Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    एका शाळेचा अंत

    June 14, 2026

    मंजिरी

    June 13, 2026

    आम्लपित्तासाठी योगाभ्यास मार्गदर्शन

    June 13, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Sunday, June 14
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » मंजिरी
    ललित

    मंजिरी

    मधुर सुनील कुलकर्णीBy मधुर सुनील कुलकर्णीJune 13, 2026No Comments8 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठी आर्टिकल, मराठीलेख, मराठी साहित्य, मराठी लेख, मी मराठी, अभिजात मराठी, तुळशीची मंजिरी, सासू सुनेचा स्नेहबंध, समंजस सून, समंजस सासू, सरिता अनघा मैत्रिणी, सासू सून मैत्रिणी, सरिताकडून अनघाची पाठराखण, तुळशीच्या रुपात सरिताचे अस्तित्व, सरिताची अनघावर प्रेमाची पखरण, सासू सुनेचे अनोखे नाते
    फोटो सौजन्य - चॅटजीपीटी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    सरिताच्या फोटोकडे अनघा टक लावून बघत होती. कुणाचा तरी खांद्यावर हात पडला म्हणून तिने वळून बघितलं. सुमामावशी होत्या!

    “अनघा, आम्ही आता निघतो. थोडं लवकर निघालो की, मग स्टेशनवर वेळेत पोहोचू. हल्ली पुण्यात ट्रॅफिक किती असतो गं…”

    “मावशी, तुम्ही पंधरा दिवस राहिलात, मला खूप बरं वाटलं. आता आई नसल्या तरी अधूनमधून येत जा,” अनघाला दाटून आलं.

    “मी येणारच गं बाळा! पण तू तुझी काळजी घे. तू अशी सारखी रडलीस तर, सरिताच्या आत्म्याला त्रास होईल.”

    मावशी नागपूला परतल्या आणि अनघाला घर खायला उठलं. तिची चार दिवस असलेली रजा तिने अजून वाढवून घेतली. दोन दिवस जळगावच्या घरात जाऊन प्रत्येक वस्तूला सरिताचा झालेला स्पर्श तिला मनात साठवून घ्यायचा होता.

    “मनीष, बाबांना सोडायला आपण जळगावला जातोच आहे तर, मी दोन दिवस तिथे राहायचा विचार करते आहे.”

    “बाबांना इथेच रहा म्हणून मी आग्रह करतोय, पण त्यांना जळगावला परत जायचं आहे…” मनीषच्या मनातली खंत बाहेर पडली.

    “त्यांना थोडा वेळ देऊ. इतकी वर्षं आईंबरोबर त्यांनी त्या घरात व्यतीत केले आहेत. आठवणी इतक्या सहजासहजी पुसल्या जातात का? काही दिवसांनी त्यांना पुण्यात घेऊन येऊ. कमलताईंना मी आता दिवसभर बाबांची काळजी घेण्यासाठी ठेवून घेणार आहे आणि बाबांची तब्येत तशी चांगली आहे.”

    वीस वर्षांपूर्वी अनघाने या घरात सून म्हणून प्रवेश केला होता. डोळ्यांत पाणी आलं. एका अश्रूची एक आठवण येताना, अनेक आठवणींचा महापूर आला… पण आता सरिता तिच्या पाठीवरून हात फिरवायला नव्हती.

    0000

    अंगावर जड शालू, दागिन्यांचे वजन, माहेरची आठवण हे सगळं घेऊन अनघा मागच्या अंगणात तुळशीला नमस्कार करायला आली. तिने हात जोडले आणि बंद डोळ्यांतून धारा वाहायला लागल्या.

    “अनघा…”

    अनघाने वळून बघितलं. सरिता तिच्या पाठीवरून हात फिरवत होती. ती डोळे पुसायला लागली.

