Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 30 एप्रिल 2026

    April 30, 2026

    स्त्रीचे सौंदर्य अन् पुरुषाचे देखणेपण खुलते…

    April 29, 2026

    Bookshelf : ‘हिंदू’… भालचंद्र नेमाडेंनी सत्य समोर ठेवले, पण…

    April 29, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Thursday, April 30
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 30 एप्रिल 2026
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 30 एप्रिल 2026

    Team AvaantarBy Team AvaantarApril 30, 2026No Comments5 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, पंचांग, दिनविशेष, Panchang, Dinvishesh,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दर्शन कुलकर्णी

    • आज, दिनांक : 30 एप्रिल 2026; वार : गुरुवार
    • भारतीय सौर : 10 वैशाख शके 1948; तिथि : चतुर्दशी 21:12; नक्षत्र : चित्रा 26:16;
    • योग : वज्र 20:54; करण : गरज 08:29;
    • सूर्य : मेष; चंद्र : कन्या 13:13; सूर्योदय : 06:12; सूर्यास्त : 18:59;
    • पक्ष : शुक्ल; अयन : उत्तरायण; संवत्सर : पराभव;
    • शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128

    पौर्णिमा प्रारंभ रात्री 09:12

    वेद कन्सल्टन्सी / 9987433660


    दिनविशेष

    प्रतिभावंत संगीतकार श्रीनिवास खळे

    टीम अवांतर

    मराठीतील प्रतिभावंत संगीतकार श्रीनिवास खळे यांचा जन्म 30 एप्रिल 1926 रोजी गुजरातमधील बडोदा येथे झाला. बडोद्यातल्या सयाजीराव गायकवाड संगीत महाविद्यालयात मधुसूदन जोशी यांच्याकडून त्यांनी संगीताचे प्राथमिक शिक्षण घेतले. पुढे अता हुसेन खाँ, निसार हुसेन खाँ आणि फैयाज हुसेन खाँ यांच्यासारख्या दिग्गजांकडून त्यांना शास्त्रीय संगीताची तालीम मिळाली.

    संगीतावरील प्रेमापोटी 1950 साली रेल्वेतील नोकरीचा कॉल आला असूनही ‘अजून आलाच नाही,’ असं खोटं सांगत आपण वडिलांना फसवलं, असं ते स्वतःच सांगत असतं. बडोदा आकाशवाणीत संगीतकार म्हणून काही वर्षे नोकरी केल्यानंतर खळे मुंबईत आले. पण त्यांना काम मिळेना. या काळात त्यांना त्यांच्या एका मित्राची मोलाची मदत झाली; त्याच्यामुळे राहण्या-खाण्याची सोय झाली. इथेच त्यांची ओळख के. दत्ता (दत्ता कोरगावकर) या संगीतकारांशी झाली. खळे यांनी मग कोरगावकर यांचे सहाय्यक संगीतकार म्हणून काम करायला सुरुवात केली.

    हेही वाचा – स्त्रीचे सौंदर्य अन् पुरुषाचे देखणेपण खुलते…

    याच काळात काही चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनाच्या स्वतंत्र संधी त्यांच्याकडे चालून आल्या, मात्र ते चित्रपट कधीच पूर्ण झाले नाहीत आणि खळे यांचे सगळे कष्ट पाण्यात गेले. त्यामुळे त्यांना विलक्षण नैराश्य आले होते. आपल्या जवळची बाजाची पेटी विकून टाकून संगीताला रामराम ठोकावा आणि काही तरी दुसराच नोकरीधंदा शोधावा, अशा टोकाच्या निर्णयाप्रत ते आले होते. पण अशा वेळी त्यांच्या पत्नीने त्यांना धीर दिला आणि नैराश्यातून त्यांना बाहेर काढले.

    बर्‍याच हालअपेष्टांनंतर 1952 साली त्यांची ‘गोरी गोरी पान’ आणि ‘एका तळ्यात होती बदके पिले सुरेख’ दोन गाणी असलेली पहिली रेकॉर्ड प्रसिद्ध झाली. आशा भोसले यांनी गायलेली ही गीते तेव्हा खूप लोकप्रिय झाली आणि त्याबरोबर संगीतकार म्हणून श्रीनिवास खळे हे नावदेखील.

