दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 31 ऑक्टोबर 2025; वार : शुक्रवार
- भारतीय सौर : 09 कार्तिक शके 1947; तिथि : नवमी 10:03; नक्षत्र : धनिष्ठा 18:50
- योग : वृद्धि 28:31; करण : तैतिल 21:43
- सूर्य : तुळ; चंद्र : मकर 06:47; सूर्योदय : 06:37; सूर्यास्त : 18:06
- पक्ष : शुक्ल; ऋतू : शरद; अयन : दक्षिणायन
- संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5127
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
आजचे राशीभविष्य
मेष – दिवस शुभ आणि फलदायी असेल. चांगल्या नोकरीची संधी मिळेल. उत्पन्न आणि खर्च यांचा समतोल साधावा लागेल, अन्यथा अनावश्यक खर्च वाढण्याची शक्यता आहे. घाईघाईने निर्णय घेणे टाळा, अन्यथा नुकसान होऊ शकते. दिवसाच्या उत्तरार्धात एखादी चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळू शकते.
वृषभ – कामात यश मिळण्याचा दिवस आहे, परंतु ते साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील. उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत निर्माण होतील. ज्यामुळे उत्पन्न वाढेल आणि आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली होईल. व्यवसाय करणाऱ्यांनी आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे. जोडीदाराकडून चांगले सहकार्य मिळेल. आरोग्य चांगले राहील.
मिथुन – उत्पन्न वाढीचे प्रयत्न यशस्वी होतील, नफ्याच वाढ होईल. मात्र, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये उगाचच अडकणे टाळा. मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी आज चांगला सौदा होऊ शकतो. नोकरदार व्यक्तींना चांगल्या नोकरीच्या काही ऑफर मिळू शकतात. पूर्वी गुंतवणूक केली होती त्यावर लक्षणीय परतावा मिळू शकतो.
कर्क – आज काही आव्हानांना तोंड देण्याची वेळ येईल. काही बाबींमध्ये खूप सावधगिरी बाळगावी लागेल. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेले काम आज पूर्ण होऊ शकते. आर्थिक परिस्थितीत लक्षणीय बदल होण्याची शक्यता आहे. कोणीतरी तुमचे कर्ज फेडू शकते. कोणत्याही कामात घाई करणे टाळावे. गुंतवणुकीसाठी दिवस अतिशय चांगला असू शकतो.
सिंह – आज इतरांच्या प्रकरणांमध्ये अनावश्यकपणे नाक खुपसणे टाळा. कामाच्या ठिकाणी दिवस चांगला जाणार नाही, कामात काही अडचणी येऊ शकतात. वैवाहिक जीवनात जोडीदाराचे प्रेम आणि विश्वास कायम राहील. बोलणे आणि राग यावर नियंत्रण ठेवावे लागेल. अन्यथा, वाद आणखी चिघळू शकतात. व्यावसायिकांना चांगला नफा होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा – बॅटन रिलेचा प्रवास : तेरा दिवसांतील काही आठवणी
कन्या – उत्पन्नाचे स्रोत वाढू शकतात, तसेच तुमचे शत्रूही वाढण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. राजकारणातील प्रवेशाचे तुमचे प्रयत्न आज यशस्वी होऊ शकतात. नोकरदार जातकांवर अतिरिक्त जबाबदाऱ्या सोपवल्या जाऊ शकतात. व्यावसायिकांना चांगला करार मिळू शकतो. घरात काही शुभ घटना घडू शकतात.
तुळ – आजचा दिवस शुभ राहील. कुटुंबातील एखाद्या सदस्याकडून चांगली बातमी समजेल. ओळखीची एखादी व्यक्ती तुमच्याकडे कर्ज मागण्यासाठी येऊ शकते. आज आत्मविश्वास वाढेल, ज्यामुळे तुम्ही कठीण कामे देखील सहजतेने पूर्ण करू शकाल. व्यवसायात चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. अतिरिक्त आर्थिक लाभाच्या संधी निर्माण होतील.
वृश्चिक – आजचा दिवस उत्साहाने भरलेला असेल. कामाच्या ठिकाणी मनाजोगते काम करू शकाल. घरी काही शुभ किंवा धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल, ज्यासाठी खर्चचा भार वाढू शकतो. जोखीम असलेले उपक्रम टाळावेत. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल, अन्यथा जोडीदार खोलवर दुखावला जाईल.
धनु – आजचा दिवस संमिश्र असेल. काही बाबतीत यश मिळू शकते, तर काही बाबतीत अडचणी येऊ शकतात. व्यावसायिकांना आज चांगला नफा मिळू शकेल. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात नवीन संपर्कांमुळे फायदा होईल. मित्र आणि कुटुंबाकडून पूर्ण पाठिंबा मिळेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात आणि स्पर्धा परीक्षांसाठी अधिक मेहनत घ्यावी लागेल.
