Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    शनीचा कर्मयोग

    September 25, 2026

    बाप्पा आले आणि जगण्याचा अर्थ सांगून गेले!

    September 25, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : कीं पुढिलाची दृष्टि चोरिजे, हा दृष्टिबंधु निफजे

    September 25, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Friday, September 25
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 20 मार्च 2026
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 20 मार्च 2026

    Team AvaantarBy Team AvaantarMarch 19, 2026Updated:March 20, 2026No Comments6 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, पंचांग, दिनविशेष, Panchang, Dinvishesh, दर्शन कुलकर्णी, कुंडली, राशीभविष्य, आजचे राशीभविष्य, ज्योतिष
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दर्शन कुलकर्णी

    • आज, दिनांक : 20 मार्च 2026; वार : शुक्रवार
    • भारतीय सौर : 29 फाल्गुन शके 1948; तिथि : द्वितीया 26:31; नक्षत्र : रेवती 26:27;
    • योग : ब्रह्मा 22:14; करण : बालव 15:44;
    • सूर्य : मीन; चंद्र : मीन 26:27; सूर्योदय : 06:44; सूर्यास्त : 18:48;
    • पक्ष : शुक्ल; मास : चैत्र; अयन : उत्तरायण; संवत्सर : पराभव;
    • शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128

    वेद कन्सल्टन्सी / 9987433660


    दिनविशेष

    नाटककार, लेखक, कादंबरीकार वसंत कानेटकर

    टीम अवांतर

    लोकप्रिय मराठी नाटककार, लेखक, कादंबरीकार आणि विचारवंत वसंत शंकर कानेटकर यांचा जन्म 20 जानेवारी 1922 रोजी सातारा जिल्ह्याच्या कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर या गावी झाला. प्रसिद्ध कवी शंकर केशव कानेटकर हे त्यांचे वडील. ते “गिरीश” या टोपणनावाने महाराष्ट्रात ओळखले जात आणि रविकिरण मंडळाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक होते. वडिलांच्या आणि रविकिरण मंडळातील इतर कवी यांच्या सहवासातून वसंत कानेटकरांना साहित्यात रस निर्माण झाला.

    1946मध्ये कानेटकर नाशिकमधील गोखले एज्युकेशन सोसायटी या संस्थेच्या एच. पी. टी. आर्टस् कॉलेजमध्ये शिकवत असतानाच त्यांनी लघुकथा लेखक आणि कादंबरीकार म्हणून आपली लेखन कारकीर्द सुरू केली. 1950 ते 1957 याकाळात त्यांच्या घर, पंख आणि पोरका या तीन कादंबऱ्या प्रकाशित झाल्या. 1957 मध्ये कानेटकरांनी आपले पहिले नाटक वेड्याचे घर उन्हात लिहिले. हे नाटक भालबा केळकर यांनी दिग्दर्शित केले, नाटकातील मध्यवर्ती भूमिका श्रीराम लागू यांनी निभावली होती. 1950च्या दशकात व्यावसायिक मराठी रंगभूमीचे पुनरुज्जीवन करण्याचे आणि पुढची चार दशके एकापाठोपाठ एक सरस आणि यशस्वी नाटके देऊन तिला समृद्ध करण्याचे श्रेयही मोठ्या प्रमाणात त्यांना जाते.

    हेही वाचा – एक स्त्री म्हणून माझं काय चुकलं?

