Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    कॉफीशॉप

    August 7, 2026

    ‘क्षितिज 9’ प्रोजेक्ट हायजॅक करणारं नेमकं कोण?

    August 7, 2026

    उपवास

    August 7, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Friday, August 7
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 22 जून 2026
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 22 जून 2026

    Team AvaantarBy Team AvaantarJune 22, 2026No Comments4 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, पंचांग, दिनविशेष, Panchang, Dinvishesh, दर्शन कुलकर्णी, कुंडली, राशीभविष्य, आजचे राशीभविष्य, ज्योतिष
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दर्शन कुलकर्णी

    • आज, दिनांक : 22 जून 2026; वार : सोमवार
    • भारतीय सौर : 01 आषाढ शके 1948; तिथि : अष्टमी 15:39 ; नक्षत्र : उत्तरा फाल्गुनी 10:21;
    • योग : व्यतिपात 10:30; करण : बालव 28:04;
    • सूर्य : मिथुन; चंद्र : कन्या; सूर्योदय : 06:01; सूर्यास्त : 19:18;
    • पक्ष : शुक्ल; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव;
    • शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128

    दुर्गाष्टमी

    अयन करिदिन

    वेद कन्सल्टन्सी / 9987433660


    दिनविशेष

    महानुभाव साहित्याचे साक्षेपी संशोधक वि. भि. कोलते

    टीम अवांतर

    मराठी ग्रंथकार, महानुभाव साहित्याचे साक्षेपी संशोधक आणि संपादक वि. भि. कोलते यांचा जन्म 22 जून 1908 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यातील नरवेल या गावी झाला. नागपूर विद्यापीठाच्या एम्. ए. परीक्षेत मराठी विषयात सर्वप्रथम आल्याबद्दल बेहरे पारितोषिक आणि सर्व विषयांच्या विद्यार्थ्यांमध्ये प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल मलक सुवर्णपदक त्यांना मिळाले. 1931 साली ते एलए‌लबी देखील झाले. तेव्हापासून 1966मध्ये निवृत्त होईपर्यंत ते सरकारी महाविद्यालयांतून मराठीचे प्राध्यापक होते.

    कोलते यांचा लव्हाळी  हा काव्यसंग्रह असला तरी. त्यांचा खरा पिंड संशोधकाचाच होता. महानुभावांचे साहित्य हे त्यांच्या संशोधनाचे खास क्षेत्र होते. भास्करभट्ट बोरीकर : चरित्र व काव्यविवेचन, महानुभाव तत्त्वज्ञान, महानुभावांचा आचारधर्म, श्रीचक्रधर चरित्र,  तसेच महानुभाव संशोधन हे त्यांचे महानुभाव पंथाविषयीचे ग्रंथ त्यांच्या गाढ व्यासंगाचे आणि विवेचकतेचे निदर्शक होते. 1948मध्ये महानुभाव पंथाच्या तत्त्वज्ञानासंबंधी लिहिलेल्या प्रबंधासाठी त्यांना डॉक्टरेटदेखील मिळाली.

    हेही वाचा – साप्ताहिक राशीभविष्य : 21 ते 27 जून 2026

    महानुभाव साहित्यातील केशवराज सूरिकृत मूर्तिप्रकाश, दामोदर पंडित विरचित वछाहरण, नरेंद्रविरचित  रुक्मिणीस्वयंवर, भास्करभट्ट बोरीकरकृत उद्धवगीता आणि शिशुपालवध, मुनिव्यासकृत स्थानपोथी, महिंद्रभट्ट किंवा म्हाइंभटकृत गोविंदप्रभुचरित्र आणि यथामूल पद्धतीने मुद्रित झालेले रवळो व्यासाचे सह्याद्रिवर्णन ही त्यांची साक्षेपी संपादने पाठचिकित्सापद्धतीने तयार केलेली आहेत.

