Author: जितेंद्र अभ्यंकर

Avatar photo

नाव - जितेंद्र अभ्यंकर गाव - सोलापूर. व्यवसाय - Astrologer मोबाईल नंबर - 8605396156 व्हाॅटसअप नंबर - 8605396156 शिक्षण - इंजिनियर. वैशिष्ट्ये - संपूर्ण स्वतंत्र विचारसरणी , समस्येकडं बघण्याचा समतोल दृष्टिकोन. छंद - समाजमाध्यमांवर व्यक्त होणे व लेखन करणे.

त्याचं नुकतंच लग्न झालं आणि कंपनीने त्याची प्रमोशनवर बदली केली. पत्नीचा पायगुण म्हणून सगळे सुखावले. ते दोघंच नव्या ठिकाणी गेले. ती कंपनीची प्रचंड अशी टाऊनशीप होती. हजारोंच्या संख्येने स्टाफ होता. तिथं त्यांना ओळखणारं कुणीच नव्हतं. म्हणून तिला फार कंटाळा येत असे. मग तिच्यासाठी त्याने कंपनीच्या सुसज्ज अशा रिक्रीएशन क्लबची मेंबरशिप घेतली. आता ती रोज क्लबमध्ये जायला लागली. तिच्यात बरेच कलागुण असल्याने ती अल्पावधीतच पॉप्युलर झाली. तो सुरुवातीला तिच्याबरोबर क्लबमध्ये जात असे. पण त्याला तिथलं वातावरण फारसं भावलं नाही. तिथला उच्चभ्रू वर्गातला मोकळेपणा त्याला पटला नाही. आपण या क्लबचे मेंबर व्हायलाच नको होतं असं त्याला वाटलं. पण ती मात्र चांगलीच रमली…

Read More

कधीही ड्रिंक्स न घेणारा तो मित्राच्या प्रमोशन पार्टीसाठी महफिल ऑर्केस्ट्रा बारच्या पायऱ्या चढत होता. आत गेल्यावर समोरच ती होती, महफिल बारची स्टार सिंगर… अस्सल बेंगॉल ब्युटी! काही वेळ तिचं गाणं ऐकून ते निघाले. महफिल बारच्या काऊंटरवर पैसे देऊन गाण्याची फर्माईश करता यायची. तो तशी फर्माईश कधीच करायचा नाही. त्याची स्वतःची अशी एक स्टाईल होती. सुसंस्कृत व्यक्तिमत्व, शांत चेहरा आणि हातात डायरी. ड्रिंक्स न घेणारा, फक्त गाणी ऐकण्यासाठी महफिल बारला येणारा तो खराखुरा रसिक होता. त्याचे मित्र प्यायचे, पण तो मात्र जीवाचे कान करुन गाणी ऐकायचा. महफिल बारमधील पैसे उडवणाऱ्या गिधाडांच्या कळपात हा राजहंस तिला भावला. एक दिवस तिनेच त्याला चिठ्ठी…

Read More

अपटुडेट पोषाख केलेला आणि एका नामवंत बहुराष्ट्रीय कंपनीत उच्च पदावर कार्यरत असलेला तो उमदा तरुण उत्सुकतेने माझ्याकडे पहात होता. मी त्याची जन्मपत्रिका काळजीपूर्वक तपासत होतो. काही वेळानंतर मी त्याला म्हणालो, ” तुझ्या जन्मलग्नकुंडलीतील कर्मस्थानी असलेली ग्रहस्थिती बघता असं दिसत आहे की, तुला कामाच्या ठिकाणी तीव्र अशा मानसिक चढउतारांना तोंड द्यावं लागत आहे. तसेच, अशुभ स्थितीत असलेल्या राहूची पूर्ण दृष्टी चंद्रावर असल्याने कोणत्याही लहानसहान समस्येवरून तुझी मनःस्थिती बिघडत असण्याची शक्यता आहे.” माझे बोलणे ऐकून तो अस्वस्थ झाला आणि अभावितपणे त्याचा हात वरच्या खिशातील सिगारेटच्या पाकीटाकडे गेला. पण तत्क्षणी मी समोर आहे, हे लक्षात येऊन तो भानावर आला. स्वतः ला सावरुन तो…

Read More

नेहमीप्रमाणे ती महानगरातील आपल्या कंपनीतून सुट्टी घेऊन आईवडिलांना भेटायला आणि काही दिवस राहायला आली होती. पण यावेळचं तिचं येणं गुणात्मकदृष्ट्या वेगळं होतं. यावेळी येताना तिने एक निर्णय घेतला होता… पण तिचा प्रॉब्लेम असा झाला होता की, त्या निर्णयाची अंमलबजावणी नेमकी कशी करायची, या पेचात ती अडकली होती. तिच्या आईच्या लक्षात आलं होतं की, आल्यापासूनच तिच्या लाडक्या लेकीचं काहीतरी बिनसलेलं आहे आणि ती प्रचंड अस्वस्थ आहे! आईने तिला खोदून खोदून विचारलं, पण तिने काहीच थांगपत्ता लागू दिला नाही. सरतेशेवटी तिच्या एका जीवश्चकंठश्च मैत्रिणीने तिला माझं नाव सुचवलं आणि ती एका संध्याकाळी माझ्याकडे आली. स्थानापन्न झाल्यावर तिने मला तिची जन्मपत्रिका दाखवली. बराच…

