Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    रामनवमी विशेष… कौसल्येचा राम!

    March 26, 2026

    Dnyaneshwari : पैं गा भक्तासि माझें कोड….

    March 26, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 26 मार्च 2026

    March 26, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Thursday, March 26
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » ‘वामन’ पोरका झाला…
    अवांतर

    ‘वामन’ पोरका झाला…

    Team AvaantarBy Team AvaantarMay 25, 2025No Comments4 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेखन, मराठीआवृत्ती, मराठीसाहित्य, मराठीलेखक, मराठीमनोरंजन, मराठीवेबसाइट, मराठीआर्टिकल, मराठीस्टोरी, विज्ञानकथा, नारळीकर, जयंत_नारळीकर, खगोलशास्त्रज्ञ, वामन
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    आराधना जोशी

    इलेक्ट्रॉनिक मीडियात काम करत असताना अनेक दिग्गज मंडळींना भेटण्याची, त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली होती. त्यातलंच एक नाव म्हणजे खगोलभौतिकशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर. 20 मे 2025 रोजी या शास्त्रज्ञ, लेखकाच्या निधनाची बातमी ऐकली आणि त्यांच्याशी साधलेल्या संवादाची घटना डोळ्यांसमोर उभी राहिली.

    1999 साली अल्फा मराठी (आताचे झी मराठी) हे मराठीतले पहिले खासगी चॅनल सुरू झाले होते. निवडणुकांची धामधूम नुकतीच आटोपली होती आणि त्यामुळे बातम्यांसाठी आता इतर विषयांवर लक्ष द्यायला सुरुवात झाली. त्यातच मुंबई विद्यापीठाच्या कलिना येथील संकुलात डॉ. जयंत नारळीकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले असल्याची बातमी आली. कार्यक्रम खरंतर विज्ञानाशी निगडीत होता. त्यामुळे तो कव्हर करायला आपल्याला संधी मिळेल, याची स्वप्नातही कल्पना केली नव्हती. मात्र, आमचे टीम लीडर नितीन वैद्य सरांनी मला तो कार्यक्रम कव्हर करण्याची आणि जमलंच तर डॉ. नारळीकर सरांची छोटी मुलाखत घेऊन येण्याची असाइन्मेंट दिली.

    त्या संपूर्ण वर्षामध्ये धूमकेतूंचे नमुने गोळा करण्यासाठी स्टारडस्ट अंतराळयानाचे प्रक्षेपण, सौर मंडळाबाहेरील ग्रहांचा शोध आणि हबल स्पेस टेलिस्कोपला सेवा देण्यासाठी हबल सर्व्हिसिंग मिशन 3ए या घटनांचा समावेश होता. त्यावरच डॉ. नारळीकरांना प्रश्न विचारायचे असा विचार मी नितीन सरांसमोर मांडला आणि त्यांनीही तत्काळ त्याला होकार दिला.

    मुळातच पत्रकार हा अनेकदा “Jack of all trades, master of none” या प्रकारात मोडणारा असतो. त्यामुळे हा प्रसंग आपण निभावून नेऊ, हा विश्वास वाटत होता. नारळीकर सरांना विद्यापीठात भेटले तेव्हा कार्यक्रम सुरू व्हायला जवळपास पाऊण तास बाकी होता. मात्र, सर पुण्याहून या लेक्चरसाठी वेळेआधीच पोहोचले होते. तोपर्यंत सरांच्या वक्तशीरपणाचे काही किस्से कानावर पडले होते. तोच वक्तशीरपणा त्या दिवशीही दिसला. खरंतर, सरांचा तिथला वावर हा इतका सहज आणि समोरच्याला आपलंसं करून घेणारा होता.

    हलकं स्मितहास्य, चेहऱ्यावर झळकणारी हुशारी आणि विद्वत्तेचं तेज, पण तरीही अत्यंत साधी राहणी हे गुण नारळीकर यांना बघताक्षणी जाणवले आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या या शास्त्रज्ञाची आपण काय मुलाखत घेणार? असा विचार मनात आला. मात्र तरीही, धीर एकवटून मुलाखतीबद्दल त्यांना विचारलं आणि कोणतेही आढेवेढे न घेता ते लगेच मुलाखतीसाठी तयार झाले. ऑफिसमधून निघण्याआधी जे प्रश्न विचारण्याची तयारी केली, ते सगळे विचारून झाले. नारळीकर यांनीही साध्या, सोप्या भाषेत त्यांची उत्तरे दिली. खरं सांगायचं तर, या मुलाखतीमध्ये सरांनी जी उत्तरं दिली त्यामुळे खगोलशास्त्र वाटतं तितकं अवघड नाही, असा विचार मनात पटकन चमकून गेला. मात्र, विषय सोपा करून विशद करण्याची नारळीकर यांची ती हातोटी होती, हेही लक्षात आलं.

    चॅनलसाठी लहानशी मुलाखत घेऊन झाल्यावर नारळीकर सरांनी चॅनलबद्दल प्रश्न विचारायला सुरुवात केली. मुळात त्यावेळी दूरदर्शनच्या मराठी चॅनलव्यतिरिक्त अल्फा मराठीमुळे नारळीकर यांच्या मनात अनेक प्रश्न होते. मला सगळ्याच प्रश्नांची उत्तरं देता आली नाहीत; पण तरी माझ्या उत्तरांनी काही प्रमाणात तरी त्यांच्या शंकांचं निरसन झालं असावं. नंतर गाडी अर्थातच माझ्या वैयक्तिक चौकशीकडे वळली आणि साहित्याची अभ्यासक म्हणून असलेल्या पार्श्वभूमीवर अर्थातच नारळीकर यांच्याशी त्यांच्या मराठीतल्या विज्ञान कथासंग्रहांबद्दल नकळत गप्पा सुरू झाल्या.

