Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 26 मे 2026

    May 26, 2026

    स्नेहल रेल्वेपुलावरून गडगडत खाली आली…

    May 26, 2026

    …म्हणून मी मरणार नाही!

    May 25, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, May 26
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 26 मे 2026
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 26 मे 2026

    Team AvaantarBy Team AvaantarMay 26, 2026No Comments5 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, पंचांग, दिनविशेष, Panchang, Dinvishesh, अधिक मास
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दर्शन कुलकर्णी

    • आज, दिनांक : 26 मे 2026; वार : मंगळवार
    • भारतीय सौर : 05 ज्येष्ठ शके 1948; तिथि : एकादशी अहोरात्र; नक्षत्र : हस्त 29:56;
    • योग : सिद्धि 27:09; करण : वणिज 17:42;
    • सूर्य : वृषभ; चंद्र : कन्या; सूर्योदय : 06:01; सूर्यास्त : 19:09;
    • पक्ष : शुक्ल; अयन : उत्तरायण; संवत्सर : पराभव;
    • शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128

    वेद कन्सल्टन्सी / 9987433660


    दिनविशेष

    जामखेड मॉडेलचे प्रणेते डॉक्टर रजनीकांत आरोळे

    टीम अवांतर

    जामखेड मॉडेलचे प्रणेते डॉक्टर रजनीकांत शंकरराव आरोळे यांचा जन्म राहुरी येथे 10 जुलै 1934 रोजी झाला. त्यांचे आई-वडील दोघेही शाळेत शिक्षक होते. अगदी लहानपणीच त्यांचे दोन मित्र योग्य औषधोपचार न मिळाल्याने दगावले आणि तिथेच आरोळे यांनी डॉक्टर बनण्याचा तसेच ग्रामीण भागात काम करण्याचा निर्णय घेतला.

    कोलार येथील ईटीसीएम रुग्णालयात 1960मध्ये निवासी डॉक्टर म्हणून त्यांनी काम सुरू केले. 1962मध्ये ते अहमदनगरमधील वडाळा मिशन जिल्ह्यातील एफजेएफएम रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक म्हणून रुजू झाले. 1966 साली  त्यांना फुलब्राइट शिष्यवृत्ती मिळाली. या काळात त्यांनी अमेरिकेतील ओहायो राज्यातील क्लीव्हलँड येथील लुथरन रुग्णालयात निवासी डॉक्टर म्हणून काम केले. 1970 मध्ये ते अहमदनगर (आताचे अहिल्यानगर) जिल्ह्याच्या जामखेड येथील व्यापक ग्रामीण आरोग्य प्रकल्पाचे संचालक म्हणून देखरेख करण्यासाठी भारतात परतले. ग्रामीण भागात खऱ्या अर्थाने आपल्या सेवेची गरज आहे, हे लक्षात घेऊन त्यांनी जामखेडला स्थायिक व्हायचे ठरवले.

    हेही वाचा – …म्हणून मी मरणार नाही!

    कुपोषण, बालमृत्यूंचे असणारे लक्षणीय प्रमाण, टीबी, दूषित पाण्यामुळे होणारे रोग अशा आरोग्य समस्यांनी ग्रस्त अशा जामखेडमध्ये त्यांनी स्वावलंबी ग्रामीण आरोग्य सेवा आणि आर्थिक उन्नतीची चळवळ उभी केली आणि ती यशस्वी करून दाखवली. या चळवळीच्या माध्यमातून त्यांनी हजारो गरीब रुग्णांवर मोफत वैद्यकीय उपचार केले. त्यांचा ‘आरोळे पॅटर्न’ देखील प्रचंड लोकप्रिय झाला होता. सामाजिक आरोग्य सेवेचे आयामच त्यांनी बदलून टाकले. या कामात त्यांच्या डॉक्टर पत्नी मेबल कमला इम्यॅन्युअल यांची भक्कम साथ मिळाली.

    ‘जामखेड मॉडेल’ वापरून सामुदायिक विकासाला ग्रामीण आरोग्यसेवेच्या व्यापक दृष्टिकोनाशी जोडण्याच्या त्यांच्या यशाची दखल अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांनी घेतली आहे. आरोग्य क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल डॉ. अरोले यांना मदर तेरेसा पुरस्कार, भारत सरकारचा पद्मभूषण पुरस्कार तसेच आशिया विभागातील नोबेल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रॅमन मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 26 मे 2011 रोजी डॉक्टर आरोळे यांचे निधन झाले.


