Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    रेवती मंदिरात गेल्यावर महाआरती सुरू झाली अन्…

    May 31, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 31 मे ते 06 जून 2026

    May 31, 2026

    Dnyaneshwari : हें रूप जरी घोर, विकृति आणी थोर…

    May 31, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Sunday, May 31
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 15 एप्रिल 2026
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 15 एप्रिल 2026

    Team AvaantarBy Team AvaantarApril 15, 2026No Comments5 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, पंचांग, दिनविशेष, Panchang, Dinvishesh, अधिक मास
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दर्शन कुलकर्णी

    आज, दिनांक : 15 एप्रिल 2026; वार : बुधवार

    भारतीय सौर : 25 चैत्र शके 1948; तिथि : त्रयोदशी 22:31; नक्षत्र : पूर्वा भाद्रपदा 15:22;

    योग : ब्रह्मा 13:24; करण : गरज 11:27;

    सूर्य : मीन; चंद्र : कुंभ 09:37; सूर्योदय : 06:23; सूर्यास्त : 18:55;

    पक्ष : कृष्ण; अयन : उत्तरायण; संवत्सर : पराभव;

    शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128

    प्रदोष

    शिवरात्री

    वेद कन्सल्टन्सी / 9987433660


    दिनविशेष

    मराठीतील गझल सम्राट सुरेश भट

    टीम अवांतर

    मराठीतील सुप्रसिद्ध कवी तसेच मराठी भाषेत गझल हा काव्यप्रकार रुजवणारे सुरेश भट यांचा जन्म 15 एप्रिल 1932 रोजी विदर्भातील अमरावती येथे झाला. त्यांचे वडील श्रीधर भट हे पेशाने डॉक्टर होते. ते संगीतप्रेमी होते. त्यांनी एचएमव्हीचा एक ग्रामोफोन आणला होता. मुलाची आवड पाहून आठवड्यातून ते किमान एक ध्वनिमुद्रिका विकत आणत होते. तर, त्यांच्या मातोश्रींना कवितांची खूप आवड होती. हाच वारसा सुरेश भट यांना मिळाला.

    लहानपणापासूनच त्यांना मराठी कवितांची आवड निर्माण  झाली. ते अडीच वर्षांचे असताना दुर्दैवाने त्यांना पोलिओ झाला आणि त्यात त्यांचा उजवा पाय जन्मभरासाठी अधू झाला. पण जिद्दीने ते संगीताशी नाते जोडत गेले. संगीताची हीच आवड सुरेश भट यांना शाळेच्या बँडपथकात घेऊन गेली. तिथे ते बासरी वाजवीत. त्यानंतर ते तबलावादनही शिकले. नंतर ते पुढे ते ढोलकीही वाजवीत. ते तासनतास मैफली करू शकत. अमरावती जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ते नोकरी करत असताना आपले कविता लेखन त्यांनी सुरू ठेवले होते.

    हेही वाचा – ‘साक्षात वरद’च्या पुडीतील रहस्य

    ‘एल्गार’ हा त्यांचा गाजलेला कवितासंग्रह. ‘रूपगंधा’, ‘रंग माझा वेगळा’, ‘झंझावात’ हे त्यांचे अन्य काव्यसंग्रह. यांपैकी ‘रंग माझा वेगळा’, ‘रूपगंधा’ या काव्यसंग्रहांना पुरस्कार लाभले. त्यांची गीते, कविता, रसिकजनांच्या ओठावर आल्या तेव्हा या कवीचा खरा सन्मान झाला. लता मंगेशकर, आशा भोसले, हृदयनाथ मंगेशकर यांच्यापासून सी. रामचंद्र यांच्यापर्यंत सर्वांनी त्यांच्या शब्दांना स्वर दिले.

    ‘मलमली तारुण्य माझे’, मेंदीच्या पानावर’, ‘केव्हा तरी पहाटे, उलटून रात गेली’ अशी असंख्य तरलस्पर्शी गीते लिहिणाऱ्या आणि ‘सूर्य केव्हाचा अंधारात यार हो… चला नवा सूर्य आणू यार हो’ अशा आशावादी गझला लिहिणाऱ्या सुरेश भट यांना ‘गझल सम्राट’ असे संबोधले जाते. माय मराठीची थोरवी कौतुकाने आणि गर्वाने शब्दबद्ध करणाऱ्या या गझल सम्राटाचे 14 मार्च 2003 रोजी निधन झाले.


