Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    कानडा राजा

    August 20, 2026

    चटपटा स्वाद… झटपटा आराम!

    August 20, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : गर्वें पर्वताचीं शिखरें,  तैसा महत्त्वावरूनि नुतरे 

    August 20, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Thursday, August 20
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » विद्यार्थ्यांना प्रतिकृती (Models) करायला प्रोत्साहन देऊया
    शैक्षणिक

    विद्यार्थ्यांना प्रतिकृती (Models) करायला प्रोत्साहन देऊया

    Team AvaantarBy Team AvaantarMay 20, 2026No Comments4 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठी आर्टिकल, मराठीलेख, मराठी साहित्य, मराठी लेख, मी मराठी, अभिजात मराठी, विद्यार्थ्यांमधील सुप्त गुण, विद्यार्थ्यांनी प्रतिकृती तयार करणे, विद्यार्थ्यांनी मॉडेल तयार करणे, अवकाशीय बुद्धिमत्ता, विद्यार्थ्यांची निरीक्षणशक्ती, विद्यार्थ्यांची अवकाशीय बुद्धिमत्ता, ऐतिहासिक स्थळांचे महत्त्व,
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    डॉ. किशोर महाबळ

    विद्यार्थ्यांना नेहमीच ताजमहालसारख्या ऐतिहासिक वास्तू आणि स्थळे, आधुनिक बहुमजली विशाल इमारती, महानगरातील विशाल क्रीडांगणे, वेगवेगळ्या वस्तूंचे बाजार, तारांगण, मत्स्यालय, कृषीप्रदर्शने, मोठमोठी धरणे, बगीचे, संग्रहालये आणि त्यातील विविध दुर्मीळ वस्तू, कारखाने, इमारतींच्या तसेच यंत्रांच्या प्रतिकृती, सुंदर चित्रे, चित्रपट, नकाशे, जाहिराती आणि त्यांचे फलक, बघायला आवडते. कारण यासारख्या असंख्य मानवनिर्मित गोष्टींमुळे मानवी जीवन अत्यंत विकसित आणि समृद्ध झाले आहे. अशा जीवनाला समृद्ध करणाऱ्या कोणत्या गोष्टी करता येतील, याची कल्पना करणाऱ्या तसेच नंतर प्रत्यक्षात त्या निर्माण करणाऱ्या व्यक्तींबद्दल जाणून घेण्याची आपल्याला इच्छा असायला हवी, कारण या व्यक्तींमध्ये अत्यंत विकसित अशी अवकाशीय बुद्धिमत्ता असते. आपल्या शाळेतही ज्यांच्यात प्राधान्याने ही बुद्धिमत्ता आढळते असे विद्यार्थी असणार! अशा विद्यार्थ्यांना आपण शोधून काढायचे आहे. त्यासाठी अशी बुद्धिमत्ता असलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये लक्षात घेऊया.

    ही बुद्धिमत्ता असलेले विद्यार्थी, व्यक्ती नेहमीच आजूबाजूच्या परिस्थितीचे अतिशय बारकाईने, अचूक निरीक्षण करतात. तसेच ते जी जागा, स्थळ, वस्तू बघतील त्याचा आकार, व्याप्ती, लांबी, रूंदी, उंची याबद्दलच्या सर्व बाबी चित्ररूपात, त्यांच्या उत्तम लक्षात राहतात. हे विद्यार्थी या बाबी बारकाईने लक्षात ठेवतात. ते त्रिमितीत विचार करू शकतात. त्यांची कल्पनाशक्ती उत्तम असते. त्यांना जी गोष्ट निर्माण करायची असेल तिची निर्मिती ते कल्पनेने मनातल्या मनातच करू शकतात. तसेच एखादी वस्तू, निर्मिती नंतर कशी दिसेल याचीही कल्पना करू शकतात आणि आवश्यक वाटल्यास त्या वस्तूत कल्पनाशक्तीनेच आवश्यक त्या सुधारणा, बदल, विकास करू शकतात. हे करण्यासाठी त्यांना प्रत्यक्ष त्या गोष्टी तयार करण्याची गरज नसते.

