दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 20 जुलै 2026; वार : सोमवार
- भारतीय सौर : 29 आषाढ शके 1948; तिथि : सप्तमी 28:02 ; नक्षत्र : हस्त 19:08 ;
- योग : शिव 18:36 ; करण : गरज 15:40;
- सूर्य : कर्क; चंद्र : कन्या; सूर्योदय : 06:10; सूर्यास्त : 19:19;
- पक्ष : शुक्ल; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव;
- शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128
विवस्तव सप्तमी
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
दिनविशेष
प्रसिद्ध गिर्यारोहक सर एडमंड हिलरी
टीम अवांतर
न्यूझीलंडचे प्रसिद्ध गिर्यारोहक आणि अंटार्क्टिका खंडाचे समन्वेषक (Exploration) सर एडमंड हिलरी यांचा जन्म 20 जुलै 1919 रोजी न्यूझीलंडमधील ऑक्लंड येथे झाला. माध्यमिक शाळेत असतानाच ते न्यूझीलंडमधील सदर्न आल्प्स पर्वतावर गिर्यारोहण करीत असे. सदर्न आल्प्समध्ये गिर्यारोहण केल्यानंतर 1943 मध्ये ते रॉयल न्यूझीलंड एअर फोर्समध्ये एक मार्गनिर्देशक म्हणून दाखल झाले. गिर्यारोहण हा त्यांचा छंद बनला होता.
दुसऱ्या महायुद्धकाळात सैनिकी सेवा पूर्ण केल्यानंतर त्यांनी एव्हरेस्ट सर करण्याचा निर्धार केला. 1951 मध्ये न्यूझीलंडने आयोजित केलेल्या भारतातल्या गढवाल गिर्यारोहण मोहिमेत आणि 1952 मध्ये ब्रिटनने आयोजित केलेल्या माऊंट एव्हरेस्टच्या पश्चिमेकडील शिखरांवरील मोहिमेत ते सहभागी झाले होते.
हेही वाचा – एका घासात विठ्ठल…
1953 मध्ये रॉयल जिऑग्रफिकल सोसायटी आणि अल्पाइन क्लब यांनी सर जॉन हंट या प्रसिद्ध ब्रिटिश गिर्यारोहकांच्या नेतृत्वाखाली माऊंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वोच्च शिखर चढून जाण्याची एक नियोजनबद्ध मोहीम आखली होती. या मोहिमेत एडमंड हिलरी आणि शेरपा तेनसिंग सामील होते. 29 मे 1953 रोजी हिलरी आणि तेनसिंग या दोघांनी सकाळी 11.30 वाजता जगातील सर्वोच्च शिखर माऊंट एव्हरेस्टवर पहिले पाऊल ठेवले. हाय ॲड्व्हेंचर या पुस्तकात हिलरी यांनी या मोहिमेसंबंधीचे वर्णन केले आहे. त्यांच्या या कामगिरीची दखल घेत राणी एलिझाबेथ (दुसरी) हिने हिलरी यांना ‘सर’ ही पदवी देऊन गौरविले.
ब्रिटिश समन्वेषक ( (Exploration) व्हिव्हियन अर्नेस्ट फुश यांच्या नेतृत्वाखाली 1955-58 या कालावधीत ब्रिटिश कॉमनवेल्थ ट्रान्स-अंटार्क्टिक समन्वेषण मोहीम योजिली होती. या मोहिमेत न्यूझीलंडच्या तुकडीचे नेतृत्व हिलरी यांच्याकडे होते. यावेळी 4 जानेवारी 1958 रोजी हिलरी तेथे स्थापन केलेल्या कॅम्पपासून ट्रॅक्टरच्या साहाय्याने दक्षिण ध्रुवावर पोहोचले होते. 1960 च्या दशकातील सुरुवातीच्या काळात त्यांनी एव्हरेस्ट परिसरात इतरही मोहिमा काढल्या, मात्र एव्हरेस्ट सर करण्याचा पुन्हा प्रयत्न केला नाही. न्यूझीलंड, अमेरिका आणि ब्रिटन यांनी 1960-61 मध्ये हिलरीच्या नेतृत्वाखाली जास्त उंचीवर मानवाच्या शरीरावर होणारा परिणाम आणि हिममानवाच्या अस्तित्वाचा शोध यांसाठी मोहीम योजली होती. येथे हिममानवाच्या अस्तित्वाचे पुरावे उपलब्ध नाहीत, असे हिलरी यांनी नमूद केले. 1967 मध्ये अंटार्क्टिका मोहिमेत हिलरी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तेथील माऊंट हर्षलची उंची प्रथम मोजली होती. हिलरी यांनी 1977 मध्ये गंगा नदीच्या मुखापासून पहिल्या टप्प्यापर्यंत जेट बोटीच्या साहाय्याने आणि त्यापुढे चढत जाऊन तिच्या हिमालयातील उगमस्थानापर्यंत समन्वेषण केले होते.
