Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    उंचावरचं जग

    October 7, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : येथ सत्त्व तें उत्तम, रज तें मध्यम

    October 7, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 07 ऑक्टोबर 2026

    October 7, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, October 7
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » संकर्षण… एकल पालकत्वात स्त्री की पुरुष सक्षम?
    ललित

    संकर्षण… एकल पालकत्वात स्त्री की पुरुष सक्षम?

    Team AvaantarBy Team AvaantarJune 29, 2026No Comments4 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेखक, मराठीवाचन, मराठी साहित्य, मी मराठी, अभिजात मराठी, अनिकेत पुरंदरेचा अपघात, मुलगी सृष्टीचा मृत्यू, पत्नी सानिकाचा मृत्यू, आयव्हीएफमार्फत भ्रूण, अनिकेत आणि सानिकाचा अंश, अनिकेत आणि सानिकाची आयव्हीएफ ट्रीटमेन्ट, अनिकेत आणि सानिकाचे भ्रूण, अनिकेत पुरंदरेचा कायदेशीर लढा, ॲड विभा शेलार यांचा युक्तिवाद, कायदेशीर लढा सुरू, ॲड राघव आपटे यांचा युक्तिवाद, संकर्षण
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    हिमाली मुदखेडकर

    भाग – 5

    केस सुरू होऊन दोन वर्षे उलटून गेली होती… दोन वर्षे! अनिकेतच्या आयुष्यातील ही दोन वर्षे न्यायालयाच्या तारखा, वकिलांच्या बैठका, कागदपत्रे, प्रतिज्ञापत्रे आणि अंतहीन प्रतीक्षेमध्ये निघून गेली होती. अपघातानंतर चार वर्षे उलटली होती. त्या छोट्या भ्रुणाला प्रयोगशाळेतील क्रायो स्टोरेजमध्ये ठेवूनही आता जवळ जवळ पाच वर्षे होत आली होती…

    न्यायालयात आता भावना नव्हे तर विज्ञान, नैतिकता आणि कायदा साक्षीदारांच्या पिंजर्‍यात उभे राहिले होते. न्यायालयीन लढाई आता एका निर्णायक टप्प्यावर पोहोचण्यात होती…

    त्या दिवशी कोर्टरूम खचाखच भरली होती. पत्रकार, कायद्याचे विद्यार्थी, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते… पण बहुतेकांना निकालापेक्षा वादात अधिक जास्त रस होता.

    न्यायमूर्ती प्रधान खंडपीठावर विराजमान होताच सुनावणी सुरू झाली.

    आजच्या पहिल्या साक्षीदार होत्या डॉ. मृणालिनी पाटील… IVF तज्ज्ञ!

    ॲड. विभा शेलारांनी सुरुवात केली.

    “डॉ. पाटील, संबंधित भ्रूण आजही वैद्यकीयदृष्ट्या सक्षम आहे का?”

    “हो.”

    “पाच वर्षांनंतरही?”

    “हो.”

    “त्यातून निरोगी गर्भधारणा होण्याची किती शक्यता आहे?”

    “वैद्यकीय दृष्टीने ते भ्रूण पूर्णपणे निरोगी आणि एक जीव म्हणून जन्माला येण्यास सक्षम आहे. त्यातून एक निरोगी बालक जन्माला येण्याची पूर्ण शक्यता आहे,” डॉ. मृणालिनी पाटील म्हणाल्या.

    विभा यांनी विचारलं, “गोठवून ठेवलेल्या भ्रूणांच्या यशस्वी गर्भधारणांची काही उदाहरणे तुमच्या नोंदित आहेत का?”

    “अनेक आहेत. पण त्यांची नावे आणि माहिती गुप्त ठेवावी लागते. आम्हाला त्यांची वैयक्तिक माहिती त्यांच्या परवानगीशिवाय इतरांना देता येणार नाही.”

    “म्हणजे, विज्ञान या प्रक्रियेला अशक्य मानत नाही?”

    “अजिबातच नाही.”

    “अशी किती उदाहरणे आहेत, ज्यात एका स्त्रीचे गोठवलेले भ्रूण दुसरी स्त्री जन्माला घालते?”