    हे विद्यार्थी चित्रकला आणि हस्तकौशल्याची आवश्यकता असलेल्या विषयात तरबेज असतात. त्यांना नकाशा उत्तम समजतो आणि लक्षात राहतो. त्यांना एकदा पाहिलेली जागा ओळखणे सहज जमते. ते उत्तम प्रतिकृती तयार करू शकतात. एखादी वस्तू सुशोभित कशी करायची हे त्यांना सहज सुचते. त्यांना दिशेची उत्तम जाण असते. रेखाचित्र काढणे, कोडी तयार करणे त्यांना उत्तम जमते. त्यांना रंगांची उत्तम जाण असते. कोणता रंग कुठे चांगला दिसेल, हे प्रत्यक्ष रंग न लावताही ते कल्पनेने समजू शकतात. ते अत्यंत सर्जनशील असतात आणि त्यांची कल्पनाशक्ती अत्यंत विकसित असते. या क्षमता आणि ही बुद्धिमत्ता सर्वच विद्यार्थ्यामध्ये असतेच. काही जणांमध्ये ती प्राधान्याने अधिक विकसित असते. अशांना मदत करतानाच इतर विद्यार्थ्यांमधील ही सुप्तरूपात असलेली बुद्धिमत्ता एका विशिष्ट दर्जापर्यंत विकसित करणेही तेवढेच गरजेचे आहे. कारण, या बुद्धिमत्तेमुळेच मानवी जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने बघण्याची सवय लागते. आपले जीवन ज्या ज्या पद्धतीने समृद्ध करता येईल, त्या त्या पद्धतीने समृद्ध करण्याचा प्रयत्न होऊ लागतो. यामुळे कल्पनाशक्ती, सर्जनशीलता आणि व्यक्तिमत्वाचा विकास होतो.

    हेही वाचा – वक्तृत्व कलेची साधना

    ही बुद्धिमत्ता विकसित करण्यासाठी आपल्याला सर्व विद्यार्थ्यांसाठी काही उपक्रम घेता येतील. त्यांना काही उत्तम चित्रे दाखवून त्या चित्रातून चित्रकाराला काय सांगायचे असेल, याची कल्पना करण्यास सांगता येईल. एखाद्या महत्त्वाच्या ठिकाणचे बारकाईने निरीक्षण करण्यास तसेच ते नोंदविण्यास सांगता येईल. यानंतर ते ठिकाण बघितलेल्या विद्यार्थ्यांना परस्परांशी चर्चा करायला सांगितले तर, त्यांना आपल्या निरीक्षणातून काय सुटले हे कळेल आणि त्यामुळे अधिक अचूकपणे निरीक्षण करण्याची सवय लागेल.

    विद्यार्थ्यांना विविध प्रकारची कोडी सोडविणे आणि कोडी तयार करण्यास प्रोत्साहन देता येईल. क्रीडांगणावर विविध अंतरावर विविध वस्तू ठेवून त्यातील अंतर किती असेल याचा अंदाज करण्यास प्रोत्साहित करता येईल. याच पद्धतीने विशिष्ट ठिकाणची उंची, खोली, रूंदी यांचाही अंदाज करण्याची संधी देता येईल. एखाद्या जागेचा नकाशा काढण्यास किंवा नकाशातील विविध स्थळे शोधण्याचा प्रकल्प देता येईल. एखादी वस्तू विविध कोनात फिरवली तर कशी दिसेल याची कल्पना करण्यास सांगता येईल. एखाद्या वस्तूची वर्तमानपत्रासाठी आणि दूरदर्शनसाठी जाहिरात तयार करण्याचे काम दिले तर त्यांना गंमत वाटेल. या प्रयोगांमुळे कल्पनाशक्ती, सर्जनशीलता व अवकाशीय बुद्धिमत्ता विकसित करण्यास खूपच मदत होईल.

    प्रत्येक वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्याला या उपक्रमात सहभागी करून घेता येऊ शकते आणि तसे केलेच पाहिजे. याशिवाय, प्रतिकृती तयार करण्याचा उपक्रम हा अत्यंत उपयुक्त ठरू शकतो. उदा. विद्यार्थ्यांना ऐतिहासिक किल्ले तयार करण्यास तसेच त्यावरील विविध ठिकाणे अचूकपणे दाखविण्यास सांगता येईल. याचप्रमाणे सौरमंडळ, ऐतिहासिक आणि अत्याधुनिक वास्तू, घरे, यंत्रे, विमाने, जहाज आणि दूरदर्शन संचासारख्या विविध प्रकारच्या वस्तूंच्या अचूक प्रमाणबद्ध प्रतिकृती तयार करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करता येईल. अशा प्रतिकृती तयार करण्यापूर्वी विद्यार्थ्याला आपल्या कल्पनाशक्तीला ताण द्यावा लागेल. कशाची प्रतिकृती करायची, तिचा आकार, बाह्य रूप, रंग आणि अंतर्गत रचना कशी असेल, याचा विचार करावा लागेल. आवश्यक ती माहिती गोळा करावी लागेल.