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या उदयापासून ते छत्रपती संभाजी राजेंच्या मृत्यूनंतर औरंगजेबाने महाराष्ट्रावर केलेली स्वारी या कालखंडावर आधारित पाच ऐतिहासिक नाटकांचे “नाट्यपंचक” त्यांनी साकारले. ही पाच नाटके म्हणजे – रायगडाला जेव्हां जागे येते, इथे ओशाळला मृत्यू, तुझा तू वाढवी राजा, आकाशमिठी आणि जिथे गवतास भाले फुटतात ही होत. संगीत नाटकातदेखील त्यांनी क्रांती घडवून आणली. कानेटकरांनी रायगडाला जेव्हा जाग येते या ऐतिहासिक नाटकात छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यातील पिता-पुत्राच्या संबंधांचे अंतरंग मांडले. हे नाटक मराठी रंगभूमीवर एक मैलाचा दगड ठरले. या नाटकातील काशिनाथ घाणेकर यांची संभाजी महाराजांची भूमिका विशेष गाजली. कानेटकरांचे अश्रूंची झाली फुले हे नाटक त्यांचे सर्वांत यशस्वी नाटक. हिंदी चित्रपट अभिनेते आणि निर्माते अशोककुमार यांनी या नाटकावर आधारित आंसू बन गये फूल हा हिंदी चित्रपट बनविला. या चित्रपटासाठी कानेटकरांना सर्वोत्कृष्ट कथेसाठीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.

    आपल्या 54 वर्षांच्या लेखन कारकीर्दीत त्यांनी 42 तीन अंकी नाटके, 4 कादंबर्‍या आणि अनेक एकांकिका, लघुकथा, चिंतनपर लेख, चित्रपट आणि टीव्ही मालिकांसाठी पटकथा लिहिल्या. त्यांची अनेक नाटके हिंदी आणि गुजराती भाषांमध्ये रूपांतरित झालेली आहेत. वसंत कानेटकर यांच्या कलाकृतींना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले. संगीत नाटक अकादमीने रायगडाला जेव्हां जाग येते या नाटकाला “बेस्ट इंडियन प्ले” पुरस्काराने सन्मानित केले. या पुरस्काराचा भाग म्हणून या नाटकाचे 14 भारतीय भाषांमध्ये भाषांतर झाले आणि आकाशवाणीच्या राष्ट्रीय कार्यक्रमात प्रसारण झाले. हे नाटक मुंबई विद्यापीठाच्या पदवीपूर्व कला अभ्यासक्रमातही सामील झाले आणि यामुळे अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून स्वत:चे नाटक शिकवण्याचा मान कानेटकरांना मिळाला. 1971मध्ये ते कुर्ला, मुंबई येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले. 1984 साली त्यांना संगीत नाटक अकादमीने सर्व भारतीय भाषांमधील सर्वोत्कृष्ट नाटककार म्हणून गौरविले आहे. 1988 मध्ये ठाणे येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. त्यांना महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्र गौरव (1990) आणि भारत सरकारतर्फे पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले (1992). 30 जानेवारी 2001 रोजी नाशिक येथे वसंत कानेटकर यांचे निधन झाले.

     

    आजचे राशीभविष्य

    मेष – वाद, संघर्ष टाळा, अन्यथा मानसिक ताण वाढेल आणि तुमच्या आजारात भर पडेल. नातेवाईक तुमच्या उदार स्वभावाचा गैरफायदा घेण्याची शक्यता आहे. म्हणून सतर्क राहा. अल्पसे अडथळे येतील, परंतु दिवसभरात बऱ्यापैकी यश मिळवाल, असे दिसते. असंतुष्ट सहकाऱ्यांकडे लक्ष द्या, त्याशिवाय तुमच्या कामाला गती मिळणार नाही. विद्यार्थ्यांनी केवळ खेळ एके खेळ असे न करता शिक्षणाकडेही लक्ष द्यावे.

    वृषभ – आजचा दिवस उच्च कामगिरीचा आणि उच्च वर्तुळात वावरण्याचा आहे. शारीरिक तसेच मानसिक स्वास्थ्याकडे लक्ष द्या. त्यासाठी ध्यानधारणा आणि योगासने करा. घरातील कार्यामुळे खर्चात वाढ होऊ शकते. तसेच, कोणाला पैसे उधार देताना, विचारपूर्वक निर्णय घ्या. व्यग्र दिनचर्येचा असतानाही आज तुम्हाला स्वत:साठी वेळ काढावा लागेल.

