Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : तो तूं परब्रह्मचि असकें, मज दैवें दिधलासि हस्तोदकें…

    April 11, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 11 एप्रिल 2026

    April 11, 2026

    हळदीकुंकू… जुनी प्रथा मोडून काढणारे!

    April 10, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Saturday, April 11
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष, 22 मार्च 2026
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष, 22 मार्च 2026

    Team AvaantarBy Team AvaantarMarch 22, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, पंचांग, दिनविशेष, Panchang, Dinvishesh,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दर्शन कुलकर्णी

    • आज, दिनांक : 22 मार्च 2026; वार : रविवार
    • भारतीय सौर : 01 चैत्र शके 1948; तिथि : चतुर्थी 21:17; नक्षत्र : भरणी 22:42;
    • योग : वैधृति 15:41; करण : वणिज 10:37;
    • सूर्य : मीन; चंद्र : मेष 28:13; सूर्योदय : 06:43; सूर्यास्त : 18:49;
    • पक्ष : शुक्ल; मास : चैत्र; अयन : उत्तरायण; संवत्सर : पराभव;
    • शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128.

    विनायक चतुर्थी

    वेद कन्सल्टन्सी / 9987433660

    हेही वाचा – प्रेमळ रजिया आपा अन् शीर खुर्मा


    दिनविशेष

    मराठी नाटककार, कथाकार, गीतकार मधुसूदन कालेलकर

    टीम अवांतर

    मराठी नाटककार, कथाकार, गीतकार आणि पटकथाकार मधुसूदन कालेलकर यांचा जन्म 22 मार्च 1924 रोजी वेंगुर्ले येथे झाला. शालेय शिक्षण वेंगुर्ल्यात झाल्यावर ते मुंबईत आले. सुरुवातीला गिरगावात राहात असताना गणेशोत्सवाच्या निमित्ताने त्यांनी पहिले नाटक लिहिले आणि तेव्हापासून त्यांनी आपल्या लेखनात त्यांनी प्रामुख्याने कौटुंबिक, गंभीर, विनोदी, सामाजिक असे विविध प्रकारचे विषय हाताळले. हिंदी-मराठी या दोन्ही भाषांमध्ये चित्रपट, नाटक आणि गीत अशा विविध माध्यमांतून सकस साहित्यलेखन त्यांनी केले.

    ‘अखेर जमलं’ चित्रपटासाठी त्यांनी विनोदी कथा लिहिली आणि तो चित्रपट गाजला. राजा नेने याच्या हाताखाली काम करून त्यांनी चित्रीकरण आणि पटकथा लेखन यांचा अनुभव मिळविला. एका मागोमाग एक असे त्यांचे 75हून अधिक चित्रपट प्रदर्शित झाले आणि सिद्धहस्त पटकथा लेखक म्हणून त्यांचा लौकिक झाला. ‘आम्ही जातो आमुच्या गावा’, ‘पाहू रे किती वाट’, ‘अपराध’, ‘जावई विकत घेणे आहे’, ‘अनोळखी’, ‘गुपचूप गुपचूप’ हे त्यांचे प्रमुख मराठी चित्रपट म्हणता येतील. तर, ‘बाळा गाऊ कशी अंगाई’ चित्रपटातील ‘निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई…’ हे अंगाई गीत तुफान लोकप्रिय झाले आणि या गीतासाठी कालेलकर यांना सर्वोत्कृष्ट गीत लेखनाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.

