Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    चांगली बोहनी…

    July 9, 2026

    पावसाळा

    July 8, 2026

    गोष्ट सरोजताई अन् समीराची!

    July 8, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Thursday, July 9
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 08 जुलै 2026
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 08 जुलै 2026

    Team AvaantarBy Team AvaantarJuly 8, 2026Updated:July 8, 2026No Comments6 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, पंचांग, दिनविशेष, Panchang, Dinvishesh, जुलै महिना
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दर्शन कुलकर्णी

    • आज, दिनांक : 08 जुलै 2026; वार : बुधवार
    • भारतीय सौर : 17 आषाढ शके 1948; तिथि : अष्टमी 12:21; नक्षत्र : रेवती 15:59;
    • योग : अतिगंड 12:37; करण : तैतिल 23:34;
    • सूर्य : मिथुन; चंद्र : मीन 15:59 ; सूर्योदय : 06:05; सूर्यास्त : 19:20;
    • पक्ष : कृष्ण; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव;
    • शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128

    वेद कन्सल्टन्सी / 9987433660


    दिनविशेष

    सुप्रसिद्ध इतिहासकार ग्रॅंट डफ

    टीम अवांतर

    मराठ्यांचा इतिहास लिहिणारे सुप्रसिद्ध इतिहासकार ग्रॅंट डफ यांचा जन्म 8 जुलै 1789 बॅम्फ (स्कॉटलंड) येथे झाला.  त्यांचे पूर्ण नाव कॅप्टन जेम्स कनिंगहॅम ग्रँट डफ. पण ग्रँट या नावाने ते अधिक परिचित आहेत. अबर्डीन येथील मार्शल महाविद्यालयात त्यांनी प्रवेश घेतला पण शिक्षण अपुरे टाकून वयाच्या सोळाव्या वर्षी ते ईस्ट इंडिया कंपनीत, मुंबईच्या लष्करात नोकरीसाठी आले. 1806 साली बॉम्बे नेटिव्ह इनफंट्री अथवा बॉम्बे ग्रेनेडिअर्समध्ये त्यांना अधिकाराची जागा मिळाली.

    एल्फिन्स्टनने त्यांना मुद्दाम पुण्यास बोलावून घेतले. 1817 च्या खडकी येथील मराठ्यांबरोबरच्या युद्धात त्यांनी प्रसंगावधान दाखवून शौर्य दाखविले. या सुमारास त्यांचा एल्फिन्स्टनशी चांगला परिचय झाला आणि त्यांना कॅप्टन हा किताब मिळाला.

    1818 मध्ये त्यांची एल्फिन्स्टनने साताऱ्यास पोलिटिकल एजंट म्हणून नियुक्ती केली.  साताऱ्यास 1818 ते 1822 अशी चार वर्षे राहून त्यांनी साताऱ्याची राजकीय व्यवस्था लावून प्रतापसिंह राजांना सुशिक्षित केले. 1823 च्या जानेवारीत ते मायदेशी रजा घेऊन गेले आणि पुन्हा भारतात परत आले नाहीत. 1825 मध्ये त्यांनी कंपनीच्या नोकरीचा राजीनामा दिला.

    हेही वाचा – पतीबरोबरचे कॉन्ट्रॅक्ट रीन्यू करणारा सण…

    एल्फिन्स्टनच्या आज्ञेप्रमाणे त्यांनी ऐतिहासिक कागदपत्रांचा शोध घेऊन 19 जुलै 1819 रोजी मराठ्यांचा सुसंगत इतिहास लिहिण्याचे कार्य अंगीकारले आणि लेखनकार्यास आरंभ केला. सातारचे महाराज तसेच अनेक संबंधित सरदार, सरदेशमुख, देशपांडे आणि आदिलशाही, निजामशाही येथील तवारिखा आणि मराठी बखरी तसेच पत्रे जमवून माहिती गोळा केली. यामध्ये त्यांना बाळाजीपंत नातू यांचे मोठे साहाय्य झाले. हा सर्व इतिहास त्यांनी एल्फिन्स्टन, ब्रिग्झ, व्हॅन्स केनेडी, विल्यम अर्स्किन, बाळाजीपंत नातू यांना दाखविला आणि 1822मध्ये मसुदा तयार केला.

    जॉन मरे पब्लिशर्स लिमिटेड कंपनीने या पुस्तकाचे ‘मोगल सत्तेचा ऱ्हास आणि ब्रिटीश सत्तेचा उदय’ असे नाव ठेवले तरच आपण हे पुस्तक छापू म्हणून कळविले. तेव्हा मला मराठ्यांचाच इतिहास केवळ सांगावयाचा आहे, अशी ठाम भूमिका घेत त्यांनी स्वखर्चाने लाँगमन्स लिमिटेड कंपनीकडून 1826 मध्ये  ‘हिस्टरी ऑफ द मराठाज’  हा ग्रंथ छापून प्रसिद्ध केला.

