दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 06 ऑगस्ट 2026; वार : गुरुवार
- भारतीय सौर : 15 श्रावण शके 1948; तिथि : अष्टमी 18:52; नक्षत्र : भरणी 20:13;
- योग : गंड 15:00; करण : बालव 07:50, तैतिल 29:47;
- सूर्य : कर्क; चंद्र : मेष 25:52; सूर्योदय : 06:16; सूर्यास्त : 19:12;
- पक्ष : कृष्ण; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव;
- शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
दिनविशेष
लेखिका, कवयित्री, नाटककार, अभिनेत्री, गायिका योगिनी जोगळेकर
टीम अवांतर
लेखिका, कवयित्री, नाटककार, अभिनेत्री, गायिका योगिनी जोगळेकर यांचा जन्म 6 ऑगस्ट 1925 रोजी पुणे येथे झाला. वयाच्या आठव्या वर्षी त्यांची पहिली कविता शाळेच्या “बालिका-दर्शन’मध्ये छापून आली. शालेय जीवनात “निशिकांतची नवरी’ या नाटकात त्यांनी भूमिका केली होती. शिक्षण घेत असताना संगीत, लेखन, अभिनय, वक्तृत्व, चित्रकला अशा अनेक विषयात त्यांनी प्राविण्य मिळविले होते.
योगिनी यांनी वयाच्या आठव्या वर्षांपासून शंकरबुवा अष्टेकर यांच्याकडे संगीताचे धडे घेतले. याशिवाय राम मराठे यांचे शिष्यत्वदेखील त्यांनी पत्करले. पुढे त्या गाण्याचे स्वतंत्र कार्यक्रमही करू लागल्या. एचएमव्हीने त्यांच्या ध्वनिमुद्रिकादेखील काढल्या. पुढे योगिनी जोगळेकर यांनी “पहिली मंगळागौर’ या चित्रपटासाठी पार्श्वगायनदेखील केले. आकाशवाणीवर पहिल्यांदा ज्यावेळी गीतरामायणाचे प्रसारण झाले त्यावेळी ‘विरूप झाली शूर्पणखा’, ही दाशरथीची कृति, सूड घे त्याचा लंकापति हे गाणे योगिनी जोगळेकर यांनी गायले होते.
हेही वाचा – पोट सहनशील, पण…
संस्कृत आणि मराठी हे दोन विषय घेऊन त्या सर परशुराम महाविद्यालयातून बीएच्या अंतिम वर्षी पहिल्या आल्या. त्या वेळी त्यांना विद्यापीठाकडून “यशोदा चिंतामणी’, “कुसुम वाघ’, “विंझे’ ही तीन मानाची पारितोषिके तसेच तंबोरा बक्षीस म्हणून मिळाला. त्यानंतर 1948 ते 1953 या काळात पुण्यातील सरस्वती मंदिरात शिक्षिका म्हणून त्यांनी काम केले. राष्ट्रसेविका समितीच्या माध्यमातून त्यांनी अनेक वर्षे सामाजिक कार्यही केले.
त्यांच्या नावावर 116 पुस्तके आहेत, ज्यात 50 कादंबऱ्या, 39 कथासंग्रह आणि कवितासंग्रह, बाल कविता इत्यादी अनेक पुस्तकांचा समावेश आहे. भास्करबुवा बाखले यांच्यावरील त्यांची ‘या सम हा’ आणि राम मराठे यांच्यावरील ‘राम प्रहार’ या कादंबऱ्या विशेष गाजल्या आणि त्यांना खूप प्रसिद्धी मिळाली.
त्यांचे लेखन बहुविध असले तरी मुख्यत्वे करून कौटुंबिक नाते-संबंधांतील ताण-तणाव, संघर्ष यांवर आधारित असायचे. बदलत्या आधुनिक जगातील उच्चभ्रू वर्गाची सामान्य माणसासोबत असणारी वर्तणूक याचा त्यांनी आपल्या लेखांतून समाचार घेतला, त्यामुळेच त्यांचे लेखन वाचकांना कायम आवडले.
जोगळेकर यांना मुंबई मराठी साहित्य संघाचा डॉ. अनंत भालेराव स्मृती पुरस्कार तसेच 2002 मध्ये 75 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात महिला लेखिकांचा सन्मान करणारा अमृत महोत्सवी पुरस्कार यांनी सन्मानित करण्यात आले. 1 नोव्हेंबर 2005 रोजी त्यांचे निधन झाले.
आजचे राशिभविष्य
मेष – आजचा दिवस आत्मविश्वास आणि नवीन संधींनी भरलेला असेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीचे आणि नेतृत्व कौशल्याचे कौतुक होईल. सहकाऱ्यांच्या पाठिंब्यामुळे प्रलंबित कामे पूर्ण होतील. नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी काळ अनुकूल असेल. आरोग्य चांगले राहील, मात्र नियमित व्यायाम आणि संतुलित दिनचर्या राखणे आवश्यक असेल.
