Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    ताई-माई-अक्का स्वत:ला किती छळणार?

    October 10, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : अविवेकमहामंत्र, जें मौढ्यमद्याचें पात्र

    October 10, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 10 ऑक्टोबर 2026

    October 10, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Saturday, October 10
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 ऑगस्ट 2026
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 ऑगस्ट 2026

    Team AvaantarBy Team AvaantarAugust 24, 2026No Comments7 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, पंचांग, दिनविशेष, Panchang, Dinvishesh, दर्शन कुलकर्णी, कुंडली, राशीभविष्य, आजचे राशीभविष्य, ज्योतिष
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दर्शन कुलकर्णी

    • आज, दिनांक : 24 ऑगस्ट 2026; वार : सोमवार
    • भारतीय सौर : 02 भाद्रपद शके 1948; तिथि : द्वादशी 30:20 ; नक्षत्र : पूर्वाषाढा 20:27;
    • योग : प्रीति 07:03; करण : बव 17:21;
    • सूर्य : सिंह; चंद्र : धनु 27:05; सूर्योदय : 06:21; सूर्यास्त : 19:01;
    • पक्ष : शुक्ल; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव;
    • शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128

    श्रावणी सोमवार शिवपूजन

    शिवामूठ : तीळ

    वेद कन्सल्टन्सी / 9987433660


    दिनविशेष

    ओडिसी नृत्यांगना संजुक्ता पाणिग्रह

    टीम अवांतर

    भारतातील ओडिसी या नृत्यात पारंगत नृत्यांगना संजुक्ता पाणिग्रह यांचा जन्म 24 ऑगस्ट 1944 रोजी ओडिसामधील गंजम जिल्ह्यातील बेहरामपूर येथे झाला. संजुक्ता यांना लहान वयातच नृत्याची गोडी लागली होती. आईने त्यांच्यातील प्रतिभा ओळखून त्यांना प्रोत्साहन दिले. त्यामुळे वयाच्या चौथ्या वर्षापासून केलुचरण मोहपात्रा यांच्याकडे त्यांच्या नृत्यशिक्षणाला सुरुवात झाली. बिसुबा मिलन यांनी संजुक्ता यांची 1950 ते 1953 अशी सलग तीन वर्षे उत्कृष्ट बालकलाकार म्हणून निवड केली. वयाच्या नवव्या वर्षी  त्यांनी कलकत्त्यातील चिल्ड्रन्स लिटिल थिएटर येथे आपली कला सादर केली. 1952 साली त्यांना इंटरनॅशनल चिल्ड्रन्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये पहिले पारितोषिक मिळाले.

    हेही वाचा – ताक…

    या यशामुळे आई-वडिलांनी संजुक्ता यांना मद्रासमधील (चेन्नई) कलाक्षेत्र येथे अजून चांगल्या नृत्य शिक्षणासाठी पाठविण्याचे ठरवले. तिथे त्यांनी रुक्मिणी देवी अरुंडेल यांच्याकडे धडे घेतले. त्या तेथे सहा वर्षे राहिल्या आणि भरतनाट्यम तसेच कथकलीमध्ये नृत्यप्रावीण्य ही पदवी मिळविली. त्यानंतर ‘कलाक्षेत्र बॅले ट्रूप’च्या सदस्या म्हणून त्यांनी भारत आणि इतर देशांचे दौरे केले. चौदा वर्षांच्या असताना त्या ओडिसाला परत आल्या. राज्य सरकारने त्यांना गुरू हझारीलाल यांच्याकडे भारतीय विद्या भवन, मुंबई येथे कथक शिकण्यासाठी शिष्यवृत्ती दिली. तरीही ओडिसी नृत्यात प्रावीण्य मिळवण्यासाठी त्या ते सोडून ओडिसाला परतल्या.

    1966 साली गुरू केलुचरण मोहपात्रा यांना संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यावेळी त्यांच्या पारितोषिक वितरण सोहळ्याच्यावेळी संजुक्ता यांनी एक कार्यक्रम सादर केला. प्रेक्षकांना तो कार्यक्रम खूप आवडला. ज्यामुळे संजुक्ता यांनी राष्ट्रीय पातळीवर आपला ठसा उमटवला. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पहिले नाही.

    गायक पती रघुनाथ यांच्यासोबत त्यांनी एकत्र सदरीकारणाला सुरुवात केली आणि पुढील दशकात दोघांनी मिळून मोठे नाव कमावले. त्या दोघांना एकत्रितपणे 1976 साली संगीत नाटक अकादमी पुरस्कार देण्यात आला. शिवाय, संजुक्ता या गुरू केलुचरण मोहपात्रा यांच्या सर्वोत्तम शिष्या म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. त्यांनी भारतात सगळ्या महत्त्वाच्या ठिकाणी प्रवास करत आपल्या कलेचे सादरीकरण केले.

