Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    हेच पक्ष कार्यकर्त्याचं वास्तव!

    June 18, 2026

    अग्रवाल कपंनीच्या नवीन सीईओची घोषणा झाली अन्…

    June 18, 2026

    साधं वरण-भाताच्या वासात आई शोधताना…

    June 18, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Thursday, June 18
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 29 एप्रिल 2026
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 29 एप्रिल 2026

    Team AvaantarBy Team AvaantarApril 29, 2026No Comments5 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, पंचांग, दिनविशेष, Panchang, Dinvishesh, जून महिना
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दर्शन कुलकर्णी

    • आज, दिनांक : 29 एप्रिल 2026; वार : बुधवार
    • भारतीय सौर : 09 वैशाख शके 1948; तिथि : त्रयोदशी 19:51; नक्षत्र : हस्त 24:15;
    • योग : हर्षण 20:50; करण : कौलव 07:18;
    • सूर्य : मेष; चंद्र : कन्या; सूर्योदय : 06:13; सूर्यास्त : 18:59;
    • पक्ष : शुक्ल; अयन : उत्तरायण; संवत्सर : पराभव;
    • शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128

    प्रदोष

    वेद कन्सल्टन्सी / 9987433660


    दिनविशेष

    आंतरराष्ट्रीय ख्यातीचे भारतीय चित्रकार राजा रविवर्मा

    टीम अवांतर

    आंतरराष्ट्रीय ख्यातीचे भारतीय चित्रकार राजा रविवर्मा यांचा जन्म 29 एप्रिल 1848 रोजी केरळ राज्यातील किलीमानूरच्या (त्रिवेंद्रमपासून सुमारे 48 किमी) राजप्रासादात-मातृगृही झाला. त्यांना आईकडून कलेचा तर, वडिलांकडून संस्कृत साहित्याचा वारसा लाभला. लहानपणापासूनच त्यांचा चित्रकलेकडे विलक्षण ओढा होता. त्यांना कलेचे प्राथमिक धडे आणि प्रोत्साहन त्यांचे काका राजा राजवर्मा यांनी दिले. त्यांनी रविवर्मांना वयाच्या चौदाव्या वर्षी त्रिवेंद्रमच्या राजवाड्यात आणले. त्या काळात भारतातील अनेक संस्थानिक पाश्चात्त्य चित्रकारांकडून आपली व्यक्त्तिचित्रे रंगवून घेत असत. इंग्रज चित्रकार थीओडोर जेन्सन यांना  त्रिवेंद्रमच्या राजवाड्यात आमंत्रित केले होते. जेन्सन आणि राजदरबारचे चित्रकार रामस्वामी नायडू या दोघांचाही रविवर्मा यांच्यावर प्रभाव पडला. थीओडोर जेन्सन यांनी हाताळलेले तैलरंग हे माध्यम त्या काळी भारतीय कलापरंपरेला नवीनच होते. तरुण रविवर्मांच्या पुढे या माध्यमामुळे एक नवीन विश्वच उभे राहिले. मोठ्या उत्साहाने त्यांनी हे माध्यम आत्मसात करून,  त्यात विलक्षण प्रभुत्व संपादन केले.

    हेही वाचा – मुलगा राज रातोरात बदलल्याने सदानंद आणि सावित्रीबाई विचारात पडले…

    रविवर्मा यांचे खास वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी पाश्चात्त्य कलेतील वास्तववादी तंत्र आणि तैलरंगाचे माध्यम वापरून भारतीय महाकाव्यांतील प्रसंग आणि धार्मिक विषय रंगविले. या त्यांच्या अभिनव आविष्कारमुळे त्यांना भारतीय तैलरंगचित्रणाचे आद्यजनक मानले जाते. त्यांच्या चित्रांचे विषय प्रामुख्याने रामायण,  महाभारतादी महाकाव्यांच्या कथानकांतील पौराणिक व्यक्ती आणि  घटना यावर आधारित असत. विशेषतः लक्ष्मी,  सरस्वती,  शिव-पार्वती,  रामपंचायतन,  विश्वामित्र-मेनका,  कृष्णशिष्टाई यासारखी चित्रे त्या काळी घराघरांतून दर्शनी भागांत लावलेली दिसत. म्हणूनच राजेरजवाड्यांच्या आणि संस्थानिकांच्या महालांत अडकून पडलेली चित्रकला,  त्यांनी जनसामान्यांपर्यंत आणून पोहोचवली, असे म्हटले जाते.

