Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : ना अर्जुना मी काळु आणि ग्रासिजे तो माझा खेळु

    May 20, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 20 मे 2026

    May 20, 2026

    Bookshelf : निशाणी डावा अंगठा… आपली फक्त हतबलता!

    May 19, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, May 20
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » मयासुराची मयसभा
    ललित

    मयासुराची मयसभा

    जितेंद्र अभ्यंकरBy जितेंद्र अभ्यंकरMay 19, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेखक, मराठीवाचन, मराठी साहित्य, मी मराठी, अभिजात मराठी, मयसभा, मयासुराची मयसभा, दिसते तसे नसते, पती पत्नीतील गैरसमज, उच्चभ्रू वस्तीतील रहाणीमान, उच्चभ्रू लोकांचे समारंभ, नव्या युगातील नातेसंबंध, पती पत्नीतील बदललेली संबध, बदललेली जीवनशैली, काळानुरूप वागण्यातील मोकळेपणा
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    त्याचं नुकतंच लग्न झालं आणि कंपनीने त्याची प्रमोशनवर बदली केली. पत्नीचा पायगुण म्हणून सगळे सुखावले. ते दोघंच नव्या ठिकाणी गेले. ती कंपनीची प्रचंड अशी टाऊनशीप होती. हजारोंच्या संख्येने स्टाफ होता. तिथं त्यांना ओळखणारं कुणीच नव्हतं. म्हणून तिला फार कंटाळा येत असे. मग तिच्यासाठी त्याने कंपनीच्या सुसज्ज अशा रिक्रीएशन क्लबची मेंबरशिप घेतली. आता ती रोज क्लबमध्ये जायला लागली. तिच्यात बरेच कलागुण असल्याने ती अल्पावधीतच पॉप्युलर झाली. तो सुरुवातीला तिच्याबरोबर क्लबमध्ये जात असे. पण त्याला तिथलं वातावरण फारसं भावलं नाही. तिथला उच्चभ्रू वर्गातला मोकळेपणा त्याला पटला नाही. आपण या क्लबचे मेंबर व्हायलाच नको होतं असं त्याला वाटलं.

    पण ती मात्र चांगलीच रमली होती. कंपनीच्या वरिष्ठ वर्गाच्या फंक्शन्सना तिला आमंत्रण येऊ लागलं. तो सुद्धा जात असे. पण त्याला तिथं फारच ऑकवर्ड व्हायचं. ती मात्र अगदी सहजपणे लोकांत मिसळत असे. असंख्य स्त्रिया तर तिच्या मैत्रिणी होत्याच, पण अनेक पुरुष मित्र पण होते. ते सगळे एकत्र कोंडाळं करुन हास्यविनोद करताना एकमेकांना सहजपणे टाळ्या द्यायचे, टाळ्या घ्यायचे… ते पाहून तो मात्र अस्वस्थ होत असे. हल्ली तो कामावरुन येत असताना तिचा फोन सतत एंगेज लागत असे. घरापाशी आल्यावर त्याला दिसायचं की, ती फोनवर हसतहसत बोलत असायची. ते बघून त्याचा तीळपापड व्हायला लागला. एके दिवशी त्याच्या या कोंडमाऱ्याचा स्फोट झाला…

    ती सहजच त्याला म्हणाली, ” सगळे आपल्याला बोलवतात. आपण सुद्धा एक छोटंसं फंक्शन करून तुमच्या मित्रांना बोलवूयात.”

    तिचं बोलणं ऐकून तो संतापाने तिच्यावर ओरडला, “मित्र कशाला हवेत? मी एकटा पुरेसा नाही का?”

    तिचा स्वतःच्या कानांवर विश्वास बसेना. मग त्यांचं प्रचंड भांडण होऊन ती बॅग भरून माहेरी निघून गेली. तोही सुट्टी घेऊन घरी आला.

    हेही वाचा – काळोखाच्या दारावरती नक्षत्रांच्या वेली

    सर्व प्रकार ऐकल्यावर त्याची आई त्याला घेऊन माझ्याकडे आली. मी त्याची जन्मपत्रिका काळजीपूर्वक तपासली आणि त्याला म्हणालो, ” तुमच्या वैवाहिक स्थानात राहू आहे. सध्या राहू महादशा सुरू असल्यामुळे तुम्हाला पत्नीशी बोलताना खूप विचारपूर्वक बोलावे लागेल, असं मला वाटतं.”

    तो उद्विग्न होऊन म्हणाला, “मला संयम ठेवणं कठीण होत आहे, कारण ती पुरुष मित्रांशी नको तितक्या सलगीने वागते.”

    मी त्याला म्हणालो, “तुमच्या पत्नीच्या सलगीची लेव्हल निश्चित करताना तुम्ही खूप विचार केला पाहिजे. पंचवीस वर्षांपूर्वी स्त्रियांनी पुरुषांशी किती सलगीने बोलावं, याची मर्यादा वेगळी होती. आजचा काळ फॉरवर्ड आहे. स्त्री-पुरुष मैत्री हे आजच्या काळाचं वास्तव आहे…”

    “दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे तुमचा दृष्टीकोन.

