Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Kitchen Tips : दाल फ्राय, टेस्टी ताक, शिळ्या भाताचा नाश्ता करताना…

    April 16, 2026

    आधी महामूर्ख ठरला आणि नंतर सर्वोच्च पुरस्काराने गौरविला!

    April 16, 2026

    Dnyaneshwari : हें युगचि आघवें बुडावें, वरि आकाशहि तुटोनि पडावें…

    April 16, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Thursday, April 16
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Panchang : आजचे पंचांग, राशीभविष्य आणि दिनविशेष, 24 डिसेंबर 2025
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, राशीभविष्य आणि दिनविशेष, 24 डिसेंबर 2025

    Team AvaantarBy Team AvaantarDecember 24, 2025No Comments5 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, पंचांग, दिनविशेष, Panchang, Dinvishesh,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दर्शन कुलकर्णी

    • आज, दिनांक : 24 डिसेंबर 2025; वार : बुधवार
    • भारतीय सौर : 03 पौष अग्रहायण शके 1947; तिथि : चतुर्थी 13:10; नक्षत्र : धनिष्ठा अहोरात्र
    • योग : हर्षण 16:01; करण : बव 25:30
    • सूर्य : धनु; चंद्र : मकर 19:45; सूर्योदय : 07:07; सूर्यास्त : 18:06
    • पक्ष : शुक्ल; ऋतू : हेमंत; अयन : उत्तरायण
    • संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5127

    वेद कन्सल्टन्सी / 9987433660


    आजचे राशीभविष्य

    मेष – दिवसाची सुरुवात थोडीशी दडपणाखाली झाली, असे वाटू शकते. एकाच वेळी मनात अनेक गोष्टी येतील, ज्यामुळे लक्ष विचलित होऊ शकते. कामात घाई करणे हानिकारक ठरेल, म्हणून काहीही करण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा. जवळच्या व्यक्तीशी वाद होऊ शकतो, परंतु वाद जास्त वाढवू नका. संध्याकाळी गोष्टी शांत होतील आणि हलके वाटेल.

    वृषभ – आजचा दिवस शांत आणि संतुलित असेल. दैनंदिन कामे तणावाविना पूर्ण होतील. कुटुंबातील सदस्याशी संवाद साधल्याने सकारात्मक मूड येईल. क्षमतेनुसार खर्च करा आणि दिखाऊपणा टाळा. आरोग्य चांगले राहील, फक्त आळसाला वर्चस्व गाजवू देऊ नका.

    मिथुन – संभाषण करताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. कारण समोरच्या व्यक्तीकडून तुमच्या शब्दांचा चुकीचा अर्थ काढला जाऊ शकतो. तसेच फोनद्वारे वाद घालणे टाळा. नोकरी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी व्यग्र राहाल. एखादे जुने काम पूर्ण करण्याची संधी मिळू शकते.

    कर्क – दिवस मनासारखा जाणार नाही. छोट्या छोट्या गोष्टीही तुमच्या भावना दुखवू शकतात. कामावर तुमचे कष्ट स्पष्ट दिसतील, परंतु प्रशंसा थोडी कमीच होईल. कार्यक्षमता वाढविण्यासाठी नवे तंत्र आत्मसात करा. विश्वासू व्यक्तीशी बोलल्याने तुम्हाला बरे वाटेल.

    सिंह – आजचा दिवस अतिशय व्यग्र असू शकतो. कामात विविध अडथळे येऊ शकतात आणि त्यामुळे चिडचिड होण्याची शक्यता आहे. रागाच्या भरात निर्णय घेणे टाळा. इतरांकडून जास्त अपेक्षा करू नका. संयमाने मोठी हानी टाळता येईल. संध्याकाळनंतर परिस्थिती हळूहळू सुधारेल.

    कन्या – आज काम आणि जबाबदाऱ्या दोन्ही वाढतील. कामात दिरंगाई केल्याने दबाव वाढू शकतो. कुटुंबात तुमच्या मतांची कदर केली जाईल. थोडासा थकवा किंवा जडपणा जाणवू शकतो, म्हणून आराम करा. दिवस तुलनेत कठीण असेल पण योग्य व्यवस्थापन केले तर काम सुरळीतपणे पूर्ण करता येईल.

    तुळ – आजचा दिवस अनुकूल असेल. प्रलंबित कामांमध्ये प्रगती होईल, त्यामुळे मन आनंदी असेल. थोडाफार आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. फक्त कामावरच लक्ष केंद्रित करणे योग्य ठरेल. आरोग्य सामान्य राहील, परंतु जर तुम्हाला थकवा जाणवत असेल तर विश्रांती घेणे आवश्यक आहे. एकंदरीत, दिवस समाधानकारक राहील.

