Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 25 जुलै 2026

    July 25, 2026

    आराध्याला पुन्हा भेटला शिवा…

    July 24, 2026

    दारू सोडली… कायमची!

    July 24, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Saturday, July 25
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » सात्विक सुख… वरण भात तूप!
    फूड काॅर्नर

    सात्विक सुख… वरण भात तूप!

    माधवी जोशी माहुलकरBy माधवी जोशी माहुलकरJuly 24, 2026No Comments6 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठी लेख, मराठी कथा, मराठी साहित्य, मी मराठी, अभिजात मराठी, मराठी लेखक, माधवी जोशी माहुलकर, लेखिका माधवी जोशी माहुलकर, माधवी जोशी, माधवी माहुलकर, सात्विक वरण भात तूप, पौष्टिक तुरीची डाळ, पौष्टिक तूरडाळ, गर्भवतींसाठी तूरडाळ, बाळंतीणीसाठी तूरडाळ, तुरीच्या डाळीचे वरण,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    तुरीचं साधे वरण आणि गरम भाताची वाफाळलेली मूद, त्यावर साजूक तुपाची धार… हे केवळ स्वर्गसुख! ‘वरण-तूप-भात’ म्हणजे प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसाचे हक्काचे ‘Comfort Food’. या साध्याशा जेवणावर मराठी लोक अगदी निर्व्याज प्रेम करतात. हॉटेलच्या चकचकीत मेन्यूकार्डवर शेकडो पक्वान्नांची नावं चमकत असतील, देश-विदेशातील नवनवीन चवी आपल्या जिभेला भुरळ घालत असतील; पण सरते शेवटी मनाला आणि पोटाला जे सात्विक सुख हवे असते, ते फक्त याच एका घासात मिळते.

    आपल्या मराठी घरात या सुखाचे कितीतरी चवदार प्रकार आहेत. कधी तूप, मोहरी, जिरे, कढीपत्ता आणि हिंगाची कडकडीत फोडणी जेव्हा मऊ शिजलेल्या तुरीच्या वरणावर बसते, तेव्हा सुटणारा तो सुवास थेट शेजारच्या घरापर्यंत जातो आणि भूक खळबळून जागी होते! तर कधी जिभेला चव आणणारे चिंच-गुळाचे चविष्ट वरण किंवा गरमागरम टोमॅटोचे, कांद्याचे फोडणीचे वरण… या चवीपुढे जगातले सगळे सूप फिके वाटतात. हॉटेलमधे गेल्यावरही दाल फ्राय, जिरा दाल किंवा दाल तडका या पदार्थांना सर्वांची पहिली पसंती असते.

    गर्भवती आणि बाळंतीण महिलांना वरणाच्या पाण्यात तूप टाकून ते पौष्टिक आहार म्हणून प्यायला देतात, त्यामुळेच मनुष्य जन्मतःच या वरण-भाताशी नाते जुळवतो. बाळ जन्मल्यानंतर सहा-सात महिन्यांनी त्याच्यावर जेव्हा अन्नसेवनाचा पहिला संस्कार केला जातो, तेव्हा या साजूक तुपातल्या वरणाच्या पाण्याची आणि मऊशार भाताची चव त्याच्या जिभेवर विराजमान होते. त्यामुळे त्याचे भरणपोषण व्यवस्थित होते. आयुर्वेदाच्या दृष्टीने हा सर्वात पाचक आणि ‘पूर्णान्न’ प्रकार आहे. आयुष्याच्या प्रवासाची ही सात्विक सुरुवातच वरण-भाताने होते, म्हणूनच की काय, हा पदार्थ माणसाच्या रक्तामध्ये कायमचा भिनून जातो.

    हेही वाचा – आठवडी बाजारातील भातकं!

