Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : हें रूप जरी घोर, विकृति आणी थोर…

    May 31, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 31 मे 2026

    May 31, 2026

    विपश्यनेतून मिळणारे मानसिक आरोग्य लाभ

    May 30, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Sunday, May 31
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Panchang : आजचे पंचांग, राशीभविष्य आणि दिनविशेष, 14 फेब्रुवारी 2026
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, राशीभविष्य आणि दिनविशेष, 14 फेब्रुवारी 2026

    Team AvaantarBy Team AvaantarFebruary 14, 2026No Comments5 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, पंचांग, दिनविशेष, Panchang, Dinvishesh, अधिक मास
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दर्शन कुलकर्णी

    • आज, दिनांक : 14 फेब्रुवारी 2026; वार : शनिवार
    • भारतीय सौर : 25 माघ शके 1947; तिथि : द्वादशी 16:01; नक्षत्र : पूर्वाषाढा 18:15
    • योग : सिद्धी 27:17; करण : गरज 28:37
    • सूर्य : कुंभ; चंद्र : धनु 24:41; सूर्योदय : 07:08; सूर्यास्त : 18:37
    • पक्ष : कृष्ण; ऋतू : शिशिर; अयन : उत्तरायण
    • संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5127

    शनिप्रदोष

    वेद कन्सल्टन्सी / 9987433660


    आजचे राशीभविष्य

    मेष – आजचा दिवस संमिश्र असेल. व्यवसायात नफा होईल. समाजातील तुमच्या कीर्ति, मानसन्मानात वाढ होईल. सरकारी कामात तुम्हाला यश मिळेल. नोकरदारांना कामाचा ताण असेल, मात्र सहकाऱ्यांच्या वर्तनामुळे निराश व्हाल. आहाराची काळजी घ्या, अन्यथा पचनाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. आज जोडीदाराचे आरोग्य देखील चिंतेचे कारण  बनेल.

    वृषभ – आजचा दिवस शुभ आणि फलदायी असेल. तुमच्या मेहनतीमुळे व्यवसायात चांगला नफा होईल. कुटुंब आणि मित्रांकडून तुम्हाला पूर्ण पाठिंबा मिळेल. नोकरीत पदोन्नतीची शक्यता आहे. नियोजनानुसार काम केले तर यश मिळेल. आज तुम्हाला आरोग्याबद्दल सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे. वाहन चालवताना, वेगावर नियंत्रण ठेवावे. शक्य असल्यास प्रवास टाळा. कुटुंबात आनंदी वातावरण असेल.

    मिथुन – व्यवसायात आर्थिक फायदा होईल आणि आणखी आर्थिक स्रोत मिळण्याची शक्यता देखील आहे. त्याचवेळी अनावश्यक खर्च वाढल्याने चिंता निर्माण होईल. कुटुंबात आनंदी वातावरण राहील. आरोग्याशी संबंधित चिंता त्रास देतील. शक्य असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. तुमचा राग आणि तुमचे शब्द नियंत्रित ठेवा, अन्यथा एखाद्या वादात अडकू शकता. आज तीर्थयात्रेला देखील जाण्याचा योग येऊ शकतो.

    कर्क – करिअरबद्दल चिंता निर्माण होईल. नवीन कामे आज सुरू करणे टाळा. अचानक अस्वस्थ वाटेल, ज्यामुळे कोणत्याही कामावर लक्ष केंद्रित करणे कठीण होईल. कामावर असलेले कर्मचारी तुम्हाला अजिबात सहकार्य करणार नाहीत. त्यामुळे सगळी कामे स्वतःलाच पूर्ण करावी लागतील. तुमच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडू शकाल. मनःशांतीसाठी योग आणि ध्यान करण्याचा प्रयत्न करा.

    सिंह – व्यवसायात चांगला नफा होईल. अनपेक्षित आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे, परंतु अनावश्यक आणि मोठे खर्च देखील जास्त असतील, ज्यामुळे कुटुंबात कलह निर्माण होऊ शकतो. तुम्हाला तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. जवळच्या मित्राच्या अचानक आजारामुळे तुम्ही काळजीत पडाल. तुम्हाला स्वतःच्या आरोग्याची देखील काळजी घ्यावी लागेल. कामाचा जास्त ताण तुम्हाला व्यग्र ठेवेल.