    मिथुन – नोकरीच्या ठिकाणी संयम बाळगा, निरंतर प्रामाणिक प्रयत्नांमुळे हमखास यशप्राप्ती होणार आहे. धनलाभामुळे अनेक आर्थिक प्रश्न सुटू शकतील. मुलांनी त्यांच्या अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रीत करण्याची आणि भविष्याच्या दृष्टीने नियोजन करण्याची गरज आहे. व्यवसाय अधिक विस्तारण्यासाठी कल्पकतेवर भर द्या. कौशल्य विकसित करण्याकडेही लक्ष द्या.

    कर्क – विचारपूर्वक केलेल्या गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला लाभ मिळेल. त्यामुळे यापुढे गुंतवणूक करताना कमी जोखीम आणि चांगला परतावा लक्षात घेऊनच निर्णय घ्या. एखाद्या कामाच्या यशाबद्दल स्वत:ची प्रशंसा करण्यात वेळ घालवू नका, त्यापेक्षा जास्त प्रयत्न करा. नोकरीच्या ठिकाणी कामाचा ताण असेल, पण वरिष्ठांसह सहकाऱ्यांचीगी मदत होईल

    सिंह – सातत्याने प्रयत्न आणि झोकून देऊन काम करण्याच्या वृत्तीमुळे वरिष्ठांची मर्जी राहील. तसेच कुटुंबीयही तुमचे कौतुक करतील. धाडसाने उचलेली पावले आणि घेतलेले निर्णय लाभदायक ठरतील. पण तुमच्या भावनांवर, खासकरून रागावर नियंत्रण ठेवा. व्यावसायिक भागीदार आणि तुमच्यात काही गोष्टींवर एकवाक्यता न झाल्याने एखादा प्रकल्प रखडू शकतो.

    कन्या – तुमच्या विचारांवर ज्यांचा असाधारण प्रभाव आहे, अशा व्यक्तीची एका मित्रामुळे ओळख होऊ शकते. पुरातन वस्तू आणि दागदागिन्यांमधील गुंतवणूक फायदा आणि समृद्धी आणेल. कामच्या ठिकाणी जे काही उत्तम करत आहात, त्यासाठी कुटुंबाकडून मिळणारे सहकार्य कारणीभूत आहे, याची आज तुम्हाला जाणीव होईल. आज जीवनसाथी सोबत वेळ घालवण्यासाठी तुमच्या जवळ पर्याप्त वेळ असेल.

    तुळ – तुमचा उत्साही स्वभाव इतरांना आनंद देणारा असेल. भाऊ बहीण तुमच्याकडून आर्थिक मदत मागू शकतात आणि त्यांना मदत केल्यावर तुमच्यावर आर्थिक ताण येण्याची शक्यता आहे; तथापि, स्थिती लवकरच सुधारेल. घरगुती कामं कंटाळवाणी होतील आणि मानसिक तणावाला निमंत्रण देणारी असतील. अशावेळी ध्यानधारणा उत्तम उपाय ठरू शकतो.

    वृश्चिक – नोकरी आणि व्यवसायात महत्त्वाच्या विषयांवर चर्चा सुरू असताना वादग्रस्त मुद्दे टाळा. तुम्हाला भेडसावणारे गंभीर विषय हाताळण्यासाठी बड्या व्यक्तींशी असलेले संपर्क वापरा. कुटुंबातील गरजांना पूर्ण करून तुम्ही बऱ्याच वेळा स्वतःला वेळ देणे विसरतात परंतु, आज तुम्ही सर्वांपासून दूर होऊन आपल्या स्वतःसाठी वेळ घालवू शकाल.