    या सात्विक अन्नाच्या साधेपणाची जादू फक्त आपल्यापुरतीच मर्यादित नाही, तर ती सातासमुद्रापारही चालते. नुकतीच माझ्या एका ओळखीच्या काकूंकडून अमेरिकेतली एक अतिशय गोड गोष्ट ऐकायला मिळाली. त्यांची सून तिच्या मुलीला, एका महाराष्ट्रीयन असलेल्या परंतु अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या ‘बेबी सिटर’कडे (लहान मुलांची काळजी घेणाऱ्या बाईंकडे) घेऊन जायची. त्या बाई तिथल्या अमेरिकन मुलांना आपल्या काही भारतीय मुलांसोबत दुपारी आवर्जून आपल्या मराठमोळ्या पद्धतीने बनवलेला गरमागरम वरण-तूप-भात खायला द्यायच्या. ती लहान मुलं तो साजूक तूप घातलेला ‘गुरगुट्या मऊ वरणभात’ खाऊन आनंदी व्हायची आणि गंमत म्हणजे, ती गोरीगोमटी परदेशी मुलं संध्याकाळी घरी गेल्यावर आपल्या आईकडे “आम्हाला तोच पिवळा वरण भात हवा!” म्हणून चक्क हट्ट करायची! परदेशात मॅश केलेले बटाटे आणि पास्ता खाणारी मुलं जर या चवीसाठी हट्ट करत असतील, तर विचार करा या वरण-भातात केवढी ताकद असेल!

    गावरान तूरडाळ दिसायला जरी साधी असली तरी, ती चवीला गुळचट आणि पौष्टिक आहे हे निश्चित! तूर हे मुळात उष्ण प्रदेशातील पीक असून दक्षिण आशिया, मध्य अमेरिका, आफ्रिकेत ते मोठ्या प्रमाणात घेतले जाते. पण संपूर्ण जगात तुरीचे सर्वाधिक उत्पादन आणि सेवन आपल्या भारतात होते! उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, गुजरात आणि विशेषतः, आपल्या महाराष्ट्राच्या, विदर्भाच्या काळ्या कसदार जमिनीत प्रामुख्याने हे पीक घेतले जाते. पण आजकाल बाजारात मिळणाऱ्या पॉलिश डाळीमुळे वरण-भाताची अस्सल चव आणि ताकद दोन्ही कुठेतरी हरवत चालले आहे, ती चकचकीत, पिवळीधमक आणि बिनासालाची पॉलिश डाळ आपण कशासाठी खरेदी करायची, याचा विचार व्हायला हवा. खाण्याच्या गोष्टीत सौंदर्याचं काय काम? दिसायला ही डाळ सुंदर नसेलही, पण चवीची आणि आरोग्याची खरी गॅरंटी पारंपरिक पद्धतीने बनवलेल्या अस्सल टरफल (साल) असलेल्या गावरान तूरडाळीमध्येच असते!

    सांगितल्यास कदाचित विश्वास बसणार नाही, पण दुधाच्या तब्बल सहापट कॅल्शियम या तूरडाळीच्या टरफलात (सालीमध्ये) असतं! हा थक्क करणारा शोध हैदराबाद येथील ‘इक्रिसॅट’मधील (ICRISAT) कृषी शास्त्रज्ञांनी लावला असून, ‘सस्टेनेबिलिटी’ नावाच्या जागतिक जर्नलमध्ये हा शोधनिबंध प्रकाशित झाला आहे.

    उदाहरणाने समजून घ्यायचे तर, 100 मिली दुधात साधारण 120 मिलिग्रॅम कॅल्शियम असते; तर 100 ग्रॅम टरफल असलेल्या तूरडाळीत तब्बल 652 मिलिग्रॅम कॅल्शियम आढळते! मानवी शरीराला दररोज 800 ते 1000 मिलीग्रॅम कॅल्शियमची गरज असते, जी सामान्य भारतीय आहारामधून पूर्ण होत नाही. पण दुर्दैवाने, आज आधुनिक कारखान्यांमध्ये डाळीवर रासायनिक प्रक्रिया करताना तिची टरफले पूर्णपणे काढून टाकली जातात. ही मौल्यवान टरफले एक तर पशुखाद्यासाठी वापरली जातात किंवा कचऱ्यात फेकली जातात. शास्त्रज्ञांच्या मते, जर लहान मुलांच्या आहारात या टरफल असलेल्या पारंपरिक डाळीचा समावेश केला, तर त्यांना मोठ्या प्रमाणावर प्रथिने आणि कॅल्शियम मिळेल, ज्यामुळे मुलांमधील ऑस्टिओपोरोसिस (हाडे ठिसूळ होणे) आणि मुडदूस (Rickets) या रोगांवर प्रभावी मात करता येईल!

