Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    अग्रवाल कपंनीच्या नवीन सीईओची घोषणा झाली अन्…

    June 18, 2026

    साधं वरण-भाताच्या वासात आई शोधताना…

    June 18, 2026

    Dnyaneshwari : गाईची तृषा हरूं, कां व्याघ्रा विष होऊनि मारूं

    June 18, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Thursday, June 18
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 04 मे 2026
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 04 मे 2026

    Team AvaantarBy Team AvaantarMay 4, 2026No Comments5 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, पंचांग, दिनविशेष, Panchang, Dinvishesh, जून महिना
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दर्शन कुलकर्णी

    • आज, दिनांक : 04 मे 2026; वार : सोमवार
    • भारतीय सौर : 14 वैशाख शके 1948; तिथि : तृतीया 29:24; नक्षत्र : अनुराधा 09:57;
    • योग : परिघ 23:19; करण : वणिज 16:11;
    • सूर्य : मेष; चंद्र : वृश्चिक; सूर्योदय : 06:10; सूर्यास्त : 19:01;
    • पक्ष : कृष्ण; अयन : उत्तरायण; संवत्सर : पराभव;
    • शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128

    वेद कन्सल्टन्सी / 9987433660


    दिनविशेष

    मराठी भावगीत गायक अरुण दाते

    टीम अवांतर

    मराठी भावगीत गायकीला गझलसदृश वळण देणारे प्रथितयश गायक अरुण दाते यांचा जन्म 4 मे 1934 रोजी मध्य प्रदेशातील इंदूर येथे झाला. त्यांचे वडील रामूभैय्या हे शासकीय अधिकारी आणि साहित्याचे आणि शास्त्रीय संगीताचे जाणकार होते. त्यामुळे दाते यांच्या घरी अल्लादियाखाँ, अहमदजान थिरकवा, गोविंदराव टेंबे, हिराबाई बडोदेकर, बेगम अख्तर इत्यादी संगीत कलावंतांचा तर वि. स. खांडेकर, आचार्य अत्रे, ना. सी. फडके इत्यादी साहित्यिकांचा सहज वावर होता. त्यांच्या चर्चां, मैफिली तसेच वडिलांच्या संग्रहातील ध्वनिमुद्रिकांच्या श्रवणातून शास्त्रीय संगीताचे, साहित्याचे आणि उर्दू शायरीचे संस्कार अरुण दाते यांच्यावर झाले.

    अरुण दाते यांना कुमार गंधर्वांकडून गझलगायनाचा पहिला धडा मिळाला. त्यानंतर सुगम संगीतातील गुरू के. महावीर यांच्याकडे त्यांचे इंदूरला पद्धतशीर गंडाबंधन झाले. ते मुंबईत हार्मोनियमवर तालीम आणि रियाझ करीत. हे करतानाच मर्फी मेट्रो गायन स्पर्धेत त्यांनी भाग घेतला. तेथे त्यांना यश मिळाले. नंतर त्यांनी हिंदी गाण्यांचे जाहीर कार्यक्रम करायला सुरुवात केली. आकाशवाणीची हिंदी गाण्यांची चाचणी पास झाल्यानंतर त्यांनी आकाशवाणीच्या भावसरगम कार्यक्रमात हिंदी गीतांचे आणि गझलांचे गायन केले. तेथेच त्यांचा मराठीतील ख्यातनाम संगीतकार यशवंत देव यांच्याशीही परिचय झाला.

    हेही वाचा – शिवच्या बंगल्याबाहेर गाडी उभी राहिली… पण आरू घरात येईना!

    1960 मध्ये त्यांनी ‘शुक्रतारा, मंद वारा, चांदणे पाण्यातूनी…’ या गायिका सुधा मल्होत्रा यांच्यासह गायलेल्या आणि पुढे लोकप्रियतेचा उच्चांक गाठलेल्या गाण्याचे ध्वनिमुद्रण केले. आकाशवाणीच्या ‘मासिक गीत’ या कार्यक्रमात या गाण्याचे प्रक्षेपण झाले. त्याच वर्षी त्यांची ‘अखेरचे येतील माझ्या’, ‘सखी शेजारिणी’ इत्यादी आणखी चार गाणी (या पाचही गीतांचे गीतकार मंगेश पाडगावकर) एचएमव्हीने ध्वनिमुद्रित केली. ती सर्व गाणी आणि त्याचबरोबरीने गायक म्हणून अरुण दातेही लोकप्रिय होत गेले. याचदम्यान त्यांनी मुंबईतून टेक्स्टाइल इंजिनिअरिंगची पदवी घेतली आणि नंतर बिर्ला (सिमको), टाटा, मफतलाल इत्यादी प्रथितयश संस्थामध्ये त्यांनी काम केले.