    बडोद्याचे दिवाण सर माधवराव यांच्या सल्ल्यावरून त्यांनी लोणावळ्यानजीक मळवली येथे ओलिओग्राफीक छापखाना उभा केला आणि चित्रांच्या असंख्य प्रतिकृती तयार केल्या. या प्रतिकृती म्हणजे सध्याच्या कॅलेंडरची पूर्वपीठीका म्हणायला हवे. मद्रास येथे भरलेल्या प्रदर्शनात त्यांच्या शकुंतलापत्रलेखन या चित्राला प्रथम पारितोषिक मिळाले. तेव्हापासून त्यांची कीर्तिशिखराकडे वाटचाल सुरू झाली. 1880 साली पुणे येथे आणि 1892 मध्ये व्हिएन्ना तसेच शिकागो येथील प्रदर्शनांत त्यांची चित्रे प्रदर्शित करण्यात आली, ज्यामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली.

    सातवे एडवर्ड यांनी राजा रविवर्मा यांना ‘कैसर-इ-हिंद’ हे सुवर्णपदक देऊन गौरव केला. त्यांनी केलेले डॉ. दादाभाई नवरोजी यांचे व्यक्त्तिचित्र प्रसिद्ध आहे. किलीमानूर येथे 2 ऑक्टोबर 1906 रोजी त्यांचे निधन झाले. रणजित देसाई यांनी त्यांच्या जीवनावर आधारित राजा रविवर्मा ही चरित्रात्मक कादंबरी लिहिली आहे.


    आजचे राशीभविष्य

    मेष – उत्पन्नाचे नवीन मार्ग खुले होतील. फक्त चुकीच्या दिशेने पाऊल पडणार नाही, याची काळजी घ्या. आज थोडी अस्वस्थता जाणवू शकते; पण घाबरण्याची गरज नाही, कोणत्याही मोठ्या समस्या उद्भवणार नाहीत. कौटुंबिक जीवन सामान्य राहील.

    वृषभ – आज तुमचे मन थोडे अस्वस्थ आणि बेचैन असू शकते. ज्यामुळे तुम्हाला अकारण भीती किंवा चिंता वाटू शकते. कामात चढ-उतार बघायला मिळतील. शासकीय कामांमध्ये अडथळे येऊ शकतात. एकूणच, काळ थोडा मध्यम आहे, पण फार वाईट नाही. धीर धरा.

    मिथुन – आज प्रवास टाळणेच उत्तम राहील. केवळ नशिबावर अवलंबून राहू नका; कठोर परिश्रम आवश्यक आहेत. अडकलेले पैसे परत मिळू शकतात, उत्पन्नाचे नवीन मार्ग खुले होतील. व्यावसायिक वर्गाला अचानक मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे.

    कर्क – परिस्थिती थोडी आव्हानात्मक वाटू शकते, पण आर्थिक फायदाही होईल. न्यायालयीन खटले जिंकू शकता. आरोग्य, कुटुंब आणि संतती या तिन्ही ठिकाणी पाठिंबा चांगला राहील. व्यवसायातही चांगली वाढ होईल. नवीन कामाला सुरुवात करण्यासाठी अतिशय योग्य दिवस आहे.

    सिंह – आज नशीब तुमच्या बाजूने असेल. कामाच्या ठिकाणी प्रगतीची चिन्हे दिसत आहेत. नोकरीत किंवा व्यवसायात वाढ अपेक्षित आहे आणि त्यामुळे प्रवासाचीही शक्यता आहे. मात्र  आरोग्याकडे आणि जोडीदारासोबतच्या नात्याकडे विशेष लक्ष द्या.

    कन्या – पैशांचा वापर विचारपूर्वक करा, कारण मोठा आर्थिक फटका बसण्याची चिन्हे आहेत. जोखमीची गुंतवणूक करणे टाळा. शब्दांवर नियंत्रण ठेवा.  घरात किरकोळ वाद निर्माण होऊ शकतात. त्यामुळे शांत राहा. आज तोंड किंवा दातांशी संबंधित समस्या जाणवू शकतात.