    याशिवाय, ‘दिवा जळू दे सारी रात’, ‘ही वाट दूर जाते’, ‘अबोल झालीस का?’, ‘कल्पवृक्ष कन्येसाठी’, ‘ चांदणे शिंपीत जा’, ‘या घर आपलंच आहे’, ‘नाथ हा माझा’, ‘डार्लिंग डार्लिंग’, ‘हे फुल चंदनाचे’, ‘अमृतवेल’ आणि माधवराव पेशव्यांच्या जीवनावर आधारित ‘ही श्रींची इच्छा’ ही नाटकं रसिक प्रेक्षकांनी उचलून घेतली. ‘अपराध मीच केला,’ ‘सागरा प्राण तळमळला’ आणि ‘शिकार’ या त्यांच्या नाटकांना महाराष्ट्र शासनाचे सर्वोत्कृष्ट साहित्यिक कलाकृतीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

    हेही वाचा – अनुलोम-विलोम प्राणायाम अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य

    हिंदी सिनेसृष्टीतही त्यांनी आपल्या प्रतिभेची चमक दाखविली. ‘बात एक रात की’ ,‘ब्लफ मास्टर’, ‘झुमरू’, ‘फरार’, ‘दुल्हन वही जो पिया मन भाये’, ‘अखियों के झरोखों से’, ‘गीत गाता चल’ असे एकापेक्षा एक सरस चित्रपटांची नावे घेता येतील. आपल्या कारकिर्दीत मधुसूदन कालेलकर यांनी एकूण 29 नाटके आणि मराठी तसेच हिंदी मिळून 111 चित्रपटांसाठी लिखाण केले. 70हून जास्त त्यांनी चित्रपट गीते लिहिली. अनेक नाटकांचे गुजराती भाषेत प्रयोग झाले, तर तीन ते चार नाटकांवर हिंदी व मराठीत चित्रपटही झाले आहेत.

    त्यांच्या ‘हा माझा मार्ग एकला’ चित्रपटाला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला आहे. महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सवात सर्वोत्तम कथा, पटकथा आणि संवाद यासाठी एकूण नऊ वेळा त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या व्यतिरिक्त त्यांना तीन वेळा रसरंग फाळके गौरवचिन्ह पुरस्कार देण्यात आला आहे. या प्रतिभावंत लेखकाचे 17 डिसेंबर 1985 रोजी निधन झाले.


    विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशीलतेला समर्पित असलेल्या avaantar.com या वेबपोर्टलवरील वैविध्यपूर्ण वाचनीय लेखाचा आनंद घ्यायचा असेल तर,

    IXZVpuvKFwKH6gb0NBN51t?mode=r_c

    या लिंकला क्लिक करून WhatsApp group जॉइन करा.


     

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 11 एप्रिल 2026

    April 11, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 10 एप्रिल 2026

    April 10, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष, 09 एप्रिल 2026

    April 9, 2026 पंचांग आणि भविष्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 11 एप्रिल 2026

    By Team AvaantarApril 11, 2026

    दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 11 एप्रिल 2026; वार : शनिवार भारतीय सौर : 21…

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 10 एप्रिल 2026

    April 10, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष, 09 एप्रिल 2026

    April 9, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 08 एप्रिल 2026

    April 8, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : तो तूं परब्रह्मचि असकें, मज दैवें दिधलासि हस्तोदकें…

    April 11, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 11 एप्रिल 2026

    April 11, 2026

    हळदीकुंकू… जुनी प्रथा मोडून काढणारे!

    April 10, 2026

    आराध्या तन्वीसह मोठ्या कंपनीच्या इंटरव्ह्यूसाठी गेली खरी…

    April 10, 2026

    गंधीत आयुष्य… सुगंधीत आयुष्य

    April 10, 2026

    मायक्रोवेव्ह येई घरा…!!

    April 10, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 264
    • अवांतर 180
    • आरोग्य 99
    • थर्ड अंपायर 2
    • पंचांग आणि भविष्य 380
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 192
    • मैत्रीण 18
    • ललित 547
    • शैक्षणिक 76
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेक... आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    - मनोज शरद जोशी
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Dnyaneshwari : तो तूं परब्रह्मचि असकें, मज दैवें दिधलासि हस्तोदकें…

    April 11, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 11 एप्रिल 2026

    April 11, 2026

    हळदीकुंकू… जुनी प्रथा मोडून काढणारे!

    April 10, 2026
    Most Popular

    Dnyaneshwari : तो तूं परब्रह्मचि असकें, मज दैवें दिधलासि हस्तोदकें…

    April 11, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.