Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    अंतर्मुख होऊन करावी स्वामींची सेवा

    September 15, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : प्रकृति येणें जिये, याचिया सत्ता जग विये

    September 15, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 15 सप्टेंबर 2026

    September 15, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, September 15
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » साप्ताहिक राशीभविष्य : 31 मे ते 06 जून 2026
    पंचांग आणि भविष्य

    साप्ताहिक राशीभविष्य : 31 मे ते 06 जून 2026

    प्राजक्ता काथेBy प्राजक्ता काथेMay 31, 2026No Comments4 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठी साहित्य, मराठीलेखक, मराठीआर्टिकल, मराठीस्टोरी, राशीभविष्य, बाराराशी, राशीफळ, राशीअंदाज, Weekly horoscope, horoscope, राशी, साप्ताहिक राशीभविष्य, प्राजक्ता काथे
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    मेष

    • हा आठवडा मनाप्रमाणे कामे होण्याचा आहे. नोकरदारांनी महत्त्वाच्या कामांना प्राधान्य द्यावे. हाताखालच्या लोकांकडून युक्तीने कामे करून घ्यावीत. व्यावसायिक वर्गाला कमी श्रमात जास्त यश आणि पैसा मिळेल. ओळखीतून नवीन कामे मिळू शकतात. व्यवसायात भरपूर उलाढाल होईल. महिलांना नवीन ओळखीतून फायदा होईल. तथापि, आरोग्य सांभाळावे. विद्यार्थ्यांना सुट्टीची मजा अनुभवता येईल.

    वृषभ

    • या आठवड्यात ग्रहमान सुधारत आहे. आठवड्याला उत्साहात सुरुवात होईल. नोकरदारांना अनपेक्षित कामे करावी लागतील. बेरोजगारांसाठी नोकरीची संधी उपलब्ध होईल. नोकरदारांना तसेच व्यावसायिकांना कामानिमित्त प्रवास करावा लागेल. व्यावसायिक वर्गाची आर्थिक स्थिती उत्तम राहिल. कामाचे नियोजन करा, त्यामुळे कमी कष्टात कामे पूर्ण करू शकाल. महिलांना प्रिय व्यक्तींचा सहवास मिळेल. धार्मिक गोष्टीत सहभागी होता येईल. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत यश मिळेल, आनंदी रहाल.

    मिथुन

    • या आठवड्यात महत्त्वाचे ग्रह अनुकूल आहेत. नोकरदारांना वरिष्ठ महत्त्वाची जबाबदारी सोपवतील आणि ती जबाबदारी पार पाडण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. हितसंबंध मजबूत करू शकाल. व्यावसायिक वर्गाने व्यवसायात थोडा बदल करून फरक पाहावा, फायदा होईल. उत्पादनांच्या जाहिरातीवर भर द्या. काही जुनी येणी असतील तर, ती वसूल होतील. महिलांची आर्थिक स्थिती समाधानकारक राहील. त्या नवीन गुंतवणूक करू शकतील. विद्यार्थ्यांना पार्ट-टाइम नोकरी मिळू शकते. मित्रांना दिलेले पैसे परत मिळतील.

    कर्क

    • या आठवड्यात गुरू तुमच्या राशीत येत आहे आणि उच्चीचा होत आहे. नोकरदारांनी आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवावे. कार्यालयात कामाचा ताण जाणवेल. कोणाशीही बोलताना सांभाळून बोला. व्यावसायिक वर्गाने पैसा मिळवून देणाऱ्या कामांना प्राधान्य द्यावे. नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न सुरू ठेवा. महिलांना धार्मिक स्थळांना भेट देता येईल. त्यानिमित्त कुटुंबाबरोबर प्रवास होईल. विद्यार्थ्यांना मनाविरुद्ध कामे करावी लागू शकतात. मात्र, स्वतःला अनावश्यक त्रास करून घेऊ नका.

