Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    काळाच्या प्रवाहात टिकून राहिलेला मुंबईचा अस्सल कॅफे ‘बी मेरवान’!

    May 29, 2026

    मायेच्या आठवणींचा गोड धागा.. रुखवत

    May 29, 2026

    Recipe : गोळ्यांचे सांबार अन् गोळ्यांची आमटी करून पाहिले आहे का?

    May 29, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Friday, May 29
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » काळाच्या प्रवाहात टिकून राहिलेला मुंबईचा अस्सल कॅफे ‘बी मेरवान’!
    ललित

    काळाच्या प्रवाहात टिकून राहिलेला मुंबईचा अस्सल कॅफे ‘बी मेरवान’!

    माधवी जोशी माहुलकरBy माधवी जोशी माहुलकरMay 29, 2026No Comments5 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठी आर्टिकल, मराठी लेख, मराठी साहित्य, मराठी कथा, मी मराठी, अभिजात मराठी, मुंबईतील इराणी हॉटेल्स, मुंबईतील कॅफे संस्कृती, बी मेरवान कॅफे, ग्रांट रोडचे बी मेरवान कॅफे, बी मेरवानचा बन मस्का पाव, बी मेरवानचा मावा केक, बी मेरवानचा मावा समोसा, बी मेरवानचा लूक, बी मेरवानमध्ये रोखीचा व्यवहार
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    गरम चहाच्या घोटासोबत ताज्या बन-मस्का पावाचा आस्वाद देणारे आणि अनोळखी माणसांचे ओळखीत रुपांतर करणारे तसेच गप्पांचा फड जमविण्यासाठी मुंबईकरांचे आवडते ठिकाण म्हणजे ग्रांट रोड येथील ‘बी मेरवान कॅफे’!

    मुंबई हे सातत्याने बदलणारं शहर आहे. इथे रात्रीतून इमारती उभ्या राहतात, जुनं मोडून नवं उभारलं जातं आणि लोक तंत्रज्ञानाच्या वेगासोबत धावत असतात. पण या धावपळीच्या मुंबईत एक अशी जागा आहे, जिथे वेळ जणू 100 वर्षांपूर्वीच थांबली आहे. ग्रांट रोड रेल्वे स्टेशनच्या पूर्वेकडे अगदी बाहेर पाऊल टाकताच डाव्या हाताला दिसणारा हा कॅफे. जुने लाकडी दरवाजे आणि तिथून येणारा बटरचा खमंग सुवास तुम्हाला एका वेगळ्याच जगात घेऊन जातो.

    आजच्या हाय-टेक, चकचकीत कॅफेच्या दुनियेतही ‘बी मेरवान अँड कंपनी’ (B. Merwan & Co.) केवळ मुंबईकरांच्याच नव्हे, तर जगभरातून येणाऱ्या खवय्यांच्या आकर्षणाचे केंद्र का बनून आहे, याचा हा सविस्तर प्रवास…

    या कॅफेला 112 वर्षांचा दैदिप्यमान इतिहास आहे! या ऐतिहासिक इराणी कॅफेची सुरुवात 1914मध्ये बोमन मेरवान यांनी केली होती. इतकी वर्षे उलटून गेल्यानंतरही या कॅफेचा तोच थाट आणि तीच लोकप्रियता कायम आहे. एके काळी मुंबईत शेकडो इराणी कॅफे होते, पण काळाच्या ओघात हळूहळू ते बंद होत गेले. मेरवानने मात्र अनेक वादळे अंगावर झेलत आपली अस्सलता आणि अस्तित्व टिकवून ठेवले आहे. 2014मध्ये हा कॅफे कायमचा बंद होणार अशी अफवा पसरली होती, तेव्हा मुंबईकरांनी तिथे प्रचंड गर्दी करून हे आपल्या संस्कृतीचे अंग असल्याचे दाखवून दिले आणि हा कॅफे आजही दिमाखात सुरू आहे.

    हेही वाचा – 90च्या दशकातील अकोल्यातील खाद्यसंस्कृती

    मेरवानमध्ये पाऊल ठेवणे म्हणजे जणू टाइम मशीनमधून थेट विसाव्या शतकाच्या सुरुवातीला जाण्यासारखे आहे. तिथल्या काळानुरूप झिजलेल्या पण मजबूत लाकडी खुर्च्या, संगमरवरी (Marble-top) गोल मेज, भिंतीवर लावलेले अवाढव्य बेल्जियमचे आरसे आणि जुन्या पद्धतीचे पंखे तुम्हाला भूतकाळात घेऊन जातात.

    या कॅफेमधे टेबल शेअरिंगची संस्कृती आहे, म्हणजे इथे ‘प्रायव्हसी’ वगैरे काही नसते. एकाच टेबलावर कॉलेजचे तरुण, नोकरदार, एखादा लेखक आणि पेन्शनर आजोबा एकत्र बसून चहा पिताना दिसतात. अनोळखी माणसांशी ओळख करून घेण्याची आणि गप्पा मारण्याची ही मुंबईची जुनी संस्कृती इथे आजही जीवंत आहे.