    हेही वाचा – सखूबाई अन् आंब्याची कलमं…

    वृश्चिक – आजचा दिवस चित्त विचलित होणारा आहे. काम करताना तुमचे मन भरकटेल. एखाद्या कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी एखाद्या मित्राची किंवा ओळखीच्या व्यक्तीची मदत घ्यायला लागू शकते. आर्थिक जोखीम टाळा. संध्याकाळी ताण कमी होईल आणि तुमचा मूड सुधारेल.

    धनु – आज मन द्विधा मन:स्थितीत असू शकते. एखाद्या निर्णयाबद्दल वारंवार विचार कराल. नातेसंबंधांमध्ये भावना दाबून ठेवण्यापेक्षा स्पष्टपणे बोलणे चांगले. आज काम करण्याची फारशी इच्छा वाटणार नाही. खर्च वाढण्याची शक्यता आहे, म्हणून सावधगिरी बाळगा. संध्याकाळी अनेक गोष्टींबद्दल स्पष्टता मिळेल.

    मकर – आज, कठोर परिश्रम आणि जबाबदारी दोन्ही जास्त असतील. कामाचा ताण जाणवू शकतो, परंतु तुम्ही तो उत्तम प्रकारे हाताळाल. जुन्या विषयावर पुन्हा चर्चा होऊ शकते. रागात उच्चारलेले शब्द हानिकारक ठरू शकतात, म्हणून संयम बाळगा.

    कुंभ – एखाद्या गोष्टीचा नव्याने विचार कराल, काहीतरी बदल करावासा वाटेल. जुन्या कामाचा किंवा रुटीनचा कंटाळा येऊ शकतो. एखादा मित्र किंवा ओळखीची व्यक्ती मदत करू शकेल. एखादी ट्रीप किंवा छोटी सहल आयोजित करू शकता. खर्च थोडा वाढेल, परंतु तो महत्त्वाच्या कामासाठी असेल.

    मीन – आज मन शांत आणि स्थिर असेल. जास्त विचार करावासा वाटणार नाही. काम हळूहळू होईल, परंतु ते तणावमुक्त असेल. आनंदाचा एक छोटासा क्षण किंवा चांगली बातमी तुमचा दिवस सकारात्मक बनवेल. कौटुंबिक कार्यक्रमात मोठ्या उत्साहात सहभागी व्हाल.


    दिनविशेष

    सदाबहार गायक मोहम्मद रफी

    टीम अवांतर

    भारतीय संगीताच्या सुवर्ण काळात आपल्या आवाजाने अवीट छाप सोडणारे सदाबहार गायक मोहम्मद रफी यांचा जन्म 24 डिसेंबर 1924 रोजी अमृतसरच्या कोटला सुलतान सिंग येथे  झाला. शेतीची किंवा शिक्षणाची आवड नाही, असे पाहून त्यांना त्यांच्या थोरल्या भावाकडे लाहोरला धाडण्यात आले. थोरल्या भावाने रफी यांचे गाण्याचे अंग लगेच हेरले आणि छोटे गुलाम अली खाँसाहेब, अब्दुल वहीद खाँसाहेब अशा उस्तादांकडून त्यांना गाणे शिकवण्याची व्यवस्था केली. पुढे रफी यांनी फिरोझ निझामी यांच्याकडे दोन वर्षे शागिर्दी केली. निझामी जेव्हा लाहोर नभोवाणी केंद्राचे संगीत-दिग्दर्शक झाले, तेव्हा त्यांनी रफी यांना नभोवाणीवर गायनाची संधी दिली.  तर, एका कार्यक्रमात प्रसिद्ध गायक के. एल. सेहगल यांनी वीज गेल्याने स्टेजवर गाणे म्हणण्यास नकार दिला होता. त्यामुळे तिथे उपस्थित 13 वर्षीय मोहम्मद रफी यांना गाणे गाण्याची संधी मिळाली होती. त्यांचे गाणे ऐकून हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध संगीतकार श्यामसुंदर यांनी गुलबलोच या पंजाबी चित्रपटात त्यांना दोन गीते गाण्याची संधी दिली.

