Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 31 मे 2026

    May 31, 2026

    विपश्यनेतून मिळणारे मानसिक आरोग्य लाभ

    May 30, 2026

    बटाटा वडा ते फ्रेंच फ्राइज… ‘किमयागार’ बटाट्याची गोष्ट!

    May 30, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Sunday, May 31
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 31 मे 2026
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 31 मे 2026

    Team AvaantarBy Team AvaantarMay 31, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, पंचांग, दिनविशेष, Panchang, Dinvishesh, अधिक मास
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दर्शन कुलकर्णी

    • आज, दिनांक : 31 मे 2026; वार : रविवार
    • भारतीय सौर : 10 ज्येष्ठ शके 1948; तिथि : पौर्णिमा 14:14; नक्षत्र : अनुराधा 16:11;
    • योग : सिद्ध अहोरात्र; करण : बालव 27:25;
    • सूर्य : वृषभ; चंद्र : वृश्चिक; सूर्योदय : 06:00; सूर्यास्त : 19:11;
    • पक्ष : शुक्ल; अयन : उत्तरायण; संवत्सर : पराभव;
    • शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128.

    वेद कन्सल्टन्सी / 9987433660


    दिनविशेष

    संगीतकार अनिल बिस्वास

    टीम अवांतर

    संगीतकार अनिल बिस्वास यांचा जन्म 7 जुलै 1914 रोजी सध्याच्या बांगलादेशमधील बारिसाल गावी झाला. कलकत्ता येथे संगीतक्षेत्रात थोडे काम केल्यावर अनिलदा 1934च्या सुमारास मुंबईला आले. वास्तविक, अनिलदा हिंदी चित्रपट सृष्टीत आले त्यावेळेस पार्श्वगायन अस्तित्वात नव्हते. बंगाली संगीताची पार्श्वभूमी, भारतीय शास्त्रोक्त संगीताचा अभ्यास आणि नवीन काहीतरी निर्माण करायची उर्मी, ही त्यांच्या संगीताची प्राथमिक वैशिष्ट्ये सांगता येतील. त्यावेळचे प्रसिद्ध दिग्दर्शक हिरेन बोस यांनी अनिल बिस्वास यांना मुंबईत आणले.

    1935 पासून संगीतकार म्हणून त्यांच्या कारकीर्दीला प्रारंभ झाला. जागीरदार, अलीबाबा, औरत इत्यादी चित्रपटांना उत्तम संगीत देऊन त्यांनी 1940 पर्यंत चित्रपट सृष्टीत जम बसवला. 1941 ते 1950 या दशकात त्यांची प्रतिभा बहरत गेली. 1942च्या सुमारास आलेल्या ‘रोटी’ आणि ‘किस्मत’ या चित्रपटातील गाण्यांनी बरीच प्रसिद्धी मिळवली आणि त्यांचे हिंदी चित्रपटातील स्थान अधिक मजबूत झाले. ‘किस्मत’ चित्रपटातील ‘दूर हटो ये दुनियावालो हिंदुस्तान हमारा है…’ हे कवी प्रदीप यांनी लिहिलेले आणि अनिल बिस्वास यांनी संगीतबद्ध केलेले देशभक्तीपर गीत प्रचंड गाजले. सुरेंद्र, पारुल घोष, अख्तरी फ़ैज़ाबादी (बेगम अख्तर), अमीरबाई कर्नाटकी, खान मस्ताना, अरुण कुमार, अश्रफ खान, सुरैया ही त्यांच्या संगीतावर गाणी गायलेल्या गायकांची ठळक नावे. स्वतः अनिलदा उत्तम गात असत.

    हेही वाचा – बटाटा वडा ते फ्रेंच फ्राइज… ‘किमयागार’ बटाट्याची गोष्ट!

    वाद्यवृंद रचना, संगीत लेखन. नोटेशन पद्धतीचा अनिलदांनी पहिल्यांदा अवलंब केला आणि ते करण्यासाठी, त्यांनी पाश्चात्य संगीताचा विलक्षण खोलात जाऊन अभ्यास करून, त्यातील आपल्या संगीताला काय नेमके भावेल, हे मनाशी ताडून, त्याचा आपल्या संगीतात अंतर्भाव केला. तसेच त्यांनी वाद्यवृंदात पाश्चात्य वाद्यांचा अंतर्भाव केला, पण तसे करताना, रचनेचे भारतीयत्व कायम राखले.