    हे जग म्हणजे मयासुराची मयसभा आहे, हे लक्षात असू द्या. जिथं जमीन असते तिथं तुम्हाला पाणी दिसू शकतं आणि जिथं पाणी असतं तिथे तुम्हाला जमीन दिसू शकते हे समजून घ्या! कोणत्याही दृश्याचं अचूक आकलन होण्यासाठी तुमची नजर पूर्वग्रहदूषित असायला नको. राहूच्या महादशेत गैरसमज होण्याची शक्यता खूप जास्त असते. तुम्ही तुमच्या पत्नीच्या घरी जाऊन तिची माफी मागून तिला सन्मानपूर्वक घेऊन यावं, असा माझा तुम्हाला सल्ला आहे.”

    हेही वाचा – तणाव कमी करणारा त्रिवेणी संगम

    तो काही न बोलता उठून निघून गेला. त्याच्या आईने मात्र माझे आभार मानले आणि मला नमस्कार करून निघून गेली.

    या प्रसंगाला बराच काळ लोटला. रोजच्या कामाच्या रहाटगाडग्यात मी हा प्रसंग साफ विसरुन गेलो होतो.

    एके दिवशी एका लग्नसमारंभात मला कुणीतरी हाक मारली. मी वळून पाहिले तर, तो तोच होता. त्याच्यासोबत एक तरुणी आणि तिच्या कडेवर बाळ होतं.

    तो मला म्हणाला, “हे जग म्हणजे मयासुराची मयसभा आहे, हे मला आता निश्चितपणे कळलं आहे. त्यामुळे मी कोणत्याही घटनेवरून कसलाही निष्कर्ष काढण्याआधी सर्व बाबींचा विचार करायला शिकलो आहे. म्हणूनच आज मी खूप सुखात आहे.”

    त्याचं बोलणं ऐकून मला खूप आनंद झाला. सत्य जाणून घेण्याचं महत्त्व त्याला पटलं होतं. मग त्यानंतर त्याच्याशी थोडावेळ बोलून मी समाधानाने तिथून निघालो.

    Avatar photo
    जितेंद्र अभ्यंकर

    नाव - जितेंद्र अभ्यंकर गाव - सोलापूर. व्यवसाय - Astrologer मोबाईल नंबर - 8605396156 व्हाॅटसअप नंबर - 8605396156 शिक्षण - इंजिनियर. वैशिष्ट्ये - संपूर्ण स्वतंत्र विचारसरणी , समस्येकडं बघण्याचा समतोल दृष्टिकोन. छंद - समाजमाध्यमांवर व्यक्त होणे व लेखन करणे.

    Related Posts

    Bookshelf : निशाणी डावा अंगठा… आपली फक्त हतबलता!

    May 19, 2026 ललित

    हा खेळ कागदांचा…

    May 19, 2026 ललित

    ऊन म्हणतयं ‘मी’ अन् पुणेकरांचा ‘श्रेयस्कर’ उतारा!

    May 18, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    Bookshelf : निशाणी डावा अंगठा… आपली फक्त हतबलता!

    By डॉ. अस्मिता हवालदारMay 19, 2026

    लेखक रमेश इंगळे उत्रादकर यांची ‘निशाणी डावा अंगठा’ ही कादंबरी 2005 साली प्रसिद्ध झाली आणि…

    हा खेळ कागदांचा…

    May 19, 2026

    ऊन म्हणतयं ‘मी’ अन् पुणेकरांचा ‘श्रेयस्कर’ उतारा!

    May 18, 2026

    दिनचर्या… तिची अन् त्याची!

    May 18, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : ना अर्जुना मी काळु आणि ग्रासिजे तो माझा खेळु

    May 20, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 20 मे 2026

    May 20, 2026

    Bookshelf : निशाणी डावा अंगठा… आपली फक्त हतबलता!

    May 19, 2026

    हा खेळ कागदांचा…

    May 19, 2026

    Recipe : खमंग सुरळीच्या वड्या अन् स्वादिष्ट गव्हाचे वडे

    May 19, 2026

    मयासुराची मयसभा

    May 19, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 303
    • अवांतर 186
    • आरोग्य 111
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 425
    • फिल्मी 48
    • फूड काॅर्नर 211
    • मैत्रीण 19
    • ललित 637
    • शैक्षणिक 80
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Dnyaneshwari : ना अर्जुना मी काळु आणि ग्रासिजे तो माझा खेळु

    May 20, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 20 मे 2026

    May 20, 2026

    Bookshelf : निशाणी डावा अंगठा… आपली फक्त हतबलता!

    May 19, 2026
    Most Popular

    Dnyaneshwari : ना अर्जुना मी काळु आणि ग्रासिजे तो माझा खेळु

    May 20, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.