Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    एका शाळेचा अंत

    June 14, 2026

    मंजिरी

    June 13, 2026

    आम्लपित्तासाठी योगाभ्यास मार्गदर्शन

    June 13, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Sunday, June 14
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 13 जून 2026
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 13 जून 2026

    Team AvaantarBy Team AvaantarJune 13, 2026No Comments5 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, पंचांग, दिनविशेष, Panchang, Dinvishesh, अधिक मास, जून महिना
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दर्शन कुलकर्णी

    • आज, दिनांक : 13 जून 2026; वार : शनिवार
    • भारतीय सौर : 23 ज्येष्ठ शके 1948; तिथि : त्रयोदशी 16:08; नक्षत्र : कृत्तिका 25:17;
    • योग : सुकर्मा 17:28; करण : विष्टि 26:15;
    • सूर्य : वृषभ; चंद्र : मेष 09:25; सूर्योदय : 06:00; सूर्यास्त : 19:15;
    • पक्ष : कृष्ण; अयन : उत्तरायण; संवत्सर : पराभव;
    • शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128

    शिवरात्री

    वेद कन्सल्टन्सी / 9987433660


    दिनविशेष

    भारतीय तिरंदाज दीपिका कुमारी

    टीम अवांतर

    भारतीय तिरंदाज दीपिका कुमारी हिचा जन्म 13 जून 1994 रोजी झारखंडमधील रांची येथे झाला. तिचे वडील रिक्षाचालक तर आई रांची वैद्यकीय महाविद्यालयात परिचारिका म्हणून कार्यरत होते. दीपिका ही लहानपणापासूनच नेमबाजीत तरबेज. जसजशी तिने या खेळाबद्दल माहिती मिळवली, तसा या खेळामधील तिचा रस आणखी वाढला. तिरंदाजीमध्ये नाव कमावण्याचे तिचे स्वप्न होते. मात्र घरच्या बिकट परिस्थितीचा विचार करून वडिलांचा सुरुवातीला तिला विरोध होता. तिरंदाजीसाठी लागणारी साधने घेण्यासाठी लागणारे पुरेसे पैसेही गाठीला नव्हते.

    परिणामी, दीपिकाने बांबूपासून घरच्या घरी धनुष्य आणि बाण बनवून सराव करायला सुरुवात केली. तिची ही जिद्द आणि या खेळाबद्दल असणारा जिव्हाळा, एकाग्रता बघून वडिलांनी अखेर माघार घेतली. दीपिकाची चुलत बहीण विद्या कुमारी ही ‘टाटा आर्चरी अ‍ॅकॅडमी’मध्ये तिरंदाजीचे शिक्षण घेत होती. अकादमी आणि विद्याच्या मार्गदर्शनामुळे दीपिकाला खेळाबद्दलचे मूलभूत ज्ञान मिळाले. 2005मध्ये ‘अर्जुन आर्चरी अकादमी’मध्ये प्रवेश घेतल्यानंतर लवकरच दीपिकाला राष्ट्रीय पातळीवर खेळण्याची पहिली संधी मिळाली. पण, तिरंदाजीमध्ये तिचा खरा प्रवास हा 2006मध्ये जमशेदपूरच्या ‘टाटा आर्चरी अकादमी’मध्ये सुरू झाला. इथे तिला आवश्यक आणि योग्य साधने, उपकरणे तसेच गणवेश मिळाला. याचवर्षी मेक्सिको येथे झालेल्या तिरंदाजीच्या विश्वचषक स्पर्धेत तिने ‘ज्युनिअर कम्पाऊंड’ स्पर्धा जिंकली. अशी कामगिरी करणारी ती दुसरी भारतीय महिला ठरली.

    हेही वाचा – प्रीत परी तुजवरती…

    त्यानंतर 2009मध्ये ‘कॅडेट वर्ल्ड चॅम्पियनशिप चषक’ तिने आपल्या नावे केला. याचवर्षी अमेरिकेमध्ये झालेल्या ‘ओगडेन यूथ वर्ल्ड आर्चरी चॅम्पियनशिप’मध्येही विजय मिळवला. तिच्या कारकिर्दीत सर्वात मोठे यश 2010मध्ये मिळाले, ‘दिल्ली कॉमनवेल्थ गेम्स’मध्ये तिने ‘वैयक्तिक रिकर्व्ह’ आणि ‘महिला रिकर्व्ह टीम इव्हेंट’मध्ये दोन सुवर्णपदके जिंकली.