    1921 पर्यंत या ग्रंथाच्या सहा आवृत्या निघाल्या. 1829 मध्ये कॅ. डेव्हिड केपेन आणि बाबा साने यांनी या ग्रंथाचे ‘मराठ्यांची बखर’  या शीर्षकाने मराठीत भाषांतर केले. त्याच्याही सहा आवृत्या निघाल्या. मात्र या इंग्रजी ग्रंथावर प्रथम कुठेच समीक्षण आले नाही किंवा टीकाही झाली नाही. मात्र नंतरच्या मराठी इतिहासकारांनी त्याच्या ‘हिस्टरी ऑफ द मराठाज’ या ग्रंथावर सडेतोड टीका केली असली तरी मराठ्यांचा सुसंगत इतिहास लिहिण्याचा त्यांचा प्रयत्न सर्वांनीच मान्य केला.

    एडन येथे स्थायिक झाल्यावरही त्यांचा प्रतापसिंह आणि एल्फिन्स्टन यांच्याशी प्रदीर्घ काळ पत्रव्यवहार चालू होता. 1848 साली सातारच्या राजाची पदच्युती आणि राज्य खालसा या संबंधीची ब्रिटिश नीती त्याला आवडली नाही आणि त्याबद्दलची आपली मते त्यांनी जाहीरपणे मांडली होती. त्यांचा एक मुलगा माउंट स्ट्यूअर्ट एल्फिन्स्टन ग्रँट डफ हा पुढे मद्रासचा गव्हर्नर झाला. 23 सप्टेंबर 1858 रोजी एडन येथे त्यांचे निधन झाले.


    आजचे राशिभविष्य

    मेष – आज सावधगिरीने आणि विचारपूर्वक पुढे जा. तुमच्या आजूबाजूचे काही लोक तुमच्या योजनांमध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न करू शकतात, त्यामुळे प्रत्येक पावलाचा काळजीपूर्वक विचार करणे उत्तम राहील. शेअर बाजारात गुंतवणूक केलेल्यांना चढ-उतार अनुभवायला मिळू शकतात. एखाद्याला उसने दिलेले पैसे परत मिळाल्याने मोठा दिलासा मिळू शकतो.

    वृषभ –  प्रलंबित आणि महत्त्वाची कामे व्यवस्थित पूर्ण करण्याकडे आज तुमचे लक्ष असेल. घाई टाळणे महत्त्वाचे ठरेल, कारण एक छोटीशी चूकसुद्धा मोठ्या समस्या निर्माण करू शकते. तुमच्या मेहनतीचे फळ मिळण्याची शक्यता आहे. संपूर्ण माहिती घेतल्याशिवाय सरकारी बाबींमध्ये कोणतेही पाऊल उचलणे टाळा. एखादी जुनी चूक उघड झाल्याने जोडीदार नाराज होऊ शकतो, म्हणून परिस्थिती हुशारीने हाताळा.

    मिथुन – इतरांना मदत करणे ही एक चांगली गोष्ट आहे, परंतु स्वतःच्या कामाकडे दुर्लक्ष करणे तुमच्यासाठी योग्य ठरणार नाही. आज तुमच्या शब्दांचा लोकांवर खोलवर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे आपले शब्द काळजीपूर्वक निवडा. नवीन इलेक्ट्रॉनिक गॅझेट किंवा उपकरण खरेदी करण्याची शक्यता आहे. तुमच्या पालकांचा सल्ला फायदेशीर ठरू शकतो.

    कर्क – सामाजिक, राजकीय किंवा सार्वजनिक क्षेत्रांत गुंतलेल्या जातकांना विशेष लाभ मिळण्याची शक्यता आहे. बऱ्याच काळापासून अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. धार्मिक कार्यात सहभागी झाल्याने मनःशांती मिळेल. संततीच्या शिक्षणासंदर्भात एक महत्त्वाचा निर्णयही घेतला जाऊ शकतो. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा.

    सिंह – व्यवसाय आणि करिअर या दोन्हीमध्ये उत्साहवर्धक परिणाम आज बघायला मिळेल. आज नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात. नोकरी करणाऱ्यांना टीमसोबत मिळून काम करण्याची संधी मिळेल, ज्यामुळे मोठी ध्येये गाठणेही सोपे होईल. पदोन्नती किंवा नवीन जबाबदाऱ्यांविषयीच्या चर्चाही तीव्र होऊ शकतात. अर्थात आपल्या कामांची जबाबदारी स्वतः घेणेच श्रेयस्कर आहे.

    कन्या – आज तुमच्या सभोवताली सकारात्मक ऊर्जा असेल. आर्थिक योजनांमुळे लाभाचे मार्ग खुले होऊ शकतात. विरोधकाच्या प्रभावाखाली येऊन घाईने निर्णय घेणे टाळा. संततीला पुढील शिक्षणासाठी दुसऱ्या शहरात पाठवण्याबाबत एखादा मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो. मामांकडून लाभ मिळण्याचे संकेत आहेत.