    धनु – कलात्मक क्षेत्रातील लोकांना आजचा दिवस यशदायी ठरले. बऱ्याच काळापासून वाट पाहात असलेली कीर्ती आणि मान्यता त्यांना मिळेल. अध्यात्मिक व्यक्तीच्या शुभाशीर्वादामुळे तुमच्या मनाला शांतता लाभेल. कौटुंबिक स्नेह मेळाव्यात मानमरातब मिळेल. ऑफिसच्या बऱ्याच समस्या तुम्हाला त्रास देत राहतील, पण वरिष्ठांचे पाठबळ मिळेल.

    हेही वाचा – त्याचा फोन अन् तेच नेहमीचंच…

    मकर – तुमचा विश्वास आणि ऊर्जाशक्ती आज उच्च असेल. संततीमुळे आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. सकारात्मक विचारांच्या आणि पाठिंबा देणाऱ्या मित्रांबरोबर राहा. सामाजिक तसेच धार्मिक कार्यक्रमांसाठी उत्तम दिवस आहे. तब्येतीची काळजी घ्या. बाहेरचे पदार्थ खाण्याचे टाळा, पथ्यपाणी सांभाळा.

    कुंभ – रम्य भटकंती, मेजवान्या यामुळे तुमचा मूड चांगला राहील. कुटुंबातील सदस्यांना बचतीचे महत्त्व पटवून द्यावे लागेल, तेव्हा खर्चावर नियंत्रण येऊ शकते. तुमचे ज्ञान आणि विनोदबुद्धी यामुळे अवतीभवतीची लोक प्रभावित होतील. पण त्याचवेळी भावनिक अडथळे निर्माण करू शकतात. धाडसाने उचलेली पावले आणि घेतलेले निर्णय लाभदायक ठरतील.

    मीन – आपल्यासाठी काय चांगले आहे, हे फक्त तुम्हाला स्वत:लाच माहीत आहे; त्यामुळे ठामपणाने, धाडसी आणि जलद निर्णय घेऊन परिणामांना सामोरे जाण्याची तयारी ठेवा. नफा आज बऱ्याच व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणू शकतो. काही लोक जरूरीपेक्षा जास्त काम करण्याचे वचन देतील, पण अशा लोकांकडून काम होण्याची अपेक्षा ठेवू नका.


     

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    शनीचा कर्मयोग

    September 25, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 25 सप्टेंबर 2026

    September 25, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 सप्टेंबर 2026

    September 24, 2026 पंचांग आणि भविष्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    पंचांग आणि भविष्य

    शनीचा कर्मयोग

    By अस्मिता दीक्षितSeptember 25, 2026

    ज्याने जन्माला घातले, त्याला काळजी असते की, याला कसं संभाळायचं! पण आपल्यालाही कष्ट करायला लागतातच.…

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 25 सप्टेंबर 2026

    September 25, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 सप्टेंबर 2026

    September 24, 2026

    वास्तुशास्त्र आणि नवीन घर निवडण्याचे महत्त्वाचे नियम

    September 23, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    शनीचा कर्मयोग

    September 25, 2026

    बाप्पा आले आणि जगण्याचा अर्थ सांगून गेले!

    September 25, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : कीं पुढिलाची दृष्टि चोरिजे, हा दृष्टिबंधु निफजे

    September 25, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 25 सप्टेंबर 2026

    September 25, 2026

    आत्मसन्मान

    September 24, 2026

    अनोखे रक्षाबंधन

    September 24, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 448
    • अवांतर 214
    • आरोग्य 150
    • पंचांग आणि भविष्य 598
    • फिल्मी 69
    • फूड काॅर्नर 257
    • मैत्रीण 30
    • ललित 944
    • शैक्षणिक 87
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    शनीचा कर्मयोग

    September 25, 2026

    बाप्पा आले आणि जगण्याचा अर्थ सांगून गेले!

    September 25, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : कीं पुढिलाची दृष्टि चोरिजे, हा दृष्टिबंधु निफजे

    September 25, 2026
    Most Popular

    Homeopathy : होमिओ आख्यान

    September 20, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.