    “अशी अनेक उदाहरणे आहेत. जेव्हा काही शारीरिक त्रुटीमुळे IVF ट्रीटमेंट घेणारी स्त्री गर्भ धारण करू शकत नसेल… किंवा भ्रूणाचे भरणपोषण करण्यास जैविक मातेचे गर्भाशय सक्षम नसेल, तेव्हा त्या परिस्थितीत सरोगसीचा पर्याय दिला जातो.”

    हेही वाचा – संकर्षण… खरी लढाई आता सुरू झाली

    “म्हणजे IVF तंत्रात आणि नियमांत अशी तरतूद आहे, याची कृपया नोंद घ्यावी माय लॉर्ड…”

    आता ॲ[. राघव आपटे उभे राहिले.

    “डॉक्टर, IVF कायदा व्यक्तीच्या मृत्यूनंतर भ्रूण वापरण्याची स्पष्ट परवानगी देतो का?”

    “नाही.”

    “मग अशा परीस्थितीत तुम्ही काय करता?”

    “आम्ही यात असलेल्या व्यक्तीच्या कनसेंटने ते भ्रूण नष्ट करतो.”

    राघव न्यायमूर्तींकडे वळून म्हणाले, “माय लॉर्ड, जेथे कायद्यात तरतूद नाही, तिथे न्यायालयाने अपवाद निर्माण करणे धोकादायक ठरू शकते.”

    “माय लॉर्ड…” विभा शेलारांचा आवाज घुमला, “मी आणखी एक प्रश्न डॉक्टरांना विचारू इच्छिते…”

    न्यायमूर्तींची परवानगी मिळाल्यावर विभा शेलार म्हणाल्या, “कायदा मृत व्यक्तीचे भ्रूण वापरण्यास स्पष्ट बंदी घालतो का?”

    “नाही… म्हणजे या बाबतीत तितकीशी स्पष्टता नाही कायद्यात.”

    “म्हणजे कायदा मौन बाळगतो.”

    “हो.”

    “माय लॉर्ड, हा एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे की, जैविक तंत्रज्ञानाच्या नियमावलीमध्ये अशा बाबींची स्पष्ट नोंद नाही.”

    0000

    दुसर्‍या साक्षीदार होत्या प्रसिद्ध बालमानसशास्त्रज्ञ डॉ. शीतल थोरात.

    राघव आपटे यांनी सुरुवात केली.

    “डॉक्टर, मुलाच्या आयुष्यात आईची भूमिका महत्त्वाची असते का?”

    “हो… नक्कीच!”

    “आईच्या अनुपस्थितीचा मुलांच्या जडणघडणीवर परिणाम होऊ शकतो का?”

    “काही परिस्थितींमध्ये होऊ शकतो.”

    राघव समाधानी दिसत होते.

    विभा शेलार प्रश्न विचारण्यासाठी उभ्या राहिल्या…

    “डॉक्टर, एकल पालक असलेल्या प्रत्येक कुटुंबातील मूल मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असते का?”

    “नाही.”

    “पालक पुरुष आहे की, स्त्री यापेक्षा प्रेम, स्थैर्य आणि संगोपन अधिक महत्त्वाचे असते की नाही?”

    “हो… पण बहुतांश एकल पालकांची यशस्वी उदाहरणे लक्षात घेता… एकल पालकत्व स्त्रिया जास्त चांगलं पेलू शकतात, असं म्हणावं लागेल.”

    “अस कसं म्हणता तुम्ही डॉक्टर? अगदी पुरातन काळापासून आजपर्यत पुरूष एकल पालक असल्याची उदाहरणे आहेत आपल्याकडे. त्याचे प्रमाण कमी असेल… पण नगण्य नाही. खूप मागे जाऊन पुराण काळातील उदाहरण घ्यायचे झाले तर, ऋषी पराशर यांनी त्यांचे पुत्र व्यास यांना जन्मापासून एकट्यानेच वाढवल्याचा दाखला महाभारतात सापडतो.”

    “माझी हरकत आहे माय लॉर्ड…” ॲड. आपटे जागेवरून उठत म्हणाले.

    “माय लॉर्ड, पुराणकथा आणि आधुनिक कायदा यांची तुलना करता येणार नाही.”

    “मी कायद्याची तुलना करत नाही…” विभा शांतपणे म्हणाल्या, “मी समाजमनाची चर्चा करते आहे. आपल्या इतिहासात पुरुषाचे एकल पालकत्व ही नवीन गोष्ट नाही, हे सिद्ध करू इच्छित आहे.”