वृषभ – उत्साह आणि नवी ऊर्जा घेऊन येणारा आजचा दिवस आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या प्रयत्नांचे कौतुक होईल, तुमचे वरिष्ठ देखील प्रभावित होतील. आर्थिक बाबींसंदर्भात आधी विचारपूर्वक घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील. तणाव कमी करण्यासाठी योग आणि ध्यान यांचा जीवनशैलीत समावेश करा. आपल्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करा. तुमच्या कठोर परिश्रमांनीच सकारात्मक परिणाम मिळण्याची शक्यता आहे.
मिथुन – आजचा दिवस नवीन संधी घेऊन येणारा असेल. तुमचे बोलणे आणि वागणूक इतरांना प्रभावित करेल. कामाच्या ठिकाणी नवीन संधी निर्माण होऊ शकतात. याशिवाय तुमचे सामाजिक वर्तुळही विस्तारेल. आपले विचार आत्मविश्वासाने व्यक्त करा. नकारात्मक विचार टाळण्यासाठी ध्यानधारणेची मदत घ्या.
कर्क – आजचा दिवस ऊर्जा आणि सकारात्मकतेने भरलेला असेल. कौटुंबिक संबंध अधिक दृढ होतील. कामाच्या ठिकाणी घेतलेले निर्णय यश मिळवून देऊ शकतात. आपल्या वेळेचा सदुपयोग करा, ध्येयांवर लक्ष केंद्रित करा. आरोग्य सामान्य राहील, परंतु संतुलित आहार आणि पुरेशी विश्रांती घेणे फायदेशीर ठरेल.
सिंह – या राशीच्या जातकांची सर्जनशीलता आणि नेतृत्व कौशल्ये उद्या सर्वांना प्रभावित करतील. कामाच्या ठिकाणी आव्हानात्मक परिस्थितीतही तुम्ही चांगली कामगिरी कराल. नवीन प्रकल्प किंवा उपक्रम सुरू करण्यासाठी वेळ अनुकूल असेल. इतरांच्या मतांना महत्त्व दिल्यास सकारात्मक परिणाम मिळू शकतात.
कन्या – आजचा दिवस तुमच्या योजना पूर्ण करण्याचा असेल. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात आणि तुम्ही त्या यशस्वीपणे पार पाडाल. कुटुंबासोबतचे नातेसंबंध अधिक दृढ होतील. आरोग्य सामान्य राहील, अर्थात तुमचा दिनक्रम नियमित ठेवा. कठोर परिश्रम आणि शिस्त तुम्हाला यशाकडे घेऊन जातील.
तुळ – सहकार्य आणि संवादाचा असा आजचा दिवस असेल. तुमची संभाषणशैली लोकांना प्रभावित करेल. कामाच्या ठिकाणी अनुकूल परिस्थिती राहील. नवीन संबंध जुळण्याची शक्यता आहे. जुने संबंधही अधिक सलोख्याचे होतील. आत्मविश्वास टिकवून ठेवा आणि आपले विचार स्पष्टपणे मांडा. तुमच्याबद्दलचा सामाजिक आदर वाढू शकतो.
वृश्चिक – नवीन आव्हाने आज जशी समोर येतील तशाच काही संधीही मिळतील. तुमची प्रबळ इच्छाशक्ती कठीण परिस्थिती सोपी करेल. सामाजिक जीवनात संयम बाळगा आणि गैरसमज टाळा. स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. संतुलित आहार घ्या. आराम करण्यासाठी थोडा जास्त वेळ काढा.
हेही वाचा – नात्यांमधील फ्रेंडशिप!
धनु – आजचा दिवस नवीन यशाचे संकेत घेऊन येणारा आहे. सामाजिक जीवनात नवीन लोकांना भेटणे फायदेशीर ठरेल. कामाच्या ठिकाणी नवीन संधी निर्माण होऊ शकतात. नियमित व्यायाम आणि संतुलित आहार यामुळे उत्साही राहाल. आत्मविश्वासाने पुढे जा याने यशाची शक्यता वाढेल.
मकर – आजचा दिवस उत्साह आणि प्रेरणेने भरलेला असेल. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांकडून पाठिंबा मिळेल. मिटींगमध्ये तुमच्या कल्पनांना महत्त्व दिले जाईल. गुंतवणुकीबाबत विचारपूर्वक निर्णय घ्या. आपल्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करा आणि कठोर परिश्रम करत राहा. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने मानसिक समाधान मिळेल.
कुंभ – सर्जनशीलता आणि नवीन संधी घेऊन येणारा आजचा दिवस आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या कल्पनांचे कौतुक होईल. तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. वैयक्तिक आयुष्यातील नातेसंबंध अधिक दृढ होतील. सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी झाल्यामुळे नवीन ओळखी होतील. स्वतःचे आरोग्य आणि मानसिक संतुलन टिकवण्यासाठी पुरेशी विश्रांती घ्या.
मीन – आत्मपरीक्षण आणि सर्जनशील कामाचा असा आजचा दिवस असेल. नवीन कल्पना प्रत्यक्षात आणण्याची संधी मिळेल. आपल्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करा, म्हणजे यश मिळण्याची शक्यता आहे. कौटुंबिक पाठिंब्यामुळे आत्मविश्वास वाढेल. स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या आणि मानसिक संतुलन राखा. आध्यात्मिक कार्यांमधील आवड वाढू शकते.