    वैज्ञानिक कथांचा हा जॉनर नारळीकर सरांनी मराठीत रुजवला, असं ठामपणे म्हणता येईल. तोपर्यंत मराठीत ज्या विज्ञान कथा आल्या होत्या, त्या परकीय भाषेतल्या कथांचा स्वैर अनुवाद अशा प्रकारच्या होत्या. म्हणूनच, नारळीकर सरांच्या कथा वेगळ्या ठरल्या, वाचकांना आवडल्या. या कथांमध्येही नारळीकर आवर्जून शक्य तिथे मराठीच शब्द वापरायचे. त्याबद्दल त्यांना विचारले असता मंद हसत ते म्हणाले, “अगं, मराठीत शब्द असताना दुसऱ्या भाषेतले शब्द का वापरायचे, हे मला आजपर्यंत कळलं नाही.”

    त्यानंतर नारळीकर यांच्याशी पुन्हा एकदा भेट झाली, ती जवळपास 25 वर्षांनी! ICSE बोर्डाच्या इयत्ता दहावीला असलेल्या मराठी विषयातील ‘उजव्या सोंडेचा गणपती’ या कथेद्वारे. या बोर्डाचे मराठी विषयाचे क्लासेस मी घेत असल्याने दरवर्षी जयंत नारळीकर यांची ही कथा शिकवण्याची संधी मला मिळायची. त्यातही एक मेख होती, कथा मोठी आणि विज्ञानाशी संबंधित असल्याने बोर्डाने त्यातला वैज्ञानिक भाग – जो कथेचा गाभा होता – पूर्णतः गाळावा अशा सूचना शाळांना दिल्या होत्या. त्यामुळे शाळेतही अनेकदा ही कथा optionला टाका असाच प्रकार असायचा. पण मी मात्र क्लासमध्ये ही संपूर्ण कथा शिकवायचे. त्यातल्या गाळायला सांगितलेल्या भागासकट! तो भाग अधिकाधिक सोप्या भाषेत मुलांना कसा शिकवता येईल, याचा प्रत्येक वर्षी मी विचार करायचे. नारळीकर सर जर या कथेविषयी बोलले तर, त्यातील मोबियस पट्टीची (उलट्याचे सुलटे किंवा सुलट्याचे उलटे करणारी पट्टी निश्चितपणे एक गणिती सिद्धान्त मांडते) कल्पना ते कसे समजावून सांगतील, याचा कायम मनात विचार असायचा. त्यामुळे क्लासेसमध्ये जेव्हा मी ही कथा शिकवायचे, तेव्हा विद्यार्थ्यांना या मोबियस पट्टीबद्दल वाटणारं कुतूहल आणि त्या अनुषंगाने त्यांना पडणारे प्रश्न, यांचं थोडंफार निरसन मी करू शकले. ही कथा अतिशय आवडली असं विद्यार्थी नंतर आवर्जून सांगायचे आणि परीक्षेसाठी हा धडा नक्की तयार करणार, ऑप्शनला टाकणार नाही, असंही जेव्हा म्हणायचे तेव्हा नारळीकर सरांच्या कथांची जादू समजून यायची.

    विज्ञान कथांसह कादंबऱ्याही त्यांनी लिहिल्या. त्यांची ‘वामन परत न आला’ ही कादंबरी वाचकांना विशेष भावली. विज्ञान कथा ते कादंबरी अशा सिद्धहस्त व्यासंगी डॉ. जयंत नारळीकर यांची 2021मध्ये नाशिक येथे झालेल्या 94व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून एकमताने निवड झाली. त्यांच्या रुपाने पहिल्यांदाच विज्ञान लेखकाला साहित्य संमेलानाच्या अध्यक्षपदाचा मान मिळाला होता. आता  त्यांच्या निधनाने मराठी विज्ञान साहित्यामधील ‘वामन’ पोरका झाला, असे म्हणावे लागेल.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    रामनवमी विशेष… कौसल्येचा राम!

    March 26, 2026 अवांतर

    संस्कार… माणुसकी आणि सहिष्णुतेचे!

    March 24, 2026 अवांतर

    आनंदी जगायला काय लागतं?

    March 23, 2026 अवांतर
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    अवांतर

    रामनवमी विशेष… कौसल्येचा राम!

    By माधवी जोशी माहुलकरMarch 26, 2026

    रामनवमी विशेष कबीराचे विणतो शेले, कौसल्येचा राम भाबड्या या भक्तांसाठी देव करी काम कौसल्येचा राम…

    संस्कार… माणुसकी आणि सहिष्णुतेचे!

    March 24, 2026

    आनंदी जगायला काय लागतं?

    March 23, 2026

    Harish Rana : अगतिक पितृत्व, असहाय्य मातृत्व…

    March 20, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    रामनवमी विशेष… कौसल्येचा राम!

    March 26, 2026

    Dnyaneshwari : पैं गा भक्तासि माझें कोड….

    March 26, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 26 मार्च 2026

    March 26, 2026

    नीरजचा निर्णय ऐकून राजेश अन् जयूला धक्काच बसला!

    March 26, 2026

    …अन् यमुनाकाकीच्या लक्षात आले, ‘शेवटी आहे कोण?’

    March 25, 2026

    आयुष्यात संवादाचा सेतू खूपच महत्त्वाचा, अन्यथा…

    March 25, 2026

    POPULAR CATEGORY

    • अध्यात्म 248
    • अवांतर 175
    • आरोग्य 91
    • पंचांग आणि भविष्य 362
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 185
    • मैत्रीण 17
    • ललित 513
    • शैक्षणिक 73

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Advertise

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn