दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 20 मे 2026; वार : बुधवार
- भारतीय सौर : 30 वैशाख शके 1948; तिथि : चतुर्थी 11:07; नक्षत्र : आर्द्रा 06:11, पुनर्वसू 28:11;
- योग : शूल 14:10; करण : बव 21:42;
- सूर्य : वृषभ; चंद्र : मिथुन 22:38; सूर्योदय : 06:03; सूर्यास्त : 19:06;
- पक्ष : शुक्ल; अयन : उत्तरायण; संवत्सर : पराभव;
- शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
दिनविशेष
प्राच्यविद्यासंशोधक, भाषाशास्त्रज्ञ पांडुरंग दामोदर गुणे
टीम अवांतर
प्राच्यविद्यासंशोधक, भाषाशास्त्रज्ञ आणि साहित्यसमीक्षक असणाऱ्या पांडुरंग दामोदर गुणे यांचा जन्म 20 मे 1884 रोजी अहमदनगर जिल्ह्यात राहुरी येथे झाला. त्यांचे प्राथमिक तसेच माध्यमिक शिक्षण अहमदनगर येथे तर उच्च शिक्षण मुंबईच्या विल्सन कॉलेजमधून झाले. मॅट्रिक परीक्षेत दुसरी शंकरशेट शिष्यवृत्ती, बीए परीक्षेत ‘भाऊ दाजी’ पारितोषिक तर एमएच्या परीक्षेत ‘झाला वेदान्त’ पारितोषिकाचे ते मानकरी ठरले. 1908मध्ये पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजात संस्कृतचे प्राध्यापक म्हणून ते रुजू झाले. याशिवाय सरकारी शिष्यवृत्ती मिळवून जर्मनीच्या लाइपसिक विद्यापीठाची पीएच्.डी. देखील त्यांनी संपादिली. ते विलिंग्डन कॉलेज, सांगली येथेही संस्कृतचे प्राध्यापक म्हणून काही काळ कार्यरत होते.
त्यांनी मांडलेले विचार मराठी साहित्य विश्वात हे नावीन्यपूर्ण आणि अभ्यासपूर्ण होते. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर, मुंबई विद्यापीठ, भारत इतिहास संशोधक मंडळ, श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ यांच्या विविध कार्यांमध्ये ते सक्रिय सहभागी असायचे. ॲन इंट्रोडक्शन टू कंपॅरेटिव्ह फायलॉलॉजी हा संस्कृत, प्राकृत आणि आधुनिक देशी भाषा यांचा तौलनिक अभ्यास मांडणारा त्यांचा इंग्रजी ग्रंथ, याशिवाय चिं. वि. वैद्य यांच्याबरोबर ‘मराठी भाषेच्या उत्पत्ती’ संबंधी त्यांचा झालेला वाद (विविधज्ञानविस्तार, 1922 पुनर्मुद्रण 1968) तसेच ‘मराठी भाषेचा कालनिर्णय’ आणि ‘अपभ्रंश भाषेतील वाङ्मय’ (भारत इतिहास संशोधक मंडळ वार्षिक वृत्त – 6 व 7) हे त्यांचे लेख भाषाशास्त्रीय अभ्यासात विशेष भर घालणारे आहेत.
हेही वाचा – Bookshelf : निशाणी डावा अंगठा… आपली फक्त हतबलता!
याशिवाय, माझा युरोपातील प्रवास, जर्मनीतील लोकशिक्षण ही त्यांची पुस्तके असून त्यांनी मोजके, पण व्यासंगी असे समीक्षा लेखही लिहिलेले आहेत. 25 नोव्हेंबर 1922 रोजी क्षय रोगामुळे वयाच्या अवघ्या 38व्या वर्षी त्यांचे निधन झाले.
आजचे राशीभविष्य
मेष – नवीन व्यावसायिक भागीदारी फायदेशीर ठरेल, जुन्या प्रकल्पांमधून चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. खर्चावर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे, अन्यथा बजेटवर ताण येऊ शकतो. खराब वातावरणामुळे आरोग्यावर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. दूरच्या नातेवाईकाकडून येणारी बातमी घरात काही प्रमाणात दुःख निर्माण करू शकते.
वृषभ – कामातील तुमची मेहनत आणि प्रामाणिकपणा वरिष्ठांना प्रभावित करेल. गुंतवणुकीच्या चांगल्या संधी मिळू शकतात, तथापि, जाणकारांचा सल्ल्यानुसारच निर्णय घेणे इष्ट. नवीन घर किंवा प्रॉपर्टी प्रोजेक्ट सुरू करण्याच्या स्वप्नालाही गती मिळू शकते. नातेवाईकांच्या भेटींमुळे दिवस खास होईल आणि एखाद्या शुभप्रसंगाच्या तयारीमुळे उत्साह दुणावेल.