    “अगं, मनसोक्त रडून घे. वाहू दे ते पाणी! त्यातूनच तर तुझ्या माहेरच्या आठवणी कमी होतील. रडावंस वाटलं तर, खुशाल रडावं माणसाने. मोकळं होतो आपण! आता तू मला आईसारखं समज, असं काही मी बोलणार नाही… कारण आईची जागा कोणीच घेऊ शकत नाही. पण आपण दोघी मैत्रिणी तर, नक्कीच होऊ शकतो. एकमेकींच्या सुखदुःखाच्या वाटेकरी!”

    हेही वाचा – पुरस्कार… एक नवा हुरूप देणारा!

    “आई!” अनघाने सरिताचा हात हातात घेऊन प्रेमाने दाबला.

    त्या दिवसानंतर अनघाचं आणि सरिताचं चांगलंच मेतकूट जमलं. एक अनोखं नातं निर्माण झालं. जळगावचं वडिलोपार्जित मोठं घर! घरात मनीष, सासू-सासरे आणि सरिताची अविवाहित मोठी नणंद असे राहत होते. लग्नानंतर दोनच दिवसांत अनघाला आत्यांच्या स्वभावाची कल्पना आली.

    “आई, मी ह्या घरात अगदीच नवखी आहे, पण आत्या तुम्हाला सतत घालून पाडून बोलतात, ते मला अजिबात आवडत नाही. तुमच्यापेक्षा मोठ्या आहेत म्हणून काहीही बोलावं?”

    “अनघा, मी नवीन लग्न होऊन आले तेव्हा तुझ्याचसारखी चिडले होते. माझ्या चिडण्याने हे वन्सना बोलले. घरात तंटा झाला. सासूबाईंनी माझ्याशी अबोला धरला. एक दिवस खोलीचे दार बंद करून खूप रडले. सगळं मन मोकळं करून टाकलं आणि ठरवलं की, आयुष्यात आनंद घ्यायचा असेल तर, डोक्यावर बर्फ ठेवूनच रहायचं. खूप त्रास झाला सुरवातीला! पण एकदा ठरवलं ते पार पाडायचं होतं. कधीतरी मन अस्वस्थ झालं की, तुळशी वृंदावनाजवळ येऊन शांतपणे उभं राहायची. आता तुम्ही मुली पैशाने, विचाराने स्वतंत्र झाला आहात. आमच्याइतक्या मनाने हळव्या नसता, पण शेवटी स्त्रीचं मन हळूवारच असतं गं! कुठेतरी टोचणी लागतेच. तो क्षण बाजूला सारायला कष्ट पडतात, पण त्यातून बाहेर पडावंच लागतं कारण संसार नेटका करायचा असतो.”

    “ते सगळं ठीक आहे आई! पण स्त्रीला तिची मतं, इच्छा, आवडीनिवडी नसतात का? सतत दुसऱ्यांचाच विचार करून जगायचं का? परदेशातल्या स्त्रिया स्वतःसाठी जगतात, त्यांना हवं तेच करतात…” अनघा त्वेषाने बोलली.

    “अगदी मान्य गं! स्त्रीला इच्छा, आवडीनिवडी असतातच ना. त्या सुद्धा काही प्रमाणात जपायच्याच गं! आणि परदेशात किती लग्न टिकतात?”

    अनघाने वाद वाढवला नाही, कारण तिच्या मनात सासूबद्दल खूप आदर होता. आठ दिवसांनी अनघा-मनीष पुण्यात परतले. दोघांचेही घर, नोकरी रुटीन सुरू झाले.

    अनघा आणि मनीषचं लग्न होऊन वर्ष होत आलं होतं. अधून-मधून सरिता आणि अरुण पुण्यात मुक्काम करून येत असत. पण एका मुक्कामी दोघांमध्ये काहीतरी बिनसल्याचं  सरिताला जाणवलं. अनघाचं तिच्याशी बोलणं कमी झालं. घरात विचित्र अबोला पसरला होता. मनीष आणि अनघाचं वागणं यंत्रवत वाटत होतं. नवरा-बायकोत आपण पडणं योग्य नाही. कितीही वाद, भांडण झाली तरी, रात्र त्यांचीच असते, हा विचार करून सरिता काही बोलली नाही. पण अचानक एक दिवस ऑफिसमध्ये न जाता अनघाने बॅग भरली आणि ती सरिताला म्हणाली, “आई, मी जरा आईकडे जातेय. मला चेंज हवा आहे.”