    कन्या – आजचा दिवस चांगला जाईल. व्यवसायात आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. सामाजिक कार्यात तुम्हाला यश मिळेल आणि समाजात तुमची प्रतिष्ठा आणि प्रभाव वाढेल. तुम्ही कामाच्या ठिकाणी एक नवीन प्रकल्प सुरू करू शकता, ज्याची सर्वजण चर्चा करतील. स्वतःच्या आरोग्याबद्दल सावधगिरी बाळगा. आहाराकडे लक्ष द्या. आज संततीच्या आजारपणामुळे काळजी वाटेल.

    हेही वाचा – सावळ्याची सावली!

    तुळ – आजचा दिवस संमिश्र असेल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे, परंतु अनावश्यक खर्चाबद्दल तुम्हाला चिंता वाटत राहील. कामाच्या ठिकाणी पदोन्नतीची शक्यता आहे. त्यामुळे ओघाने कामाचा ताण जास्त असेल. मित्र आणि सहकाऱ्यांकडून तुम्हाला पूर्ण पाठिंबा मिळेल. वादविवाद आणि संघर्ष मानसिक त्रास वाढवतील, म्हणून ते शक्यतो टाळा. जोडीदाराच्या आणि पालकांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक असेल.

    वृश्चिक – आजचा दिवस चांगला जाईल. व्यवसायात नफा चांगला होईल. कौटुंबिक आनंद आणि संपत्ती दोन्हीत वाढ होईल. सामाजिक कार्यात उत्साहाने सहभागी व्हाल. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीची दखल घेऊन मोठी जबाबदारी सोपविली जाईल. तुम्हाला एखाद्या दीर्घकालीन आजारापासून आराम मिळू शकेल. कुटुंबात शुभ घटना घडू शकतात. तुम्ही धार्मिक यात्रेला जाऊ शकता.

    धनु – आजचा दिवस शुभ राहील. कुटुंबात एखादी आनंदाची बातमी मिळेल. कामाच्या ठिकाणी पदोन्नती शक्य आहे. आहाराची काळजी घेतली तर आरोग्य चांगले राहील. वाढत्या उर्जेसह, तुम्ही सर्व प्रलंबित कामे पूर्ण करू शकाल. आज भविष्याबाबत एखादा मोठा निर्णय घेऊ शकता. बोलण्यावर संयम ठेवणे महत्वाचे आहे. आज तुम्ही सामाजिक कार्यात उत्साहाने सहभागी व्हाल.

    मकर – आजचा दिवस चांगला जाईल. व्यवसायात नफा होण्याची शक्यता आहे. आर्थिक गुंतवणूक फायदेशीर ठरेल. मानसिक शांतीच्या शोधात तुम्हाला एखाद्या अध्यात्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. आज आरोग्यात सुधारणा होण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी कामाचा ताण असला तरी, वरिष्ठांची मदत मिळेल.

    कुंभ – आजचा दिवस संमिश्र असेल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता असेल, परंतु खर्चही अनियंत्रित असेल. आरोग्याच्या कुरबुरीमुळे महत्त्वाची कामे पूर्ण करता येणार नाहीत. म्हणून तुमच्या जीवनशैलीत आणि राहणीमानात बदल करण्याचा प्रयत्न कराल. व्यवसायातील परिस्थिती आशादायक असेल. नव्या प्रस्तावाचा सखोल अभ्यास करा. कोणताही निर्णय घाईघाईत घेऊ नका. कुटुंबात शांत आणि समाधानाचे वातावरण राहील.

    मीन – आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. नवीन व्यवसाय योजना सुरू करू शकता. चांगली दिनचर्या तुमचे आरोग्य सुधारेल. म्हणून, बाहेरचे, विशेषत: जंकफूड खाणे टाळा. नोकरीच्या दृष्टीने पूरक असे नवे तंत्रज्ञान आत्मसात करण्याचा प्रयत्न करा. घराच्या सजावटीवर मोठा खर्च होऊ शकतो. जोडीदारासोबत आज एखाद्या पार्टीला उपस्थित रहाल.