    सिंह

    • या आठवड्यात परदेश प्रवासाची संधी मिळू शकते. नोकरदारांनी पुढे होऊन अतिरिक्त कामे ओढवून घेऊ नयेत. स्वतःची क्षमता ओळखून काम करा. व्यावसायिक वर्गाने वेळेचे महत्त्व समजून घेतले पाहिजे. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी कार्यतत्पर राहा. महिलांनी लोकांची योग्य पारख करून हुशारीने त्यांचा उपयोग करून घ्यावा. विद्यार्थी मित्रांच्या मदतीसाठी सरसावतील. पण, त्याचवेळी मित्रांची योग्य पारख करा.

    हेही  वाचा – विपश्यनेतून मिळणारे मानसिक आरोग्य लाभ

    कन्या

    • या आठवड्यात तुमच्या इच्छा पूर्ण होतील. नोकरदारांना कामानिमित्त विविध सवलती आणि भत्ते मिळू शकतात. शिवाय, प्रवासही होईल. व्यावसायिक वर्गाला यश मिळेल. आर्थिक परिस्थिती समाधानकारक राहील. नव्याने गुंतवणूक करू शकाल. महिलांना कौटुंबिक समाधान मिळेल. तसेच, प्रिय व्यक्तींच्या भेटी होतील. विद्यार्थ्यांना मित्र-मैत्रिणींबरोबर पिकनिकला जाण्याचा आनंद मिळेल.

    तुळ

    • या आठवड्यात ग्रहांची अनुकूलता असल्यामुळे यश मिळेल. नोकरदारांनी नवीन जबाबदारी स्वीकारावी. हितचिंतकांची मदत मिळेल. त्यांना कामानिमित्त प्रवास करावा लागेल. व्यावसायिक वर्गाला पूर्वी केलेल्या कामाचे यश आणि आर्थिक फळ आता मिळेल. कामानिमित्त नवीन ओळखी होतील. महिलांना माहेरची माणसे भेटतील. तसेच, धार्मिक कार्यात सहभागी होता येईल. विद्यार्थ्यांना नवीन नोकरी मिळण्याची शक्यता आहे.

    वृश्चिक

    • या आठवड्यात ग्रहमानाची उत्तम साथ मिळेल. नोकरदारांना स्वतःची कामे पूर्ण करून सहकाऱ्यांना मदत करता येईल. काही कामांच्या बाबतीत गुप्तता ठेवा. व्यावसायिक वर्गाला अनपेक्षित लाभ होईल. काही रेंगाळलेली कामे पूर्ण होतील. महिलांना केलेल्या कष्टाचे फळ मिळेल. त्यांचा मान-सन्मान वाढेल. विद्यार्थ्यांनी आळस झटकून अभ्यासाला लागावे.

    धनु

    • या आठवड्यात कामासाठी खूप प्रयत्न करावे लागतील. नोकरदारांनी बेफिकीर राहून चालणार नाही, कार्यक्षमता वाढवून कामे करावी लागतील. मेहनत आणि चिकाटीने अशक्य गोष्टीही व्यावसायिक वर्ग साध्य करू शकेल. त्यांचा कामाचा उरक चांगला राहील. महिलांना कमी कष्टात जास्त यश मिळेल. त्यामुळे उत्साह वाढेल. विद्यार्थ्यांनी अतिसाहस टाळावे, विशेषत: वाहनाचा वेग नियंत्रणात ठेवा.

    मकर

    • या आठवड्यात सकारात्मक विचार ठेवा. नोकरदारांची मनाप्रमाणे कामे होतील. मुख्यत: दिलेला शब्द पाळा. त्याचप्रमाणे कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. व्यावसायिक वर्गाला परिस्थितीशी जुळवून घ्यावे लागेल. कामात लवचिकता ठेवावी लागेल. महिलांनी विचार आणि कृती यांच्यात एकवाक्यता ठेवावी. विद्यार्थ्यांनी पैशाचा हव्यास करू नये. कोणताही निर्णय घेताना सावध राहावे.

