Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    तो राजहंस एक…

    May 12, 2026

    Dnyaneshwari : कैसा नव्हता प्रळयाचा वेळु, गोखा तूंचि मिनलासि काळु

    May 12, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 12 मे 2026

    May 12, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, May 12
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 12 मे 2026
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 12 मे 2026

    Team AvaantarBy Team AvaantarMay 12, 2026No Comments5 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, पंचांग, दिनविशेष, Panchang, Dinvishesh,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दर्शन कुलकर्णी

    • आज, दिनांक : 12 मे 2026; वार : मंगळवार
    • भारतीय सौर : 22 वैशाख शके 1948; तिथि : दशमी 14:52; नक्षत्र : पूर्वा भाद्रपदा 25:16
    • योग : वैधृति 23:18; करण : बव 26:17;
    • सूर्य : मेष; चंद्र : कुंभ 19:24; सूर्योदय : 06:06; सूर्यास्त : 19:03;
    • पक्ष : कृष्ण; अयन : उत्तरायण; संवत्सर : पराभव;
    • शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128

    वेद कन्सल्टन्सी / 9987433660


    दिनविशेष

    आधुनिक रुग्ण परिचर्याशास्त्राच्या संस्थापिका फ्लॉरेन्स नाइटिंगेल

    टीम अवांतर

    आधुनिक रुग्ण परिचर्याशास्त्राच्या संस्थापिका फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांचा जन्म 12 मे 1820 रोजी इटलीतील फ्लॉरेन्स येथे झाला. त्यांचे शिक्षण घरीच झाले. ग्रीक, लॅटिन, फ्रेंच, जर्मन आणि इटालियन या भाषांशिवाय त्यांना त्यांच्या वडिलांनी इतिहास, तत्त्वज्ञान, गणित हे विषय शिकवले. रुग्णालयात जाऊन रुग्णपरिचर्या शिकावी, या त्यांच्या इच्छेला तीव्र विरोध झाला. अर्थात, पुढील तीन वर्षांत त्या सार्वजनिक आरोग्य आणि रुग्णालये या विषयातील तज्ज्ञ म्हणून गणल्या जाऊ लागल्या.

    1850 साली कैसरव्हर्ट (जर्मनी) येथील एका संस्थेत दाखल होऊन त्यांनी रुग्णपरिचर्याविषयक संपूर्ण शिक्षणक्रम पार पाडला. 1853 मध्ये लंडनच्या एका छोट्या रुग्णालयात त्या अधीक्षक म्हणून रुजू झाल्या. 1854 साली क्रिमिया येथे झालेल्या युद्धाच्यावेळी ब्रिटनचे युद्ध सचिव सिडनी हर्बर्ट यांनी सैनिकी रुग्णालयातील रुग्णपरीचर्याविषयक व्यवस्थेची जबाबदारी नाइटिंगेल यांच्यावर सोपवली होती. 1855 साली स्कूटारी (आताचे ऊस्कूदार) रुग्णालयात पटकी आणि टायफस ज्वर यांची मोठी साथ उद्भवली होती, ती त्यांनी नाना प्रयत्न करून आटोक्यात आणली.

    हेही वाचा – उपम्याला उपमा नाही…

    नाइटिंगेल यांना संख्याशास्त्राची गोडी होती आणि त्याचा त्यांनी आपल्या कार्यासाठी उपयोगही केला. त्यांनी स्वत:च अभ्यास करून संख्याशास्त्रात प्राविण्य संपादन केले आणि  लोककल्याणासाठी त्याचा भरपूर उपयोगही केला. त्यामुळे त्या वैद्यकीय संख्याशास्त्राच्या संस्थापिका मानल्या जातात. 1860 मध्ये त्यांनी लंडनमध्ये सर्वात पहिली निधर्मीय नाइटिंगेल शुश्रुषा शाळा स्थापन केली. संख्याशास्त्राचा वापर करण्यावर भर तसेच व्हिक्टोरियन सनातनी परंपरा, अज्ञानी नोकरशाही आणि आग्रही लष्करी यंत्रणा यांच्या विरुद्ध लढा देऊन नागरी तसेच लष्करी क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी नाइटिंगेल यांनी धैर्याने आणि सोशिकपणे अपार कष्ट घेतले.