    तुळ – मालमत्ता खरेदी-विक्री करण्यासाठी किंवा त्यासंबंधी मोठे निर्णय घेण्यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. भागीदारीतूनही चांगला नफा मिळू शकतो. आर्थिक अडथळे कमी होतील आणि आर्थिक व्यवहार सुरळीतपणे पार पडतील.  इतरांच्या कामात जास्त हस्तक्षेप केल्याने समस्या निर्माण होऊ शकतात. एखाद्या गोष्टीवरून वडिलांच्या नाराजीचा सामना करावा लागू शकतो

    वृश्चिक – आज प्रत्येक व्यक्तीवर लगेच विश्वास ठेवणे टाळा. घाईने घेतलेले निर्णय नुकसानीस कारणीभूत ठरू शकतात. घराची सजावट आणि सोयीसुविधा सुधारण्यावर लक्ष केंद्रित कराल. आपल्या जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष करणे योग्य ठरणार नाही. एका अनुभवी व्यक्तीचा सल्ला वरदान ठरू शकतो. कामाशी संबंधित मोठी समस्या सुटल्याने दिलासा मिळेल.

    हेही वाचा – पित्याचा निर्णय!

    धनु – आज इतरांच्या कामात अनावश्यक हस्तक्षेप टाळणे शहाणपणाचे ठरेल. जोडीदारासोबत समन्वय राखणे आवश्यक असेल. अनोळखी व्यक्तीच्या गोड शब्दांच्या प्रभावाखाली कोणताही निर्णय घेऊ नका. एखादी जुनी कौटुंबिक समस्या पुन्हा उद्भवू शकते. वडीलधाऱ्यांच्या मदतीने ती सोडवा.

    मकर – आज काही कौटुंबिक आणि वैयक्तिक बाबींवर तुमचे लक्ष केंद्रित राहू शकते. मुलाच्या करिअर किंवा नोकरीबद्दलची चिंता तुम्हाला सतावू शकते, पण संयम ठेवा. अफवांवर लगेच विश्वास ठेवू नका. आरोग्यात किंचित चढ-उतार होऊ शकतो. एखादा महत्त्वाचा कौटुंबिक मुद्दाही तुमच्या मनात  वादळ निर्माण करू शकतो.

    कुंभ – बऱ्याच काळापासून रखडलेली सरकारी कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी तुम्ही एखाद्या प्रभावशाली व्यक्तीची मदत घेऊ शकता. प्रवासादरम्यान किंवा बैठकीदरम्यान, तुम्हाला अशी माहिती मिळू शकते जी भविष्यात तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकेल. तुम्हाला तुमच्या आवडीच्या गोष्टींवर खर्च करण्याची इच्छा होईल. वाहन चालवताना विशेष सावधगिरी बाळगा, कारण थोडासा निष्काळजीपणासुद्धा अडचणी निर्माण करू शकतो.

    मीन – बऱ्याच काळापासून उधार दिलेली रक्कम परत मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे आर्थिक दिलासा मिळेल. रखडलेल्या व्यावसायिक योजनांना पुन्हा गती मिळू शकते. नवीन सदस्य किंवा पाहुण्यांच्या आगमनाने घरातील वातावरण उजळून निघेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पाठिंबा मिळेल. आज अनावश्यक वाद टाळणे सर्वोत्तम ठरेल.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 07 जुले 2026

    July 7, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 06 जुलै 2026

    July 6, 2026 पंचांग आणि भविष्य

    साप्ताहिक राशीभविष्य : 05 ते 11 जुलै 2026

    July 5, 2026 पंचांग आणि भविष्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 07 जुले 2026

    By Team AvaantarJuly 7, 2026

    दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 07 जुलै 2026; वार : मंगळवार भारतीय सौर : 16…

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 06 जुलै 2026

    July 6, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 05 ते 11 जुलै 2026

    July 5, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 05 जुलै 2026

    July 5, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    चांगली बोहनी…

    July 9, 2026

    पावसाळा

    July 8, 2026

    गोष्ट सरोजताई अन् समीराची!

    July 8, 2026

    गुंतागुंतीचा माणूस…

    July 8, 2026

     सार्थ ज्ञानेश्वरी : रथांगांचा मेळावा, जेवीं रथु म्हणिजे पांडवा 

    July 8, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 08 जुलै 2026

    July 8, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 353
    • अवांतर 193
    • आरोग्य 128
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 481
    • फिल्मी 55
    • फूड काॅर्नर 231
    • मैत्रीण 24
    • ललित 767
    • शैक्षणिक 82
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    चांगली बोहनी…

    July 9, 2026

    पावसाळा

    July 8, 2026

    गोष्ट सरोजताई अन् समीराची!

    July 8, 2026
    Most Popular

    नूतन… मौनाचा संवाद!

    July 5, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.