Read More

त्याकाळी मी जन्मपत्रिकेतील नक्षत्रांच्या स्थितीवरून भविष्याचा अंदाज बांधणाऱ्या ‘नक्षत्र फलज्योतिष’ पद्धतीचा अभ्यास करत होतो. कंपनीत दिवसभर काम करून थकूनभागून बाहेर पडलो की, दूर क्षितिजावर मनोहारी रंगांचा पंखा उघडून संध्याकाळ माझी वाटच पहात असे. मग आपोआपच माझी पावले सरोश कॅन्टीनकडे वळत असत. तिथे प्रशस्त आवारात मांडलेल्या खुर्चीवर रेलून बसल्यावर माझी नजर अथांग, अमर्याद पसरलेल्या आकाशाचा वेध घेत असे. चांदण्यांनी खचाखच भरलेल्या आकाशात आपल्या अंगभूत तेजाने चमकणाऱ्या नक्षत्रांकडे बघताना माझं देहभान हरपून जात असे. बऱ्याच वेळाने मानेला रग लागल्यावरच मी भानावर येत असे… माझा जन्मपत्रिकेचा सखोल अभ्यास असल्याची बातमी हळूहळू कंपनीत सर्वत्र पसरली. मग एकेक करून माझे सहकारी, स्टाफ, कामगारवर्ग मला जन्मपत्रिका…

Read More

सुमारे तीस वर्षांपूर्वी मी गणिताची ट्युशन घेणे आणि जन्मपत्रिका बघणे, असे दोन्ही व्यवसाय करत होतो. एक दिवस मला ट्युशनसाठी एक फोन आला. त्यांनी दिलेल्या पत्त्यावर मी गेलो. त्या रस्त्याला मी फारसा कधी जात नसे. ती एक निसर्गरम्य अशी गल्ली होती. मुख्य रस्त्यावरून मी डाव्या हाताला वळण घेऊन त्या गल्लीत शिरलो आणि तो दिसला… फुललेला पारिजात! त्याचे आणि माझे जन्मांतरीचे नाते असावे… प्राजक्ताचा मांडव पाहिला की, माझ्या पायांना आपोआप ब्रेक लागतो. त्याला डोळे भरून पाहिल्याशिवाय पाऊल उचलले जात नाही. निसर्गाने आपले सर्व कौशल्य पणाला लावून प्राजक्ताचे फूल बनवले आहे. ते इतके नाजूक आहे की त्याला स्पर्श करायचीही भीती वाटते. गुलाब हा फुलांचा…

Read More

ती श्रीमंताघरची लेक तिच्या आईच्या सोबतीने हुरडा पार्टीसाठी सोलापूरमध्ये त्यांच्या अत्यंत जवळच्या नातेवाईकांकडे उतरली होती. सोलापूर परिसरातील फार्मवर मस्त हुरडा पार्टी पार पडली. त्यानंतर सर्वांनी मिळून देवदर्शन केले. असा साग्रसंगीत पाहुणचार करणाऱ्या त्या नातेवाईकांना एक बाब सतत खटकत होती… शेवटी एक दिवस न राहवून त्यांनी मुलीच्या आईला तो खटकणारा प्रश्न विचारलाच, “तुमची कन्या कशातच इंटरेस्ट दाखवत नाहीय. आमच्याकडून पाहुणचारात काही चूक होत असेल तर प्लीज तसं सांगा.” त्यावर मुलीची आई डोळ्यांत पाणी आणून म्हणाली, “तुमचा पाहुणचार तर अगदी दृष्ट लागेल असा आहे. पण माझ्या मुलीचं नशीबच खोटं आहे. त्या बिचारीला पहिल्या प्रेमातच अपयश आलं आहे. त्यामुळे ती अशी उदास असते.”…

Read More

ती मेडिकलला शिकत होती. तिचा लहान भाऊ शाळेत जात होता. त्यांचं चौकोनी कुटुंब अशा महत्त्वाच्या वळणावर असतानाच काही कारणाने अकस्मात तिच्या वडिलांची नोकरी गेली. एके दिवशी ती नेहमीप्रमाणे कॉलेजला जाऊन घरी परत आली. घरी आल्यावर ती दारात सॅंडल काढत असतानाच तिला दिसलं की, तिचे लाडके बाबा शून्य नजरेने आढ्याकडे बघत पलंगावर पडले होते आणि आई कोपऱ्यात बसून पदराने डोळे पुसत होती… आईने तिला गहिवरल्या आवाजात सांगितले की, ‘बाबांची नोकरी गेली.’ पण ती खचली नाही. ती खंबीरपणे बाबांच्या शेजारी बसली. त्यांचा हात हातात घेऊन म्हणाली, “बाबा, आजपर्यंत तुम्ही मला जीवापाड सांभाळले. आता माझी पाळी आली आहे, मी दिवसरात्र एक करून शिक्षण…

Read More