Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    नळ स्टॉपची कहाणी…

    July 26, 2026

    चिकनी चमेली अन् रोहन

    July 26, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 26 जुलै ते 01 ऑगस्ट 2026

    July 26, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Sunday, July 26
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » नळ स्टॉपची कहाणी…
    ललित

    नळ स्टॉपची कहाणी…

    पराग गोडबोलेBy पराग गोडबोलेJuly 26, 2026No Comments6 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठी आर्टिकल, मराठीलेख, मराठी साहित्य, मराठी लेख, मी मराठी, अभिजात मराठी, पराग गोडबोले, लेखक पराग गोडबोले, पुणे मेट्रो, नळ स्टॉपचे नामकरण, एसएनडीटी स्टॉप, नळ स्टॉप एसएनडीटी स्टेशन, रिक्षावाल्यांची मुजोरी, जगण्यात आनंदाचा शोध, आनंदी जगणं,
    फोटो सौजन्य - चॅटजीपीटी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    अलीकडेच मस्त गंमत झाली. तसे घोळ, गमतीजमती माझ्या पाचवीलाच पुजलेल्या आहेत, त्यातलीच ही एक नवीन कडी. शनिवारी पुण्याला येण्यासाठी म्हणून ठाण्याहून प्रगती एक्स्प्रेस पकडली, मी पाच वाजता आणि आठच्या सुमारास पुणे स्थानकात उतरलो. अगदी वेळेवर आली गाडी, म्हणून जाम हायसं वाटलं.

    भाऊ राहतो कर्वेनगरला… त्याच्याकडे जाऊन मग पुढे एका नातेवाईकांकडे जेवायला जायचं होतं. शनिवार असून सुद्धा ऑफिसला गेलो होतो, दिवसभर काम करून जाम दमायला झालं होतं, पण जाण्याशिवाय दुसरा काही पर्याय नव्हता. ‘कितीही उशीर झाला तरी, तुला यायचंच आहे;’ हे आधीच बजावण्यात आलं होतं, त्यामुळे तशी मनाची तयारी होतीच झालेली!

    पुण्यनगरीत उतरल्यावर, प्रवासाचा पुढचा टप्पा होता ‘पुणे मेट्रो’. ही एक छान सोय झालीय हल्ली. पूर्वी ज्या प्रवासात अनंत अडचणी यायच्या, तो प्रवास हल्ली फार म्हणजे फारच झटपट आणि सुखकारक झालाय. पण मागे एकदा असाच प्रवास केला होता, तेव्हा तिकिटाच्या रांगेत जवळपास अर्ध्या तासाची खोटी झाली होती, एवढी गर्दी होती. यावेळी मात्र मी फोनमध्ये ‘पुणे मेट्रो’ ॲप घेतलं आणि ‘पुणे स्थानक’ ते ‘नळ स्टॉप’ हे वीस रुपयांचं तिकीट, सवलतीच्या दरात फक्त चौदा रुपयांना खरेदी करून निश्चिंत झालो. आता रांग लावावी लागणार नव्हती, त्यामुळे बराच वेळ वाचणार होता.

    मजल दरमजल करत, फलाटावर पोहोचलो. तीनच मिनिटांत गाडी आली वनाझकडे जाणारी… गर्दी नव्हती, त्यामुळे चक्क बसायला जागा मिळाली आणि मी सुखावलो. येणाऱ्या प्रत्येक स्थानकाची उद्घोषणा होत होती. नळ स्टॉपची घोषणा झाली की, उठायचं, असं ठरवलं होतं. डोळे मोबाइलमध्ये आणि कान उद्घोषणेकडे, असं काहीसं सुरू होतं माझं.

    स्थानकं येत होती आणि जात होती. पोरं, पोरी, बायका, पुरुष चढत होते आणि उतरत होते. अशी बरीच स्थानकं आली आणि गेली, पण नळ स्टॉपची घोषणा काही होईना! मी आपला वाट बघत बसलो होतो… भिडस्त स्वभाव, त्यामुळे तोंड उचकटून कोणाला तरी विचारावं, हे पण सुधरलं नाही आणि बसून राहिलो निवांत…

    हेही वाचा – पेरू खाणे म्हणजे सुखाची परिसीमा, पण…

    ‘पौड रोड’ नावाचं स्थानक आलं आणि गेलं. त्यानंतर ‘आनंद नगर’ची घोषणा झाली आणि मला जाणवलं की, ‘कुछ तो गडबड है दया…’ काहीतरी गंडलं होतं नक्कीच!

    आता धीर एकवटून, मी शेजारी कानात बोळे खुपसून बसलेल्या एका मुलाला विचारलं, “नळ स्टॉप कधी येईल?”