    संजुक्ता पाणिग्रही यांनी 1986, 1990 आणि 1992 मध्ये इटलीतील बोलोन्या येथील इंटरनॅशनल स्कूल ऑफ थिएटर अँथ्रोपोलॉजीमध्ये काही काळ घालवला,  तिथे त्यांनी परदेशी विद्यार्थ्यांसाठी कमी कालावधीचे अभ्यासक्रम तयार करून शिकविले, त्यांना ओडिसी नृत्याचे प्रात्यक्षिक दिले, ज्यामुळे त्यांच्या जागतिक लोकप्रियतेत आणखी भर पडली.

    आपल्या संगीतकार पतीसोबत, संजुक्ता यांनी ओडिसी नृत्याचा एक आधुनिक तरीही शास्त्रीय असा संग्रह तयार केला, ज्यामध्ये जयदेव यांच्या गीत गोविंदवर आधारित पारंपरिक रचनांपासून ते सूरदास यांच्या पदबाल्या, तुलसीदास यांच्या रामचरितमानसमधील चौपाही आणि विद्यापती तसेच रवींद्रनाथ टागोर यांच्या गाण्यांपर्यंतचा समावेश आहे. यातील सर्वोत्कृष्ट रचना म्हणजे युग्मा -द्वांड. पंडित रघुनाथ पाणिग्रही यांनी रचलेला, राग बागेश्रीमधील नर्तक आणि संगीतकार यांच्यातील एक प्रकारचा जुगलबंदीचा खेळ‌. याशिवाय ‘मोक्ष मंगलम’ची रचना जी कालांतराने संजुक्ता यांची वैयक्तिक ओळख बनली आणि  आपल्या कार्यक्रमांचा शेवट करण्यासाठी त्या याच रचनेचा वापर करीत असे.

    आपल्या अथक प्रयत्नांनी संजुक्ता यांनी जवळजवळ विस्मृतीत गेलेल्या ओडिसी नृत्यशैलीला भारताच्या नृत्यपरंपरेत एक महत्त्वाचे स्थान मिळवून दिले. नृत्य आणि संबंधित उपक्रमांमधील त्यांच्या योगदानाबद्दल, भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार, पद्मश्री देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. याशिवाय 1976मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्काराच्याही त्या मानकरी ठरल्या. भारताच्या विविध भागांमध्ये ओडिसी नृत्य सादर करण्याव्यतिरिक्त, संजुक्ता पाणिग्रही यांनी सरकारच्या सांस्कृतिक शिष्टमंडळाचा भाग म्हणून अमेरिका आणि फिलीपिन्स, युनायटेड किंगडम, इस्रायल तसेच ग्रीसमधील डेल्फी आंतरराष्ट्रीय महोत्सव यासारख्या विविध देशांमधील कार्यक्रमात सहभाग घेतला.

    24 जून 1997 रोजी, वयाच्या 52 व्या वर्षी कर्करोगाने त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर, त्यांचे पती रघुनाथ पाणिग्रही यांनी 1999मध्ये ओडिसी नृत्याच्या प्रसारासाठी त्यांच्या नावाने ‘संजुक्ता पाणिग्रही मेमोरियल ट्रस्ट’ची स्थापना केली. 2001 पासून, दरवर्षी त्यांच्या जयंतीनिमित्त, हा ट्रस्ट उदयोन्मुख नर्तकांना शिष्यवृत्ती देतो, शिवाय ओडिसी नृत्य क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांना पुरस्कार प्रदान करतो.


    आजचे राशिभविष्य

    मेष – आज नशीब तुमच्या बाजूने असेल. तुमच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होण्याची चिन्हे आहेत. राजकारण किंवा सार्वजनिक जीवनात असलेल्यांनी मात्र आज सावधगिरी बाळगावी, कारण विरोधक पडद्यामागून तुमच्या विरोधात वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकतात. नोकरीच्या शोधात असलेल्यांना चांगला मार्ग मिळू शकतो. एका छोट्या सहलीला जा; त्यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल.

    वृषभ – आजचा दिवस चांगला असेल, पण घाई टाळणे महत्त्वाचे आहे. थोड्याशा निष्काळजीपणामुळे इजा किंवा त्रास होऊ शकतो. गाडी चालवताना विशेष सावधगिरी बाळगा.  विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासावर पूर्णपणे लक्ष केंद्रित केले पाहिजे, कारण कठोर परिश्रमांमुळेच चांगले परिणाम मिळतील. प्रवासादरम्यान, तुम्हाला भविष्यात उपयोगी पडणारी महत्त्वाची माहिती मिळू शकते. खर्चही वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे बजेटची काळजी घ्या.

