Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    चौकटीपलीकडचा विचार!

    October 15, 2026

    जब जिद पे आ गई पार्वती!

    October 15, 2026

    स्वयंप्रकाशित आत्मा आणि परमात्मा

    October 15, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Friday, October 16
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » सोहोनी आजोबा आणि मोडक आजोबा यांच्या मैत्रीतील वळणे…
    ललित

    सोहोनी आजोबा आणि मोडक आजोबा यांच्या मैत्रीतील वळणे…

    सतीश बर्वेBy सतीश बर्वेAugust 24, 2026No Comments4 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मी मराठी, अभिजात मराठी, लेखक सतीश बर्वे, मोडक आजोबा आणि सोहोनी आजोबा, मोडक सोहोनी मैत्री, मोडक आजोबा कोमात, मोडक सोहोनी शेजारी, मोडक सोहोनी तीन पिढ्याची मैत्री, मोडक आजोबांची विचित्र अट, धनवापसी, मोडक आजोबांची प्रतीक्षा, सोहनी आजोबांची फसवणूक, मोडक आजोबांचा व्यवसाय, सोहोनी आजोबा व्यवसाय,
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    भाग – 2

    अंगणातील झोपाळ्यावरच्या मऊशार गादीवर बसून आजोबा गहन विचारात मग्न होते. खरंतर, आम्हाला कोणालाच त्यांची एकाग्रता खंडित करायची इच्छा नव्हती. पण, मला मात्र हीच वेळ महत्त्वाची वाटत होती… त्यांच्या आणि मोडक आजोबांच्या मैत्रीविषयी आणखी जाणून घेण्यासाठी! म्हणूनच सावकाश पावलं टाकत मी झोपाळ्याजवळ येऊन उभा राहिलो. क्षण दोन क्षण गेल्यावर अचानक आजोबांनी डोळे उघडले आणि हाताने खूण करुन ‘काय हवं आहे?’ असं मला विचारले.

    “तुमच्या आणि मोडक आजोबांच्या मैत्रीच्या आठवणी ऐकायच्या आहेत मला…” पडत्या फळाची आज्ञा मानून मी बोलून गेलो. ते ऐकून आजोबा जरा सावरून बसत मला म्हणाले बस माझ्या बाजूला.

    आजोबांच्या आठवणींचा झोपाळा हळूहळू वेग घ्यायला लागला…

    “आजोबा तुमची आणि मोडक आजोबांची ओळख कशी आणि कधी झाली तिथपासूनचं सगळं ऐकायचं आहे मला.”

    “आमची मैत्री शाळेपासूनची. दोन्ही कुटुंब तशी गरीबच… पण आहे त्याच्यात समाधान मानणारी आणि आनंद शोधणारी. त्याकाळी आमची घरं लहान होती, पण माणसांची मने ऐसपैस होती… माणूसकीचे रंग लावलेली. माझे वडील म्हणजे तुझे पणजोबा पोस्टात होते आणि सुधीरचे सचिवालयात. पण आम्ही दोघेही तल्लख बुद्धीचे. शालांत परीक्षेत अव्वल होतो दोघेही. आम्ही दोघांनीही सायन्सला ॲडमिशन घेऊन पुढे इंजिनीअर व्हायचे ठरवले. त्याकाळी कुटुंब जरी मोठी होती तरी स्वस्ताई होती, त्यामुळे थोडी फार रक्कम शिल्लक राहायची. मोडक जरा जास्त अहंकारी होता पहिल्यापासूनच आणि मी त्याविरूद्ध कायम परिस्थितीनुसार सगळं सांभाळून घेणारा. त्यामुळेच कदाचित मोडकला मी सतत सोबत लागायचो. अभ्यासात एकमेकांना मदत करत आम्ही दोघेही इंजिनीअर झालो. दोन्ही घरात उत्सवाचं वातावरण होते. आमच्या नोकऱ्या सुरू झाल्या. पण मोडक त्यात रमला नाही. त्याला व्यवसाय सुरू करायचा होता. त्या काळी मराठी कुटुंबात असा विचार करणं मोठ्या धाडसाने होते. पण म्हणतात ना जिथे जिद्द हार मानत नाही तिथे आशेचे किरण आपोआप दिसायला लागतात…

