Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    मेहनत करने वालों की…

    June 22, 2026

    बेटर हाफ

    June 22, 2026

    संकर्षण… खरी लढाई आता सुरू झाली

    June 22, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, June 23
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » वक्तृत्व कलेची साधना
    शैक्षणिक

    वक्तृत्व कलेची साधना

    Team AvaantarBy Team AvaantarFebruary 2, 2026No Comments4 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेखक, मराठीवाचन, मराठी साहित्य, मी मराठी, अभिजात मराठी, वक्तृत्व कलेची साधना, वक्तृत्व कला, वक्तृत्व स्पर्धा, वाचनाचे महत्त्व, विषयांचे सखोल ज्ञान, विषयाची मांडणी, मुद्देसुद मांडणी, प्रसंगोचित मुद्देसूद मांडणी,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    डॉ. किशोर महाबळ

    आत्मविश्वास असलेल्या आणि उत्तम पाठांतर करू शकणाऱ्या विद्यार्थ्यांची सहसा आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेत भाग घेण्यासाठी शिक्षक निवड करतात. असे विद्यार्थी मग अशा स्पर्धामध्ये शिक्षकांनी लिहून दिलेली भाषणे पाठ करून सादर करतात आणि बक्षिसे जिंकतात. याच पद्धतीने बक्षीस जिंकण्याची सवय झालेल्या विद्यार्थ्यांना मग वक्तृत्व कला सोपी वाटू लागते. काही विद्यार्थ्यांमध्ये उपजतच भाषिक बुद्धिमत्ता असते. असे विद्यार्थी संवाद कौशल्ये आणि वक्तृत्व कला सहजगत्या शिकू शकतात, त्यांना शिकण्याची इच्छाही असते. मात्र, अशा विद्यार्थ्यांना पाठ केलेले भाषण म्हणून दाखविणे म्हणजेच वक्तृत्व असे वाटू लागले तर, मात्र त्यांना योग्य ते मार्गदर्शन करण्याची गरज असते. ते कसे करायचे याचा आता विचार करूया.

    वक्तृत्व कला आत्मसात करण्यासाठी भाषिक बुद्धिमत्ता असणे पुरेसे नसते तर त्या बुद्धिमत्तेचा विचारपूर्वक आणि प्रयत्नपूर्वक विकास करणे गरजेचे असते, हे विद्यार्थ्यांना सांगितले पाहिजे. वक्तृत्व कला विकसित करण्यासाठी उत्तम सद्विचारांचा संस्कार, विविध विषयांची माहिती, कोणत्या तरी एका विषयाचे सखोल ज्ञान, कमीतकमी एका भाषेवर प्रभूत्व, भाषेचा योग्य उपयोग करण्याची क्षमता लागते. याशिवाय, आत्मविश्वास, स्वतंत्रपणे विचार करता येणे, जीवनाकडे तसेच विविध विषयांकडे बघण्याचा स्वतंत्र दृष्टिकोन असणे हेही गरजेचे असते. श्रोत्यांची मन:स्थिती ओळखून प्रभावीपणे आपली मते मांडता यावी लागतात. सभ्य भाषेत आपल्या विरोधकांची मते खोडून काढण्याची क्षमता विकसित करावी लागते. प्रसंगावधान राखून, प्रसंगोचित मुद्देसूद कसे बोलायचे, हेही शिकावे लागते. इतरांचे विचार, दृष्टिकोन, मते समजून घेण्याची क्षमता असावी लागते. आपले विचार मुद्देसूदरित्या मांडता येणे गरजेचे असते. हे सोपे नाही, हे विद्यार्थ्यांना सांगायला हवे.

    या सर्वच गोष्टी शालेय जीवनात शिकता येणार नाहीत. त्यासाठी कदाचित आयुष्यभर प्रयत्न करावा लागेल. शिवाय, या सर्व गोष्टी काही प्रमाणातच शिकविता येतात. उत्तम वक्तृत्वासाठी म्हणूनच व्यक्तिगत स्तरावर खूप तयारी करावी लागते. वक्तृत्वकला शिकण्यासाठी प्रयत्न करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना या सर्व गोष्टींची जाणीव करून द्यावी लागते. याशिवाय, या सर्व क्षमता विकसित करण्यासाठी विद्यार्थ्यांना काही छोटे उपक्रमही आपण वेळोवेळी सुचवू शकतो.

    उत्तम वक्ता होण्यासाठी सर्वप्रथम नामवंत वक्त्यांची भाषणे ऐकणे उपयुक्त ठरते. असे वक्ते भाषण कसे देतात, मुद्दे कसे मांडतात, मुद्यांचा सोदाहरण विस्तार कसा करतात, कोणती उदाहरणे देतात, म्हणी, वाक्प्रचार, सुविचार, कविता यांचा भाषण रंगविण्यासाठी कसा आणि किती उपयोग करतात, शब्द तसेच वाक्ये कशी उच्चारतात, आपले भाषण श्रोत्यांना आवडावे यासाठी काय करतात, हे सारे विद्यार्थ्यांनी अभ्यासले पाहिजे. या भाषणांतून त्यांना काय आवडले, काय नाही आवडले, याचाही विचार करावा, हे आपण विद्यार्थ्यांना सुचवायचे आहे.

    हेही वाचा – सर्व विद्यार्थ्यांना निसर्गाचा अभ्यास करू द्या!