    मिथुन – स्वतःच्या आरोग्याबाबत आज निष्काळजीपणा करू नका. जुन्या समस्या पुन्हा उद्भवू शकतात, त्यामुळे वेळीच लक्ष देणे उत्तम ठरेल. वाढत्या खर्चावर नियंत्रण ठेवणेही महत्त्वाचे आहे. तुमचा सामाजिक प्रभाव कायम राहील आणि नवीन गोष्टी करण्याचे प्रयत्न यशस्वी होऊ शकतात. एक चांगला व्यावसायिक करार होण्याची शक्यता आहे, परंतु अंतिम निर्णय घेण्यापूर्वी सर्व बाबींचा काळजीपूर्वक विचार करा.

    कर्क – कोणताही निर्णय घाईने घेऊ नका. कारण घाईने घेतलेला निर्णय नंतर समस्या निर्माण करू शकतो. प्रत्येक लढाई ताकदीने नव्हे, तर बुद्धीने देखील जिंकता येते हे आज तुमच्या लक्षात येईल. तुम्ही विरोधकांवर विजय मिळवू शकता,  संततीकडून चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे.  कौटुंबिक बाबींमध्ये थोडी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे,

    सिंह – आज तुम्हाला तणाव वाढल्याचे जाणवेल. संततीच्या आरोग्याबाबत निष्काळजीपणा करू नका आणि गरज भासल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घ्या. आज कोणत्याही जोखमीच्या कामात पैसा किंवा वेळ गुंतवणे टाळणेच उत्तम. तुमचे वडील तुमच्यावर एक महत्त्वाची जबाबदारी सोपवू शकतात. ती गांभीर्याने पार पाडा.  दिवसभरात तुम्ही काही महत्त्वाच्या व्यक्तींना भेटाल. घरी पाहुण्यांच्या आगमनामुळे महिला जातकांची धावपळ होईल.

    कन्या –  तुम्हाला आज काही आव्हानांना सामोरे जावे लागू शकते, परंतु संयम आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास त्यावर सहज मात कराल. नकारात्मक विचारांना स्वतःवर भारी पडू देऊ नका. महिलांना घराची सजावट किंवा त्यात काही बदल करण्यावर लक्ष केंद्रित करण्याची संधी मिळेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करणे हानिकारक ठरू शकते. पदोन्नतीला थोडा विलंब होऊ शकतो, पण याला अपयश समजू नका.

    तुळ – आजचा दिवस तुम्हाला प्रगतीच्या नवीन संधी देईल. तुमच्या मेहनतीचे सकारात्मक फळ मिळेल आणि तुम्हाला एखाद्या सामाजिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधीही मिळू शकते. एखाद्या सहकाऱ्याच्या बोलण्याने तुम्हाला वाईट वाटू शकते, पण ते मनावर न घेता स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रित करा. जोडीदाराच्या नवीन नोकरी किंवा करिअरबद्दल चांगली बातमी मिळू शकते. तुम्ही हाती घेतलेले कोणतेही कार्य यशस्वी होण्याची दाट शक्यता आहे.

    वृश्चिक – आजचा दिवस सकारात्मक परिणाम दर्शवेल, मात्र एका किरकोळ मुद्द्यावरून कुटुंबात तणाव निर्माण होऊ शकतो. तुम्हाला संततीच्या करिअरबाबत एक महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागू शकतो किंवा त्यासाठी प्रवास करावा लागू शकतो. आज स्वादिष्ट जेवणाचा आनंद घ्याल, पण अतिखाणे टाळा, कारण त्यामुळे पोटाचे विकार होऊ शकतात. विद्यार्थ्यांना मानसिक तणावातून दिलासा मिळेल आणि अभ्यासात त्यांची एकाग्रता सुधारेल.

    हेही वाचा – कहाणी जुम्मन चाचा आणि गावकऱ्यांची!

    धनु – आज तुम्हाला थोडे अस्वस्थ वाटू शकते. शिवाय तुमचे आरोग्यही कमजोर असू शकते. तुम्हाला एका व्यावसायिक व्यवहाराबद्दल चिंता वाटेल, त्यामुळे संपूर्ण माहितीशिवाय निर्णय घेणे टाळा. आईला दिलेले वचन पूर्ण करणे महत्त्वाचे ठरेल, आर्थिक बाबींमध्ये अनोळखी लोकांवर विश्वास ठेवणे टाळा. आज नवीन गुंतवणुकीपासून दूर राहणे चांगले राहील. बँकिंग किंवा वित्तीय क्षेत्रात काम करणाऱ्यांना नोकरीची चांगली संधी मिळू शकते.