    मावा केक, बन-मस्का पाव, खारी यांची टेस्ट जिभेवर रेंगाळणारी आहे. बी मेरवानचे खाद्यपदार्थ हीच त्यांची खरी ओळख आहे. अतिशय मर्यादित मेन्यू असूनही लोकांची इथे झुंबड उडते.

    मेरवानचा मावा केक हा निव्वळ पदार्थ नाही, ती एक भावना आहे. अतिशय मऊ, तोंडात टाकताच विरघळणारा, योग्य प्रमाणात गोड आणि अस्सल माव्याचा स्वाद असलेला हा केक घेण्यासाठी सकाळी 6.30 वाजल्यापासून रांगा लागतात. तुम्ही सकाळी 8.30 किंवा 9 वाजता पोहोचलात, तर काऊंटरवरून “मावा केक खलास!” हे ऐकायची पूर्ण तयारी ठेवावी लागते. त्याचबरोबर बन-मस्का आणि इराणी चहा स्पेशलचं म्हणावं लागेल. इथला बन इतका मऊ असतो की, हाताने सहज तुटतो. त्यात भरलेलं पांढरं बटर (मस्का) आणि सोबत मिळणारा कडक, साय असलेला गोड इराणी चहा! चहात बन बुडवून खाण्याचा तो आनंद फाइव्ह स्टार हॉटेलमधील महागड्या नाश्त्यालाही फिका पाडतो.

    मेरवानची इतर बेकरी उत्पादने जसे मऊ पुडिंग, मावा समोसा, वेगवेगळ्या पेस्ट्रीज आणि अंड्याची भुर्जी – ऑम्लेट हे देखील येथील विशेष पदार्थ आहेत.

    डिजिटल युगातील ‘फक्त रोखी’त व्यवहार करण्याचा मेरवानचा बाज आहे. आज आपण खिशात पाकीट न ठेवता फक्त मोबाइल घेऊन बाहेर पडतो. प्रत्येक टपरीवर ‘क्यूआर कोड’ स्कॅन केला जातो. पण मेरवानमध्ये आजही काऊंटरवर पाटी दिसते — “ओन्ली कॅश”. डिजिटल पेमेंट्स स्वीकारण्यास त्यांचा नकार, हा त्यांच्या तत्त्वाचा आणि जुन्या पद्धतीचा एक भाग आहे. खिशातून सुट्टे पैसे काढून बिल देण्याचा तो जुना फील आजच्या पिढीला खूप आकर्षित करतो. तसेच, मुंबईच्या महागाईच्या काळातही येथील दर अतिशय सामान्य आहेत. सामान्यातील सामान्य माणूसही इथे पोटभर नाश्ता करू शकतो, हे याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे.

    ‘बी मेरवान’चे खरे आकर्षण हे केवळ तिथल्या अन्नात नाही, तर तिथल्या ‘निवांतपणात’ आहे. आजचे कॅफे आपल्याला वाय-फाय देतात जेणेकरून आपण लॅपटॉप उघडून कामात बुडून जावे. पण मेरवान आपल्याला मोबाइल बाजूला ठेवून, समोरच्या अनोळखी माणसाशी ‘चाय पे चर्चा’ करायला भाग पाडतो. बदलत्या मुंबईच्या चेहऱ्यावर मेरवान म्हणजे भूतकाळाची एक सुंदर आणि गोड आठवण आहे!

    जर तुम्ही अजूनही इथे गेला नसाल, तर एखादी सकाळ स्वतःसाठी काढा, खिशात थोडे सुट्टे पैसे ठेवा आणि ‘बी मेरवान’च्या त्या ऐतिहासिक बाकावर बसून चहाचा आस्वाद नक्की घ्या! मी तर नागपूरहून मुंबईला गेले की, मुलांसोबत आवर्जून ‘बी मेरवान कॅफे’ला जाते. मला तिथे बसून चहचा घोट आणि बन-मस्काचा आस्वाद घेत विविध बहुढंगी, बहुरंगी लोकांना न्याहाळणे खूप आवडते.

    हेही वाचा – गोष्ट एका ‘व्हेज अंडाकरी’ची!

    एकदा एक पारशी म्हातारे जोडपे आमच्या बाजूच्या टेबलवर बसून एकमेकांशी काहीतरी बोलत होते. त्यांची ती भाषा ऐकून मला ते कानाला छान वाटल्यामुळे माझी उत्सुकता वाढली. मला त्यांच बोलणं फारसं काही ऐकायला येत नव्हतं, परंतु त्यांचा जो काही थोडा फार संवाद कानावर पडत होता, ते ऐकायला खूप मस्त वाटत होतं. माझा मुलगा मला डोळ्याने दटावत असतांनाही मी माझी खुर्ची मुद्दाम थोडी त्यांच्या बाजूने बाहेर सरकवली. ते पाहून बहुदा माझे त्यांच्या गप्पांकडे लक्ष आहे, असं त्यांच्यातल्या वयस्कर स्त्रीला वाटले असावे… कारण, तिने आपल्या नाकावरील चष्मा बोटाने खाली करून माझ्याकडे पाहिलं आणि एक गोड स्माइल दिलं. तिला हसताना पाहून त्या बाबाजीने पण मागे वळून पाहिलं आणि मला आपला हात वर करून हायं केलं! त्यांचा हा प्रतिसाद पाहून मला खूप आनंद झाला.