    हेही वाचा – शोध काव्यप्रतिभेचा!

    प्रतिकृती करण्यासाठी कोणत्या वस्तू किती प्रमाणात वापरायच्या आणि प्रत्यक्षात ती प्रतिकृती कशी करायची, याचाही विचार करावा लागेल. किती कालावधीत प्रतिकृती तयार करायची हेही ठरवावे लागेल. त्यानंतर अचूकपणे काळजीपूर्वक प्रमाणबद्ध अशी प्रतिकृती तयार करावी लागेल. या सर्व प्रक्रियेत विद्यार्थ्यांची कल्पनाशक्ती, सर्जनशीलता, कृतीशीलता आणि अवकाशीय बुद्धिमत्ता कितीतरी प्रमाणात विकसित होते. सर्व विद्यार्थ्यांना म्हणूनच छोट्या-मोठ्या प्रतिकृती करण्यास प्रोत्साहन दिले पाहिजे. अशा प्रतिकृती करण्यास खर्च येतो असाही एक समज आहे. काही प्रकारच्या प्रतिकृतींच्या बाबतीत हे खरे नाही. साधे कागद वापरून अनेक प्रतिकृती तयार करता येतात, हे ओरिगामी या कलेतून अनुभवता येते. बिया, वेगवेगळ्या आकाराचे दगड, रंगीत कापडाचे तुकडे आणि साधा कागद अशा सहजगत्या उपलब्ध असलेल्या वस्तूंचा उपयोग करून चांगल्या शैक्षणिक प्रतिकृती तयार करता येऊ शकतात, हे अनेक शिक्षक व विद्यार्थ्यांनी दाखवून दिले आहे. तेव्हा अत्यल्प खर्चात प्रत्येक विद्यार्थ्याला प्रतिकृती तयार करणे शक्य आहे; मात्र त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे.

    याशिवाय, या सर्व प्रतिकृतींचे प्रदर्शनही शाळेत लावले गेले पाहिजे. यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला त्याने तयार केलेले मॉडेल इतरांना दाखविता येईल इतर विद्यार्थ्यांनाही हे अतिशय फायद्याचे ठरू शकते. त्या दृष्टीने आपण सर्वजण प्रयत्न करूया.

    (‘सर्वांसाठी सर्वोत्तम शिक्षण’ पुस्तकातून साभार)

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    संगणकाच्या साथीने सर्वोत्तम अध्यापन

    August 17, 2026 शैक्षणिक

    सर्व विद्यार्थ्यांना प्रश्न विचारू द्या

    August 3, 2026 शैक्षणिक

    सर्व विद्यार्थ्यांना गाणे गाऊ द्या

    July 19, 2026 शैक्षणिक
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    शैक्षणिक

    संगणकाच्या साथीने सर्वोत्तम अध्यापन

    By Team AvaantarAugust 17, 2026

    डॉ. किशोर महाबळ विज्ञानाचे काही शिक्षक काही प्रमाणात तरी संगणकाचा उपयोग करताना दिसतात. मात्र अनेक…

    सर्व विद्यार्थ्यांना प्रश्न विचारू द्या

    August 3, 2026

    सर्व विद्यार्थ्यांना गाणे गाऊ द्या

    July 19, 2026

    सर्व विद्यार्थ्यांना आत्मपरीक्षण करायला शिकवूया

    July 4, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    कानडा राजा

    August 20, 2026

    चटपटा स्वाद… झटपटा आराम!

    August 20, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : गर्वें पर्वताचीं शिखरें,  तैसा महत्त्वावरूनि नुतरे 

    August 20, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 20 ऑगस्ट 2026

    August 20, 2026

    अशीही एक भाऊबीज… पूर्वार्ध

    August 19, 2026

    धनवापसी… मोडक आजोबांची प्रतीक्षा

    August 19, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 402
    • अवांतर 206
    • आरोग्य 140
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 541
    • फिल्मी 64
    • फूड काॅर्नर 250
    • मैत्रीण 24
    • ललित 861
    • शैक्षणिक 85
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    कानडा राजा

    August 20, 2026

    चटपटा स्वाद… झटपटा आराम!

    August 20, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : गर्वें पर्वताचीं शिखरें,  तैसा महत्त्वावरूनि नुतरे 

    August 20, 2026
    Most Popular

    ज्योतिषशास्त्र… कुंडलीतील महत्त्वाचे सूत्र – भावलग्न आणि होरा लग्न

    August 15, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.