    मकर – वाढत्या खर्चामुळे आज तुमच्या आर्थिक परिस्थितीवर दबाव येऊ शकतो. बजेटवर लक्ष न ठेवल्यास बचतीवर परिणाम होऊ शकतो. भावंडांसोबत मालमत्तेवरून होणारे वाद वाढण्याची शक्यता आहे आणि हे प्रकरण कायदेशीर स्तरावरही जाऊ शकते. त्यामुळे, चर्चेद्वारे तोडगा काढण्याचा प्रयत्न करा. आज आळसामुळे कामाची टाळाटाळ करणे हानिकारक ठरू शकते. अनोळखी लोकांवर आंधळा विश्वास ठेवू नका आणि महत्त्वाची कागदपत्रे व वस्तू सुरक्षित ठेवा.

    कुंभ – आजचा दिवस सामान्य असेल, पण तुम्ही ऊर्जा आणि उत्साहाने परिपूर्ण असाल. तुम्ही एखाद्या लांबच्या प्रवासाचे नियोजन करू शकता. आज जोडीदाराच्या भावना समजून घेणे महत्त्वाचे ठरेल, कारण कोणतीही अविचारी टिप्पणी नात्यात तणाव निर्माण करू शकते. एखादे काम लवकर पूर्ण होईल, पण इतरांच्या वैयक्तिक बाबींमध्ये हस्तक्षेप करणे टाळा. जर तुम्ही राजकारण किंवा सार्वजनिक जीवनात प्रवेश करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्या सभोवतालचे लोक आणि परिस्थिती पूर्णपणे समजून घेतल्यानंतरच पुढे जा.

    मीन – कायदेशीर बाबींमध्ये तुम्हाला आज अधिक सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. व्यवसायात काही चढ-उतार येतील, परंतु जुन्या गुंतवणुकी, विशेषतः शेअर बाजाराशी संबंधित गुंतवणुकीतून नफा मिळण्याची शक्यता आहे. कोणत्याही व्यवहाराला अंतिम रूप देण्यापूर्वी, प्रत्येक दस्तऐवज आणि अट काळजीपूर्वक वाचा. भागीदारीच्या बाबतीत घाई केल्यास नुकसान होऊ शकते. नवीन वाहन खरेदी करण्याचा आज विचार करू शकता आणि त्यासाठी कर्ज मिळवण्याची प्रक्रियाही सुरू होऊ शकते. आर्थिक निर्णय काळजीपूर्वक घेणे सर्वोत्तम आहे.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 10 ऑक्टोबर 2026

    October 10, 2026 पंचांग आणि भविष्य

    मिथुनेचा शुक्र… सोशल बटरफ्लाय

    October 9, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 09 ऑक्टोबर 2026

    October 9, 2026 पंचांग आणि भविष्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 10 ऑक्टोबर 2026

    By Team AvaantarOctober 10, 2026

    दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 10 ऑक्टोबर 2026; वार : शनिवार भारतीय सौर : 18…

    मिथुनेचा शुक्र… सोशल बटरफ्लाय

    October 9, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 09 ऑक्टोबर 2026

    October 9, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 08 ऑक्टोबर 2026

    October 8, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    ताई-माई-अक्का स्वत:ला किती छळणार?

    October 10, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : अविवेकमहामंत्र, जें मौढ्यमद्याचें पात्र

    October 10, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 10 ऑक्टोबर 2026

    October 10, 2026

    शर्वाय-आराध्याबाबत आनंदी अनभिज्ञच!

    October 9, 2026

    सासू आणि आई… दोघी सारख्याच!

    October 9, 2026

    Recipe : ढाबा स्टाईल लसुणी पालक!

    October 9, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 465
    • अवांतर 216
    • आरोग्य 157
    • पंचांग आणि भविष्य 622
    • फिल्मी 71
    • फूड काॅर्नर 258
    • मैत्रीण 30
    • ललित 982
    • शैक्षणिक 87
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    ताई-माई-अक्का स्वत:ला किती छळणार?

    October 10, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : अविवेकमहामंत्र, जें मौढ्यमद्याचें पात्र

    October 10, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 10 ऑक्टोबर 2026

    October 10, 2026
    Most Popular

    Homeopathy : होमिओपॅथीत महाराष्ट्रही अग्रेसर!

    October 4, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.