    1950च्या उत्तरार्धात लता मंगेशकर, मुकेश, तलत महमूद, मीना कपूर हे नवीन कलाकार त्यांच्या रचना गाऊ लागले होते. या कलाकारांबरोबर त्यांनी 1955-56 पर्यंत काम करत अत्यंत दर्जेदार संगीत दिले. नूरजहाँ यांच्या प्रभावातून बाहेर काढून लता मंगेशकर यांना स्वतःचा स्वतंत्र आवाज आणि शैली अनिलदांनीच मिळवून दिली. तर, तलत मेहमूद यांच्या आवाजातील कंप हेरून त्याला त्यांची खासियत बनवण्यास प्रोत्साहन दिले. त्यांनी जसे नवे गायक, त्यांचे आवाज पुढे आणले तसेच हाताखाली असणाऱ्या रोशन, मदन मोहन, सी. रामचंद्र असे असामान्य संगीतकार सहाय्यक म्हणून पुढे आणले. त्यांच्याच कारकिर्दीत या तिन्ही संगीतकारांनी स्वत:ची स्वतंत्र ओळख चित्रपट सृष्टीत निर्माण केली. मात्र त्यानंतर त्यांचा सिनेसृष्टीशी संबंध कमी होत गेला.

    हेही वाचा – सावली… शेवटपर्यंत साथ देणारी!

    1960-61 मधे मित्र पन्नालाल घोष, भाऊ सुनील बिस्वास, मुलगा प्रदीप बिस्वास यांच्या निधनामुळे अनिलदा खचले आणि मुंबई सोडून त्यांनी आपली पत्नी मीना कपूर यांच्याबरोबर दिल्लीला मुक्काम हलवला. या दशकातल्या सौतेला भाई, छोटी छोटी बातें या चित्रपटांतल्या गाण्यांतही दादांच्या प्रतिभेचा प्रत्यय रसिकांना मिळतो. त्यांच्या उत्कृष्ट सांगीतिक योगदानासाठी त्यांना 1986 मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 31 मे 2003 रोजी या संगीतकाराचे नवी दिल्ली येथे निधन झाले.


    विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशीलतेला समर्पित असलेल्या avaantar.com या वेबपोर्टलवरील वैविध्यपूर्ण वाचनीय लेखाचा आनंद घ्यायचा असेल तर,

    IXZVpuvKFwKH6gb0NBN51t?mode=r_c

    या लिंकला क्लिक करून WhatsApp group जॉइन करा.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 30 मे 2026

    May 30, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 29 मे 2026

    May 29, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 28 मे 2026

    May 28, 2026 पंचांग आणि भविष्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 30 मे 2026

    By Team AvaantarMay 30, 2026

    दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 30 मे 2026; वार : शनिवार भारतीय सौर : 09…

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 29 मे 2026

    May 29, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 28 मे 2026

    May 28, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 27 मे 2026

    May 27, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 31 मे 2026

    May 31, 2026

    विपश्यनेतून मिळणारे मानसिक आरोग्य लाभ

    May 30, 2026

    बटाटा वडा ते फ्रेंच फ्राइज… ‘किमयागार’ बटाट्याची गोष्ट!

    May 30, 2026

    सावली… शेवटपर्यंत साथ देणारी!

    May 30, 2026

    मैत्रिणींचे प्लॅनिंग… पुण्याला जायचे अन्…

    May 30, 2026

    Dnyaneshwari : तें हें तुवां अनायासें, विश्वरूप देखिलें जैसें

    May 30, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 313
    • अवांतर 188
    • आरोग्य 115
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 437
    • फिल्मी 49
    • फूड काॅर्नर 217
    • मैत्रीण 20
    • ललित 664
    • शैक्षणिक 81
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 31 मे 2026

    May 31, 2026

    विपश्यनेतून मिळणारे मानसिक आरोग्य लाभ

    May 30, 2026

    बटाटा वडा ते फ्रेंच फ्राइज… ‘किमयागार’ बटाट्याची गोष्ट!

    May 30, 2026
    Most Popular

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 31 मे 2026

    May 31, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.