Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 14 एप्रिल 2026

    April 14, 2026

    नावात तर सर्वकाही आहे, पण सांगायचं कसं?

    April 13, 2026

    आशा उद्याच्या, डोळ्यात माझ्या…

    April 13, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, April 14
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » आयुष्याचं गणित बरोब्बर सोडविणारी… वनिता
    मैत्रीण

    आयुष्याचं गणित बरोब्बर सोडविणारी… वनिता

    Team AvaantarBy Team AvaantarOctober 1, 20253 Comments6 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीआर्टिकल, वनिता, आयुष्याचे गणित, राजकारण, नगरसेविका, आमदार, मैत्रीण, मैत्रिणी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    हिमाली मुदखेडकर

    माहेरी गावी जाण्याचा खूप वर्षांनी योग आला होता. वामकुक्षी आटोपून मस्तपैकी फक्कड चहा घेतला… आणि फेरफटका मारून यावा म्हणून निघाले. आजूबाजूचा परिसर अनोळखी वाटावा, इतका बदल झाला होताच. तरी काही ओळखीच्या… जुन्या खुणा शोधण्याचा अट्टाहास नजर करत होती… पण कुठे काही खाणाखुणा सापडत होत्या… तर कुठे अगदीच नावीन्य पसरले होते…

    अशीच पुढे पुढे जात मी त्याच जुन्या पाण्याच्या टाकीजवळ आले… सहज नजर वर टाकीकडे टाकली… पण ते मधमाशांचं पोळं नव्हतं तिथे, जे पूर्वी आम्ही तेथून जात असताना नेहमी दिसायचं…

    सवयीने नजर समोरील घराकडे वळली. असं वाटल की, तिथेही अपेक्षित चाफा नसेल आता… पण सुखद आश्चर्याचा धक्का! चाफा होता तिथे… तसाच… पूर्वीपेक्षा अधिक डौलदार… उंच फोफावलेला.. आणि छान निगा राखलेला… शेजारी पेरूचेही झाड होतेच… अगदी जसेच्या तसे!! त्याच्या फांदीवर झोकाही होता… पूर्वी आम्ही दोरीचा बांधायचो… आता केनचा होता.

    घराभोवती कुंपणही अगदी पूर्वीसारखेच… बांबू उभ्यातून अर्धा कापून त्याची जाळी केलेले कुंपण. या कुंपणामागेच ती उभी असायची, रोज सकाळी माझी वाट पाहात… मी आले की, आम्ही दोघी मिळून पुढे शाळेसाठी निघायचो.

    ती… वनिता.. माझी शाळेतली जिवलग मैत्रीण… लांब केस, गोल चेहरा, पाणीदार डोळे, साधीशी सैल एक वेणी… नीट व्यवस्थित तेल लावून घातलेली… आम्ही इतर सगळ्याजणी शाळेचा गणवेश म्हणून स्कर्ट घालायचो… पण वनिता गणवेशाच्या रंगाचा लांब पारकर घालत असे.

    मी दुरून येताना दिसले की, कुंपणाचे फाटक उघडत ती, ‘येते गं वहिनी…’ असं मोठ्याने सांगत असे.

    सातवी-आठवीत शिकणारी वनिता… तिच्या दादा आणि वहिनीसोबत इथे या घरात राहत असे. दादा, वहिनी, दोन भाचे आणि वनिता! तिचे आई-वडील गावी असत. भाऊ टेक्सकॉम नावाच्या कंपनीत कामाला जात असे.

    गावाकडे मुलींची लवकर लग्न केली जातात… वनिता दिसायला सुरेख… चटकन नजरेत भरणारी… वयात येऊ घातलेली… ना जाणो कुणी मागणी घातली आणि वडिलांनी ठरवलंच बालवयात लग्न तर! बहिणीच्या आयुष्यच नुकसान होईल, या भीतीपोटी दादाने तिला स्वतः सोबत तिला शहरात आणली होती. शाळा शिकेल आणि वहिनीला वर कामात मदतही करेल… असे सांगून!

    वनिता ही वाहिनीला सगळ्या कामात मदत करत असे. सकाळी साडेसातच्या शाळेला… जिथे वेळेवर उठण्यासाठी आईचा ओरडा खाऊन डोळे चोळत आम्ही पळत असू तिथे ती मात्र धुणी-भांडी करून स्वतःचे नीटनेटके आवरून येत असे…

    आम्ही बर्‍याचदा दुपारी एकमेकींच्या घरीही जात असू. अभ्यास, गप्पाटप्पा.. असx बरेचदा चालत असे. माझ्या घरी ती आली की, सराईतपणे कुणीही ना सांगता समोरची छोटी-मोठी कामे चटाचट करत असे. मला फार गम्मत वाटे तिची याबाबतीत!

    “अगं, बस की जरा आल्यासारखी… सारखं काय हाताला काम लागतं तुझ्या?” माझी आई तिला हक्काने रागवे.

    “कपड्यांच्या घड्याच तर करायच्या होत्या काकी! त्याला काय असा सोस लागतोय… तोंडाने बोलता बोलता हाताने होतात…” ती उत्तरे.