    1960 ते 70 हा काळ त्यांच्या गायन-कारकीर्दीचा सुवर्णकाळ ठरला. त्यांनी गायलेल्या गाण्यांपैकी अनेक गाणी अतिशय लोकप्रिय झाली. 1987 मध्ये त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला आणि पूर्णवेळ संगीताला वाहून घेतले. यानंतर कार्यक्रम आणि  ध्वनिमुद्रणे यांचा सतत धडाका सुरू झाला. अरुण दाते यांना श्रीनिवास खळे, यशवंत देव, हृदयनाथ मंगेशकर असे दर्जेदार संगीतकार लाभले. सुधा मल्होत्रा, अनुराधा पौडवाल, लता मंगेशकर, आशा भोसले, सुमन कल्याणपूर, कुंदा बोकील, अनुराधा मराठे आणि कविता कृष्णमूर्ती इत्यादी नामवंत सहगायिकांसोबत गायलेली त्यांची अनेक गाणी खूप प्रसिद्ध झाली.

    वयाची साठ वर्षे पूर्ण केल्यानिमित्ताने पुणे महानगरपालिकेतर्फे महापौरांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. त्याशिवाय 1993 मध्ये अमेरिकेतल्या तुसाँ सिटीतर्फे मानद नागरिकत्व, गजाननराव वाटवे पुरस्कार, महेंद्र कपूर पुरस्काराचे पहिले मानकरी, महाराष्ट्र पत्रकार संघाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार अशा पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले होते. 6 मे 2018 रोजी त्यांचे निधन झाले.


    आजचे राशीभविष्य

    मेष – करिअरमध्ये प्रगतीच्या संधी मिळतील, मात्र अचानक काही आव्हाने निर्माण होऊ शकतात. कष्टाचे फळ मिळण्यास उशीर होईल, पण यश निश्चित आहे. व्यवसायात कोणतीही मोठी गुंतवणूक करणे टाळा, आर्थिक नुकसान होऊ शकते. कौटुंबिक जीवनात पारदर्शकता ठेवा, कारण गैरसमजांमुळे नात्यावर परिणाम होऊ शकतो.

    वृषभ – कौटुंबिक जीवन आणि नातेसंबंध अधिक दृढ होतील. कामाच्या ठिकाणी पदोन्नतीची शक्यता असून, वरिष्ठांकडून पूर्ण पाठिंबा मिळेल. व्यवसायात आर्थिक लाभाचे नवीन मार्ग खुले होतील. आरोग्य उत्तम राहील, तुम्ही उत्साही असाल. गुंतवणुकीसाठी दिवस उत्तम आहे, ज्यामुळे भविष्यात आर्थिक स्थैर्य प्राप्त होईल. तथापि, गुंतवणुकीबाबत जाणकाराचा सल्ला घेतल्यास योग्य ठरेल.

    मिथुन – नियोजन आणि निर्णय घेण्याची तुमची क्षमता वाढेल. प्रलंबित कामे पूर्ण होतील. कामाच्या ठिकाणी प्रतिस्पर्ध्यांवर मात करण्यात यश मिळेल, ज्यामुळे पदोन्नतीचा मार्ग मोकळा होईल. व्यवसायात तीव्र स्पर्धा असेल, पण तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल. जोडीदारासोबत किरकोळ वाद होण्याची शक्यता आहे; रागावर नियंत्रण ठेवा.

    कर्क – दिवस तुमच्यासाठी सर्जनशीलता दाखवण्याचा असेल. शिक्षण आणि कला क्षेत्रातील व्यक्तींना मोठे यश मिळू शकते. करिअरच्या नवीन संधी उपलब्ध होतील, ज्यामुळे प्रगती करण्यास मदत होईल. आर्थिक लाभाची शक्यता आहे. नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल, तर दिवस योग्य आहे. नातेसंबंध अधिक घट्ट होतील.

    सिंह – कामाच्या ठिकाणी अतिकामामुळे मानसिक तणाव येऊ शकतो. आर्थिकदृष्ट्या दिवस सामान्य राहील, मात्र घरगुती खर्च वाढू शकतो. वैवाहिक जीवन सुखद राहील. आरोग्याची, विशेषतः हृदय आणि रक्तदाबाची काळजी घ्या. मानसिक स्थिरता मिळवण्यासाठी संयम बाळगा. आध्यात्मिक शांतीकडे हळूहळू तुमचा प्रवास होईल.

    कन्या – तुमची मेहनत आणि संवाद कौशल्ये करिअरमध्ये यश मिळवून देतील. व्यावसायिक प्रवास सुखद आणि फायदेशीर ठरेल. आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. नवीन सुरुवात करण्यासाठी घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील. कौटुंबिक जीवनात एक नवीन वळण येऊ शकते, ज्यामुळे उभयतांमधील प्रेम वाढेल.

