्थ टाकून देतो, ॥588॥ त्याप्रमाणे ज्या स्नेहाच्या योगाने वियोग व दु:खे, विपत्ति व शोक ही पोसली जातात, तो स्नेह टाकून जो समाधानवृत्ति ठेऊन उदास होऊन राहतो, ॥589॥ आणि ज्या ज्या इंद्रियांच्या द्वाराने निषिद्ध आचरणे आपला चंचुप्रवेश करतील त्या त्या कर्म करणार्‍या इंद्रियरूपी बिळात निग्रहाचे धोंडे ठोकून तो ते प्रवेशाचे मार्गच बंद करतो ॥590॥ अशा अशा सामग्रीने ज्याचा वागण्याचा प्रकार असतो, तोच तो अर्जुना ज्ञानरूपी ऐश्वर्याचा मालक आहे असे समज. ॥591॥ आता आणखीही एक ज्ञानाचे लोकोत्तर लक्षण सांगतो, अर्जुना, ऐक. ॥592॥

    (देहासंबधी) अनासक्ती, स्त्री, पुत्र, गृह इत्यादिकांविषयी अलोलुपता व इष्ट अथवा अनिष्ट (प्रकार) घडले असता चित्ताचे समत्व कधीही ढळू न देणे ॥9॥

    तर बिर्‍हाडी बसविलेला वाटसरू जसा त्या बिर्‍हाडाविषयी उदास असतो, तशा प्रकाराने जो स्वत:च्या शरीराविषयी उदास असतो ॥593॥ अथवा वाटेने जात असता मध्येच प्राप्त झालेल्या झाडाच्या सावलीवर ज्याप्रमाणे (वाटसरूची) आस्था नसते, त्याप्रमाणे ज्ञानी पुरुषाचे स्वत:च्या घरावर किंचितही ममत्व नसते ॥594॥ आपली सावली आपल्याबरोबर नेहेमी असते. परंतु ती सावली आपल्याबरोबर आहे याची आपल्याला खबरही नसते, त्याप्रमाणे स्त्रीविषयी ज्याला आसक्ती नसते, ॥595॥ आणि त्याला जी मुलेबाळे झालेली असतात, त्यास तो खरोखर वस्तीला आलेल्या वाटसरूप्रमाणे मानतो अथवा झाडाखाली बसलेल्या गुरांसंबंधी झाड जसे उदास असते (तसा तो ज्ञानी प्रजेसंबंधी उदास असतो) ॥596॥

    क्रमश:

    हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : हात होती खुळे, हें पुढील मोटकें कळे

    (साभार – शं. वा. तथा मामासाहेब दांडेकर संपादित ‘सार्थ ज्ञानेश्वरी’)

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    रामरक्षेचे चिलखत

    August 13, 2026 अध्यात्म

    सार्थ ज्ञानेश्वरी : हात होती खुळे, हें पुढील मोटकें कळे

    August 13, 2026 अध्यात्म

    सार्थ ज्ञानेश्वरी : कुसळें कोरडीं, वारेनि जाती बरडीं

    August 12, 2026 अध्यात्म
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    अध्यात्म

    रामरक्षेचे चिलखत

    By डॉ. शिरीष कुलकर्णीAugust 13, 2026

    रामनामृतपानेन, यस्य चित्तं प्रसीदति। तस्य रक्षा स्वयं रामः, कुरुते भवसागरे॥ – गीताव्रत ज्यांचे चित्त रामनामाच्या…

    सार्थ ज्ञानेश्वरी : हात होती खुळे, हें पुढील मोटकें कळे

    August 13, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : कुसळें कोरडीं, वारेनि जाती बरडीं

    August 12, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : निदैव्याचे व्यवसाय, तैसे ठाकती हातपाय

    August 11, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    आराध्याने शोधला ‘क्षितिज 9’ प्रोजेक्टचा हायजॅकर!

    August 14, 2026

    भैरू आणि पारू

    August 14, 2026

    आनंदाच्या राज्यातले चार मित्र

    August 14, 2026

    समजून घेणं

    August 14, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : सापाच्या तोंडीं, पडली जे उंडी

    August 14, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 14 ऑगस्ट 2026

    August 14, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 395
    • अवांतर 204
    • आरोग्य 138
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 532
    • फिल्मी 63
    • फूड काॅर्नर 248
    • मैत्रीण 24
    • ललित 851
    • शैक्षणिक 84
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    आराध्याने शोधला ‘क्षितिज 9’ प्रोजेक्टचा हायजॅकर!

    August 14, 2026

    भैरू आणि पारू

    August 14, 2026

    आनंदाच्या राज्यातले चार मित्र

    August 14, 2026
    Most Popular

    ज्योतिषशास्त्र… कारक ग्रहाचा भाव सुद्धा महत्त्वाचा!

    August 8, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.