    हेही वाचा – Education : शिक्षकांचा दृष्टिकोन सकारात्मक हवा

    दिग्दर्शक नाझीर यांच्या आग्रहामुळे रफी मुंबईच्या चित्रपटासृष्टीत आले आणि त्यांनी नाझीर यांच्या लैला मजनू या चित्रपटात छोटी भूमिकाही केली. तथापि रफी यांच्या गळ्याची तसेच गायकीची ओळख असणारे संगीतकार त्यावेळी मुंबईत नव्हते. योगायोगाने लाहोरचे संगीतकार श्यामसुंदर त्याचवेळी मुंबईत आले आणि त्यांनी रफी यांना गाँव की गोरी या पहिल्याच हिंदी चित्रपटात पार्श्वगायनाची संधी दिली. तरीही त्यांचे मुंबईत नीट बस्तान बसले नाही. सुदैवाने त्यांचे गुरू फिरोझ निझामी हे त्याच वेळेस जुगनू या चित्रपटाचे संगीतकार म्हणून मुंबईत आले आणि साहजिकच रफी यांनी त्या चित्रपटात पार्श्वगायक म्हणून संधी मिळाली. त्या चित्रपटातील ‘यहाँ बदला वफा का’ या नूरजहाँबरोबर गायलेल्या द्वंद्वगीतामुळे रफी यांची खास पंजाबी ढंगाची गायकी एकदम लोकप्रिय झाली. तर, प्यार की जीत या चित्रपटातील ‘इस दिल के टुकडे हजार हुए’ या हुस्नलाल-भगतराम यांनी स्वरबद्ध केलेल्या गाण्यामुळे रफी यांना अधिक प्रसिद्धी मिळाली आणि ती पुढे सतत वाढतच गेली. 36 वर्षांच्या कालावधीत मोहम्मद रफी यांनी पाच हजार हिंदी गाण्यांसह भजन, रागदारी, गजल, कवाली अशा निरनिराळ्या गीतप्रकारांमध्ये सुमारे 25 हजारांवर गाणी आपल्या दर्दभऱ्या, मुलायम आवाजात गाऊन प्रथम श्रेणीचा पार्श्वगायक म्हणून कीर्ती मिळविली. विशेष म्हणजे, त्यांनी गायलेली सगळी मराठी गाणी त्यांनी संगीतकार श्रीकांत ठाकरे यांच्याकडे गायली.

    1948 मध्ये त्यांनी गायलेले ‘सुनो ऐ दुनिया वालों बापूजी की अमर कहानी’ हे गाणे प्रचंड गाजले. हे गाणे ऐकून तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी आपल्या निवासस्थानी रफी यांना गाण्यासाठी निमंत्रण दिलं होतं. 1960 चे दशक हे रफी यांच्यासाठी खास होते, त्याच वर्षी त्यांना ‘चौदहवी का चाँद’ च्या शीर्षकगीतासाठी पहिल्यांदाच फिल्मफेअर अवॉर्ड मिळाले. त्यांच्या संपूर्ण करिअरमध्ये रफी यांना 23 वेळा फिल्मफेअर अवॉर्डसाठी नामांकन मिळाले होते. त्यापैकी 6 वेळा त्यांना हा पुरस्कार मिळाला होता. 1967 साली त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला. अशा या महान गायकाचे 31 जुलै 1980 रोजी निधन झाले.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 16 एप्रिल 2026

    April 16, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 15 एप्रिल 2026

    April 15, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 14 एप्रिल 2026

    April 14, 2026 पंचांग आणि भविष्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 16 एप्रिल 2026

    By Team AvaantarApril 16, 2026

    दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 16 एप्रिल 2026; वार : गुरुवार भारतीय सौर : 26…

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 15 एप्रिल 2026

    April 15, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 14 एप्रिल 2026

    April 14, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य;13 एप्रिल 2026

    April 13, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Kitchen Tips : दाल फ्राय, टेस्टी ताक, शिळ्या भाताचा नाश्ता करताना…

    April 16, 2026

    आधी महामूर्ख ठरला आणि नंतर सर्वोच्च पुरस्काराने गौरविला!

    April 16, 2026

    Dnyaneshwari : हें युगचि आघवें बुडावें, वरि आकाशहि तुटोनि पडावें…

    April 16, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 16 एप्रिल 2026

    April 16, 2026

    …तेच मातीने माखलेले पाय!

    April 15, 2026

    बरसणारा पाऊस अन् सासू-सुनेतील प्रेमाचा ओलावा…

    April 15, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 269
    • अवांतर 182
    • आरोग्य 101
    • थर्ड अंपायर 4
    • पंचांग आणि भविष्य 386
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 195
    • मैत्रीण 18
    • ललित 557
    • शैक्षणिक 77
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Kitchen Tips : दाल फ्राय, टेस्टी ताक, शिळ्या भाताचा नाश्ता करताना…

    April 16, 2026

    आधी महामूर्ख ठरला आणि नंतर सर्वोच्च पुरस्काराने गौरविला!

    April 16, 2026

    Dnyaneshwari : हें युगचि आघवें बुडावें, वरि आकाशहि तुटोनि पडावें…

    April 16, 2026
    Most Popular

    Kitchen Tips : दाल फ्राय, टेस्टी ताक, शिळ्या भाताचा नाश्ता करताना…

    April 16, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.