    दोन महिन्यांनी ग्वांग्झू येथे झालेल्या ‘आशियाई स्पर्धा 2010’मध्ये कांस्यपदक जिंकत जगभरात आपल्या नावाची दखल घेण्यास दीपिकाने भाग पाडले. यानंतर तिने कधी मागे वळून पाहिले नाही. 2012मध्ये तुर्की येथे झालेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत दीपिकाने पदार्पण केले. यावेळी तिने वैयक्तिक, संघ आणि मिश्र या तिन्ही प्रकारांत रौप्यपदक पटकावले.
    तिच्या या दमदार कामगिरीची दखल घेत दीपिकाला 2012 मध्ये ‘अर्जुन पुरस्कार’ तर 2016मध्ये ‘पद्मश्री’ देऊन गौरव करण्यात आला.  याशिवाय 2014 साली  FICCI स्पोर्टस् ऑफ द इयर अवॉर्ड तर 2017 साली यंग अचिवर्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.


    आजचे राशीभविष्य

    मेष –  आर्थिकबाबतीत नवीन संधी घेऊन येणारा दिवस आहे. मात्र गुंतवणूक आणि पैशांसंबंधी निर्णय घेताना संयम ठेवला तर चांगला नफा मिळू शकतो. कामाच्या ठिकाणी ध्येये साध्य करण्यासाठी पूर्णपणे कटिबद्ध असाल. व्यावसायिकांना उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने गांभीर्याने विचार करावा लागेल. नवीन तंत्रज्ञानाचा आधार घेतल्यास फायदा होईल.

    वृषभ – जितक्या हुशारीने वागाल, तितके यशाच्या जवळ जाल. समाजात तुमच्याबद्दलचा वाढलेला आदर आत्मविश्वास वाढवेल. लग्नाशी संबंधित अडथळे दूर झाल्याने घरात आनंदाचे वातावरण निर्माण होऊ शकते. तथापि, घरात एखाद्या लहानशा गोष्टीवरून किरकोळ वाद होऊ शकतो, त्यामुळे शांत राहणेच उत्तम.

    मिथुन – कामात आणि जीवनशैलीत बदल घडवण्याचा प्रयत्न कराल. हे बदल भविष्यात खूप फायदेशीर ठरतील. कुटुंबात नवीन सदस्याच्या आगमनाची बातमी आनंद घेऊन येऊ शकते. वडिलांचा सल्ला अत्यंत उपयुक्त ठरेल. कामाच्या ठिकाणी महत्त्वाच्या चर्चेदरम्यान तुमच्या कल्पनांचे कौतुक होईल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठदेखील तुमच्या सूचनांनी प्रभावित होतील.

    कर्क – नवीन वाहन किंवा घरातील अत्यावश्यक वस्तू खरेदी करण्याचा विचार कराल. कर्ज घेण्याचा विचार करत असाल, तर तेही सहजपणे मंजूर होण्याची चिन्हे आहेत. शासकीय कामांमध्ये काही विलंब होऊ शकतो, परंतु संयम ठेवल्यास सर्व सुरळीत होईल. एखादा जुना आर्थिक व्यवहार समस्या निर्माण करू शकतो, ज्याचे वेळेवर निराकरण करणे आवश्यक असेल.

    सिंह –  व्यवसायातील मिळणाऱ्या चांगल्या परिणामांमुळे आनंद होईल. तुमच्या मेहनतीचे फळही दिसून येईल. शेअर बाजाराशी संबंधित असलेल्यांसाठीही दिवस सकारात्मक जाण्याची शक्यता आहे. अविवाहित जातकांचे विवाह ठरण्याची शक्यता आहे. घरातूनच एखादा नवीन, शुभ प्रकल्प सुरू करण्याची संधी मिळू शकते. तब्येतीची काळजी घ्या.

    कन्या –  दिवस संमिश्र स्वरूपाचा असेल, पण तुमची मेहनत आणि प्रामाणिकपणा सगळ्यांच्या नजरेत भरेल. वरिष्ठही तुमच्यावर खूश असतील. खर्चाबरोबरच बोलण्यावर नियंत्रण ठेवा, अन्यथा अगदी लहानसहान गोष्टींवरूनही वाद होऊ शकतो. व्यवसायात विरोधकांपासून सावध रहा,  नव्या व्यवहारांबाबत गुप्तता बाळगा. आत्मविश्वासही टिकवून ठेवा.