    चांगले भाषण हे माहितीपूर्ण आणि आशयसंपन्न असते. असे भाषण देता येण्यासाठी सातत्याने विश्वकोशासारख्या संदर्भग्रंथांचे तसेच विविध विषयांवरील अभ्यासपूर्ण ग्रंथांचे अध्ययन करणे उपयुक्त ठरते. विविध विषयांचे वाचन करतानाच एखाद्या विशिष्ट विषयाचा सखोल अभ्यासही केला पाहिजे. श्रेष्ठ कथा, निबंध, कविता, कादंबऱ्यांचे वाचनही करावे. ताज्या घडामोडींची माहिती होण्यासाठी नियमितपणे वर्तमानपत्रांचे वाचनही केले पाहिजे. या वाचनामुळे माहिती, नवे विचार, नव्या संकल्पना, नवा दृष्टिकोन यांचा परिचय होईल. याशिवाय भाषेचा प्रभावीपणे उपयोग कसा करता येतो, हेही लक्षात येईल. हे सारे वाचन करताना आपण जे वाचत आहोत, ते आपल्याला समजते आहे, याची खात्री करून घेतली पाहिजे. समजले नसल्यास पुन्हा वाचून समजून घेतले पाहिजे. शक्य तेव्हा वाचलेले आठवून बघितले पाहिजे. वाचलेल्या गोष्टींबद्दल विचार केला पाहिजे. जे वाचले त्यातील आपल्याला काय आवडले आणि काय आवडले नाही. आवडले तर ते का आवडले? आणि आवडले नसेल तर का आवडले नाही? याचाही विचार करायला हवा. हे सतत करीत राहिल्यास चांगले भाषण करता येऊ शकेल, हे आपल्याला विद्यार्थ्यांना सुचवायचे आहे.

    कोणी लिहून दिलेले भाषण पाठ करून म्हणून दाखविण्याऐवजी दिलेल्या विषयावर स्वतःच तयारी करून भाषण देणे योग्य असते, हेही विद्यार्थ्यांना सांगणे आवश्यक आहे. यामुळे दिलेल्या विषयासंबंधी भरपूर माहिती गोळा करण्याची, विषयासंबंधी मुद्दे काढून योग्य उदाहरणे शोधण्याची, उपलब्ध वेळेत काय बोलायचे हे निश्चित करण्याची तसेच अभ्यासाची सवय लागेल.

    हेही वाचा – ‘वेगळ्या’ चित्रकारांचा शोध

    जो वक्ता नेहमी आत्मपरीक्षण करतो तोच चांगले भाषण करू शकतो. आपल्या भाषणाबद्दल जो वक्ता समाधानी असतो, तो कधीच प्रगती करू शकत नाही. भाषणानंतर आत्मस्तुती न करता भाषणात जे सांगितले ते नीट सांगितले का, दिलेली उदाहरणे योग्य होती का, विषय नीट मांडला गेला का, भाषणात अजून काय सांगता आले असते, विषय मांडतांना काय चुकले, याचा विचार करण्याची तसेच या आत्मपरीक्षणातून लक्षात आलेल्या चुका पुढच्या भाषणात कटाक्षाने टाळण्याची सवय ज्या वक्त्याला असते, त्याची नेहमी प्रगती होते. जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतला पाहिजे. शक्यतो आपले भाषण स्वतःच तयार केले पाहिजे आणि आपले बोलणे नीट मुद्देसूद असले पाहिजे, असा प्रयत्न होतकरू वक्त्याने नेहमी केला पाहिजे. त्यामुळे वक्तृत्व कला आत्मसात करणे सोपे जाईल, हे विद्यार्थ्यांना सांगितले पाहिजे. या सर्व गोष्टी विद्यार्थ्यांना माहीत असल्या तर ते आपली भाषिक बुद्धिमत्ता विकसित करण्यासाठी प्रयत्न करू शकतील.

    (‘सर्वांसाठी सर्वोत्तम शिक्षण’ या पुस्तकातून साभार)

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    विद्यार्थ्यांना प्रतिकृती (Models) करायला प्रोत्साहन देऊया

    May 20, 2026 शैक्षणिक

    शाळेत सर्व विद्यार्थ्यांना भरपूर बोलू द्या…

    May 14, 2026 शैक्षणिक

    विद्यार्थ्यांना क्लासेसची आवश्यकता किती?

    May 5, 2026 शैक्षणिक
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    शैक्षणिक

    विद्यार्थ्यांना प्रतिकृती (Models) करायला प्रोत्साहन देऊया

    By Team AvaantarMay 20, 2026

    डॉ. किशोर महाबळ विद्यार्थ्यांना नेहमीच ताजमहालसारख्या ऐतिहासिक वास्तू आणि स्थळे, आधुनिक बहुमजली विशाल इमारती, महानगरातील…

    शाळेत सर्व विद्यार्थ्यांना भरपूर बोलू द्या…

    May 14, 2026

    विद्यार्थ्यांना क्लासेसची आवश्यकता किती?

    May 5, 2026

    प्रत्येक विद्यार्थ्याला खेळण्यासाठी प्रोत्साहन दिलेच पाहिजे…

    May 2, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    मेहनत करने वालों की…

    June 22, 2026

    बेटर हाफ

    June 22, 2026

    संकर्षण… खरी लढाई आता सुरू झाली

    June 22, 2026

    चिनारचे उत्साही राहण्याचे रहस्य

    June 22, 2026

    Dnyaneshwari : कैवल्याचा अधिकारी, मोक्षाची सोडी बांधी करी

    June 22, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 22 जून 2026

    June 22, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 336
    • अवांतर 191
    • आरोग्य 122
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 463
    • फिल्मी 53
    • फूड काॅर्नर 226
    • मैत्रीण 22
    • ललित 725
    • शैक्षणिक 81
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    मेहनत करने वालों की…

    June 22, 2026

    बेटर हाफ

    June 22, 2026

    संकर्षण… खरी लढाई आता सुरू झाली

    June 22, 2026
    Most Popular

    बेटर हाफ

    June 22, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.