दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 19 जुलै 2026; वार : रविवार
- भारतीय सौर : 28 आषाढ शके 1948; तिथि : षष्ठी 27:29; नक्षत्र : उत्तरा फाल्गुनी 18:11;
- योग : परिघ 19:22; करण : कौलव 15:29;
- सूर्य : कर्क; चंद्र : कन्या; सूर्योदय : 06:09; सूर्यास्त : 19:19;
- पक्ष : शुक्ल; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव;
- शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128
कुमारषष्ठी
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
दिनविशेष
कवी, कोशकार, इतिहास संशोधक यशवंत केळकर
टीम अवांतर
कवी, कोशकार, इतिहास संशोधक यशवंत नरसिंह केळकर यांचा जन्म 19 जुलै 1902 रोजी पुणे येथे झाला. न. चिं. केळकर यांचे पुत्र म्हणून यशवंत यांची सुरुवातीची ओळख होती. मॅट्रिक झाल्यानंतर यशवंत केळकर यांनी सर परशुरामभाऊ महाविद्यालयात प्रवेश घेतला. याच दरम्यान गांधीजींची असहकार चळवळ सुरू झाली. त्यात शाळा-महाविद्यालय यांवर बहिष्कार घालण्यात यावा, असे एक कलम होते. न. चिं. केळकर यांना ते मान्य नव्हते, पण तरी यशवंत आणि बापूराव या आपल्या दोन्ही मुलांना महाविद्यालयातून काढून घरी बसवले. पुढे य. न. केळकर यांनी टिळक महाविद्यालय (आताचे टिळक महाराष्ट्र विद्यापीठ) प्रवेश घेतला. तेथे त्यांना तात्यासाहेब करंदीकर, चिंतामण विनायक वैद्य, शिवराम महादेव परांजपे हे शिक्षक म्हणून लाभले. 1922 साली यशवंत केळकर यांनी टिळक विद्यापीठातून ‘वाङ्मयविशारद’ ही पदवी प्राप्त केली.
हेही वाचा – मधुमेह नियंत्रणासाठी आहार मार्गदर्शन
त्यांनी वयाच्या चौदाव्या वर्षी अब्राहम लिंकन यांच्यावर लिहिलेला लेख ‘शालापत्रक’ या मासिकात प्रसिद्ध झाला होता. पुढे साताऱ्यात नोकरी करत असताना त्यांनी आपले वाचन आणि लिखाण चालू ठेवले. साताऱ्यात असताना यशवंत आणि त्यांच्या बहिणीने ‘गीत-द्वीदल’ हा आपला कवितासंग्रह प्रसिद्ध केला. साताऱ्याच्या ‘ऐक्य’ साप्ताहिकात देखील ते लेख लिहीत असत.
इतिहास विषयावरील पराग या मासिकाची सुरुवात यशवंत केळकरांनी ग. ना. जोशी, मो. गं. दीक्षित यांच्यासोबत केली. हे तिघेही अंकाचे संपादक होते. ऑक्टोबर 1947मध्ये या मासिकाचा पहिला अंक प्रसिद्ध झाला. पुढे सप्टेंबर 1949 पर्यंत हे त्यावेळचे मराठीतील पूर्णतः इतिहास विषयासाठी समर्पित ‘मासिक’ होते. इतिहास विषयक निबंध, स्थळे, कथा, इतिहास क्षेत्रातील बातम्या अशा स्वरूपाचे लेख या मासिकात प्रसिद्ध होत असत. ऑक्टोबर 1949च्या दिवाळी अंकापासून मासिकाच्या स्वरूपात बदल करून फक्त इतिहासविषक लेखासाठी मर्यादित न ठेवता इतरही अनेक विषयांसाठी ते खुले करण्यात आले.
हेही वाचा – ज्योतिषशास्त्र सोप्या भाषेत
य. न. यांचे इतिहासविषयक जवळपास 14 आणि इतर विषयांवरील 10 असे एकूण 24 ग्रंथ प्रसिद्ध झाले. काही अप्रसिद्ध ऐतिहासिक चरित्रे, ऐतिहासिक पोवाडे अथवा मराठ्यांचा काव्यमय इतिहास – भाग 1 ते 3, ऐतिहासिक शब्दकोश भाग 1 आणि 2, चित्रमय शिवाजी, तंतकवि तथा शाहीर, जुन्या अप्रसिद्ध लावण्या, अंधारातील लावण्या, तिसऱ्या महायुद्धाच्या छायेत, होळकरांची कैफियत, वसईची मोहीम, कै. न. चिं. केळकर यांचा खासगी पत्रव्यवहार तसेच केळकर कुलवृत्तान्त (सहलेखक – सी. व्ही. केळकर) यासारख्या ग्रंथसंपदेचा त्यात समावेश आहे. मोडी लिपीतील जुनी कागदपत्रे वाचून आणि त्यांचा सखोल अभ्यास करून त्यांनी नवीन पिढीसाठी इतिहास जिवंत ठेवण्याचे मोठे कार्य केले. 13 फेब्रुवारी 1994 रोजी त्यांचे निधन झाले.
विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशीलतेला समर्पित असलेल्या avaantar.com या वेबपोर्टलवरील वैविध्यपूर्ण वाचनीय लेखाचा आनंद घ्यायचा असेल तर,
IXZVpuvKFwKH6gb0NBN51t?mode=r_c
या लिंकला क्लिक करून WhatsApp group जॉइन करा.