    ‘चक्रधर आणि ज्ञानेश्वर’, ‘महानुभावांचे अवैदिकत्व’ यासारखे त्यांचे स्फुटलेखनही लक्षणीय ठरले. साहित्यसंचार तसेच प्राचीन मराठी साहित्य संशोधन या ग्रंथांतून त्यांचे अनुक्रमे अर्वाचीन आणि प्राचीन साहित्यासंबंधीचे स्फुटलेखन संकलित झालेले आहे. शिलालेख, ताम्रपटांच्या वाचनातही त्यांना रुची होती.

    विदर्भ साहित्य संमेलनाच्या गोंदिया येथील अधिवेशनाचे आणि महाराष्ट्र साहित्य संमेलनाच्या भोपाळ येथील अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते. साहित्य अकादमीची फेलोशीपदेखील त्यांना मिळाली होती. नागपूर विद्यापीठाचे ते कुलगुरू होते. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे ते सदस्य देखील होते. 1991 साली भारत सरकारने पद्मश्री देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला. 9 एप्रिल 1998 रोजी त्यांचे निधन झाले.

    आजचे राशीभविष्य

    मेष – खर्चावर काही प्रमाणात नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. अनावश्यक खर्च भविष्यातील योजनांवर परिणाम करू शकतो. भूतकाळात निर्माण झालेल्या समस्या विसरून पुढे जाणे सर्वांसाठीच उत्तम ठरेल. मोकळ्या संवादामुळे नातेसंबंध अधिक दृढ होतील. स्वतःच्या जबाबदाऱ्या पूर्ण प्रामाणिकपणाने पार पाडाल.

    वृषभ – वृषभ राशीच्या जातकांसाठी आजचा दिवस समस्या घेऊन येऊ शकतो. कोणताही मोठा व्यावसायिक निर्णय घेण्यापूर्वी, प्रत्येक पैलूचा काळजीपूर्वक विचार करा. जवळच्या मित्राचा किंवा एखाद्या नातेवाईकाचा सल्ला फायदेशीर ठरू शकतो. कामातून हळूहळू सकारात्मक परिणाम मिळू शकतात.

    मिथुन – या राशीच्या जातकांसाठी दिवस खास असेल. जोडीदाराकडून मिळणारे एखादे विशेष सरप्राईज तुमच्या चेहऱ्यावर हास्य आणू शकते. दिवसाच्या उत्तरार्धात एखादी चांगली बातमी मिळण्याचीही शक्यता आहे. घाईने घेतलेला निर्णय हानिकारक ठरू शकतो. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने मन आनंदी होईल.

    कर्क – या राशीच्या जातकांसाठी आजचा दिवस सामान्य असेल. प्रत्येक काम संयमाने करा. आई-वडिलांच्या आशीर्वादाने, प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. नात्यांमध्ये जवळीकता आणि प्रेम वाढण्याची चिन्हे आहेत. एखाद्या व्यक्तीबाबत मनात असलेल्या कोणत्याही चिंता दूर होण्याची शक्यता आहे.

    सिंह – आजचा दिवस खास बनेल, कारण तुम्ही यशाच्या दिशेने भक्कमपणे वाटचाल करू शकाल. तुमच्या मेहनतीला सकारात्मक फळ मिळण्याची शक्यता आहे. एखाद्या नवीन प्रकल्पाबद्दल उत्साही असाल. कुटुंबात सकारात्मक वातावरण राहील. व्यावसायिकांनाही चांगल्या संधी मिळू शकतात.

    कन्या – अपेक्षित काम वेळेवर पूर्ण होणार नाही, त्यामुळे थोडी निराशा वाटू शकते. कौटुंबिक बाबींमध्ये होणारा बाहेरील हस्तक्षेप रोखा. मानसिक तणावाला स्वतःवर भारी पडू देऊ नका. या तणावावर मेडिटेशन हा उत्तम उपाय ठरू शकतो. वाहन चालवताना निष्काळजीपणा टाळा.