    दिनविशेष

    प्रसिद्ध कवयित्री, गायिका संजीवनी मराठे

    टीम अवांतर

    मराठीतील प्रसिद्ध कवयित्री, गायिका आणि लेखिका संजीवनी मराठे यांचा जन्म 14 फेब्रुवारी 1916 रोजी पुणे येथे झाला. एसएनडीटी विद्यापीठातून त्यांनी बी.ए. आणि  एम.ए. या पदव्या संपादन केल्या. शालेय जीवनातच संजीवनी मराठे यांचे काव्यलेखन सुरू झाले होते. त्याच सुमारास पुणे येथे “रविकिरण मंडळ’ स्थापन झाले. या मंडळाचा आणि त्याच्याबरोबरीने रवींद्रनाथ टागोरांच्या काव्याचाही मोठा प्रभाव त्यांच्यावर होता.

    कोल्हापूर येथे 1932 साली झालेल्या साहित्य संमेलनात कवयित्री म्हणून त्या पहिल्यांदा जगासमोर आल्या. त्याच वर्षी त्यांचा पहिला कवितासंग्रह “काव्यसंजीवनी’ प्रकाशित झाला. त्यांच्या काव्यातून प्रीतीबरोबर सश्रद्धता, वात्सल्यादि स्त्रीसुलभ भाव सुरेख पद्धतीने मांडले आहेत. संसारी गृहिणीचे भावविश्‍व त्यांनी आपल्या कवितेतून चित्रित केले तसेच राष्ट्रप्रेमाचा आविष्कारही त्यांच्या रचनेतून स्पष्ट होतो.

    हेही वाचा – अबोला… जास्त किंवा कमी दोन्ही घातकच!

    “एचएमव्ही’चे संचालक जी. एन. जोशी यांनी संगीतबद्ध केलेले “शांत सागरी कशास उठविलीस वादळे’ हे संजीवनी मराठे यांचे गीत कांचनमाला शिरोडकर यांनी गायलेले पहिलेच गाणे होते. त्यांनी “साखरपुडा’ चित्रपटासाठी गीते लिहिली. या संग्रहातील बालगीतांमधून मुलांचे खेळकर, चंचल, निरागस भावजीवन प्रतिबिंबित झालेले दिसते.

    काव्यसंजीवनी, राका, संसार, चित्रा, छाया, भावपुष्प, परिमला हे त्यांचे सात काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले. याशिवाय “ट्युलिप्सच्या देशातून’ हे पत्रसंकलन आणि “गीतांजली दर्शन’ हा काव्यानुवाद ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. तर बाल वाचकांसाठी त्यांनी इच्छामणी आणि इतर गोष्टी, गंमत, माझा भारत, मासुमा आणि इतर प्राणिकथा, लाडकी लेक (अनुवादित बालकादंबरी) ही पुस्तके लिहिली. “बरं का गं आई’ आणि  “हसू बाई हसू’ या त्यांच्या संग्रहांना महाराष्ट्र शासनातर्फे पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. 1 एप्रिल 2000 रोजी त्यांचे निधन झाले.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 31 मे 2026

    May 31, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 30 मे 2026

    May 30, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 29 मे 2026

    May 29, 2026 पंचांग आणि भविष्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 31 मे 2026

    By Team AvaantarMay 31, 2026

    दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 31 मे 2026; वार : रविवार भारतीय सौर : 10…

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 30 मे 2026

    May 30, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 29 मे 2026

    May 29, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 28 मे 2026

    May 28, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : हें रूप जरी घोर, विकृति आणी थोर…

    May 31, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 31 मे 2026

    May 31, 2026

    विपश्यनेतून मिळणारे मानसिक आरोग्य लाभ

    May 30, 2026

    बटाटा वडा ते फ्रेंच फ्राइज… ‘किमयागार’ बटाट्याची गोष्ट!

    May 30, 2026

    सावली… शेवटपर्यंत साथ देणारी!

    May 30, 2026

    मैत्रिणींचे प्लॅनिंग… पुण्याला जायचे अन्…

    May 30, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 314
    • अवांतर 188
    • आरोग्य 115
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 437
    • फिल्मी 49
    • फूड काॅर्नर 217
    • मैत्रीण 20
    • ललित 664
    • शैक्षणिक 81
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Dnyaneshwari : हें रूप जरी घोर, विकृति आणी थोर…

    May 31, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 31 मे 2026

    May 31, 2026

    विपश्यनेतून मिळणारे मानसिक आरोग्य लाभ

    May 30, 2026
    Most Popular

    Dnyaneshwari : हें रूप जरी घोर, विकृति आणी थोर…

    May 31, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.