Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    साप्ताहिक राशीभविष्य : 28 जून ते 04 जुलै 2026

    June 28, 2026

     सार्थ ज्ञानेश्वरी : रचूनि महत्तत्त्वाचें खळें, मळी एके काळुगेनि पोळें 

    June 28, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 28 जून 2026

    June 28, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Sunday, June 28
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » साप्ताहिक राशीभविष्य : 28 जून ते 04 जुलै 2026
    पंचांग आणि भविष्य

    साप्ताहिक राशीभविष्य : 28 जून ते 04 जुलै 2026

    प्राजक्ता काथेBy प्राजक्ता काथेJune 28, 2026No Comments4 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठी साहित्य, मराठीलेखक, मराठीआर्टिकल, मराठीस्टोरी, राशीभविष्य, बाराराशी, राशीफळ, राशीअंदाज, Weekly horoscope, horoscope, राशी,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    मेष

    • या आठवड्यात ओळखी किंवा मध्यस्थीच्या माध्यमातून लाभ होतील. नोकरदारांनी घरातील मौल्यवान वस्तू आणि कागदपत्रे तसेच ऑफिसमधील महत्त्वाच्या फाइली सांभाळून ठेवाव्यात. त्या गहाळ होण्याची किंवा विसरण्याची शक्यता आहे. व्यावसायिक वर्गाची उधारी वसूल होईल. परदेशी व्यापार वाढवू शकतात. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रयत्न करत असाल तर मध्यस्थीचा उपयोग होईल. महिलांनी वेंधळेपणा करू नये. विशेषत:, प्रवासात काळजी घ्या. नातेवाईकांबरोबर वाद होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांनी वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवावे. त्यांनी उत्सव आणि प्रदर्शनांना भेट द्यावी.

    वृषभ

    • या आठवड्यात आर्थिक जोखीम टाळा. शेअर मार्केटमध्ये पैसे लावू नका. नोकरदारांनी स्वतःची कामे स्वतः करावीत. कोणावरही विसंबून राहू नये. तसेच, प्रलोभनांपासून दूर रहावे. व्यावसायिक वर्गाने अति आत्मविश्वास बाळगू नये. पूर्ण विचार करूनच निर्णय घ्यावा. नवीन कामे स्वीकारताना आपल्या क्षमतेचा विचार करावा. महिलांना जुन्या गुंतवणुकीमधून आर्थिक फायदा मिळेल. नवीन गुंतवणूक करताना तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला घ्यावा. विद्यार्थ्यांच्या नोकरीचा प्रश्न सुटेल. परदेशात जाण्यासाठी योग्य काळ आहे.

    मिथुन

    • या आठवड्यात सामाजिक स्तरावर मानसन्मान मिळेल. नोकरदारांच्या दृष्टीने कामाच्या ठिकाणी सर्वसामान्य स्थिती राहील. तथापि, कामाच्या बाबतीत अपडेटेड रहा. वरिष्ठ आणि कंपनीकडून लाभ मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिक वर्गातील जातकाला प्रवास करावा लागेल. प्रवासात नवीन ओळखीतून फायदा संभवतो. त्याचबरोबर खर्चाचे प्रमाण वाढेल. महिलांना आवडत्या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळेल. विद्यार्थ्यांना ज्येष्ठ गुरुजनांचे मार्गदर्शन मिळेल. घरातील व्यक्तींचे सहकार्य मिळेल.

    कर्क

    • या आठवड्यात लांबचे प्रवास ठरवाल. घरातील तरुण मुला-मुलींचे प्रश्न सुटतील. नोकरदारांचे प्रमोशन आणि पगारवाढीची शक्यता आहे. नवीन नोकरी शोधणाऱ्यांसाठी चांगला काळ आहे. व्यावसायिक वर्गाची आर्थिक स्थिती मजबूत होईल. नवीन नियोजन करू शकाल. नवीन व्यावसायिक करार होऊ शकतात. महिलांना घरात नवीन खरेदी करता येईल. घरातील मदतनीसांकडे लक्ष द्या. विद्यार्थ्यांनी कुठलेही काम अपूर्ण ठेवू नये. तसेच, सकारात्मक रहावे.