    आजचे राशीभविष्य

    मेष – एका मागोमाग एक येणाऱ्या कामांमुळे दिवस काहीसा तणावपूर्ण वाटेल. मात्र वेळेचे योग्य नियोजन केले, तर सर्व काही सुरळीतपणे पार पडेल. नोकरी किंवा करिअरबद्दल जवळच्या मित्राने दिलेला सल्ला तुमचा मार्ग मोकळा करू शकतो. कुटुंबात तुमच्या मतांना महत्त्व दिले जाईल. समाजात लोक तुमच्या बुद्धिमत्तेची प्रशंसा करतील.

    वृषभ – नोकरी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी वादात अडकणे महागात पडू शकते, त्यामुळे शांत राहणेच उत्तम. आत्मविश्वास हाच तुमचा आज सर्वात मोठा आधार बनणार आहे. अनावश्यक खर्च टाळून बचतीवर भर द्या. घरातील वातावरण पूर्वीपेक्षा अधिक शांत आणि आनंदी असेल. एखाद्याशी नातेसंबंध बिघडले असतील, तर आज त्यात पुन्हा गोडवा येईल.

    मिथुन – नवीन घर, जमीन किंवा मालमत्तेच्या बाबतीत चांगली बातमी मिळू शकते. दीर्घकाळ प्रलंबित असलेला एखादा प्रकल्प अखेर पूर्ण होईल. मेहनत आणि समर्पण तुम्हाला वेगळी ओळख मिळवून देऊ शकते. सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या मिळू शकतात. तथापि, बोलण्यावर ताबा ठेवा, नकळतपणे कोणीतरी दुखावले जाऊ शकते.

    कर्क – कोणाबद्दलही मत्सर किंवा नकारात्मक भावना मनात बाळगणे टाळा, कारण त्यामुळे मनःशांती भंग होईल. नोकरदारांवर नवीन जबाबदारी सोपविली जाऊ शकते, त्याला सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. व्यवसायात कोणतेही वाद टाळणे शहाणपणाचे ठरेल. विद्यार्थ्यांसाठी दिवस आनंदाचा आहे, मेहनतीचे चांगले फळ मिळण्याची अपेक्षा आहे.

    सिंह – आजचा दिवस तुम्हाला स्वतःला सिद्ध करण्याची संधी देणारा ठरेल. एखाद्या सहकाऱ्याच्या शब्दांनी तुम्हाला दुःख होऊ शकते, पण तुमचा आत्मविश्वास आणि कठोर परिश्रम सर्वांचे लक्ष वेधून घेतील. जोडीदाराचे यश किंवा पदोन्नती घरात आनंद आणू शकते. आर्थिक समस्यांमुळे थांबलेले काम आज पुढे सरकू शकते.

    कन्या – सामाजिक कार्यक्रमातील तुमची उपस्थिती लोकांना प्रभावित करेल. गाडी चालवताना काळजी घ्या. कोणीही न मागितलेला सल्ला देणे टाळा, कारण यामुळे गैरसमज निर्माण होऊ शकतात. भावंडांसोबतचे नातेसंबंध अधिक दृढ होतील. घरात एखाद्या शुभ कार्याची तयारी सुरू होऊ शकते, ज्यामुळे उत्साहाचे वातावरण निर्माण होईल.

    तुळ – आजचा दिवस अपेक्षेपेक्षा अधिक सकारात्मक ठरू शकतो. व्यवसायात पूर्वीपेक्षा चांगले परिणाम दिसतील आणि तुमचा आत्मविश्वास वाढेल. कामाच्या ठिकाणी इतरांवर अवलंबून राहण्याऐवजी स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवल्याने प्रगती साधता येईल. भूतकाळातील निर्णयांबद्दल थोडे दुःख वाटू शकते, पण तेच अनुभव आता तुमची ताकद बनतील.