    लिंबाच्या सालीसारखी नितळ उजळ कांती असणारी वनिता घरकामात… निवडण्या-टिपण्यात… घर टापटीप ठेवण्यात चांगलीच तरबेज होती… पण अभ्यासात तिची गती जरा कमीच पडे, गणित हा तिचा सर्वात मोठा शत्रू! बाकीचे विषय घोकंपट्टीच्या जोरावर काठावर पास करता येत, पण गणितात बरेचदा दांडी उडे… शाळेत ती कायम माझ्या शेजारी बसत असे… आणि गणिताच्या तासात माझ्या वहीतून उत्तरे जशीच्या तशी स्वतःच्या वहीत उतरवून घेई.

    हेही वाचा – भाविकांचे श्रद्धास्थान पुण्यातील चतुःश्रृंगी देवस्थान

    तिच्या घरापुढे तिने अत्यंत आवडीने झाडे लावली होती. चाफा तर तिच्या विशेष आवडीचा! शेजारील पेरूच्या झाडाला आम्ही झोका टांगला होता. सुट्ट्यांमध्ये चुरमुरे-फुटाणे खात आम्ही तासनतास तिच्या या बागेत रमत असू… मंद मंद झोके घेत गुणगुणणे हा तर तिचा खास छंद!

    पुढे काही वर्षांत शाळा संपली आणि आमच्या शैक्षणिक वाटा वेगळ्या झाल्या… मी सायन्स घेतले… आणि वनिता आर्ट्स घेऊन बारावी उत्तीर्ण झाली. रोज होणार्‍या भेटी आता आठवड्यातून व्हायला लागल्या!

    रविवारी दुपारी येताना ती काही ना काही खाऊ स्वतः बनवून आणत असे किंवा आईच्या मागे किचनमध्ये जाऊन तिच्याकडून काही ना काही शिकून घेत असे.

    बारावीनंतर पुढील शिक्षणासाठी मी दुसर्‍या गावी गेले. वनिताच्या भावाने मात्र तिचे लग्न जुळवण्याचा घाट घातला. मुळातच सुंदर असणार्‍या वनिताचे लग्न ठरणे फारसे कठीण नव्हतेच… दोनच महिन्यांत सर्वांच्या अपेक्षेत उतरेल असे छान तालेवार ठिकाण मिळाले… आणि लग्न झालेही…

    कॉलेजच्या परीक्षा नेमक्या त्याच तारखांना येत असल्याने मी जाऊ शकले नाही. पण आई मात्र आवर्जून गेली. छानसा आहेर केला. सासरी जाताना वनिता आईच्या गळ्यात पडून खूप रडली.

    पुढे सात-आठ महिन्यांनी सुट्टीत मी घरी आले असताना ती देखील माहेरपणाला आली असल्याचे आईने सांगितले. खूप दिवसांत गाठभेट नसल्याने मलाही तिला भेटावेसे वाटतच होते. ‘उद्या जाऊया नक्की तिच्याकडे,’ असे ठरवून रात्री झोपले. सकाळी जागच मुळी वनिताच्या हाकेने आली…

    “ए ढमें… किती वेळ लोळत पडलीयस! उठ की आता, केव्हाची आलीय मी… काकी, इतका वेळ कशी झोपू देती हिला? जरा चांगल्या सवयी लाव, नंतर सासरी त्रास व्हायचा नाही तर!… उठ गं लवकर, मी चहा टाकते आपल्या दोघींना…”

    नितळ लिंब कांती वनिता आणखीनच उजळ दिसत होती. संसाराच सुख ओसंडून वाहत होत तिच्या चर्येवर…

    आई म्हणाली, “बस गं जरा आल्यासारखी… तडतड नको सारखी…. मी करते चहा… आणि आता सांभाळून वागायला हवे हो… धावपळ नकोय!”

    आईच्या या बोलण्याचा अर्थ उमजून मी तिच्याकडे पाहिले तर, ती चक्क लाजून ‘हो’ म्हणाली! मी चक्रावूनच गेले. माझे शिक्षणही पुरे झाले नाही  अन् हिची मातृत्वाची तयारीही सुरू झाली होती! पुढील अनेक दिवस दुपारी घरी येऊन आईकडून हवे नको ते सारे लाड पुरवून घेत राहिली.

    “काकी… मी उद्या निघतेय सासरी! ही बघ साडी, दादाने घेतली… छाने किनई!”

    झुळझुळीत गडद हिरव्या रंगाची शिफॉन नेसून समाधानाने मिरवत होती. आईने तिची ओटी भरून, तिची दृष्ट काढली. त्यानंतर काही महिन्यांतच मुलगा झाल्याचे तिने पत्रातून कळविले. ती तिच्या संसारात रमली. हळूहळू पत्रांची संख्याही कमी होत गेली…

    हेही वाचा – Heart touching story : अशीही एक आई… यशोदा

    पुढे माझेही शिक्षण पूर्ण होऊन लग्न झाले… मीही माझ्या दैनंदिनीत रमले. नोकरी… सांसारिक जबाबदार्‍या… मुले यात गुरफटून गेले. पण तिची आठवण आली की, कायम वाटत असे… तिने थोडे पुढे शिकून किमान स्वतःच्या पायावर उभे राहायला हवे होते. अगदीच सर्वसामान्य असणे तिला का आवडले असेल… किंवा कदाचित तिला त्या निवडीचा हक्कच दिला गेला नसेल म्हणून आहे त्यात तिने सुख मानले का?