    आजचे राशीभविष्य

    मेष – आजचा दिवस सकारात्मक स्पंदने घेऊन आला आहे. कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिमा अधिक मजबूत होईल. वरिष्ठ आणि सहकारी तुमच्या कामाचे कौतुक करतील. इतरांच्या कामात जास्त हस्तक्षेप करणे टाळावे. धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यांमध्ये वाढलेल्या स्वारस्यामुळे मनःशांती लाभेल. कुटुंबातील आपापसातील संबंध प्रेमाचे राहतील.

    वृषभ – आज परिस्थिती अनुकूल राहील. अचानक झालेल्या लाभाने आनंद मिळेल. कुटुंबाकडूनही मोठा पाठिंबा मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या प्रयत्नांचे कौतुक होईल. प्रवासादरम्यान मात्र सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. जोडीदारासोबतच्या नात्यात सुधारणा होण्याची चिन्हे आहेत, ज्यामुळे कौटुंबिक वातावरण सुधारेल.

    मिथुन – आजचा दिवस प्रगती आणि यशाचे सूचक आहे. अपूर्ण कामे पूर्ण झाल्याने तुमचा आत्मविश्वास वाढेल. कामाच्या ठिकाणी यश मिळेल. तथापि, नफ्याच्या हव्यासापोटी लहान संधींकडे दुर्लक्ष करू नका. वैवाहिक सुसंवाद टिकून राहील, परंतु काही कौटुंबिक बाबींमध्ये संयम बाळगणे आवश्यक असेल. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी अधिक मेहनत करावी लागेल.

    कर्क – आजचा दिवस सामान्य असेल. मात्र त्यात संतुलन राखणे आवश्यक आहे. कामाच्या ठिकाणी केलेल्या मेहनतीचे सकारात्मक परिणाम मिळतील, परंतु आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. अर्धवट माहितीच्या आधारे पैसे गुंतवण्याची घाई करू नका. यासंदर्भात जाणकाराचा सल्ला घेणे योग्य ठरेल. कुटुंबातील सदस्यांसोबत भावनिक तणाव कायम राहील, ज्यामुळे तुमच्या मानसिक ताणात वाढ होईल.

    सिंह – आजचा दिवस सावधगिरीने आणि विचारपूर्वक वागण्याचा आहे. कामाच्या ठिकाणी इतरांवर जास्त अवलंबून राहणे टाळा, कारण यामुळे समस्या निर्माण होऊ शकतात. आर्थिक बाबींमध्ये विचारपूर्वक निर्णय घेणे महत्त्वाचे आहे. जीवनशैलीतील अचानक बदलांमुळे काहीसा त्रास होऊ शकतो. कुटुंबाचा पाठिंबा कायम राहील. तब्येतीची काळजी घ्या.

    कन्या – आजचा दिवस ज्ञान आणि अनुभवाचे फायदे मिळवून देईल. कामाच्या ठिकाणी तुमचे निर्णय योग्य ठरतील. तुमच्या जबाबदाऱ्या वेळेवर पूर्ण करण्यात आज यशस्वी व्हाल. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल. व्यावसायिकांनी नवीन करार करताना कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.

    तुळ – आजचा दिवस अनुकूल परिस्थिती घेऊन येणारा आहे. कामाच्या ठिकाणी मिळणारे यश आणि नवीन संधी यामुळे आत्मविश्वास वाढेल. आर्थिक परिस्थिती अधिक मजबूत होण्याची चिन्हे आहेत. प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. आज सामाजिक दर्जात वाढ होईल. विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर वेळ घालवण्यापेक्षा अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.

    वृश्चिक – आजचा दिवस सामान्य असेल. वरिष्ठांच्या सहकार्यामुळे तुम्हाला कामात यश मिळेल. कुटुंबासोबत वेळ घालवाल. यामुळे मानसिक शांतता टिकून राहील. आर्थिक व्यवहारांमध्ये सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. जोडीदारासोबतचे संबंध सौहार्दपूर्ण राहतील. विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी सादर करायची कागदपत्रे नीट तपासून पाहणे गरजेचे आहे.

