Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 27 जून 2026

    June 27, 2026

    माधवनं शर्वायसाठी नेमकं कोणतं स्थळ दाखवलं?

    June 26, 2026

    बापाचा स्वाभिमान सर्वांत मोठा!

    June 26, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Saturday, June 27
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » उपम्याला उपमा नाही…
    ललित

    उपम्याला उपमा नाही…

    पराग गोडबोलेBy पराग गोडबोलेMay 11, 2026No Comments5 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेखक, मराठीवाचन, मराठी साहित्य, मी मराठी, अभिजात मराठी, स्वादिष्ट उपमा, उपमा बनविण्याचं आव्हान, उपमा रेसिपी, पत्नीच्या मार्गदर्शनाखाली उपमा, पती बल्लवाचार्य, उपमा बनविण्याचे चक्रव्यूह, उपमा बनविण्याची तयारी, उपम्याला उपमा
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    शनिवारी संध्याकाळीच आमच्या घरात रविवारच्या सकाळच्या न्याहारीची चर्चा जोर धरू लागते. साबुदाण्याची खिचडी करायची असेल तर साबुदाणा भिजवावा लागतो. आंबोळी असेल तर तशी तयारी करावी लागते, कारण न्याहारी हा एक सोहळा असतो रविवारी. अर्थात, तो सगळ्यांच्याच घरात असतो, आमचं काही फार वेगळं नाही. पोहे, उपमा, फोपो (फोडणीची पोळी) वगैरे काही असेल, तर मला स्फुरण चढतं आणि मी माझ्या पाककलेचे प्रयोग घरच्या लोकांवर करायला सिद्ध होतो. बायको तर म्हणते, “तू शेफच व्हायला हवा होतास. उगाच नको त्या क्षेत्रात मुशाफिरी करत बसलास. आमच्या डोक्याला ताप जरा कमी झाला असता आणि वेगवेगळे पदार्थही चाखायला मिळाले असते आम्हाला.”

    जाऊ द्या, तो विषय नाही. ती बोलतच असते आणि मी आपला ‘नळी फुंकीली सोनारे’ या म्हणीचं पारायण करत असतो अशा वेळी, डोक्यावर बर्फ ठेवून! तर, या रविवारी उपमा करावा, असं सर्वानुमते ठरलं आणि मी स्वतःहून या चक्रव्यूहात शिरायचं ठरवलं. ती जिम्मेदारी मी ओढवून घेतली आणि म्हणालो, “कधी खाल्ला नसेल असा उपमा खाऊ घालेन तुम्हाला. समजताय काय तुम्ही?”

    आता उपमा हा पदार्थ काही जगावेगळा नाही, पण स्वतःची टिमकी वाजवायची संधी मी सुखासुखी बरा सोडेन? तिला म्हणालो, “तशी कृती ठाऊक आहे मला, पण परीक्षेच्या आधी जशी उजळणी करतात तसं एकदा सांगतो मी तुला, ऐकून घे आणि चुकत असेल तर सांग.” कृती ऐकवल्यावर तिने संमतीदर्शक मान डोलावली आणि thumbs up करून मला शुभेच्छा दिल्या… भरून पावलो मी!

    पहाट झाली आणि आज भैरु उठला चक्क आठ वाजता, आळोखेपिळोखे देत. रविवार अंगावर आला होता, पण उठणं तर भाग होतंच. सौ कधीच उठून कामाला लागल्या होत्या… सुट्टीच्या दिवशी चहा मीच करतो एरवी, पण आज उठायला अंमळ उशीरच झाला होता, त्यामुळे आलं घातलेला फक्कड चहा तयारच होता… ताजं वर्तमानपत्रही, त्यातल्या नव्या शब्दकोड्यासकट तयार होतं… पण मला माझं काल स्वीकारलेलं, ‘आ बैल मुझे मार’ म्हणत अंगावर घेतलेलं आव्हानही समोर दिसत होतं…

    हेही वाचा – बल्लव! म्हातारी मेल्याचं दुःख नाही…

    “उपमा करायचाय, आहे ना लक्षात? काल मोठ्या डिंग्या मारल्या होत्या, यांव करेन आणि त्यांव करेन म्हणून. उठा चला, कामाला लागा. वेळेवर मिळू द्या तुमचा उपमा आम्हाला,” अशी गाज आलीच.