मिथुन – बोलण्याची कला तुमची सर्वात मोठी ताकद आणि कमजोरी दोन्ही ठरू शकते. तापट स्वभावामुळे कुटुंबातील सदस्यांना काहीसा त्रास होऊ शकतो. व्यवसायातील नवीन बदल यशाचा मार्ग मोकळा करू शकतात. अचानक झालेल्या आर्थिक लाभाने आनंद द्विगुणित होईल. इतरांना वैयक्तिक माहिती देणे टाळा, त्यामुळे भविष्यात समस्या निर्माण होऊ शकतात.
कर्क – प्रत्येक पाऊल काळजीपूर्वक टाकावे लागेल. गाडी चालवताना विशेष सावधगिरी बाळगा. जुन्या प्रिय व्यक्तीशी अचानक भेट झाल्याने पराकोटीचा आनंद होईल, पण भावनांच्या आहारी जाऊन चुकीचा निर्णय घेऊ नका. शहाणपण आणि संयम ही तुमची सर्वात मोठी शक्ती असेल. मुलांसोबत वेळ घालवल्याने तुमच्या नात्यातील प्रेम आणि जवळीक वाढेल.
सिंह – नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामामुळे तसेच कल्पक नियोजनामुळे वरिष्ठ खूप प्रभावित होतील. संपत्ती आणि सुखसोयींमध्ये वाढ होईल. कमकुवत बाजू ओळखून त्या सुधारल्यास अधिक लवकर यश मिळेल. आजूबाजूच्या वादांपासून दूर राहणेच उत्तम. आजचा दिवस विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी देणारा ठरू शकतो. परीक्षेचा निकाल अपेक्षेप्रमाणे लागू शकतो.
कन्या – जे जातक नोकरीच्या शोधात आहेत, त्यांना हवी असलेली संधी मिळू शकते. घरासाठी नवीन इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करण्याची शक्यता आहे. कुटुंबात सुरू असलेले वाद मिटवण्याची जबाबदारी तुमच्यावर येऊ शकते. एखाद्या आनंदाच्या प्रसंगासाठी नातेवाईकांच्या घरी भेट दिल्याने तुमच्या मनावरील दडपण दूर होऊन हलकेपणा आणि आनंद मिळेल.
तुळ – कठोर परिश्रम हेच तुमचे सर्वात मोठे शस्त्र ठरेल. राजकारण किंवा सामाजिक क्षेत्रातील उच्च पदामुळे तुमच्याबद्दलचा आदर वाढू शकतो. कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांसोबत बसून महत्त्वाचे निर्णय घेण्याची संधी मिळेल. मुलांकडून आलेली चांगली बातमी आनंद घेऊन येऊ शकते. ऑनलाइन खरेदी करताना सावधगिरी बाळगा, त्यात नुकसान होण्याची शक्यता आहे.
वृश्चिक – आजचा दिवस तुमच्यासाठी विशेष आणि फायदेशीर ठरू शकतो. नवीन लोकांशी भेटीगाठी होतील आणि त्याचा भविष्यात मोठा फायदा होईल. व्यवसायात चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. संततीसाठी नवीन वाहन खरेदी करण्याची शक्यता आहे. जीवनशैलीतील बदल आणि नवीन खरेदी तुम्हाला उत्साहित करतील.
हेही वाचा – मयासुराची मयसभा
धनु – आज बरीच धावपळ होईल, पण तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल. नोकरीच्या ठिकाणी जबाबदारीने वागावे लागेल, अन्यथा वरिष्ठ नाराज होऊ शकतो. उत्पन्न वाढवण्याच्या नव्या स्रोतांकडे तुमचे पूर्ण लक्ष असेल. एखाद्या अभ्यासक्रमासाठी किंवा मुलाच्या भविष्यासाठी परदेशात प्रवास करावा लागू शकतो. आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यास समस्या वाढू शकतात.
मकर – आज तुमच्यावर अनेक जबाबदाऱ्या येऊ शकतात. तुमच्यातील मार्गदर्शक प्रत्येक कार्याला योग्य दिशेने मार्गदर्शन करेल. नवीन व्यवसाय सुरू करताना कुटुंबाकडून पूर्ण पाठिंबा मिळेल. जुन्या मित्राला भेटल्याने जुन्या आठवणी ताज्या होतील. सध्या प्रवासाचे बेत पुढे ढकलणे उत्तम ठरेल.
कुंभ – आज तुमच्यासोबत सकारात्मक ऊर्जा आणि चांगले परिणाम असतील. जबाबदाऱ्यांबाबत गंभीर रहा. प्रलंबित व्यावसायिक कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. कोणालाही पैसे उधार देण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा. घरी धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमाचे आयोजन केल्याने वातावरण पवित्र आणि आनंददायी होईल.
मीन – काही आव्हाने तुमच्या संयमाची परीक्षा घेऊ शकतात, पण शहाणपणाने प्रत्येक अडचणीवर मात कराल. तुमच्या बोलण्याने जोडीदार नाराज होऊ शकतो, म्हणून आपले शब्द काळजीपूर्वक निवडा. दुसऱ्यावर आंधळेपणाने विश्वास ठेवून निर्णय घेणे टाळा. कौटुंबिक समस्या घरातच सोडवणे उत्तम, नाहीतर तुम्हाला नंतर पश्चात्ताप होऊ शकतो.