    त्यांच्या बाजूच्या टेबलवर एक जोडपं लहान मुलासह तिथे रोज चार वाजता फक्त चहा आणि बन-मस्का पाव खायला येतं. त्यांच्यासोबत असलेल्या लहान मुलानेच मला सांगितलं. आहे की नाही मजा? या कॅफेमध्ये माणसं अनोळखी असली तरी, एकमेकांशी सहज संवाद साधतात. मेरवानमध्ये अशी बरीचशी लोकं तिथे येतात आणि काही क्षणांपुरतं का होईना, आपलं सर्व टेन्शन बाजूला ठेवून त्या अनोख्या दुनियेत हरवतात! त्या अर्ध्या-पाऊण तासात लोकांचा मनावरील ताण मेरवानच्या जिंदादिल वातावरणात नक्कीच कमी होत असावा, नाही का?

    बी मेरवानसारख्या मुंबईतील अशा बऱ्याच इराणी कॅफेंबद्दल मी खूप ऐकलं आहे. मुंबईत अशा वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन निरनिराळ्या लोकांना अनुभवणे म्हणजे एक विलक्षण आनंददायी गोष्ट आहे. आता यापुढे मी परत जेव्हा मुंबईला जाईन, तेव्हा बी मेरवानसारखेच नवीन कॅफे शोधून काढेन, जिथे मला माझ्या विरंगुळ्याचे क्षण आणि आवडीचे विषय मिळतील. मला तो अनुभव परत परत घ्यायला नक्कीच आवडेल.

    Avatar photo
    माधवी जोशी माहुलकर

    एम.ए.(इंग्रजी) बी.एड. असून सध्या नागपूरमध्ये स्थायिक आहेत. लग्नाआधी चार वर्षे मेडिकल रीप्रेझेन्टेटिव्ह म्हणून अकोला येथे कार्यरत. तीन वर्षे शिक्षिका. वाचन, प्रवास करणे, वेगवेगळ्या विषयांवर लिखाण तसेच चर्चा करणे, गायन याची आवड. गायनात गंधर्व महाविद्यालयाच्या परीक्षा प्रथम श्रेणीसह उत्तीर्ण. पती Additional S.P. Anti corruption Bureau Nagpur येथे कार्यरत.

    Related Posts

    मायेच्या आठवणींचा गोड धागा.. रुखवत

    May 29, 2026 ललित

    आत्तू… एकमेकांच्या भावविश्वात समरस होणारं नातं

    May 28, 2026 ललित

    शंकरने उभारले ज्येष्ठांचे मंदिर… ‘स्नेहमंदिर’!

    May 28, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    मायेच्या आठवणींचा गोड धागा.. रुखवत

    By प्रणाली मंगेश महाशब्देMay 29, 2026

    “ए आई तुला माहीत आहे का, आज मी निशाच्या घरी गेले होते ना, तिथे तिची…

    आत्तू… एकमेकांच्या भावविश्वात समरस होणारं नातं

    May 28, 2026

    शंकरने उभारले ज्येष्ठांचे मंदिर… ‘स्नेहमंदिर’!

    May 28, 2026

    दिनूचा वाढदिवस अन् लोढा शेठचा निश्चय

    May 27, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    काळाच्या प्रवाहात टिकून राहिलेला मुंबईचा अस्सल कॅफे ‘बी मेरवान’!

    May 29, 2026

    मायेच्या आठवणींचा गोड धागा.. रुखवत

    May 29, 2026

    Recipe : गोळ्यांचे सांबार अन् गोळ्यांची आमटी करून पाहिले आहे का?

    May 29, 2026

    Dnyaneshwari : हे विश्वरूपाचे सोहळे भोगूनि निवाले जी डोळे

    May 29, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 29 मे 2026

    May 29, 2026

    शांत पूर्णत्व अन् सर्जनशील अपूर्णत्व!

    May 28, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 312
    • अवांतर 187
    • आरोग्य 114
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 435
    • फिल्मी 49
    • फूड काॅर्नर 217
    • मैत्रीण 20
    • ललित 661
    • शैक्षणिक 81
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    काळाच्या प्रवाहात टिकून राहिलेला मुंबईचा अस्सल कॅफे ‘बी मेरवान’!

    May 29, 2026

    मायेच्या आठवणींचा गोड धागा.. रुखवत

    May 29, 2026

    Recipe : गोळ्यांचे सांबार अन् गोळ्यांची आमटी करून पाहिले आहे का?

    May 29, 2026
    Most Popular

    काळाच्या प्रवाहात टिकून राहिलेला मुंबईचा अस्सल कॅफे ‘बी मेरवान’!

    May 29, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.