हिलरी यांना त्यांच्या कामगिरीबद्दल वेगवेगळ्या सन्मानांनी गौरविले गेले. 1985-87 या कालावधीत ते न्यूझीलंडचे भारत, नेपाळ आणि बांगलादेशच्या उच्चायुक्त पदावर होते. न्यूझीलंडने ऑर्डर ऑफ द गार्टर, पोलंडने कमांडर्स क्रॉस आणि भारताने 2008 मध्ये पद्मविभूषण ही पदवी देऊन त्यांना गौरविले.
हिलरी यांनी त्यांच्या मोहिमांविषयी अनेक पुस्तके लिहिली. यामध्ये ॲक्सेंट ऑफ एव्हरेस्ट, द क्रॉसिंग ऑफ अंटार्क्टिका, द कॉमनवेल्थ ट्रान्स-अंटार्क्टिक एक्स-पेडिशन, नो लॅटिट्यूड फॉर एरर, हाय इन द थिन कोल्ड एअर (डेसमंड द्योगसह), नथिंग व्हेंचर नथिंग विन (आत्मचरित्र), फ्रॉम द ओशन टू द स्काय यांचा अंतर्भाव आहे. 11 जानेवारी 2008 रोजी ऑकलंड येथे त्यांचे निधन झाले.
आजचे राशिभविष्य
मेष – आज दिवसभरात भरपूर धावपळ करावी लागेल मात्र त्यामुळे तुम्हाला यशाची नवी दिशाही मिळेल. जोखमीचे निर्णय टाळणे शहाणपणाचे ठरेल. प्रवासाचे नियोजन करत असाल, तर निघण्यापूर्वी सगळ्या तयारीवर एक नजर फिरवा. सरकारी बाबींमधील निष्काळजीपणा अडचणींना कारणीभूत ठरू शकतो. सखोल चौकशीनंतरच गुंतवणुकीचे निर्णय घ्या.
वृषभ – बऱ्याच काळापासून घर किंवा मालमत्ता खरेदी करण्याचे स्वप्न पाहत असाल, तर ते आज सत्यात उतरण्याची शक्यता आहे. तुमच्या सध्याच्या चिंतांबाबत शांत मनाने उपाय शोधण्याचा प्रयत्न करा. नोकरीच्या ठिकाणी तसेच घरात संयम ठेवा. कुटुंबासोबत घालवलेला वेळ तुम्हाला मन:शांती देईल. आज तुम्हाला अशी माहिती मिळू शकते, जी भविष्यात तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरेल.
मिथुन – छोटे छोटे प्रयत्न तुम्हाला मोठे यश मिळवून देऊ शकतात. आज नशीब तुमच्या बाजूने असेल, त्यामुळे तुमची मेहनत वाया जाणार नाही. गरज पडल्यास इतरांकडे मदत मागण्यास संकोच करू नका. आपले प्राधान्यक्रम योग्यरित्या ठरवल्यास दिवस आणखी यशस्वी होईल. रागावर नियंत्रण ठेवा, अन्यथा अडचणी निर्माण होतील.
कर्क – सुरू असलेल्या कायदेशीर प्रकरणाचा निकाल तुमच्या बाजूने लागण्याची शक्यता आहे. खूप दिवसांपासूनची इच्छा पूर्ण झाल्याने तुमचा आनंद द्विगुणित होईल. कुटुंबातील लग्न किंवा इतर शुभ प्रसंगांविषयीच्या चर्चेमुळे घरात उत्साहाचे वातावरण असेल. कुटुंबातील सदस्यांची मते भिन्न असू शकतात, परंतु संयम आणि सामंजस्याने प्रत्येक समस्या सोडवता येते, हे लक्षात ठेवा.