    हेही वाचा – धनवापसी… मोडक आजोबांची प्रतीक्षा

    मोडकच्या कंपनीत एक व्याख्यान झाले होते, ज्यात तरुणांना छोटे छोटे व्यवसाय सुरू करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले होते. शिवाय, सुरुवातीच्या भांडवलासाठी बॅंकाकडून कर्जासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले होते. मोडकच्या डोक्यात तेव्हापासूनच व्यवसायाचे खूळ आले. त्याने त्याच्या वडिलांना पटवून दिले त्याबद्दल. त्यांची कोकणातील जमीन गहाण ठेवून जमा झालेली थोडी रक्कम आणि बॅंकेतून थोडी उसनवारी घेऊन मोडकने मोटारी बनवण्यासाठी लागणाऱ्या सुट्ट्या भागांचे उत्पादन सुरू केले. पुढच्या दहा वर्षांत त्याने बॅंकेचे कर्ज नुसतं फेडले नाही तर व्यवसायवृद्धी केली मोठ्या प्रमाणात.

    मला मात्र माझ्या शिक्षणाचा उपयोग व्यवसायात तितकासा झाला नाही. आमच्या कंपनीचा बराचसा माल गोदीतून सोडवून आणायला लागे. कधी कधी माझ्या पारशी साहेबासोबत मी गोदीमध्ये जायचो. त्याच साहेबाने मला गोदीतून माल सोडवण्याचे काम नोकरी सांभाळून खासगीमध्ये करण्याची परवानगी दिली. आमच्या कामासोबत इतर कंपन्यांना मी हे काम करून देऊ लागलो आणि तिथेच मला माझ्या व्यवसायाची वाट सापडली. मी नोकरीचा राजीनामा दिला आणि तोच व्यवसाय सुरू केला. माझी जुनी कंपनी माझं पहिलं ग्राहक बनली आणि नंतर मी मागे वळून पाहिलं नाही.

    मराठी माणूस व्यवसायात यशस्वी झालेला एका गुजराती माणसाला बघवलं नाही. त्याने एका नवीन जोडधंद्याची मला भूरळ पाडली. मोडक ‘नको नको’ म्हणत असताना देखील मी इरेला पेटून जोडधंदा सुरू केला खरा आणि त्यात सपशेल बुडालो. गुजरात्याचा डाव मला नंतर कळला तोवर खूप उशीर झाला होता. देणेकरी वाढत होते आणि तसाच त्यांचा पैशासाठीचा तगादा. शेवटी एक दिवस मी तिरिमिरीत मोडककडे गेलो आणि मदतीची याचना केली. मी मोडकचं न ऐकता जोडधंदा सुरू केला म्हणून त्याचा अहंकार आधीच दुखावला होता मी! त्यात ही माझी मदतीची याचना. मला खात्री होती मोडक अव्वाच्या सव्वा अटी घालेल, पण मला या संकटातून बाहेर काढेल. झाले तसेच… पण त्याने घातलेली ती विचित्र अट मला नाईलाजाने मान्य करावी लागली. मोडकच्या अटीची पूर्तता जमेल तितकी लांबणीवर टाकण्याचा मी प्रयत्न केला. पण शेवटी तो दुर्देवी दिवस उजाडला आणि कर्जाच्या शेवटच्या हप्ता दिल्यावर माझं कर्ज आणि आमची मैत्री संपुष्टात आली. गेली कित्येक वर्षे मोडक आपल्या भूमिकेवर ठाम राहिला. कदाचित आजारी पडल्यावर त्याचं मन बदलेल म्हणून मी तुझ्यामार्फत त्याच्यापर्यंत निरोप पोहोचवला आहे. मी आतुरतेने वाट बघत आहे त्याच्या निर्णयाची.

    हेही वाचा – एक दिवस माझ्यासाठी रडशील तू….