    भावगीतांव्यतिरिक्त ‘बोलकी बाहुली’, ‘जिव्हाळा’, ‘पोरकी’, ‘पळसाला पाने तीन’, ‘यंदा कर्तव्य आहे’, ‘सोबती’ यासारख्या निवडक सहा मराठी चित्रपटांना खळे यांनी संगीत दिले. याशिवाय, आचार्य अत्रे लिखित ‘संगीत पाणिग्रहण’ या नाटकाचे संगीतही श्रीनिवास खळे यांचेच होते. तसेच, लता मंगेशकर आणि पंडित भीमसेन जोशी अशा दिग्गजांना घेऊन त्यांनी ‘रामश्याम गुणगान’ हा गीतसमूह संगीतबद्ध केला होता. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर राजा बढे यांनी लिहिलेल्या “जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा” या गीताला खळे यांनीच स्वरसाज चढवला होता.

    1968 सालापासून त्यांनी एचएमव्हीकडे संगीतकार म्हणून नोकरी करायला सुरूवात केली. 1973 साली लता मंगेशकर यांना घेऊन ‘अभंग तुकयाचे’ तर, पंडित भीमसेन जोशी यांच्याकडून ‘अभंगवाणी’ गाऊन घेतली. यांनाही प्रचंड लोकप्रियता मिळाली. हिंदी, संस्कृत, गुजराती, बंगाली इत्यादी भाषांमधील गीतांना खळे यांनी स्वरबद्ध केले असले तरी, त्यांचे खरे योगदान हे मराठी भावगीत या गीतप्रकारामध्ये आहे. त्यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली जवळजवळ 100हून जास्त गायक गायिकांनी गाणी गायलेली आहेत.

    श्रीनिवास खळे यांना 2010 साली भारत सरकारने पद्मभूषण या नागरी पुरस्काराने सन्मानित केले. याशिवाय, दत्ता डावजेकर पुरस्कार, लता मंगेशकर पुरस्कार, नटसम्राट बालगंधर्व पुरस्कार, संगीतरत्‍न पुरस्कार, सुधीर फडके पुरस्कार, सूर सिंगार पुरस्कार, स्वरयात्री समाजगौरव पुरस्कार, स्वररत्‍न पुरस्कार यासारखे अनेक सन्मान त्यांना मिळाले. 2 सप्टेंबर 2011 रोजी त्यांचे निधन झाले.


    आजचे राशीभविष्य

    मेष – विवेकबुद्धीची कसोटी लागणाऱ्या प्रसंगाला सामोरे जावे लागेल. खर्चावर नियंत्रण ठेवा, प्रत्येक निर्णय काळजीपूर्वक घ्या. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, कौटुंबिक बाबी शांततेने सोडवा. कधीतरी जोडीदाराकडून उसने घेतलेले पैसे त्यांनी परत मागितले तर, आश्चर्य वाटून घेऊ नका.

    वृषभ – आज नशीब तुमच्या बाजूने आहे. तुम्ही जे काही हाती घ्याल, त्यात यश नक्की मिळेल. आधी केलेल्या गुंतवणुकीतून नफा मिळेल, व्यवसायाला गती मिळेल. आपल्या शब्दांबाबत, विशेषतः जोडीदार आणि आईसोबत बोलताना काळजी घ्या, कारण लहानसहान गोष्टीही गंभीर रूप घेण्याची शक्यता आहे.

    मिथुन – आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल, एखाद्याला दिलेले पैसेही परत मिळू शकतील. तुम्ही घेतलेले निर्णय इतरांना आश्चर्यचकित करतील, मात्र भविष्यात तेच योग्य असल्याचे सिद्ध होईल. प्रवासाचे नियोजन केले जाईल. आज तुम्हाला समाजकार्यात रस वाटेल.

    कर्क – अपूर्ण कामे पूर्ण करण्याचा दिवस आहे, अन्यथा नंतर त्यामुळे समस्या निर्माण होऊ शकतात. वाहन चालवताना विशेष सावधगिरी बाळगा. वैवाहिक जीवनात जोडीदाराशी काहीसा दुरावा जाणवू शकतो, त्यामुळे संवाद कायम ठेवा. घरातील एका शुभप्रसंगाच्या निमित्ताने व्यग्र रहाल.

    सिंह – समाजात तुमची ओळख आणि प्रभाव वाढेल. तुमच्या शब्दांना आदर मिळेल, कामाच्या ठिकाणी कामावरच लक्ष केंद्रित ठेवण्याचा प्रयत्न करा. सहकाऱ्यांकडून पूर्ण पाठिंबा मिळेल. तुमची प्रगती होईल, पण मनात कोणाहीबद्दल मत्सर बाळगू नका. प्रवास करताना मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या.

    कन्या – दिवस धावपळीचा असेल. कामानिमित्त प्रवास करावा लागेल, ज्यामुळे तुम्हाला थकवा जाणवू शकतो. कुटुंबाबद्दल, विशेषतः वडिलोपार्जित मालमत्तेसंबंधी काही चिंता निर्माण होईल. तुम्हाला दिलेली कोणतीही जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडा. अन्यथा, घरातील वडीलधारी मंडळी नाराज होऊ शकतात.