    माझा प्रश्न त्याला ऐकूच गेला नसावा बहुतेक, हे त्याच्या कोऱ्या करकरीत चेहेऱ्याकडे बघून मला कळलं. मी ढोसलं त्याला आणि परत विचारलं, “नळ स्टॉप कधी येईल?”

    त्याने एका कानातलं बुच काढलं आणि त्रासिक चर्या करून ‘काय?’ असं हातानं खूण करून विचारलं. मी तिसऱ्यांदा तोच प्रश्न विचारला आणि तो म्हणाला, “काय काका, गेलं की नळ स्टॉप मागेच. तुम्ही पुढे आलात दोन स्टेशनं!”

    च्या मारी गंडेरी, हे कधी गेलं? मी तर ऐकलं नाही आणि बघितलं पण नाही. मी आपला केविलवाणा…

    शेजारी एक समवयस्क गृहस्थ बसले होते, ते म्हणाले, “अहो, नळ स्टॉप आता इतिहासजमा झाला. आता नाव बदलून SNDT केलंय. गेलं ते मागं, कधीच… काय राव तुम्ही! आता तुम्ही इथे उतरा, पलिकडची गाडी पकडा आणि मग SNDT ला उतरा. तोच नळ स्टॉप.”

    हाय रे कर्मा! आधीच गांजलेला मी आणखीनच वैतागलो. बायकोला फोन करून, आता वनाझला उतरून थेट वारज्याला घरी जाऊन पथारी पसरतो, असं सांगावं असं मनात आलं, पण आवरलं स्वतःला. तेवढ्यात तिचाच फोन आला – “कुठवर पोहोचली स्वारी?”

    सांगावं का नं सांगावं, विचार करत असतानाच, न राहवून ही नवी कहाणी ऐकवली तिला, आणि  पलीकडे तिने कपाळावर मारलेल्या हाताचा आवाज ऐकू आला मला स्पष्टपणे. आता जे घडलं त्यात माझा दोष काय? पण ती ऐकून घेईल तर शपथ.

    मनातल्या मनात, स्थानकाचं नाव बदलणारे आणि ते नीटसपणे सगळीकडे बदलून पूर्णत्वाला न नेणारे जे कोणी असतील, त्यांना शिव्यांची लाखोली व्हायली आणि चरफडत आनंदनगरला उतरलो. आता परत तिकीट काढावं म्हणून मोबाइल उघडला आणि तिथल्या एका कर्मचाऱ्याला विचारलं, तर तो म्हणाला, ‘चालतंय तेच तिकीट. जावा तुम्ही बिनघोर.’ बरं वाटलं अगदी, सरळसोट उत्तर मिळालं म्हणून!

    परतीची गाडी तब्बल दहा मिनिटांनी होती. तेवढ्यात बायकोचे चार फोन येऊन गेले. किती वैतागलो असेन, विचार करा!

    परतीच्या प्रवासात मात्र अगदी खणखणीत ‘नळ स्टॉप’ अशी घोषणा झाली…! हे गौडबंगाल काही उलगडलंच नाही मला. च्यायला, नाव बदललं तर ते ॲपमध्ये का दिसतंय, काही गाड्यांमध्ये दिसतंय तर काहींमध्ये नाही, असं कसं? हा प्रश्नच पडला मला.

    उतरल्यावर तिरमिरीत तिथल्या तिकीट खिडकीपाशी गेलो आणि त्यांना हे विचारायचा क्षीण प्रयत्न केला, पण मेट्रोचे ते कर्मचारी ताकास तूर लागू देईनात. शेवटी तो निष्फळ प्रयत्न सोडून, स्वतःच्याच नशिबाला बोल लावून निघालो.

    मागे माझा एक मित्र, वनाझहून पुणे स्थानकाकडे जाताना, ‘RTO, पुणे स्थानक’ अशी उद्घोषणा ऐकून तिथेच उतरला होता, याची आठवण झाली. फसगत होणारा मी काही एकटाच नव्हतो, ही एक सुखाची जाणीव, त्यातल्या त्यात…

    हा नळ स्टॉप म्हणजे ‘कोई बंदर नही है फिरभी नाम बांद्रा, चर्च का गेट है चर्च है लापता…’  याची पुणेरी आवृत्ती आहे. ना नळ आहे, ना स्टॉप आहे, तरी ‘नळ स्टॉप’! बच्चनने असं काही गाणं पुढे मागे केलं पुण्यावर, तर डझनभर मारूती आणि विठोबांसोबत या विस्मयजनक नळ स्टॉपचा उल्लेख नक्कीच होईल हे मात्र निश्चित!

    दुर्दैवाचे दशावतार तिथेच संपले नव्हते. आता पाळी होती रिक्षाची. अगदी आगीतून फुफाट्यात अशी गत. माझं ठिकाण सांगितल्यावर, ‘दोनशे रुपये होतील साहेब,’ असं कान, नाहीतर दात कोरत, गुटखा चघळत, निर्विकारपणे सांगणाऱ्या त्या महामहिम रिक्षेवाल्यांनाही लाखोली वाहावी असं खूप वाटत होतं, पण शेवटी ‘अडला हरी’ अशातली गत.