    आज खूप वर्षांनी तिच्या घराजवळील खुणा पटल्या… वाटले असेल कुणी ओळखीचे आत तर करावी तिची चौकशी! म्हणून फाटक उघडून आत गेले… दारावर टकटक केली… तिच्या भाच्याने दार उघडले. लहानपणी पाहिलेल्या त्याला आता ओळखणे तसे कठीणच गेले असते… पण त्यानेच ओळखले मला!

    “अरे, ये ना मीनूताई… कशी आहेस? किती वर्षांनी आलीस… कुठे असतेस?”

    तिच्या वहिनीनेही अगदी अगत्याने स्वागत केले. थोडावेळ गप्पा झाल्या, तसा तिचा विषय निघालाच!

    “काय म्हणतेय वनिता? कसं काय सुरू आहे सगळं?”

    वहिनी म्हणाल्या, “वन्संचा मुलगा इंजिनीअरिंगच्या शेवटच्या वर्षाला आहे आता… खूप हुशार आहे हो पोरगा… कॉलेज संपायच्या आधीच तीन ठिकाणच्या नोकरीच्या ऑफर आहेत त्याला…” हे सगळं सांगताना जणू आपल्या लेकीबाबत सांगावे तसा ऊर भरून अभिमान ओसंडत होता वाहिनीच्या चेहर्‍यावर!

    “…आणि वन्संही काही कमी नाहीत हो कशात… घरची एवढी श्रीमंती… सगळ्यांच्या पोटात शिरून आपलेसे करून राहतात. नगरसेविका म्हणून निवडून आल्यात तीन सालाआधी! आता यंदा आमदारकीला उभ्या करतो, म्हनतात आमचे जावई. बायकोचा लई अभिमान त्यान्ला…”

    हे ऐकून मी अवाकच झाले! असाही एक मार्ग असू शकतो, स्वयंसिद्ध होण्याचा… हे आपल्या गावीही नसते. वनिताला कमी लेखणारी मी चुकीचीच होते… पुस्तकातील नाही जमले, पण आयुष्याचे गणित तिने माझी कॉपी न करता अगदी बरोब्बर सोडवले होते!

    मलाही तिचा मनोमन अभिमान वाटला. तिचा नंबर तिच्या भाच्याकडून घेऊन मीही परतले… लवकरच पुन्हा संपर्क साधण्यासाठी…

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    हळदीकुंकू… जुनी प्रथा मोडून काढणारे!

    April 10, 2026 मैत्रीण

    प्रत्येक घराचा ‘आधारवड’!

    March 24, 2026 मैत्रीण

    सौंदर्याचा सुवर्णपाश!

    March 11, 2026 मैत्रीण

    3 Comments

    1. शिल्पा जावळे on October 1, 2025 4:47 pm

      अतिशय सुंदर लेख 🥰🥰

      Reply
    2. Sejal on October 2, 2025 9:45 am

      खूपच सुंदर… अगदी खिळवून ठेवणारा लेख आहे 👌🏻💖

      Reply
    3. विश्वास मुदखेडकर on October 9, 2025 9:16 am

      खुप छान ,

      Reply
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    मैत्रीण

    हळदीकुंकू… जुनी प्रथा मोडून काढणारे!

    By प्रदीप केळुस्करApril 10, 2026

    आपा मास्तर नेहमीच्या दुकानात उभे होते. दुकानात गर्दी होती. आज संक्रात, हळदीकुंकू प्रत्येकाकडे असतेच. त्यामुळे…

    प्रत्येक घराचा ‘आधारवड’!

    March 24, 2026

    सौंदर्याचा सुवर्णपाश!

    March 11, 2026

    मोठी आई अन् तिने लहानांचा राखलेला सन्मान!

    March 10, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 14 एप्रिल 2026

    April 14, 2026

    नावात तर सर्वकाही आहे, पण सांगायचं कसं?

    April 13, 2026

    आशा उद्याच्या, डोळ्यात माझ्या…

    April 13, 2026

    Ayush Shetty : फायनल हरला, पण इतिहास घडवला…

    April 13, 2026

    शेवटची महाराणी!

    April 13, 2026

    Dnyaneshwari : हें सारस्वताचें गोड, तुम्हींचि लाविलें जी झाड…

    April 13, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 266
    • अवांतर 182
    • आरोग्य 100
    • थर्ड अंपायर 4
    • पंचांग आणि भविष्य 384
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 194
    • मैत्रीण 18
    • ललित 551
    • शैक्षणिक 76
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 14 एप्रिल 2026

    April 14, 2026

    नावात तर सर्वकाही आहे, पण सांगायचं कसं?

    April 13, 2026

    आशा उद्याच्या, डोळ्यात माझ्या…

    April 13, 2026
    Most Popular

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 14 एप्रिल 2026

    April 14, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.