    “अगदी जरूर जा… आणि यायची घाई नको करू. तुझं मन भरेपर्यंत माहेरपण उपभोगून ये. मी आणि बाबा इथे आहोत तोपर्यंत मनीषच्या खाण्याची काळजी करू नकोस… पण तू जाणार हे मनीषला माहिती आहे नं?”

    “नाही, माझं आत्ता ठरलं आहे. तुम्ही त्याला सांगा,” अनघा रागात होती हे सरिताला कळलं.

    “तू निर्धास्तपणे जा. त्याला मी सांगते,” सरिता तिच्या गालावर थोपटत म्हणाली.

    मनीष ऑफिसमधून आल्यावर अनघा माहेरी गेली आहे, हे त्याला कळलं आणि तो चिडला. “मला न सांगता अनघा गेली? एक फोन करू शकली असती ना?”

    “मनीष, शांत हो! तिचंही मन अस्वस्थ दिसलं…”

    “डोक्यात काहीतरी खुळ घेऊन बसायचं आणि अस्वस्थ व्हायचं…” मनीषचा राग उफाळला.

    “मनीष, विचारायचा अधिकार आहे म्हणून विचारते. तुमच्या दोघांमध्ये काय बिनसलं आहे?”

    “तिला बंगलोरला एका जॉबची ऑफर आली आहे. पगार दुप्पट आहे. तिला तो जॉब हवा आहे.”

    “अरे, मग ही तर आनंदाची बातमी आहे. अगदी अवश्य जाऊ दे.”

    “आई, बंगलोरला मी जाऊ शकणार नाही. चार पैसे कमी मिळाले तरी इथे किती सुख आहे, स्वतःचं घर आहे, तुम्ही अधूनमधून येता. तिकडे राहणं सोपं नाही.”

    सरिता काही वेळ गप्प बसली. मग मनीषला म्हणाली, “एक प्रश्न विचारू मनीष?”

    “विचार!”

    “हा जॉब तुला मिळाला असता तर? तू स्वीकारला असताच ना? मग तिने का नाही? लग्न करताना तुम्हाला मुलगी करिअर करणारी हवी असते. संसारात तिची आर्थिक साथ हवी असते, मग असे प्रसंग आल्यावर तिला साथ द्यायची सोडून हा कसला विचार तुझा?”

    “ती एकटी राहणार का तिकडे? मी नाही जाऊ शकत.”

    “राहिल की! तिने विचार करूनच निर्णय घेतला असेल ना!”

    “आई, खर्चही दुप्पट वाढेल. या घराचे हफ्ते अजून फिटायचे आहेत. तिकडे ती भाड्याच्या घरात राहणार, त्याचा खर्च! पगार जास्त मिळूनही काय उपयोग? आणि दोघांनाही एकटं राहावं लागेल, ते वेगळंच!”

    “तू फक्त खर्चाचा हिशोब मांडलास. पण या संधीमुळे, तिथल्या अनुभवामुळे कदाचित नंतर पुण्यात तिला याहून चांगला जॉब मिळू शकेल… आणि आता बाबांनी व्हीआरएस घेतली आहे. काही दिवस आम्ही दोघे बंगलोरला राहू, काही दिवस पुण्यात! तिला नाही म्हणू नकोस. जशी बायकोने नवऱ्याला साथ द्यावी ही अपेक्षा असते, तशीच नवऱ्याने देखील तिला द्यायलाच हवी! तिला अडवू नकोस. फोन कर, तिला प्रोत्साहन दे… आणि दोन दिवसांनी तिला घरी घेऊन ये.”

    आईचं म्हणणं पटलं नव्हतं, तरी पण मनीष अनघाला घरी घेऊन आला. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून सरिता भरून पावली. हुशार, गुणी सून मिळाली होती. तिच्या पाठीशी कायम राहायचं, हे सरिताने ठरवून टाकलं.