    पूर्वीच्या काळी आपल्या ग्रामीण भागात वर्षभराची डाळ घरीच बनवून साठवून ठेवायचे, जिचे टरफल पूर्णपणे नष्ट होत नसे. उन्हाळ्यात जेव्हा खळ्यात तुरीची गंजी किंवा चूड लावली जायची, तेव्हा तुरीच्या शेंगांमधून दाणे वेगळे करणे, हे एक मोठे आणि कष्टाचे काम असायचे. शेंगा काठीने बदडून किंवा मुसळाने कुटून दाणे वेगळे केले जायचे. तुरीच्या काड्या आणि कुटारापासून दाणे वेगळे झाले की, मग खरी सुरुवात व्हायची ती डाळ बनवण्याच्या प्रक्रियेची!

    पहिले मोठ्या मातीच्या खापरावर (खपटीवर) तूर टाकून ती हलकी शेकून म्हणजेच ‘कौरून’ घेतली जायची. त्यानंतर ती जात्यावर दळली जायची. पहिल्या फेरीत ज्या तुरीचे टरफल निघायचे नाही, त्यावर पाण्याचे हबके मारून, ती थोडी ओलसर केली जायची आणि मग उखळ-मुसळाने कुटून तिचे टरफल थोडे वेगळे केले जायचे. यालाच ‘डाळ छाटणे’ म्हणतात. यात साल पूर्ण निघत नाही, तर डाळीला चिकटून राहते, जी आरोग्यासाठी अमृत असते. हे काम खूप किचकट होते, परंतु आता आधुनिक युगात तूरडाळ थ्रेशरच्या साह्याने लवकर तयार होते.

    या संपूर्ण प्रक्रियेत जी डाळ तुटायची (ज्याला आपण चुनी किंवा कणी म्हणतो) ती साफ करून वेगळी ठेवली जायची आणि त्यात कांदा, मिरची टाकून चुलीवर छान खरपूस, जाडसर भाकरी बनवली जायची! अशी ही शेकलेली डाळ जेव्हा पाटा-वरवंट्यावर ताजी हळद, मिरची आणि लसूण वाटून शिजवली जायची… ती डाळ इतकी चवदार व्हायची की तिला वेगळ्या फोडणीची गरजच नसायची! आज याच डाळीची किंमत परदेशात गेल्यावर कळते. जेव्हा तिथे भारतासारखी ढीगभर डाळ मिळत नाही. तेथील दुकानांमध्ये “एका कुटुंबाला फक्त दोनच पाकिटे डाळ मिळेल” अशी मर्यादा (Rationing) येते, तेव्हा तिथे डॉलरमध्ये कमावणारी माणसंही या डाळीला एखाद्या संपत्तीसारखं जपून वापरतात, हे लक्षात येते.

    या तुरीच्या वरणाची जादू अशी आहे की, तिचा मोह जगप्रसिद्ध सेलिब्रिटिज, उद्योगपती आणि मोठमोठ्या राजकीय नेत्यांनाही आवरत नाही. क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर असो की, बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान… परदेशात कितीही महागडे पदार्थ खाल्ले तरी घरच्या वरण-भाताची सर कशालाच येत नाही, हे त्यांनी अनेकदा कबूल केले आहे. अगदी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या बाबतीतही ही गोष्ट प्रसिद्ध आहे की, भारतीय जेवणात त्यांची पहिली आणि हक्काची पसंती नेहमीच साध्या डाळ-भाताला असते. कारण, या साधेपणात जो आराम आहे, तो जगातील कोणत्याही ‘फाइव्ह स्टार’ हॉटेलात विकत मिळत नाही.

    हेही वाचा – वर्ध्यातील गोरस पाक म्हणजे स्वर्गीय सुख!

    भरपूर फायबर, कमी फॅट्स आणि प्रथिनांचा खजिना असलेली, आणि विज्ञानानेही सिद्ध केलेली ही गावरान तुरीची डाळ जेव्हा मऊ शिजवून, घोटून भातावर घेतली जाते, तेव्हा ती केवळ शरीराचे पोषण करत नाही, तर मनाला एक कमालीची शांतता देते. विज्ञानाच्या भाषेत याला काही विशिष्ट नावं असतील, पण आपल्यासाठी ते ‘अमृतापेक्षाही गोड’ असलेले सुख आहे. दिवसभराच्या कष्टाने थकलेल्या जीवाकरिता वरण तूप भात हे खरचं तृप्तीचा आनंद देणारे ‘Comfort food ‘आहे.

    जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही जा, कितीही मोठे व्हा… पण जन्माला आल्यानंतर आयुष्याच्या पहिल्या सहा महिन्यांनंतर, अन्नप्राशनावेळी जिभेवर रेंगाळलेली ती तुरीच्या वरणाची सात्विक चव कधीच पुसली जात नाही. म्हणूनच आपण कितीही मोठे झाले असलो तरी आजही, जेव्हा साधं वरण तूप भाताचा सुगंध येतो, तेव्हा नकळतच आपण त्याकडे ओढले जातो, तेव्हा तृप्त होऊन म्हणावसं वाटतं— “हेच खरे सुख, यापुढे बाकी सर्व फिके!” इतकं सगळं माहीत झाल्यावर शक्य असल्यास आणि सहज उपलब्ध असेल तर, नेहमी गावरान तूरडाळ वापरा, असा मी आग्रह करेन.

    Avatar photo
    माधवी जोशी माहुलकर

    एम.ए.(इंग्रजी) बी.एड. असून सध्या नागपूरमध्ये स्थायिक आहेत. लग्नाआधी चार वर्षे मेडिकल रीप्रेझेन्टेटिव्ह म्हणून अकोला येथे कार्यरत. तीन वर्षे शिक्षिका. वाचन, प्रवास करणे, वेगवेगळ्या विषयांवर लिखाण तसेच चर्चा करणे, गायन याची आवड. गायनात गंधर्व महाविद्यालयाच्या परीक्षा प्रथम श्रेणीसह उत्तीर्ण. पती Additional S.P. Anti corruption Bureau Nagpur येथे कार्यरत.

    Related Posts

    Kitchen Tips : बुंदीच्या लाडूंची खीर, आंब्याच्या वड्या, नारळाच्या वड्या बनविण्यासाठी…

    July 21, 2026 फूड काॅर्नर

    Recipe : आषाढ स्पेशल खुसखुशीत कापण्या अन् चटपटीत कॉर्न पॅटिस

    July 20, 2026 फूड काॅर्नर

    पोई भाजी (मलबार स्पिनॅच, मायाळू) एक पौष्टिक प्रकार!

    July 17, 2026 फूड काॅर्नर
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    फूड काॅर्नर

    Kitchen Tips : बुंदीच्या लाडूंची खीर, आंब्याच्या वड्या, नारळाच्या वड्या बनविण्यासाठी…

    By Team AvaantarJuly 21, 2026

    रोजच्या जेवणात वेगळेपणा आणण्याचा प्रयत्न गृहिणींचा असतो. यासाठी काही नवनवीन प्रयोग केले जातात… असेच काही…

    Recipe : आषाढ स्पेशल खुसखुशीत कापण्या अन् चटपटीत कॉर्न पॅटिस

    July 20, 2026

    पोई भाजी (मलबार स्पिनॅच, मायाळू) एक पौष्टिक प्रकार!

    July 17, 2026

    Recipe : चटपटीत सोया पॅकेट्स

    July 16, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 25 जुलै 2026

    July 25, 2026

    आराध्याला पुन्हा भेटला शिवा…

    July 24, 2026

    दारू सोडली… कायमची!

    July 24, 2026

    चातुर्मास आमचा-तुमचा… आपल्या सर्वांचा

    July 24, 2026

    दर्शन विठ्ठलाचे

    July 24, 2026

    सात्विक सुख… वरण भात तूप!

    July 24, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 371
    • अवांतर 199
    • आरोग्य 132
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 503
    • फिल्मी 59
    • फूड काॅर्नर 241
    • मैत्रीण 24
    • ललित 802
    • शैक्षणिक 83
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 25 जुलै 2026

    July 25, 2026

    आराध्याला पुन्हा भेटला शिवा…

    July 24, 2026

    दारू सोडली… कायमची!

    July 24, 2026
    Most Popular

    कान्होपात्रेचे समर्पण

    July 23, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.