    एक जण शंभर रुपयांवर तयार झाला, अगदी उपकारच माझ्यावर. बसलो रिक्षात आणि त्याला म्हणालो, “मीटर टाक. मी कबूल केलेले पैसे देईन तुला, पण टाक.” छद्मी का काय ते हसत, त्याने खटकन् मीटर टाकलं आणि मी एकदाचा मार्गाला लागलो. उतरताना मीटरवर झाले होते फक्त अठ्ठावन्न रुपये.

    मी कबूल केल्याप्रमाणे शंभर दिले आणि मग तो स्वतःहूनच म्हणाला, “रिटर्न भाडं भेटत नाय साहेब.” कसले साहेब आणि कसलं काय? पामर आम्ही, तुमच्या दावणीला बांधलेले! कर्वेनगरसारख्या भागातून कुठे परतीचं भाडं कोणास ठाऊक? जाऊद्या, काय बोलणार, गरजवंताला अक्कल नसते, हेच खरं.

    सकाळी सात वाजता डोंबिवलीहून प्रस्थान केलेला मी, अशा रीतीने रात्री नऊ वाजता भावाच्या घरी पोहोचलो. जरा तोंडावर पाण्याचे सपकारे मारून, तेवढ्यापुरता फ्रेश का काय ते होऊन, मग जेवायला निघालो, सिंहगड रोडला.

    हेही वाचा – मनात घर करू बसलेली ‘सुशीला’!

    उपास चालेल एकवेळ,  पण आता प्रवास नको, असं झालं होतं, पण जाणं भाग होतं. वास्तूशांत होती आणि नवं घर, नवी सजावट बघणं, कौतुक करणं आवश्यकच होतं.

    भावाची गाडी होती आता, त्यामुळे परत रिक्षेवाल्यांची मनधरणी करणं, ओला, उबरवर त्यांची वाट बघत बसणं आवश्यक नव्हतं.

    छान जेवण झालं तिकडे. जरा वेळ बसलो, घर बघितलं, अभिनंदन केलं मनापासून आणि रात्री अकरा वाजता वारज्यात जाऊन, अंथरूणाला पाठ टेकली.

    अशा रितीने एक अनोखा दिवस, टक्के टोणपे खात, नव्या अनुभवांना काखोटीला मारत, संपुष्टात आला. आता यापुढे पुणे मेट्रोने प्रवास करताना, श्रीमती ना. दा. ठाकरसी कायम लक्षात राहणार होत्या, नळ स्टॉप सोबतच!

    असंच असतं आयुष्य. त्यातच आनंद शोधत जगायचं असतं माणसानं. कण्हत, कुथत जगण्यात काय हशील?

    पराग गोडबोले

    मोबाइल - 9323277620

    Related Posts

    चिकनी चमेली अन् रोहन

    July 26, 2026 ललित

    एसए ग्रुप… एफबीवर प्रणिताची ‘ती’ पोस्ट

    July 25, 2026 ललित

    विठ्ठल विठ्ठल… दोन बहिणींची पंढरीची वारी

    July 25, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    चिकनी चमेली अन् रोहन

    By विशाल कुलकर्णीJuly 26, 2026

    पूर्वार्ध “ए हीरो वो देख, आ गयी तेरी ‘चिकनी चमेली’?” राजाने रोहनच्या पोटात कोपराने ढोसत,…

    एसए ग्रुप… एफबीवर प्रणिताची ‘ती’ पोस्ट

    July 25, 2026

    विठ्ठल विठ्ठल… दोन बहिणींची पंढरीची वारी

    July 25, 2026

    आराध्याला पुन्हा भेटला शिवा…

    July 24, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    नळ स्टॉपची कहाणी…

    July 26, 2026

    चिकनी चमेली अन् रोहन

    July 26, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 26 जुलै ते 01 ऑगस्ट 2026

    July 26, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : तियेकडोनि येतसे वारा, देखोनि धांवे सामोरा

    July 26, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 26 जुलै 2026

    July 26, 2026

    एसए ग्रुप… एफबीवर प्रणिताची ‘ती’ पोस्ट

    July 25, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 373
    • अवांतर 199
    • आरोग्य 133
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 506
    • फिल्मी 59
    • फूड काॅर्नर 241
    • मैत्रीण 24
    • ललित 806
    • शैक्षणिक 83
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    नळ स्टॉपची कहाणी…

    July 26, 2026

    चिकनी चमेली अन् रोहन

    July 26, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 26 जुलै ते 01 ऑगस्ट 2026

    July 26, 2026
    Most Popular

    कान्होपात्रेचे समर्पण

    July 23, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.