    वर्षभरातच अनघाला पुण्यात एका उत्तम जॉबची ऑफर आली. आनंदाचे क्षण वाढत होते. अनघाला जुळी मुलं झाली, तेव्हा सरिता पुण्यात दोन वर्षं येऊन राहिली. सांभाळणारी बाई असली तरी, घरात सरिता आहे, म्हणून अनघा निर्धास्तपणे कामावर जाऊ शकत होती. अडीअडचणीला एकमेकींना साथ देत, दोघींमधलं नातं दृढ होत गेलं. मनीषच्या आत्याचं निधन झालं आणि अनघाने सरिताला पुण्याला यायचा आग्रह केला.

    “आई, आता तुम्ही आणि बाबा पुण्यात या. इतके दिवस आत्यांची जबाबदारी होती म्हणून मी काही बोलले नाही.”

    “अनघा, पुण्याचं घर सुद्धा आमचंच आहे, पण इथे बरं वाटतं गं, माझं भजनी मंडळ, मैत्रिणी यात वेळ छान जातो… आणि तू हाक दिलीस की, मी आलेच म्हणून समज…” सरिता हसत म्हणाली.

    “ते तर तुम्ही कायमच धावून आलात, आई पण मला तुमची थोडी तरी सेवा करू द्या. आईची माया दिली, आपल्या दोघींमध्ये कधी धुसफूस झाल्याचं मला तरी आठवत नाही आणि झाली असेल तर ती माझ्याचकडून!”

    “मला मुलगी नाही ना, म्हणून तुझ्या रूपाने ती घरात आली.”

    “आई, दिवाळीत आम्ही येतोय, तेव्हा तुम्हाला इकडे घेऊन येणार. आता मी तुमचं काहीही ऐकणार नाही.”

    दिवाळीत अनघा-मनीष आले तर, सरिता झोपूनच होती. सतत ताप येत होता. अनघाला ते बघून भरूनच आलं. दोघांनाही आता जळगावला ठेवायचं नाही, हा निर्णय अनघा-मनीषने घेतला.

    पुण्यात सरिताच्या टेस्ट झाल्या आणि अनघाची शंका खरी ठरली. शरीर पोखरणाऱ्या आजाराला सरिता बळी पडली होती. असाध्य, सगळ्या कुटुंबाला उद्ध्वस्त करणारा आजार! एका हळव्या क्षणी अनघाचा बांध फुटला. ती सरिताजवळ बसून हमसून हमसून रडायला लागली.

    सरिताने अनघाला जवळ घेतलं, “तुला माझी सेवा करायची होती ना! बघ आता, किती करावी लागते आहे.”

    “आई, अशी सेवा मला नव्हती करायची. तुम्हाला आनंदात ठेवून तुमच्या उत्तर आयुष्यात तुम्हा दोघांना सुखात ठेवायचं होतं.” अनघाचे अश्रू थांबत नव्हते.

    “मी सुखातच आहे. तुझ्यासारखी इतकी गुणी सून मला लाभली आहे, यापेक्षा मोठं सुख ते कोणतं? आता तुला हळवं होऊन चालणार नाही. मोठी हो! तुलाच सगळ्यांना सांभाळून घायचं आहे. माझी एक इच्छा पूर्ण कर. जळगावच्या घरातली तुळस इतकी वर्षे कधीही कोमेजली नाही. मी लग्न होऊन त्या घरात आले तेव्हापासूनच ती माझ्या सुखदुःखाची साथीदार आहे. माझा आधार आहे. कृष्ण कसा हाक दिली की धावून येतो ना, तशीच ती माझ्यासाठी आहे. मला आत्मिक बळ, मानसिक समाधान देणारी! आणि तुळस म्हणजे कृष्णच गं! आत्ता सुद्धा मी कमलताईंना रोज पाणी घालायला सांगितलं आहे. ती तुळस इथे घेऊन ये. तुला कधीही माझी आठवण अनावर झाली की त्या तुळशीची मंजिरी डोळ्याला लाव. मी तुझ्याजवळ असेन.”

    हेही वाचा – एक थी बुलबुल…

    अनघा सरिताला घट्ट मिठी मारून मोकळी होत होती.