    पूर्वी दोन्ही घरात ये जा असायची. बंगल्यामधली भिंत नावालाच होती. तुझे बाबा काका आणि आत्या त्या घरात आणि मोडकची दोन्ही मुलं आपल्या घरात लहानाची मोठी झाली. दर रविवारी सकाळी मोडक कुंपणाजवळच्या मोठ्या दरवाजातून जोरात ओरडायचा… “सुमती मी आलोय. मस्तपैकी आल्याचा चहा आणि थालिपीठ बनवायला घे.” सुमती म्हणजे तुझी आजी. मोडक तिचा लाडका भावोजी होता. अंगणात आमचा दोघांचा बुद्धिबळाचा डाव तासंतास सुरू असायचा. सुमती आणि कुसुम म्हणजे मोडकची बायको हातात लाटणं घेऊन यायच्या तेव्हा आमचा डाव संपून आम्ही आपापल्या बंगल्यात जायचो. दोन्ही घरांतील मुलांची लग्ने या बंगल्याच्या आवारात धुमधडाक्यात लागली. काळ पुढे चालला होता तसेच सगळ्या मुलांचे संसार… सगळे सण दणक्यात साजरे व्हायचे. पण आमची मैत्री तुटली आणि सगळ्यातच एक प्रकारची मरगळ आली ती आजपर्यंत सुरू आहे.

    मोडकचं आजारपण कानावर आलं आणि मी अक्षरशः उन्मळून पडलो. आता तरी त्याने त्याचा हट्ट सोडून एकदा तरी प्रेमाने हाक मारत मला गच्च मिठीत घ्यावं असं वाटतंय.”

    आजोबा सांगून सांगून दमले आणि त्यांच्या डोळ्यांवर झोप यायला लागली.

    “आजोबा थोडावेळ आत जाऊन आराम करा. सुधीर हॉस्पिटलमधून निघताना फोन करणार आहे. तेव्हा या तुम्ही परत अंगणात,” असं म्हणून मी आजोबांना आधार देऊन उठवलं. सावकाश पावलं टाकणाऱ्या आजोबांना मी त्यांच्या खोलीत नेऊन बिछान्यावर झोपवलं.

    क्रमशः
    Avatar photo
    सतीश बर्वे

    वय वर्षे 65. Adhesive क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय पातळीवर दबदबा असणाऱ्या भारतीय कंपनीच्या कायदा विभागात प्रदीर्घ काळासाठी काम करून निवृत्त. लेखनाचा वारसा आईकडून आलेला आहे. फेसबुकवरील 7-8 वाचक समुहात विपुल लेखन करून अल्पावधीतच लोकप्रिय होऊन स्वतःचा वाचक वर्ग तयार केला आहे. प्रवासाची आवड. डोळे आणि कान उघडे सतत उघडे ठेवल्याने माझ्या कथेतील बरीच पात्रं आणि प्रसंग मला सापडत गेले. मनमोकळ्या स्वभावाने मी सतत माणसं जोडत गेलो आणि त्यांच्या आयुष्यात मिसळून गेलो.

    Related Posts

    चौकटीपलीकडचा विचार!

    October 15, 2026 ललित

    चव्हाणांचे मृत्युपत्र

    October 14, 2026 ललित

    बापाची माया..

    October 14, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    चौकटीपलीकडचा विचार!

    By तृप्ती देवOctober 15, 2026

    संध्याकाळची वेळ होती. नेहमीप्रमाणे स्वाती स्वयंपाकघरात रात्रीच्या जेवणाची तयारी करत होती. तिचा नवरा निलेश ऑफिसमधून…

    चव्हाणांचे मृत्युपत्र

    October 14, 2026

    बापाची माया..

    October 14, 2026

    पहिला पाऊस आणि भिजायची हौस

    October 14, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    चौकटीपलीकडचा विचार!

    October 15, 2026

    जब जिद पे आ गई पार्वती!

    October 15, 2026

    स्वयंप्रकाशित आत्मा आणि परमात्मा

    October 15, 2026

    दरवाजा ढकलायचा की, ओढायचा?

    October 15, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : नगरेंचि रचावीं, जळाशयें निर्मावीं

    October 15, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 15 ऑक्टोबर 2026

    October 15, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 471
    • अवांतर 217
    • आरोग्य 159
    • पंचांग आणि भविष्य 630
    • फिल्मी 73
    • फूड काॅर्नर 259
    • मैत्रीण 32
    • ललित 994
    • शैक्षणिक 87
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    चौकटीपलीकडचा विचार!

    October 15, 2026

    जब जिद पे आ गई पार्वती!

    October 15, 2026

    स्वयंप्रकाशित आत्मा आणि परमात्मा

    October 15, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.