    धनु – आजचा दिवस आनंद आणि नवीन संधींनी भरलेला असेल. नवीन ओळखी फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे. तुमच्या कामाशी संबंधित योजना यशस्वी होऊ शकतात. कुटुंबाकडून येणारी आनंदाची बातमी तुमचा उत्साह वाढवेल. तुमचे सामाजिक वर्तुळही विस्तारेल, ज्यामुळे भविष्यासाठी नवीन मार्ग खुले होऊ शकतात.

    हेही वाचा – Bookshelf : ‘उपरा’ आत्मचरित्र म्हणजे कैकाडी समाजाचं चरित्र

    मकर – आजचा दिवस संयम आणि सावधगिरी बाळगण्याचा आहे. कामाच्या ठिकाणी विरोधकांपासून सावध रहा, घाईचे निर्णय घेणे टाळा. गुंतवणुकीशी संबंधित बाबींमध्ये अडथळे येऊ शकतात, परंतु संयम राखा. परिस्थिती हळूहळू सुधारेल. कुटुंबासोबत वेळ घालवून कुटुंबीयांच्या समस्या समजून घ्या, त्यामुळे मानसिक समाधान मिळेल.

    कुंभ – आजचा दिवस यश आणि प्रगती दर्शवणारा आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. अडकलेला निधी मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या प्रयत्नांची दखल घेतली जाईल. तुम्हाला कुटुंबाकडून पाठिंबा मिळेल. संयम राखा, नातेसंबंध सुधारण्याचे संकेत आहेत, ज्यामुळे जीवनात संतुलन टिकून राहील.

    मीन – आजचा दिवस शुभ परिणाम घेऊन येईल. व्यवसायात चांगला नफा मिळण्याची शक्यता असून, जुने वाद मिटू शकतात. कामाच्या ठिकाणी मिळालेल्या अनुभवाचा फायदा होईल, आत्मविश्वास वाढेल. कुटुंबासोबत सलोखा टिकून राहील. धार्मिक कार्यांमधील आवड वाढेल. त्यामुळे संध्याकाळी एखाद्या  धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हाल.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    साप्ताहिक राशीभविष्य : 31 मे ते 06 जून 2026

    May 31, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 31 मे 2026

    May 31, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 30 मे 2026

    May 30, 2026 पंचांग आणि भविष्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    पंचांग आणि भविष्य

    साप्ताहिक राशीभविष्य : 31 मे ते 06 जून 2026

    By प्राजक्ता काथेMay 31, 2026

    मेष हा आठवडा मनाप्रमाणे कामे होण्याचा आहे. नोकरदारांनी महत्त्वाच्या कामांना प्राधान्य द्यावे. हाताखालच्या लोकांकडून युक्तीने…

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 31 मे 2026

    May 31, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 30 मे 2026

    May 30, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 29 मे 2026

    May 29, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    रेवती मंदिरात गेल्यावर महाआरती सुरू झाली अन्…

    May 31, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 31 मे ते 06 जून 2026

    May 31, 2026

    Dnyaneshwari : हें रूप जरी घोर, विकृति आणी थोर…

    May 31, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 31 मे 2026

    May 31, 2026

    विपश्यनेतून मिळणारे मानसिक आरोग्य लाभ

    May 30, 2026

    बटाटा वडा ते फ्रेंच फ्राइज… ‘किमयागार’ बटाट्याची गोष्ट!

    May 30, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 314
    • अवांतर 188
    • आरोग्य 115
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 438
    • फिल्मी 49
    • फूड काॅर्नर 217
    • मैत्रीण 20
    • ललित 665
    • शैक्षणिक 81
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    रेवती मंदिरात गेल्यावर महाआरती सुरू झाली अन्…

    May 31, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 31 मे ते 06 जून 2026

    May 31, 2026

    Dnyaneshwari : हें रूप जरी घोर, विकृति आणी थोर…

    May 31, 2026
    Most Popular

    रेवती मंदिरात गेल्यावर महाआरती सुरू झाली अन्…

    May 31, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.