मागील लेखात वातविकाराविषयी थोडक्यात माहिती घेताना आपण वातविकाराची लक्षणे आणि कारणे जाणून घेतली. तद्नंतर आपण वातविकार निवारणार्थ योगाभ्यास मार्गदर्शन घेतले. या लेखात आपण वातविकारासाठी योग्य आहार तसेच घरगुती उपाय याबाबत उपयुक्त मार्गदर्शन घेणार आहोत.
आहार मार्गदर्शन
आहार सेवनाची वेळ ठराविक असावी.
पथ्याहार – काय खावे?
- गाईचे दूध आणि तूप
- गव्हाची चपाती
- हिरव्या पालेभाज्या
- मूगडाळ
- डाळिंब, पपई, सफरचंद
- आले, सुंठ, ओवा
- ओली आणि सुकी हळद
अपथ्याहार – काय खाऊ नये?
- वातुळ पदार्थ
हेही वाचा – वातविकारासाठी योगाभ्यास मार्गदर्शन
घरगुती उपाय
- आहारात योग्य प्रमाणात तेलाचा आणि तुपाचा समावेश असावा.
- सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यात लिंबूरस टाकून पाणी पिणे.
- पोट साफ होण्यासाठी एरंडेल तेल घ्यावे, तसेच दुखऱ्या भागावर लावावे.
- नियमित तेलमालीश करणे.
- गरम पाण्याने स्नान करणे.
- कोमट पाणी पिणे.
- स्थूलतेमुळे वातविकार संभवतात म्हणून वजन नियंत्रणात ठेवणे.
अशा रितीने आपण वातविकार निवारणार्थ आहार आणि घरगुती उपाय याबद्दल थोडक्यात मार्गदर्शन घेतले. माझ्या ‘निरामय आरोग्यासाठी आहार-विहार’ या पुस्तकात सदर विषयावर सविस्तररीत्या मार्गदर्शन केले आहे.
विविध वातविकारांच्या निवारणासाठी नियमित योगाभ्यासाबरोबर नियमित सात्त्विक आहार सेवन देखील अत्यंत गरजेचे आहे.
पुढील लेखात आपण अशाच एका शारीरिक व्याधी-विकार निवारणार्थ उपयुक्त मार्गदर्शन घेणार आहोत.
यासंदर्भात इथे आवर्जून नमूद करावेसे वाटते की, निरामय आरोग्य संकल्पनेतील माझ्या ‘निरामय आरोग्यासाठी योगाभ्यास’, ‘निरामय आरोग्यासाठी आहार-विहार’ आणि ‘निरामय मानसिक आरोग्य’ या पुस्तकांत संबंधित विषयांवर उपयुक्त सर्वसमावेशक सविस्तर मार्गदर्शनपर वस्तुपाठ सादर केले असून त्यांचा एकत्रित अभ्यास म्हणजे निरामय आरोग्याचा परिपाक होय.
हेही वाचा – आम्लपित्तासाठी आहार मार्गदर्शन
नम्र निवेदन
गेल्या अकरा वर्षांपासून आम्ही उभयतां ‘निरामय आरोग्य संकल्पना’ यशस्वीरीत्या राबवत आहोत. असंख्य पुरुष आणि महिला साधकांनी संकल्पनेचा लाभ घेतला आहे. संकल्पना जाणून घेऊन लाभार्थी होण्यासाठी मोबाइल 9850856774 यावर 🙏/👌/👍 / 👏 / तत्सम चिन्हाने व्हॉट्सॲप मेसेज करून प्रतिसाद द्यावा.
क्रमश:
विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशीलतेला समर्पित असलेल्या avaantar.com या वेबपोर्टलवरील वैविध्यपूर्ण वाचनीय लेखाचा आनंद घ्यायचा असेल तर,
IXZVpuvKFwKH6gb0NBN51t?mode=r_c
या लिंकला क्लिक करून WhatsApp group जॉइन करा.