    सिंह

    • या आठवड्यात तरुणांना स्पर्धात्मक यश मिळण्याची शक्यता आहे. नोकरदारांनी तुमच्या कार्यकक्षा ओळखून काम करावे. छोट्या-मोठ्या प्रलोभनांपासून दूर रहा. अति आत्मविश्वास टाळा. दुसऱ्या कुणाचे काम स्वतःच्या जबाबदारीवर करू नका. व्यावसायिक वर्गाच्या बाबतीत काही कडू-गोड घटना घडतील. अशा परिस्थितीत आत्मविश्वास कायम ठेवा. घाईने कुठलाही निर्णय घेऊ नका. महिलांनी प्रामाणिकपणे काम करत राहावे; कामात सातत्य ठेवा, नक्की यश मिळेल. विद्यार्थ्यांनी कुसंगतीपासून दूर राहून अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे.

    हेही वाचा – सारं काही रंगभूमीसाठी!

    कन्या

    • हा आठवडा खूप गतिमान असेल. नोकरदारांनी कुणालाही उसने पैसे देण्याचे टाळावे. वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर सुसंवाद असेल. कार्यालयीन कामाच्या बाबतीत सामान्य काळ असला तरी, सकारात्मक रहा, लाभ होईल. व्यवसायाला चांगली चालना मिळेल आणि व्यावसायिक वर्गाला फायदा होईल. छंदातून नवीन जोडधंदा सुरू करू शकाल. महिलांना मैत्रिणी आणि कुटुंबातील लोकांकडून सहकार्य मिळेल. त्यांचे छोटे प्रवास घडतील. विद्यार्थ्यांना गुरुजनांचे मार्गदर्शन मिळेल, परिणामी स्पर्धेत आणि मुलाखतीत यश मिळेल.

    तुळ

    • या आठवड्यात मानसन्मान मिळेल. नोकरदारांच्या दृष्टीने कामात सुलभता असेल. मात्र, आर्थिक व्यवहार करताना सावध रहा; फसवणूक होण्याची शक्यता आहे. परिवारातील मुलांच्या नोकरीचे प्रश्न सुटतील. व्यावसायिक वर्गाने हितशत्रू आणि स्पर्धकांकडे लक्ष देऊन त्यांच्या कारवाया वेळेत थांबवाव्यात. नवीन उसनेवारी देऊ नका. महिलांना शेअर मार्केटमध्ये लाभ संभवतो. त्यांची आर्थिक स्थिती उत्तम राहील. विद्यार्थ्यांनी स्वतःचे वाहन इतरांना वापरायला देऊ नये. तसेच महत्त्वाची कागदपत्रे सांभाळावीत.

    वृश्चिक

    • या आठवड्यात अडचणी आणि समस्यांवर मात कराल. नोकरदारांच्या अधिकारात वाढ होईल. वरिष्ठ खूश राहतील. मोठी गुंतवणूक करू शकाल. व्यावसायिक वर्गाची जुनी येणी वसूल होतील आणि व्यापारातही वाढ होईल. नियोजनात बदल केल्याने व्यापारात फायदा होईल. घरातील तरुण मुला-मुलींचे लग्न ठरतील, त्यामुळे महिलांचा उत्साह वाढेल. विद्यार्थ्यांनी अभ्यासात प्रामाणिक रहावे, उज्ज्वल भविष्यासाठी ते चांगले आहे.

    धनु

    • या आठवड्यात सकारात्मक विचार करा, आशावादी रहा. नोकरदारांना कामे सहजपणे पूर्ण करता येतील. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील, त्यामुळे ते मनाप्रमाणे खर्च करू शकतील. व्यावसायिक वर्गाला जुन्या गुंतवणुकीतून लाभ मिळतील. अव्याहतपणे कामे करावी लागतील, न कंटाळता कामे पूर्ण करा. अडचणींवर मात करू शकाल. त्यांनी जाहिरातींना भुलू नये. समाजासाठी आणि कुटुंबासाठी महिला प्रेरणास्रोत बनून राहतील, तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. विद्यार्थी मित्रांना मदत करू शकतील. त्यांची स्वप्ने साकार होण्याची शक्यता आहे.

    मकर

    • या आठवड्यात मंगलकार्य ठरतील. कलाकार आणि खेळाडूंच्या दृष्टीने अनुकूल कालावधी आहे. नोकरदारांच्या बाबतीत अपेक्षित घटना घडतील. नवीन नोकरी शोधणाऱ्या जातकांना नोकरीच्या संधी मिळतील. व्यावसायिक वर्गाने वसुली करताना कायदेशीर मार्गच वापरा. अन्यथा, वसुली वादग्रस्त होईल. तसेच, कर्ज घेऊ नका. महिलांच्या बाबतीत गैरसमज होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पटकन प्रतिक्रिया देऊ नका, वाद टाळा. विद्यार्थ्यांना कॉलेज कॅम्पसमधून नोकरी मिळण्याची शक्यता आहे.