    वृश्चिक – भागीदारीतून एक मोठा व्यावसायिक करार फायदेशीर ठरू शकतो. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ तुमच्या मेहनतीची दखल घेतील. तुमच्या काही निर्णयांमुळे संतती काहीशी अस्वस्थ होईल. म्हणून त्यांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा. घराच्या सजावटीचे किंवा नूतनीकरणाचे काम सुरू होऊ शकते. ऑनलाइन खरेदी करताना सावधगिरी बाळगा.

    हेही वाचा – पेरू खाणे म्हणजे सुखाची परिसीमा, पण…

    धनु – प्रत्येक पावलावर नशीब तुमच्या सोबत असेल. अडचणीत असलेल्या कोणाला पैसे उधार दिले असतील, तर ते तुम्हाला परत मिळतील, अशी चिन्हे आहेत. जोडीदाराकडून मिळणारे एक गोड आश्चर्य तुम्हाला आनंद देईल. सभोवतालच्या लोकांचे हेतू समजून त्यानुसार भूमिका घ्या. हितचिंतक बनलेल्या एखाद्याकडून फसवणूक होऊ शकते.

    मकर – कामातील शिस्त आणि कठोरता तुम्हाला वेळेंभीवर यश मिळवून देईल. वरिष्ठांचे बोलणे गांभीर्याने न घेणे हानिकारक ठरू शकते. वडिलोपार्जित मालमत्तेबाबत चर्चा किंवा मतभेद निर्माण होऊ शकतात. भूतकाळातील चुकांमधून शिकणे आज खूप उपयुक्त ठरेल. कुटुंबात नवीन सदस्याच्या आगमनाची आनंदाची बातमी वातावरण प्रफुल्लित करू शकते.

    कुंभ – दिवस हास्य, मजा आणि जुन्या नात्यांच्या गोडव्याने भरलेला असेल. जुन्या मित्रासोबतची अचानक भेट सुखद आठवणी जागवेल. मात्र, संभाषणादरम्यान शब्द जपून वापरा. कुटुंबातील वडीलधाऱ्यांसोबत एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा कराल, त्यातून एखाद्या समस्येवर तोडगा निघू शकेल. दीर्घकाळ प्रलंबित एखादे काम पूर्ण झाल्याने दिलासा मिळेल.

    मीन – मालमत्ता खरेदी किंवा विक्री करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी हा अनुकूल काळ आहे. शेअर बाजाराशी संबंधित असलेल्यांनी घाई टाळावी. विद्यार्थ्यांना मानसिक तणावातून दिलासा मिळेल आणि ते अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकतील. समाजकार्यातील योगदानाने तुमच्याबद्दलचा आदर वाढेल. एखादा सन्मान किंवा पुरस्कार मिळण्याची शक्यता आहे.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 25 मे 2026

    May 25, 2026 पंचांग आणि भविष्य

    साप्ताहिक राशीभविष्य : 24 ते 30 मे 2026

    May 24, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 24 मे 2026

    May 24, 2026 पंचांग आणि भविष्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 25 मे 2026

    By Team AvaantarMay 25, 2026

    दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 25 मे 2026; वार : सोमवार भारतीय सौर : 04…

    साप्ताहिक राशीभविष्य : 24 ते 30 मे 2026

    May 24, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 24 मे 2026

    May 24, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 23 मे 2026

    May 23, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 26 मे 2026

    May 26, 2026

    स्नेहल रेल्वेपुलावरून गडगडत खाली आली…

    May 26, 2026

    …म्हणून मी मरणार नाही!

    May 25, 2026

    पेरू खाणे म्हणजे सुखाची परिसीमा, पण…

    May 25, 2026

    एक दिवस माझ्यासाठी रडशील तू….

    May 25, 2026

    Dnyaneshwari : ‘कृष्णा’ म्हणोनि हाकारिजे, यादवपणें तूतें लेखिजे

    May 25, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 308
    • अवांतर 187
    • आरोग्य 113
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 432
    • फिल्मी 48
    • फूड काॅर्नर 213
    • मैत्रीण 19
    • ललित 653
    • शैक्षणिक 81
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 26 मे 2026

    May 26, 2026

    स्नेहल रेल्वेपुलावरून गडगडत खाली आली…

    May 26, 2026

    …म्हणून मी मरणार नाही!

    May 25, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.