    नाइटिंगेल यांनी बरेच लेखनही केले आहे. त्यांचा नोट्स ऑन नर्सिंग हा ग्रंथ नावाजलेला आहे. तसेच नोट्स ऑन मेटर्स ॲफेक्टिंग द हेल्थ, एफिशियन्सी अँड हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ द ब्रिटिश आर्मी हा त्यांचा मोठा ग्रंथ 1858 साली प्रसिद्ध झाला. संख्याशास्त्राची कुठलीही पदवी पदरी नसूनही 1859 मध्ये त्या रॉयल स्टॅटिस्टिकल सोसायटीच्या पहिल्या महिला सदस्य म्हणून निवडून आल्या. त्या अमेरिकन स्टॅटिस्टिकल असोसिएशनच्या मानद सदस्यही झाल्या. 1883 मध्ये राणी व्हिक्टोरियाने त्यांना रॉयल रेड क्रॉस प्रदान करून त्यांचा सन्मान केला. शिवाय 1907 मध्ये त्यांना ब्रिटिश सरकारकडून ऑर्डर ऑफ मेरिट हा किताब बहाल करण्यात आला. हा किताब मिळविणाऱ्या त्या पहिल्याच महिला होत्या. 13 ऑगस्ट 1910 रोजी त्यांचे लंडन येथे निधन झाले.


    आजचे राशीभविष्य

    मेष – तुमच्या चांगल्या कामांची प्रशंसा केली जाईल, वरिष्ठ तुमच्या कामावर खूश असतील. एखादा पुरस्कारही जाहीर होऊ शकतो. काही लोक तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेऊ शकतात, सावध रहा. कोणाच्याही बोलण्यावर विश्वास ठेवून गुंतवणुकीची जोखीम घेऊ नका. कुटुंबातील लहानसहान तणाव प्रेमळ संवादाने दूर होतील.

    वृषभ – नोकरी करणाऱ्या जातकांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. पदोन्नती किंवा प्रगतीची बातमी आनंद घेऊन येईल. तुमची आर्थिक परिस्थितीही सुधारेल. जोडीदारासोबत खरेदीचा आनंद घेऊ शकता. कोणताही निर्णय घाईने घेतल्यास तो महागात पडू शकतो. शेअर बाजारात गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

    मिथुन – नवीन मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करू शकता. जवळचा मित्र एखाद्या गोष्टीवरून नाराज होऊ शकतो, त्यामुळे शब्दांच्या वापराबाबत काळजी घ्या. कोणत्याही कामात घाई करणे टाळा, कारण त्यामुळे आणखी समस्या निर्माण होऊ शकतात. वैवाहिक आयुष्यातील प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने प्रयत्न कराल.

    कर्क – आज तुमच्या सुखसोयी आणि ऐषारामात वाढ होण्याचे संकेत आहेत. तथापि, ही जीवनशैली सुधारण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. एखाद्या अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवणे हानिकारक ठरू शकते. राजकीय किंवा मोठे निर्णय घेताना सावधगिरी बाळगा. नोकरीच्या ठिकाणी प्रतिस्पर्ध्यांबाबत सजग रहा.

    सिंह – आज सामाजिक कार्यक्रमांमध्ये चमकाल आणि नावलौकिक मिळवाल. तुम्हाला जुन्या कर्जातून दिलासा मिळू शकतो, पण उत्पन्नाकडेही लक्ष देणे महत्त्वाचे आहे.  महत्त्वाच्या व्यक्तींना भेटल्याने तुमच्या व्यवसायाला नवी दिशा मिळेल. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित केले नाही तर अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

    कन्या – संततीच्या शिक्षणासाठी प्रवास करावा लागू शकतो. उत्पन्न आणि खर्च यांच्यात संतुलन राखणे महत्त्वाचे ठरेल. सभोवतालच्या लोकांना नीट ओळखूनच पुढे जा. बँकिंग किंवा गुंतवणुकीच्या व्यवसायात असलेल्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आईला दिलेले वचन विसरू नका, त्याची पूर्तता करण्यासाठी प्रयत्न करा.

