Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    हे बंध रेशमाचे ठेवू जपून जीवा…

    April 17, 2026

    जगाचा नकाशा आणि इतिहास बदलणारा ‘सुगंधी’ प्रवास!

    April 17, 2026

    Dnyaneshwari : जैसा केरु फिटलिया आभाळीं, दिठी रिगे सूर्यमंडळीं…

    April 17, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Friday, April 17
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Recipe : विदर्भातील पारंपरिक वाळवणाचा प्रकार ‘पापडा’!
    फूड काॅर्नर

    Recipe : विदर्भातील पारंपरिक वाळवणाचा प्रकार ‘पापडा’!

    Team AvaantarBy Team AvaantarOctober 1, 2025No Comments2 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, रेसिपी, Recipe, Traditional Papada, Vidarbha Special, पापडा, वाळवणाचा प्रकार, पारंपरिक पापडा, विदर्भ स्पेशल,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    माधवी जोशी माहुलकर

    विदर्भातील खाद्यसंस्कृती समृद्ध आहे. अमरावती जिल्ह्यातील अचलपूर, परतवाडा या गावांसह इतर खेड्यांमधे वाळवणाचा असाच एक पापडा हा पारंपरिक प्रकार केला जातो. पापडा करताना गहू ओलावून पीठ तयार करतात. हे पीठ चांगले मळून, दीड-दोन तास मुरत ठेवतात. नंतर त्याच्या मोठमोठ्या पोळ्या लाटून घेतात आणि त्या परत हातावर घेऊन त्यांना दोन्ही हातांनी गोल गोल फिरवत अजून मोठा आकार देतात. एका मोठ्या परडीवर तो पापडा वाळत घालतात. पापडा उन्हात कडकडीत वाळले की त्यांचा हातानेच चुरा करून हवाबंद डब्यात भरून ठेवतात. हा प्रकार वर्षभर साठवून ठेवला जातो. अगदी फोडणीच्या पोळीसारखा किंवा फोडणीच्या शेवयांसारखाच असणारा हा पदार्थ कसा करतात ते पाहूया!

    एकूण कालावधी – 20 ते 30 मिनिटे.

    साहित्य

    • पापडा (पापडचुरा, पापळा) – 2 वाट्या
    • चिरललेला कांदा –  1
    • हिरव्या मिरच्या – 3 ते 4
    • कढीलिंबाची पाने – 5 ते 6
    • शेंगदाणे – मुठभर
    • लाल तिखट – 1 ते 2 चमचे
    • हळद – 1 चमचा
    • मीठ – चवीनुसार
    • मोहरी – 1 लहान चमचा
    • जिरे – 1 लहान चमचा
    • हिंग – लहान अर्धा चमचा
    • साखर – चवीनुसार
    • बारीक चिरलेली कोथिंबीर – मुठभर
    • तेल – 1 पळीभर
    • पाणी – 1 पेला

    हेही वाचा – Recipe : विदर्भ स्पेशल… भातावरचे पिठले

    कृती

    1. कढईत तेल तापवून घ्यावे.
    2. तेल तापल्यावर त्यात मोहरी, जिरं टाकून ते तडतडल्यावर हिंग टाकावा आणि लगेच कढीलिंबाची पाने आणि हिरव्या मिरच्या टाकून ते परतून घ्यावे.
    3. थोड्या परतल्यावर त्यामध्ये शेंगदाणे टाकावे आणि गॅस मंद करून शेंगदाण्यांचा रंग थोडा बदलल्यावर कांदा टाकून तोपण थोडा गुलाबी होऊ द्यावा.
    4. नंतर त्यात एक चमचा हळद, दोन चमचे तिखट टाकावे आणि त्या फोडणीत एक पेलाभर पाणी टाकावे.
    5. त्या पाण्यात चवीनुसार मीठ आणि साखर टाकावी.
    6. पाण्याला उकळी आली की, त्यामध्ये पापडा किंवा पापडचुरा टाकावा.
    7. गॅसची आच थोडी कमी करून कढईवर झाकण ठेवावे.
    8. हा पापडा छान सुटा होईपर्यंत नरम शिजवून घ्यावा. यातील पाणी शोषले जाऊन पापडा सुटसुटीत, मोकळा आणि छान नरम होतो.
    9. गॅस बंद करून दोनेक मिनिटे कढई ताटलीने झाकून ठेवावी.
    10. हा पापडा सर्व्ह करताना त्यावर मुठभर कोथिंबीर पेरावी
    11. हा चविष्ट पदार्थ दही आणि लोणचे यासोबत खायला द्यावा.

    हेही वाचा – Recipe : विदर्भ स्पेशल… तुरीच्या उसळीतील दिवसे!


    तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता. मात्र, त्यासाठी तुम्हाला वरील फॉरमॅटमध्ये ही रेसिपी द्यावी लागेल.

    avaantar.recipe@gmail.com

    या ईमेलवर तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    जगाचा नकाशा आणि इतिहास बदलणारा ‘सुगंधी’ प्रवास!

    April 17, 2026 फूड काॅर्नर

    Kitchen Tips : दाल फ्राय, टेस्टी ताक, शिळ्या भाताचा नाश्ता करताना…

    April 16, 2026 फूड काॅर्नर

    Recipe : उन्हाळा स्पेशल चिवळीची भाजी!

    April 12, 2026 फूड काॅर्नर
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    फूड काॅर्नर

    जगाचा नकाशा आणि इतिहास बदलणारा ‘सुगंधी’ प्रवास!

    By माधवी जोशी माहुलकरApril 17, 2026

    भारतीय मसाल्यांचा प्रवास ही एक विस्मयकारक गाथा आहे. या मसाल्यांचा उल्लेख 3000 ते 5000 वर्षांपूर्वीच्या…

    Kitchen Tips : दाल फ्राय, टेस्टी ताक, शिळ्या भाताचा नाश्ता करताना…

    April 16, 2026

    Recipe : उन्हाळा स्पेशल चिवळीची भाजी!

    April 12, 2026

    Recipe : अशी बनवा खमंग कचोरी!

    April 11, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    हे बंध रेशमाचे ठेवू जपून जीवा…

    April 17, 2026

    जगाचा नकाशा आणि इतिहास बदलणारा ‘सुगंधी’ प्रवास!

    April 17, 2026

    Dnyaneshwari : जैसा केरु फिटलिया आभाळीं, दिठी रिगे सूर्यमंडळीं…

    April 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 17 एप्रिल 2026

    April 17, 2026

    Ayurveda : वसंताचे ‘ब्रह्मास्त्र’ – वासंतिक वमन पंचकर्म

    April 17, 2026

    पाप आणि पुण्य

    April 16, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 270
    • अवांतर 182
    • आरोग्य 102
    • थर्ड अंपायर 4
    • पंचांग आणि भविष्य 387
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 196
    • मैत्रीण 18
    • ललित 559
    • शैक्षणिक 77
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    हे बंध रेशमाचे ठेवू जपून जीवा…

    April 17, 2026

    जगाचा नकाशा आणि इतिहास बदलणारा ‘सुगंधी’ प्रवास!

    April 17, 2026

    Dnyaneshwari : जैसा केरु फिटलिया आभाळीं, दिठी रिगे सूर्यमंडळीं…

    April 17, 2026
    Most Popular

    हे बंध रेशमाचे ठेवू जपून जीवा…

    April 17, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.