सिंह – आर्थिक संतुलन राखणे हे आज प्राधान्य असले पाहिजे. उत्पन्न आणि खर्च यांच्यात योग्य संतुलन राखल्यास भविष्य सुरक्षित होईल. आरोग्यात थोडे चढ-उतार जाणवू शकतात, त्यामुळे स्वतःकडे लक्ष द्या. कोणत्याही कामातील हलगर्जीपणामुळे तुमच्या प्रयत्नांवर परिणाम होऊ शकतो. एखाद्या निर्णयाबद्दल तुमच्या मनात शंका असेल, तर तो सध्या पुढे ढकलणेच उत्तम ठरेल.
कन्या – आज प्रगतीच्या नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात. विद्यार्थ्यांकडून उत्कृष्ट शैक्षणिक यशाची अपेक्षा आहे. घरगुती सुविधांवरील खर्च वाढू शकतो, ज्यामुळे कौटुंबिक वातावरण अधिक आरामदायक होईल. सहकाऱ्यांसोबत वाद होण्याची शक्यता आहे, त्यामुळे संयम बाळगा. व्यवसायातील व्यवहारांबाबत अत्यंत सावधगिरी बाळगा, अनोळखी लोकांशी व्यवहार करणे टाळा, कारण फसवणुकीची शक्यता नाकारता येत नाही.
तुळ – आजचा दिवस आनंद आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेला असेल. जुने विरोधकसुद्धा तुमच्याबद्दलचा त्यांचा नकारात्मक दृष्टिकोन बदलू शकतात. कुटुंबात नवीन सदस्याच्या आगमनाची बातमी आनंदी वातावरणात भर घालेल. नवीन वाहन खरेदी करण्याचाही विचार करू शकता. स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.
वृश्चिक – आज तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल. प्रवासादरम्यान तुम्हाला महत्त्वाची माहिती मिळू शकते, जी भविष्यात फायदेशीर ठरेल. परदेशी व्यवसायात सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. वरिष्ठ तुमच्यावर एक महत्त्वाची जबाबदारी सोपवू शकतात, जी तुम्ही निष्ठेने पार पाडाल. कुटुंबासोबत घालवलेला वेळ मनःशांती देईल. राजकारण किंवा सामाजिक क्षेत्रात असलेल्यांना सन्मान मिळण्याची शक्यता आहे.
हेही वाचा – घरौंदा… निरंतर आत्मबोधाचा शोध
धनु – अचानक झालेला फायदा आज तुमचा दिवस खास बनवू शकतो. मालमत्ता किंवा जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही नवीन संधी स्वीकारण्याचा प्रयत्न कराल, पण घाईने कोणताही निर्णय घेऊ नका. स्वतःच्या कामात विचारपूर्वक बदल करा, कारण यामुळे भविष्यातील यशाचा पाया रचला जाईल. एक मोठे ध्येय साध्य केल्याने तुमचा आत्मविश्वास वाढेल.
मकर – संयम ही तुमची आज सर्वात मोठी ताकद ठरेल. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने तुम्हाला मन:शांती आणि आनंद मिळेल. वडिलोपार्जित मालमत्तेबाबत काही वाद असल्यास, तो मिटण्याची चिन्हे दिसत आहेत. नवीन व्यवसाय सुरू करण्याची कल्पना पुढे जाऊ शकते. स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवा.
कुंभ – आर्थिक परिस्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे. करिअरशी संबंधित एखादी चांगली बातमी मिळेल. प्रलंबित कामे पूर्ण होतील. प्रेम आणि सहकार्याच्या भावनेमुळे नातेसंबंध अधिक दृढ होतील. केवळ दिखाव्यासाठी खर्च करणे टाळा. संततीच्या शिक्षणासंदर्भात एक महत्त्वाचा निर्णय घेऊ शकता. वाहन चालवताना काळजी घ्या.
मीन – आजचा दिवस सन्मान, कर्तृत्व आणि यश घेऊन येणारा असेल. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल. आज तुम्हाला नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. आरोग्याची समस्या जाणवत असेल, तर त्वरित वैद्यकीय सल्ला घ्या. जुनी कर्जे फेडण्यासाठी आज पावले उचलू शकता. कुटुंबासोबत घालवलेला वेळ मनःशांती देईल. मनोरंजनावर देखील खर्च कराल.