    मी मोठ्या नाखुशीनेच उठलो. रोज सगळं आयतं हातात मिळण्याची सवय झालेला मी, सिद्ध झालो स्वतःला सिद्ध करायला, पुन्हा एकदा! फ्रीजमध्ये कायकाय आहे, याचा अदमास घेतला. टोमॅटो होते, मिरच्या होत्या, कढीलिंब होतं, गाजरं होती, दोन छोटी वांगी सुद्धा होती. बाहेर टोपलीत कांदे होते… सगळं साहित्य बाहेर काढून घेतलं आणि मांडून ठेवलं ओट्यावर, चिरण्यासाठी. माझ्या प्रत्येक हालचालीवर वक्र नजर होतीच तिची. ओट्यावर वांगं बघितल्यावर मात्र ती आली तावातावात…

    “उपम्यात वांगं घालणार आहेस?”

    “हो, काय म्हणणं आहे? चाकोरी सोडून वेगळं काहीतरी करून बघूदे की मला!”

    खाऊ का गिळू नजरेनं माझ्याकडे बघत म्हणाली, “तुझी घैसास आजी खानावळ चालवायची ना रे पनवेलला? हेच का आलं तुझ्याकडे तिच्याकडून? उपम्यात वांगं आम्ही कधी घातलं नाही आणि घालणारही नाही. मुकाट ती वांगी आपल्या जागी जाऊदेत!”

    अरेच्चा, आता भूतकाळ झालेल्या खानावळीचा आणि आजीचा हा उपमर्द? मी मूग गिळून गप्प बसलो, पण मोठ्या उमेदीने नवं काहीतरी करण्याच्या माझ्या प्रयत्नावर अक्षरश: पाणी ओतलं गेलं हो!

    वांग्यांची रवानगी झाल्यावर मग मी गाजर, टोमॅटो, कांदा आणि मिरच्या छान बारीक चिरून घेतलं सगळं. थोडी उदडाची डाळ पण काढून घेतली आणि मग रवा भाजायच्या मुख्य उद्योगाला लागलो. तीन जणांसाठी किती रवा लागेल, याचा अंदाज तिच्याकडूनच घेतला आणि मग कढल्यात तो काढून, भाजायला सुरुवात केली. गॅस बारीक ठेवला, म्हणजे तेवढ्यावरून परत बोलणी खायला नकोत!

    मंद आचेवर रवा छान भाजून घेतला आणि मग तो वेगळ्या भांड्यात काढून ठेवला. थोडं तेल घेतलं त्याच कढईत आणि त्यात चिरून ठेवलेले जिन्नस घातले, मोहोरी घातली आणि तेवढ्यात, “हळद घालू नका, उपमा पांढरा असतो पिवळा नाही,” हे ऐकलं. हळदीचा चमचा परत डब्यात गेला…

    थोडक्यात बचावलो होतो.

    तापल्या तेलात सगळे जिन्नस मस्त एकजीव करून घेतले आणि मग त्यात भाजून वेगळा ठेवलेला रवा सोडला. ते मिश्रण घोळवलं थोडा वेळ आणि मग गरम करून ठेवलेलं पाणी घातलं, मीठ आणि थोडीशी साखर घालून मिश्रण हलकेच ढवळलं. गंध यात्रा सुरू झाली होती… उपमा आकाराला यायला लागला होता, माझ्या नजरेसमोर.

    “झाकण ठेवा, वाफ येऊ द्या आणि शिजू द्या थोडा वेळ…”

    सूचना आली आणि मी तिचं पालन केलं, तंतोतंत. झाकण ठेवलं थोडा वेळ आणि मग मधेमधे ढवळत राहिलो ते मिश्रण. गाजर आणि टोमॅटो या दोघांची गुलबट लाली उतरली होती उपम्यात माझ्या… दिसायला तरी खूप छान होता, आता चव घेतल्यावर नक्की काय ते कळणार होतं!