    कुंभ

    • नोकरदारांच्या वाट्याला किचकट कामे येतील. पण हाती घेतलेली कामे पूर्ण कराल. त्याद्वारे वरिष्ठ आणि ज्येष्ठ सहकाऱ्यांचा विश्वास संपादन कराल. व्यावसायिक वर्गाची जुनी येणी वसूल होतील. अडकलेली कामे मार्गी लागतील. जोडधंद्यातून विशेष फायदा होईल. नातेवाईक घरी आल्याने महिलांचा वेळ कामात जास्त जाईल. विद्यार्थ्यांना हातात घेतलेले प्रोजेक्ट पूर्ण करता येतील.

    हेही वाचा – सावली… शेवटपर्यंत साथ देणारी!

    मीन

    • प्रकृतीच्या तक्रारी राहू शकतात. नोकरदारांच्या कामाचे चीज होईल. कामानिमित्त प्रवासही होईल आणि प्रवासात नवीन ओळखी होतील, त्याचा फायदा होईल. व्यावसायिक वर्गाचा कामाचा वेग उत्तम राहील. नवीन कामे दृष्टीक्षेपात येतील. महिलांनी आर्थिक गुंतवणुकीबाबत चोखंदळ राहावे. त्यांना कामातून आनंद मिळेल. विद्यार्थ्यांना पार्ट-टाइम जॉब मिळू शकतो. मित्रांबरोबर फिरायला जाण्याचा योग आहे.

    prajaktakathe3970@gmail.com

    प्राजक्ता काथे

    वाणिज्य शाखेत पदवी (1991), ज्योतिष शास्त्री (2003), हस्तसामुद्रिक प्रवीण (2004), कृष्णमूर्ती ज्योतिष भास्कर (2008), होरा मार्तंड (2016) या पदव्या प्राप्त. 2005पासून पत्रिकेच्या आधारे अभ्यासकरून लोकांच्या अडचणीबाबत मार्गदर्शन करीत आहेत. हस्तसामुद्रिक शास्त्र, कृष्णमूर्ती पद्धती आणि होरा शास्त्र यांचा एकत्रित सखोल अभ्यास असून, जीवनातील प्रश्न आणि आव्हानांचे अचूक विश्लेषण करून, व्यवहार्य मार्गदर्शन देण्याचा दीर्घ अनुभव.

    Related Posts

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 15 सप्टेंबर 2026

    September 15, 2026 पंचांग आणि भविष्य

    वैदिक ज्योतिषशास्त्र : 100 महत्त्वपूर्ण सिद्धांत – आरोग्याच्या समस्या, मैत्रीची गुणवत्ता

    September 14, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 14 सप्टेंबर 2026

    September 14, 2026 पंचांग आणि भविष्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 15 सप्टेंबर 2026

    By Team AvaantarSeptember 15, 2026

    दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 15 सप्टेंबर 2026; वार : मंगळवार भारतीय सौर : 24…

    वैदिक ज्योतिषशास्त्र : 100 महत्त्वपूर्ण सिद्धांत – आरोग्याच्या समस्या, मैत्रीची गुणवत्ता

    September 14, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 14 सप्टेंबर 2026

    September 14, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 13 ते 19 सप्टेंबर 2026

    September 13, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    अंतर्मुख होऊन करावी स्वामींची सेवा

    September 15, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : प्रकृति येणें जिये, याचिया सत्ता जग विये

    September 15, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 15 सप्टेंबर 2026

    September 15, 2026

    Movie : ‘The Intouchable’… जगावेगळी कहाणी

    September 14, 2026

    अविघ्न

    September 14, 2026

    वैदिक ज्योतिषशास्त्र : 100 महत्त्वपूर्ण सिद्धांत – आरोग्याच्या समस्या, मैत्रीची गुणवत्ता

    September 14, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 435
    • अवांतर 208
    • आरोग्य 146
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 582
    • फिल्मी 68
    • फूड काॅर्नर 255
    • मैत्रीण 28
    • ललित 919
    • शैक्षणिक 87
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    अंतर्मुख होऊन करावी स्वामींची सेवा

    September 15, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : प्रकृति येणें जिये, याचिया सत्ता जग विये

    September 15, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 15 सप्टेंबर 2026

    September 15, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.