    तुळ – कामात घाई केल्यास नुकसान होऊ शकते. मालमत्तेच्या व्यवहारामुळे समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. कोणालातरी पैसे उधार दिल्याने कौटुंबिक नातेसंबंधांमध्ये ताण येऊ शकतो. व्यवसायात नवे करार करताना सावधगिरी बाळगा. सर्व अटी-शर्ती तपासून पाहा. त्यानंतरच पुढे जा. आज आईच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या.

    वृश्चिक – आरोग्याबाबत, विशेषतः आहाराच्या बाबतीत सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. घराच्या नूतनीकरणाची कामे सुरू होऊ शकतात, ज्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागेल. कार्यालयात अपेक्षित काम न मिळाल्याने निराशा वाटू शकते, परंतु जबाबदाऱ्या पार पाडाव्याच लागतील. व्यवसायात नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा प्रयत्न करा, फायदा होईल.

    हेही वाचा – 10 साल जवान कर दिया…

    धनु – घरी एखाद्या शुभ कार्यक्रमाची तयारी सुरू असू शकते. खर्च करताना प्राथमिक गरजांचा विचार करा. प्रलंबित सरकारी कामे पूर्ण होऊ शकतात. मात्र, अनावश्यक प्रवास टाळा. परदेशी शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य त्या व्यक्तीकडून मार्गदर्शन मिळेल. आज आरोग्याची काळजी घ्या, पथ्यपाणी सांभाळा.

    मकर – आज व्यवसायात उत्तम नफा मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या योजना प्रगतीपथावर नेतील. कोणावरही विश्वास ठेवण्यापूर्वी सावधगिरी बाळगा. कुटुंबात एकोपा टिकवून ठेवणे आवश्यक असेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांच्या सल्ल्याकडे लक्ष देणे फायदेशीर ठरेल. सुरक्षित गुंतवणुकीवर भर द्या, याबाबत कोणतीही जोखीम घेऊ नका.

    कुंभ – नवीन घर विकत घेण्याचे तुमचे स्वप्न साकार होऊ शकते. कठोर परिश्रमाने यश मिळते, म्हणून कोणावरही अवलंबून राहू नका. दीर्घकालीन आजाराकडे दुर्लक्ष करू नका; आवश्यकता असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. राजकीय क्षेत्रातील एखाद्या मित्राशी भेट होऊ शकते. व्यावसायिकांना त्या ओळखीचा फायदा होऊ शकतो.

    मीन – आज वाद टाळणे शहाणपणाचे ठरेल, नाहीतर परिस्थिती चिघळू शकते. नोकरीच्या ठिकाणी संयमाने सोडू नका. व्यवसायातील अडचणी कमी होतील. जोडीदारासाठी एखादे सरप्राइज प्लॅन करू शकता. जुन्या मित्राला भेटल्याने आनंद होईल. बाहेरचे खाणे आज टाळा अन्यथा पोटदुखीचा त्रास होण्याची शक्यता आहे.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 11 मे 2026

    May 11, 2026 पंचांग आणि भविष्य

    साप्ताहिक राशीभविष्य : 10 ते 16 मे 2026

    May 10, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 10 मे 2026

    May 10, 2026 पंचांग आणि भविष्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 11 मे 2026

    By Team AvaantarMay 11, 2026

    दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 11 मे 2026; वार : सोमवार भारतीय सौर : 21…

    साप्ताहिक राशीभविष्य : 10 ते 16 मे 2026

    May 10, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 10 मे 2026

    May 10, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 09 मे 2026

    May 9, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    तो राजहंस एक…

    May 12, 2026

    Dnyaneshwari : कैसा नव्हता प्रळयाचा वेळु, गोखा तूंचि मिनलासि काळु

    May 12, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 12 मे 2026

    May 12, 2026

    10 साल जवान कर दिया…

    May 11, 2026

    उपम्याला उपमा नाही…

    May 11, 2026

    दु:ख विसरायला लावणारे कॅडबरी चॉकलेट

    May 11, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 295
    • अवांतर 185
    • आरोग्य 109
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 416
    • फिल्मी 48
    • फूड काॅर्नर 205
    • मैत्रीण 19
    • ललित 618
    • शैक्षणिक 79
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    तो राजहंस एक…

    May 12, 2026

    Dnyaneshwari : कैसा नव्हता प्रळयाचा वेळु, गोखा तूंचि मिनलासि काळु

    May 12, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 12 मे 2026

    May 12, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.