    न्यायालयाने विभा शेलारांना पुढे बोलण्याची परवानगी देताच त्या म्हणाल्या,

    “माझे सहकारी मित्र आपटे साहेबाच्या समाधानासाठी मी अलीकडचे म्हणजे इतिहासातील उदाहरण देते मनकर्णिका तांबे म्हणजेच ज्यांना आपण सगळेच झाशीची राणी लक्ष्मीबाई या नावाने ओळखतो, त्यांचे जन्मापासून संगोपन त्यांचे पिता मोरोपंत तांबे यांनी त्यांच्या पत्नीच्या मृत्यू पश्चात एकट्यानेच केले असल्याचा दाखला आहेच की! समाज बदलला, तंत्रज्ञान बदललं, पण प्रेमाने मुल वाढवण्याची क्षमता केवळ स्त्रीकडे आणि पुरुषांकडे ती नाही, असं कसं म्हणता येईल?”

    राघव आपटे उभे राहिले, “माय लॉर्ड, चुकीची उदाहरणे देत आहेत शेलार मॅडम! यापैकी कोणत्याही व्यक्तीचा जन्म हा आईच्या मृत्यूपश्चात झालेलाच नाही!!”

    न्यायमूर्ती म्हणाले, “हरकत मान्य आहे… अॅड. विभा, पुढील सुनावणीदरम्यान तुमच्या मुद्द्याला अनुसरून तुम्ही तुमचा पक्ष मांडावा, हे अपेक्षित आहे…”

    पुढील सुनावणीची तारीख आठ आठवड्यानंतरची देण्यात आली.

    हेही वाचा – संकर्षण… ‘त्या’ स्वप्नाने अनिकेतला दिलं बळ

    0000

    माध्यमांमध्ये आता नव्या चर्चांना उधाण आलं. काहींचे म्हणणे होते, “वडिलांच्या अधिकारासाठीची ऐतिहासिक लढाई.”

    काही म्हणत होती, “मृत स्त्रीच्या इच्छेवर अतिक्रमण?”

    सोशल मीडियावर तर अराजक माजलं होतं. काही पोस्टमध्ये अनिकेतला नायक दाखवलं जात होतं तर, काहींमध्ये खलनायक!

    एका व्हिडीओमध्ये त्याच्या अपघाताचे फोटो वापरून भावनिक संगीत लावण्यात आलं होतं.

    हताश अनिकेत विभा शेलारांच्या ऑफिसमध्ये बसला होता.

    “मला आता थकवा आलाय,” अनिकेत म्हणाला, “दोन वर्षे झाली. आणखी किती?”

    विभा एकटक खिडकीबाहेर पाहात म्हणाल्या,

    “माहीत नाही.”

    क्रमश:

    (Disclaimer : ही कथा काल्पनिक असून याचा कोणत्याही घटना अथवा व्यक्तीशी साधर्म्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.)

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    उंचावरचं जग

    October 7, 2026 ललित

    फूल ना फुलाची पाकळी

    October 6, 2026 ललित

    पुण्यकर्म

    October 6, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    उंचावरचं जग

    By सतीश बर्वेOctober 7, 2026

    एकही दिवस जात नाही असा, जेव्हा मला माझ्या आबाची आठवण येत नाही. काही माणसं तुमच्या…

    फूल ना फुलाची पाकळी

    October 6, 2026

    पुण्यकर्म

    October 6, 2026

    पितरांना मनापासून नमस्कार, पण…

    October 5, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    उंचावरचं जग

    October 7, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : येथ सत्त्व तें उत्तम, रज तें मध्यम

    October 7, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 07 ऑक्टोबर 2026

    October 7, 2026

    फूल ना फुलाची पाकळी

    October 6, 2026

    पुण्यकर्म

    October 6, 2026

    उंबऱ्यापलीकडचा सातबारा

    October 6, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 461
    • अवांतर 216
    • आरोग्य 155
    • पंचांग आणि भविष्य 617
    • फिल्मी 71
    • फूड काॅर्नर 257
    • मैत्रीण 30
    • ललित 976
    • शैक्षणिक 87
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    उंचावरचं जग

    October 7, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : येथ सत्त्व तें उत्तम, रज तें मध्यम

    October 7, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 07 ऑक्टोबर 2026

    October 7, 2026
    Most Popular

    Homeopathy : होमिओपॅथीत महाराष्ट्रही अग्रेसर!

    October 4, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.