    प्रयत्नांची पराकाष्ठा संपली आणि सरिताचं अस्तित्वही संपलं. अनघाने सगळ्यांना सावरलं कारण तिने सरिताला शब्द दिला होता.

    0000

    अनघाने जळगावच्या घरात पाऊल ठेवलं. पाय धुवून ती तुळशीजवळ आली. आज तिला खूप रडायचं होतं. इतके दिवस मनीष, बाबा आणि मुलांना आधार देत, सावरत तिचं दुःख तिने बाजूला ठेवलं होतं. तिने हळूच मंजिरी तोडून डोळ्यांना लावली. एक पवित्र वलय तिच्याभोवती फिरतंय हे तिला जाणवलं. पाठीवरून कोणीतरी हात फिरवत म्हणालं, “आहे मी! तुझ्याचजवळ, तुझ्या पाठीशी!”

    अनघाने काही क्षण डोळे मिटून घेतले आणि एक दीर्घ श्वास घेतला. तिचा आधार हरवला नव्हता. तिच्या पाठीशी होता…

    Avatar photo
    मधुर सुनील कुलकर्णी

    M A (इंग्लिश) असून पुण्याला वास्तव्य आहे. पाच वर्षांपूर्वी कथालेखनास प्रारंभ केला. त्याआधी अनेक कविता केल्या आहेत. आत्तापर्यंत 60 कथांचे लेखन! 'सिद्धी' हा पहिला कथासंग्रह एप्रिल 2023 मध्ये प्रकाशित झाला. दुसरा कथासंग्रह 'भक्ती!' नोव्हेंबर 2025मध्ये प्रकाशित झाला आहे. 'सिद्धी' या कथासंग्रहास जानेवारी 2024 ते मे 2024 या कालावधीत एक आंतराष्ट्रीय द्वितीय पारितोषिक आणि तीन राज्यस्तरीय पारितोषिक प्राप्त झाले आहे. 'भक्ती' या कथासंग्रहास चार पुरस्कार प्राप्त झाले आहेत. काही कथांना प्रथम, द्वितीय आणि उत्तेजनार्थ पुरस्कार लाभले आहेत. याबरोबरच गाण्याची आवड असून पुण्यात स्टेज शो करते. हौशी चित्रकार असून अनेक स्केचेस काढले आहेत.

    Related Posts

    एका शाळेचा अंत

    June 14, 2026 ललित

    जुईलीचा चकवा… फिरून पुन्हा त्याच जागेवर!

    June 13, 2026 ललित

    प्रीत परी तुजवरती…

    June 12, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    एका शाळेचा अंत

    By प्रदीप केळुस्करJune 14, 2026

    एका न्यूज चॅनेलचा मी हेड झालो आणि पहिल्याच महिन्यात महाराष्ट्रातील विविध शैक्षणिक संस्थाचा कारभार जवळून…

    जुईलीचा चकवा… फिरून पुन्हा त्याच जागेवर!

    June 13, 2026

    प्रीत परी तुजवरती…

    June 12, 2026

    शर्वायने बोलावलेल्या समारंभात आराध्या पोहोचली अन्…

    June 12, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    एका शाळेचा अंत

    June 14, 2026

    मंजिरी

    June 13, 2026

    आम्लपित्तासाठी योगाभ्यास मार्गदर्शन

    June 13, 2026

    जुईलीचा चकवा… फिरून पुन्हा त्याच जागेवर!

    June 13, 2026

    Dnyaneshwari : एऱ्हवीं तरी माझियां भक्तां, आणि संसाराची चिंता

    June 13, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 13 जून 2026

    June 13, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 327
    • अवांतर 190
    • आरोग्य 120
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 452
    • फिल्मी 52
    • फूड काॅर्नर 221
    • मैत्रीण 20
    • ललित 702
    • शैक्षणिक 81
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    एका शाळेचा अंत

    June 14, 2026

    मंजिरी

    June 13, 2026

    आम्लपित्तासाठी योगाभ्यास मार्गदर्शन

    June 13, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.