    तुळ – आर्थिक बाबतीत शहाणपणाने निर्णय घेणे महत्त्वाचे ठरेल. खर्च आणि उत्पन्न यांच्यात संतुलन राखल्यास भविष्य सुरक्षित होईल. व्यावसायिक योजनांमधून हळूहळू नफा मिळू लागेल. मात्र कामे पुढे ढकलण्याची सवय टाळा, कारण त्यामुळे नंतर समस्या निर्माण होऊ शकतात.  कुटुंबातील रुसव्या फुगव्यांबाबत संयम बाळगा, पटकन प्रतिक्रिया देणे टाळा.

    वृश्चिक – जोखीम असलेली गुंतवणूक करण्यापूर्वी जाणकारांचा सल्ला घ्या, अन्यथा पश्चाताप करावा लागू शकतो. विचारपूर्वक खर्च केल्यास भविष्य अधिक सुरक्षित होईल. आहाराकडे लक्ष देणे आवश्यक आहे, कारण तुमच्या आरोग्याचा तुमच्या मनःस्थितीवर परिणाम होत आहे. सुसंवादातून कौटुंबिक समस्या हळूहळू कमी होतील.

    हेही वाचा – शर्वायने बोलावलेल्या समारंभात आराध्या पोहोचली अन्…

    धनु – दिवस आनंद आणि समृद्धीचा आहे. हाती घेतलेल्या कोणत्याही कामात मिळणाऱ्या यशामुळे आत्मविश्वास वाढेल. सन्मान आणि पुरस्कार मिळण्याचीही शक्यता आहे. व्यवसायातील समस्या सुटतील आणि भविष्यातील योजनाही अधिक स्पष्ट होतील. मालमत्ता खरेदीचे स्वप्न पूर्णत्वास जाण्याची शक्यता आहे.

    मकर – एखाद्या कामाबद्दल शंका असल्यास, ते सध्या पुढे ढकलणेच उत्तम. भविष्यात फायदेशीर ठरेल अशा एखाद्या नव्या प्रकल्पाची व्यावसायिक योजना आखू शकता. कोणत्याही वादांपासून दूर राहा. एखाद्या सामाजिक कार्यक्रमात सहभागी झाल्याने नवी ओळखी होतील, ज्याचा व्यवसायाला फायदा होईल. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल.

    कुंभ – दिवस सामान्य असेल, पण काही किरकोळ आव्हाने येऊ शकतात. कामाच्या ठिकाणी एखादा सहकारी प्रतिकूल वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकतो, त्यामुळे सावध रहा. वाढत्या खर्चामुळे चिंता वाटू शकते, म्हणून अनावश्यक खर्च टाळा. स्वतःच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक असेल.

    मीन – सकारात्मक विचार कराल, त्यामुळे कामाचा ताण जाणवणार नाही. सामाजिक कार्यातही सक्रिय असाल. दीर्घकालीन व्यावसायिक योजनांना गती मिळेल. अडकलेला निधी परत मिळाल्याने दिलासा मिळेल. सरकारी नोकरी किंवा निविदा मिळण्याच्या शक्यतेमुळे उत्साह वाढू शकतो. कुटुंबातील एखादा सदस्य छानसे सरप्राइज देईल.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 12 जून 2026

    June 12, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 11 जून 2026

    June 11, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 10 जून 2026

    June 10, 2026 पंचांग आणि भविष्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 12 जून 2026

    By Team AvaantarJune 12, 2026

    दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 12 जून 2026; वार : शुक्रवार भारतीय सौर : 22…

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 11 जून 2026

    June 11, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 10 जून 2026

    June 10, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 09 जून 2026

    June 9, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    एका शाळेचा अंत

    June 14, 2026

    मंजिरी

    June 13, 2026

    आम्लपित्तासाठी योगाभ्यास मार्गदर्शन

    June 13, 2026

    जुईलीचा चकवा… फिरून पुन्हा त्याच जागेवर!

    June 13, 2026

    Dnyaneshwari : एऱ्हवीं तरी माझियां भक्तां, आणि संसाराची चिंता

    June 13, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 13 जून 2026

    June 13, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 327
    • अवांतर 190
    • आरोग्य 120
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 452
    • फिल्मी 52
    • फूड काॅर्नर 221
    • मैत्रीण 20
    • ललित 702
    • शैक्षणिक 81
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    एका शाळेचा अंत

    June 14, 2026

    मंजिरी

    June 13, 2026

    आम्लपित्तासाठी योगाभ्यास मार्गदर्शन

    June 13, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.