    तुळ – आजचा दिवस थोडा तणावपूर्ण असू शकतो. दुखापत होण्याची किंवा काही अडचणीत सापडण्याची शक्यता आहे, त्यामुळे सावध रहा. शत्रू सक्रिय असतील, पण तुमचेच वर्चस्व राहील. आरोग्याची विशेष काळजी घ्या. कुटुंब, संतती आणि व्यवसाय या बाबतीत सर्व काही ठीक राहील.

    वृश्चिक – प्रत्येक कामात यश मिळण्याची शक्यता आहे. तरीही मानसिक गोंधळ आणि अस्वस्थता कायम राहू शकते. बेरोजगार लोकांना रोजगाराच्या संधी मिळू शकतात.  खर्च वाढू शकतो, त्यामुळे दिवसभरातील सगळ्या खर्चाची नोंद ठेवा. तब्येतीच्या कुरबुरी जाणवतील.

    हेही वाचा – आत्मसन्मान जपलाच पाहिजे…

    धनु – व्यवसायात जोडीदाराकडून पूर्ण पाठिंबा मिळेल, त्यामुळे कामात प्रगती होईल. नोकरदारांना पदोन्नती आणि नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे.मात्र मन थोडे अस्वस्थ राहील. संततीच्या आरोग्याची चिंता वाटेल.

    मकर – ज्ञानात वाढ होईल. वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद मिळतील. नवीन कल्पनांमुळे कामाच्या ठिकाणी यश मिळेल. मात्र, घरातील वातावरण काहीसे नकारात्मक असू शकते. आईच्या आरोग्याबाबत आणि मालमत्तेच्या बाबतीत समस्या निर्माण होऊ शकतात.

    कुंभ – पैसा, कुटुंब आणि संततीसाठी काळ अनुकूल आहे. भावनांवर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ तुमच्या कामावर खूश होतील त्यामुळे बढती मिळण्याची शक्यता आहे. नवीन लोकांशी संपर्क साधणे भविष्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरेल.

    मीन – सावधगिरीने पावले उचलण्याची गरज आहे. सरकारी कामात अडथळे येऊ शकतात. तुमची मेहनत आणि सकारात्मक विचार तुम्हाला यश मिळवून देतील. तथापि, कुटुंब, संतती, व्यवसाय आणि भागीदारीच्या संदर्भात काही समस्या निर्माण होऊ शकतात.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 18 जून 2026

    June 18, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 17 जून 2026

    June 17, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 16 जून 2026

    June 16, 2026 पंचांग आणि भविष्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 18 जून 2026

    By Team AvaantarJune 18, 2026

    दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 18 जून 2026; वार : गुरुवार भारतीय सौर : 28…

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 17 जून 2026

    June 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 16 जून 2026

    June 16, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 15 जून 2026

    June 15, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    हेच पक्ष कार्यकर्त्याचं वास्तव!

    June 18, 2026

    अग्रवाल कपंनीच्या नवीन सीईओची घोषणा झाली अन्…

    June 18, 2026

    साधं वरण-भाताच्या वासात आई शोधताना…

    June 18, 2026

    Dnyaneshwari : गाईची तृषा हरूं, कां व्याघ्रा विष होऊनि मारूं

    June 18, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 18 जून 2026

    June 18, 2026

    बंधनं… आयुष्याचं ऑक्सिजन!

    June 17, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 332
    • अवांतर 190
    • आरोग्य 121
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 458
    • फिल्मी 53
    • फूड काॅर्नर 224
    • मैत्रीण 21
    • ललित 714
    • शैक्षणिक 81
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    हेच पक्ष कार्यकर्त्याचं वास्तव!

    June 18, 2026

    अग्रवाल कपंनीच्या नवीन सीईओची घोषणा झाली अन्…

    June 18, 2026

    साधं वरण-भाताच्या वासात आई शोधताना…

    June 18, 2026
    Most Popular

    हेच पक्ष कार्यकर्त्याचं वास्तव!

    June 18, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.