    हेही वाचा – मी, लेक, बायको आणि कुकर!

    उपमा  नीट शिजल्यावर, वरून मस्त हिरव्यागार कोथिंबीरीची पखरण केली आणि तो ताटलीत काढून, लिंबू पिळून, वर शुभ्र ओल्या खोबऱ्याची सजावट करून, बायकोच्या हातात ठेवली ताटली… तिची कौतुकमिश्रित नजर एकदा ताटलीकडे, मग माझ्याकडे वळली आणि तिथेच अर्धी लढाई जिंकली मी!

    “छानच दिसतोय,” म्हणत, वाफाळता उपमा फुंकर घालून निववत, पहिला घास घेतला तिने चमचाभर. “मस्त झालाय हो,” अशी वाखाणणी आली उत्स्फूर्तपणे आणि माझे ‘कष्ट सत्कारणी’ लागले. खरा नव्हता पडू शकला, पण हा अभिमन्यू मात्र चक्रव्यूहातून बाहेर पडला होता, सहीसलामत…

    खाऊन झाल्यावर म्हणाली, “फोपो झाली, आमटीभात झाला, उपमा झाला. अजून उकडलेल्या बटाट्याची भाजी राहिलीये कधींची. आणूया तो योगही लवकरच.”

    लक्ष्मीबाई टिळकांची क्षमा मागून, काही दिवसांनी मलाही म्हणता यायला हवं, ‘तू तर माझ्याही पुढे गेलास’, असं. मी म्हणालो, “येईल हो तो सुदिन लवकरच. पोळ्या आणि भाकरी सोडून सगळं काही करून दाखवेन तुला.”

    हसत हसत ‘तथास्तु’ म्हणाली ती चक्क आणि मी रविवार सकाळच्या दुसऱ्या चहाचं आधण ठेवायला स्वयंपाकघराकडे मोर्चा वळवला. आजच्या माझ्या उपम्याला उपमाच नव्हती!

    पराग गोडबोले

    मोबाइल - 9323277620

    Related Posts

    माधवनं शर्वायसाठी नेमकं कोणतं स्थळ दाखवलं?

    June 26, 2026 ललित

    बापाचा स्वाभिमान सर्वांत मोठा!

    June 26, 2026 ललित

    मी श्रीकृष्ण, मी अर्जुन…

    June 26, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    माधवनं शर्वायसाठी नेमकं कोणतं स्थळ दाखवलं?

    By प्रणाली वैद्यJune 26, 2026

    भाग – 31 “मी माधवला म्हणाले खरी की, मी शर्वायशी बोलेन… पण  अजूनपर्यंत मला त्याच्याशी…

    बापाचा स्वाभिमान सर्वांत मोठा!

    June 26, 2026

    मी श्रीकृष्ण, मी अर्जुन…

    June 26, 2026

    …अन् आईच्या चेहऱ्यावरचे भावच बदलले!

    June 25, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 27 जून 2026

    June 27, 2026

    माधवनं शर्वायसाठी नेमकं कोणतं स्थळ दाखवलं?

    June 26, 2026

    बापाचा स्वाभिमान सर्वांत मोठा!

    June 26, 2026

    Recipe : कच्च्या केळ्यांचे खुसखुशीत मिनी समोसे

    June 26, 2026

    मी श्रीकृष्ण, मी अर्जुन…

    June 26, 2026

    Recipe : चमचमीत आलू पराठा अन् खमंग बटाटावडा…

    June 26, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 340
    • अवांतर 191
    • आरोग्य 123
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 468
    • फिल्मी 53
    • फूड काॅर्नर 228
    • मैत्रीण 23
    • ललित 738
    • शैक्षणिक 81
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 27 जून 2026

    June 27, 2026

    माधवनं शर्वायसाठी नेमकं कोणतं स्थळ दाखवलं?

    June 26, 2026

    बापाचा स्वाभिमान सर्वांत मोठा!

    June 26, 2026
    Most Popular

    कार्यक्रम कांदेपोह्यांचा!

    June 25, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.