    तुळ – दिवस जरासा त्रासदायक असेल. कामे वारंवार पुढे ढकलण्याची सवय एखादी मोठी समस्या निर्माण करू शकते. त्यामुळे आपल्या जबाबदाऱ्या गांभीर्याने पार पाडणे आवश्यक ठरेल. एखादे महत्त्वाचे अपूर्ण काम पूर्ण झाल्याने दिलासा मिळेल. संयमाने कामे हातावेगळी करणे योग्य ठरेल.

    वृश्चिक – आजचा दिवस आनंदाचा असेल. ऑफिसमधील तुमच्या मेहनतीची दखल घेतली जाऊ शकते. जोडीदाराशी बोलताना शब्दांची काळजीपूर्वक निवड करा; कारण अगदी लहानसहान गोष्टींमुळेही तणाव वाढू शकतो. स्वत:च्या योजनांवर विश्वास ठेवा. लवकरच गोष्टी तुमच्या बाजूने होऊ लागतील.

    हेही वाचा – आरूच्या ‘त्या’ प्रश्नाने शिव गोंधळलाच!

    धनु – सामाजिक कार्यात सक्रियपणे सहभागी व्हाल. रागावर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे ठरेल, अन्यथा नव्या अडचणी निर्माण होतील. सुज्ञ निर्णयामुळे नातेसंबंध सुधारू शकतात. एखाद्या गोष्टीबद्दल थोडी चिंता वाटू शकते, अशावेळी शांत राहणेच उत्तम. कामाच्या ठिकाणी नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे.

    मकर – प्रत्येक गोष्टीत सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. उत्पन्न आणि खर्च यांच्यात योग्य संतुलन राखणे आवश्यक आहे. आर्थिक बाबींमधील निष्काळजीपणामुळे भविष्यात समस्या निर्माण होऊ शकतात. संततीच्या उच्च शिक्षणाबाबत मोठा निर्णय घेतला जाईल. विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणाची संधी उपलब्ध होईल.

    कुंभ – दिवस सामान्य असला तरी त्यात काही चढ-उतारही असू शकतात. एखाद्या गरजू व्यक्तीला मदत करण्याची संधी मिळाली, तर कृपया ती करा. अंगभूत समज आणि संयम तुम्हाला कोणतीही परिस्थिती हाताळण्यास मदत करेल. एखादा जुना प्रकल्प पुन्हा सुरू करण्याचा विचार करू शकता.

    मीन – सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे फायदेशीर ठरेल. आपण काय बोलतोय याचा काळजीपूर्वक विचार करणे आवश्यक आहे, कारण एखाद्या लहान चुकीच्या शब्दाचाही विपरित परिणाम होऊ शकतो. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेले एखादे सरकारी काम पूर्ण होण्याची चिन्हे आहेत.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 07 ऑगस्ट 2026

    August 7, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 06 ऑगस्ट 2026

    August 6, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 05 ऑगस्ट 2026

    August 5, 2026 पंचांग आणि भविष्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 07 ऑगस्ट 2026

    By Team AvaantarAugust 7, 2026

    दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 07 ऑगस्ट 2026; वार : शुक्रवार भारतीय सौर : 16…

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 06 ऑगस्ट 2026

    August 6, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 05 ऑगस्ट 2026

    August 5, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 04 ऑगस्ट 2026

    August 4, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    कॉफीशॉप

    August 7, 2026

    ‘क्षितिज 9’ प्रोजेक्ट हायजॅक करणारं नेमकं कोण?

    August 7, 2026

    उपवास

    August 7, 2026

    Recipe : स्प्राऊटेड मूग आणि स्वीट कॉर्न चीज बॉल्स!

    August 7, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : सचेतनीं वाणेपणें, देहासकट आटणें

    August 7, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 07 ऑगस्ट 2026

    August 7, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 387
    • अवांतर 202
    • आरोग्य 136
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 522
    • फिल्मी 61
    • फूड काॅर्नर 246
    • मैत्रीण 24
    • ललित 835
    • शैक्षणिक 84
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    कॉफीशॉप

    August 7, 2026

    ‘क्षितिज 9’ प्रोजेक्ट हायजॅक करणारं नेमकं कोण?

    August 7, 2026

    उपवास

    August 7, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.