    तुळ- आनंदाची एखादी बातमी मिळेल. कुटुंबात नवीन सदस्याचे आगमन किंवा लग्नाची तयारी यामुळे आनंदी वातावरण निर्माण होईल. मात्र प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला सांगणे टाळा. काही लोक याचा गैरफायदा घेऊ शकतात. तसेच, इतरांच्या मतांवर आधारित निर्णय घेणे हानिकारक ठरू शकते.

    वृश्चिक – कामाचा ताण थोडा त्रासदायक वाटू शकतो, पण त्यातून मिळणारे लहान लहान फायदे तुम्हाला समाधानी ठेवतील. एखाद्या गोष्टीवरून वाद निर्माण होऊ शकतो, मात्र तुम्ही संय़म ठेवून शांत राहा. करिअरबाबत कोणताही निष्काळजीपणा टाळा. कौटुंबिक स्तरावर शांतता आणि सुसंवाद राहील.

    हेही वाचा – प्रेम म्हणजे, प्रेम म्हणजे प्रेम असते…

    धनु – आज संधींची रेलचेल असू शकते. उत्पन्नाचे नवीन मार्ग खुले होतील. संध्याकाळी जुन्या मित्राला भेटल्याने आनंद होईल. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्यांना चांगली बातमी मिळू शकते. कर्ज घेण्यासंदर्भात सावधगिरी बाळगा, भविष्यात त्याची परतफेड करणे कदाचित कठीण होऊ शकते.

    मकर – आज थोडी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. घाईने घेतलेले निर्णय नुकसानीस कारणीभूत ठरू शकतात. प्रसंगी जाणकारांचा सल्ला घ्या. जुना मित्र भेटल्याने आनंद होईल. वेळ आणि पैसा या दोन्हींचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. विशेषत:, खर्चावर नियंत्रण ठेवा.

    कुंभ – व्यवसायात नफा होईल, मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे त्रास होऊ शकतो. अनुभवाचा योग्य वापर केला तर उत्तम प्रगती साधता येईल. सासरच्या मंडळींपैकी कोणीतरी अचानक तुम्हाला भेटायला येऊ शकते. मात्र त्यांना तुमच्या वैयक्तिक गोष्टी सांगणे टाळा. जोडीदारासोबत कोणत्याही प्रकारची लपवाछपवी टाळा.

    मीन – कठोर परिश्रमामुळेच तुमची ओळख निर्माण होईल. मित्रांना भेटणे आणि कुटुंबासोबत वेळ घालवणे यामुळे तुमचा मूड आनंदी बनेल. व्यावसायिकांना गरज भासल्यास आर्थिक मदत मिळू शकेल. कोणत्याही समस्या सोडवण्यासाठी जाणकार व्यक्तीचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 29 एप्रिल 2026

    April 29, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 28 एप्रिल 2026

    April 28, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 27 एप्रिल 2026

    April 27, 2026 पंचांग आणि भविष्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 29 एप्रिल 2026

    By Team AvaantarApril 29, 2026

    दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 29 एप्रिल 2026; वार : बुधवार भारतीय सौर : 09…

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 28 एप्रिल 2026

    April 28, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 27 एप्रिल 2026

    April 27, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 26 एप्रिल ते 02 मे 2026

    April 26, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 30 एप्रिल 2026

    April 30, 2026

    स्त्रीचे सौंदर्य अन् पुरुषाचे देखणेपण खुलते…

    April 29, 2026

    Bookshelf : ‘हिंदू’… भालचंद्र नेमाडेंनी सत्य समोर ठेवले, पण…

    April 29, 2026

    प्रेम म्हणजे, प्रेम म्हणजे प्रेम असते…

    April 29, 2026

    कालाय तस्मै नमः

    April 29, 2026

    Dnyaneshwari : अनावरें मुखें समोर देखे, तयाभेणें पाठीमोरा जंव ठाके

    April 29, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 282
    • अवांतर 184
    • आरोग्य 106
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 401
    • फिल्मी 47
    • फूड काॅर्नर 200
    • मैत्रीण 18
    • ललित 591
    • शैक्षणिक 77
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 30 एप्रिल 2026

    April 30, 2026

    स्त्रीचे सौंदर्य अन् पुरुषाचे देखणेपण खुलते…

    April 29, 2026

    Bookshelf : ‘हिंदू’… भालचंद्र नेमाडेंनी सत्य समोर ठेवले, पण…

    April 29, 2026
    Most Popular

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 30 एप्रिल 2026

    April 30, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.