मागील लेखात आपण हर्निया विकारासाठी योगाभ्यास तसेच आहार मार्गदर्शन घेतले. आता या लेखात आपण व्हेरिकोज व्हेन्स विकार या विषयावर मार्गदर्शन घेऊयात.
व्हेरिकोज व्हेन्सविषयी थोडक्यात
सतत बराच वेळ एकाच ठिकाणी उभे राहिल्याने पायांना होणाऱ्या रक्तपुरवठ्यावर विपरीत परिणाम होतो. कालांतराने पायांच्या शिरा फुगणे आणि निळ्या होणे, असे त्रास उद्भवतात. अशा वेळेस पायातील अशुद्ध रक्त हृदयाकडे आणणे गरजेचे असते. यासाठी योगाभ्यास अतिशय उपयुक्त ठरतो. आता आपण व्हेरिकोज व्हेन्स विकारासाठी उपयुक्त योगाभ्यास मार्गदर्शन घेऊयात.
योगासने अभ्यास
सूक्ष्म व्यायाम
- पदसंचालन
- कदमताल
शयनस्थितीतील आसने
- उत्तानपादासन
- पवनमुक्तासन
- मर्कटासन
- सर्वांगासन
- मत्स्यासन
- अनंतासन
- शवासन
विपरीत शयनस्थितीतील आसने
- शलभासन
- धनुरासन
- मकरासन
बैठक स्थितीतील आसने
- पद्मासन
- वज्रासन
- उग्रासन
- भद्रासन
- शवासन
दंड स्थितीतील आसने
- वीरासन
- त्रिकोणासन
- ताडासन
- शवासन
योगाभ्यास करताना शवासन आणि मकरासन ही विश्रांतीदायक आसने अवश्य घ्यावीत.
हेही वाचा – आम्लपित्तासाठी योगाभ्यास मार्गदर्शन
प्राणायाम अभ्यास
- कपालभाती
- अनुलोम-विलोम प्राणायाम
हस्त मुद्रा
- प्राण मुद्रा
- जल / वरूण मुद्रा
- वायू मुद्रा
आता आपण व्हेरिकोज व्हेन्स विकारासाठी आहार तसेच घरगुती उपाय याबाबत उपयुक्त मार्गदर्शन घेऊयात.
आहार मार्गदर्शन – काय खावे?
- गाईचे दूध, तूप, लोणी आणि ताक
- डाळिंब
- सफरचंद
घरगुती उपाय
- पाण्यात तुळशीचा अर्क टाकून पिणे.
- पायांना तीळ तेलाने अथवा खोबरेल तेलाने मसाज करणे.
मसाज पायाच्या खालून वरच्या दिशेने करावा, म्हणजे पायातील रक्त हृदयाकडे आणणे सुकर होईल.
अशा रितीने आपण व्हेरिकोज व्हेन्स विकारासाठी योगाभ्यासातील उपयुक्त योगासने, प्राणायाम आणि हस्त मुद्रा तसेच आहार आणि घरगुती उपाय याबद्दल थोडक्यात मार्गदर्शन घेतले. माझ्या ‘निरामय आरोग्यासाठी योगाभ्यास’ या पुस्तकात वरील सर्व अभ्यासाची कृती आणि आरोग्य लाभ याबाबत सविस्तररीत्या मार्गदर्शन केले आहे. शिवाय, वरील सर्व अभ्यासाची प्रत्यक्ष कृती माझ्या युट्यूब चॅनेलवरील Yoga for Varicose Veins या व्हिडीओत पाहता येतील आणि यामुळे योगाभ्यास मार्गदर्शन नक्कीच उपयुक्त ठरेल. या व्हिडीओची लिंक लेखाअंती दिली आहे. तसेच, माझ्या ‘निरामय आरोग्यासाठी आहार-विहार’ या पुस्तकात सदर विषयावर सविस्तररीत्या मार्गदर्शन केलेले आहे.
हेही वाचा – आम्लपित्तासाठी आहार मार्गदर्शन
व्हेरिकोज व्हेन्स विकारासाठी नियमित योगाभ्यास नक्कीच उपयुक्त आहे. तसेच नियमित सात्त्विक आहार सेवन देखील अत्यंत गरजेचे आहे.
यासंदर्भात इथे आवर्जून नमूद करावेसे वाटते की, निरामय आरोग्य संकल्पनेतील माझ्या ‘निरामय आरोग्यासाठी योगाभ्यास’, ‘निरामय आरोग्यासाठी आहार-विहार’ आणि ‘निरामय मानसिक आरोग्य’ या पुस्तकांत संबंधित विषयांवर उपयुक्त सर्वसमावेशक सविस्तर मार्गदर्शनपर वस्तुपाठ सादर केले असून त्यांचा एकत्रित अभ्यास म्हणजे निरामय आरोग्याचा परिपाक होय.
नम्र निवेदन
गेल्या अकरा वर्षांपासून आम्ही उभयतां ‘निरामय आरोग्य संकल्पना’ यशस्वीरीत्या राबवत आहोत. असंख्य पुरुष आणि महिला साधकांनी संकल्पनेचा लाभ घेतला आहे. संकल्पना जाणून घेऊन लाभार्थी होण्यासाठी मोबाइल 9850856774 यावर 🙏/👌/👍 / 👏 / तत्सम चिन्हाने व्हॉट्सॲप मेसेज करून प्रतिसाद द्यावा.