मकर – आजचा दिवस चांगला जाईल. काही चांगली बातमी ऐकायला मिळेल. आर्थिक लाभ वाढतील, अतिरिक्त आर्थिक मदत मिळू शकेल. व्यावसायिकांच्या दृष्टीने दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या करारावर शिक्कामोर्तब होईल. कामाच्या ठिकाणी काही चांगल्या संधी मिळू शकतात. तथापि, आर्थिक व्यवहारांमध्ये सावधगिरी बाळगावी लागेल.
कुंभ – दिवस सामान्य असेल. नोकरदार जातकांवर कामाच्या ठिकाणी ताण वाढेल, ज्यामुळे काही वेगळेच प्रश्न निर्माण होतील. संयम आणि शांततेने काम करावे लागेल. एखाद्याच्या मदतीने, अतिरिक्त उत्पन्न, आर्थिक लाभ मिळू शकतो. तथापि, उत्पन्न आणि खर्च यात संतुलन राखावे लागेल. मालमत्तेत गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांना दिवस अनुकूल असेल.
हेही वाचा – लग्नाला यायचं हं… ते डिजिटल निमंत्रण!
मीन – अपूर्ण कामांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी वेळ काढा. सध्या आर्थिक बाबतीत तणावात असणाऱ्यांना समस्यांवर उपाय सापडू शकतो. मात्र व्यवहार अंतिम करण्यापूर्वी सावधगिरी बाळगा. नोकरी करणाऱ्या जातकांना आज कामानिमित्ताने घरापासून लांब राहायला लागू शकते. बेरोजगारांना त्यांच्या योग्य काम मिळू शकते.
दिनविशेष
भारताचे पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल
टीम अवांतर
भारताचे लोहपुरूष म्हणून ज्यांची ओळख आहे त्या सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म 31 ऑक्टोबर 1875 रोजी नाडिया येथे एका जमीनदार घराण्यात झाला. ते यशस्वी वकील होते. पटेल यांनी गुजरातमधील खेडा बोरसाद आणि बारडोली येथील शेतकऱ्यांना ब्रिटिश राजवटी विरुद्ध अहिंसक आणि सविनय कायदेभंगात संघटित करण्याचे कार्य केले. त्यामुळे ते एक प्रभावशाली नेते बनले. 1918 मध्ये अहमदाबाद नगरपारिकेत निवडून आले. पुढे तर 1924-28 या काळात ते नगरपालिकेचे अध्यक्ष झाले. त्यांनी अनेक सुधारणा करून अहमदाबाद शहर स्वच्छ आणि सुंदर केले. 1921 साली ते गुजरात प्रांतिक काँग्रेसचे अध्यक्ष झाले. 1940च्या नोव्हेंबरमध्ये वैयक्तिक सत्याग्रहात त्यांना स्थानबद्द करण्यात आले. 8 ऑगस्ट 1942 रोजी ‘भारत छोडो’चा ठराव संमत होण्यापूर्वीच सरदारांनी गुजरातमधील वातावरण तापवले होते. 9 ऑगस्टला त्यांना अहमदनगरच्या किल्ल्यात इतर काँग्रेसच्या नेत्यांबरोबर अटकेत ठेवले. 15 जून 1945 रोजी त्यांची सुटका झाली. सुटकेनंतर सिमला परिषद, कॅबिनेट मिशन यामध्ये त्यांनी सहभाग घेतला. त्यांच्या मध्यस्थीने 1946 सालच्या मुंबई नाविक बंड शमविण्यात आले होते. पण सरदारांचे सर्वांत मोठे, महत्त्वाचे आणि राष्ट्रीय ऐक्याचे काम म्हणजे संस्थानांचे विलिनीकरण होय. त्यांनी सर्वप्रथम हैदराबाद, जुनागढ आणि काश्मीर वगळता इतर सुमारे 550 संस्थाने भारतात विलीन करून घेतली. पुढे त्यांनी हैदराबाद संस्थानही, पोलीस कारवाई करून खालसा केले. या विलीनीकरणाच्या कार्यात त्यांना व्ही. पी. मेनन यांचे बहुमोल सहाय्य झाले. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ते 49वे अध्यक्ष होते. सरदार पटेल यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसने मूलभूत हक्क आणि आर्थिक धोरण ठराव मंजूर केला. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात आणि त्यानंतरच्या स्वातंत्र्योत्तर भारतात वल्लभभाईंना मानाचे स्थान होते. एकात्म भारताचे ते खरे शिल्पकार असून काँग्रेसच्या पक्ष संघटनात्मक कार्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. ‘भारताचा पोलादी पुरुष’ म्हणून त्यांची जगभर ख्याती होती. चाणाक्ष बुद्धी, कठोर शिस्त आणि परिस्थितीचे विलक्षण आकलन हे राजकारणी मुत्सद्याला आवश्यक असणारे गुण त्यांच्यात होते. 15 डिसेंबर 1950 रोजी त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर त्यांना श्रद्धांजली वाहताना ‘द टाइम्स’ने (लंडन) त्यांचा गौरव बिस्मार्कपेक्षा श्रेष्ठ राजकारणी म्हणून केला होता.