    कुंभ

    • निराश होऊ नका, सकारात्मक रहा. नोकरदारांच्या बाबतीत कामाच्या ठिकाणी सर्वसामान्य परिस्थिती राहील. कामाचा ताण जास्त नसेल. कामे वेगाने पूर्ण करू शकाल. नवीन ओळखी आणि मध्यस्थीतून व्यावसायिक वर्गाला नवीन करार करता येतील. भागीदाराबद्दल गैरसमज होणार नाही, याची काळजी घ्या. कामात आणि पैशांच्या बाबतीत पारदर्शकता ठेवा. महिलांनी घरात काम करताना काळजी घ्यावी. विशेषत:, तब्येतीची काळजी घ्यावी. विद्यार्थ्यांना बहीण-भावाबरोबर वेळ घालवता येईल, त्यामुळे आनंदी राहाल.

    हेही वाचा – वातविकारासाठी योगाभ्यास मार्गदर्शन

    मीन

    • या आठवड्यात नवीन संधी मिळतील. नोकरदारांना नवीन प्रोजेक्टची जबाबदारी सोपविली जाईल. कामात सुलभता असेल. नवीन जॉबच्या शोधात असाल तर, त्याच्या संधी मिळतील. व्यावसायिक वर्गाच्या दृष्टीने व्यापारात महत्त्वाचे बदल घडू शकतात. स्पर्धकांवर मात करून पुढे जाऊ शकाल. प्रतिस्पर्ध्यांकडून मैत्रीचा हात पुढे केला जाईल. तुम्ही उत्साहाने आणि आत्मविश्वासाने पुढे जाल. कुटुंबात मंगलकार्य ठरेल आणि महिलांवर नियोजनाची जबाबदारी पडेल. ती तुम्ही उत्साहाने पूर्ण करू शकाल. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. वाहन खरेदीचा योग आहे.

    prajaktakathe3970@gmail.com

    प्राजक्ता काथे

    वाणिज्य शाखेत पदवी (1991), ज्योतिष शास्त्री (2003), हस्तसामुद्रिक प्रवीण (2004), कृष्णमूर्ती ज्योतिष भास्कर (2008), होरा मार्तंड (2016) या पदव्या प्राप्त. 2005पासून पत्रिकेच्या आधारे अभ्यासकरून लोकांच्या अडचणीबाबत मार्गदर्शन करीत आहेत. हस्तसामुद्रिक शास्त्र, कृष्णमूर्ती पद्धती आणि होरा शास्त्र यांचा एकत्रित सखोल अभ्यास असून, जीवनातील प्रश्न आणि आव्हानांचे अचूक विश्लेषण करून, व्यवहार्य मार्गदर्शन देण्याचा दीर्घ अनुभव.

    Related Posts

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 28 जून 2026

    June 28, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 27 जून 2026

    June 27, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 26 जून 2026

    June 26, 2026 पंचांग आणि भविष्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 28 जून 2026

    By Team AvaantarJune 28, 2026

    दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 28 जून 2026; वार : रविवार भारतीय सौर : 07…

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 27 जून 2026

    June 27, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 26 जून 2026

    June 26, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 25 जून 2026

    June 25, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    साप्ताहिक राशीभविष्य : 28 जून ते 04 जुलै 2026

    June 28, 2026

     सार्थ ज्ञानेश्वरी : रचूनि महत्तत्त्वाचें खळें, मळी एके काळुगेनि पोळें 

    June 28, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 28 जून 2026

    June 28, 2026

    सारं काही रंगभूमीसाठी!

    June 27, 2026

    वातविकारासाठी योगाभ्यास मार्गदर्शन

    June 27, 2026

    मारवाडी…

    June 27, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 342
    • अवांतर 191
    • आरोग्य 124
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 470
    • फिल्मी 53
    • फूड काॅर्नर 228
    • मैत्रीण 23
    • ललित 741
    • शैक्षणिक 81
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    साप्ताहिक राशीभविष्य : 28 जून ते 04 जुलै 2026

    June 28, 2026

     सार्थ ज्ञानेश्वरी : रचूनि महत्तत्त्वाचें खळें, मळी एके काळुगेनि पोळें 

    June 28, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 28 जून 2026

    June 28, 2026
    Most Popular

    कार्यक्रम कांदेपोह्यांचा!

    June 25, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.