    तुळ –  संभाषण कौशल्यामुळे एक महत्त्वाचा व्यावसायिक करार निश्चित होऊ शकतो. आर्थिक लाभांमुळे संचित संपत्तीत वाढ होईल. कामातील प्रगतीमुळे मत्सर करणारे लोक तुमच्या विरुद्ध सक्रिय होऊ शकतात, त्यामुळे सावध रहा. गुंतवणुकीसाठी काळ अनुकूल आहे. कुटुंबात शुभ घटना घडण्याची शक्यता आहे.

    वृश्चिक – नशीब तुमच्या बाजूने असेल, ज्यामुळे कोणत्याही धोक्याला सामोरे जाणे सोपे होईल. भावनिक असाल, पण आत्मविश्वास कामात यश मिळवून देईल. करिअरमध्ये बढती मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात नवीन संधी निर्माण होतील. कुटुंबात शांती आणि स्थैर्य अनुभवायला मिळेल.

    हेही वाचा – काळानुसार बदलत गेलेली सहजीवनातील समृद्धता!

    धनु – आर्थिक व्यवहाराबाबत सावध राहा. आर्थिक नुकसान टाळण्यासाठी सगळ्या प्रकारची गुंतवणूक पुढे ढकला. अतिरिक्त खर्चामुळे बजेट बिघडू शकते. कामाच्या ठिकाणी नको असलेली आव्हाने निर्माण होऊ शकतात. जोडीदारापासून दुरावल्यासारखे वाटू शकते. आरोग्याबद्दल जागरूक रहा; झोपेच्या कमतरतेमुळे मानसिक ताण येऊ शकतो.

    मकर – उत्पन्नाचे नवीन स्रोत खुले होतील. जुन्या गुंतवणुकीतून मोठा आर्थिक फायदा होईल. मेहनतीमुळे करिअरमध्ये यश मिळेल. व्यवसाय विस्ताराच्या योजना यशस्वी होतील. कौटुंबिक जीवन गोड राहील आणि प्रेम अधिक वाढेल. मित्रांसोबत वेळ घालवल्याने आनंद मिळेल. नशिबाची साथ असल्याने प्रगतीचा मार्ग सुकर होईल.

    कुंभ – आजचा दिवस प्रतिष्ठा, सन्मान आणि कृतीचा असेल.  कामाच्या ठिकाणी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न कराल. अधिक जबाबदारी आणि पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायातील स्पर्धेत तुमचे स्थान निर्माण करण्यात यशस्वी व्हाल. आर्थिक लाभ निश्चित आहे. कौटुंबिक पातळीवर संवाद महत्त्वाचा ठरेल.

    मीन – आजचा दिवस भाग्यवृद्धी आणि आध्यात्मिक जागृतीचा असेल. शिस्तप्रियतेमुळे करिअरमध्ये स्थिरता येईल. परदेशी संपर्कांमुळे व्यवसायात आर्थिक लाभ मिळू शकतो. कौटुंबिक जीवन चांगले राहील. आरोग्य सुधारेल, ऊर्जा पातळी वाढेल. धार्मिक यात्रेला जाण्याची शक्यता आहे.  महत्त्वाचा निर्णय घेण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. तुमच्या सामाजिक दर्जात वाढ होईल.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 18 जून 2026

    June 18, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 17 जून 2026

    June 17, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 16 जून 2026

    June 16, 2026 पंचांग आणि भविष्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 18 जून 2026

    By Team AvaantarJune 18, 2026

    दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 18 जून 2026; वार : गुरुवार भारतीय सौर : 28…

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 17 जून 2026

    June 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 16 जून 2026

    June 16, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 15 जून 2026

    June 15, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    अग्रवाल कपंनीच्या नवीन सीईओची घोषणा झाली अन्…

    June 18, 2026

    साधं वरण-भाताच्या वासात आई शोधताना…

    June 18, 2026

    Dnyaneshwari : गाईची तृषा हरूं, कां व्याघ्रा विष होऊनि मारूं

    June 18, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 18 जून 2026

    June 18, 2026

    बंधनं… आयुष्याचं ऑक्सिजन!

    June 17, 2026

    हिरव्या बांगड्या

    June 17, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 332
    • अवांतर 190
    • आरोग्य 121
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 458
    • फिल्मी 53
    • फूड काॅर्नर 224
    • मैत्रीण 21
    • ललित 713
    • शैक्षणिक 81
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    अग्रवाल कपंनीच्या नवीन सीईओची घोषणा झाली अन्…

    June 18, 2026

    साधं वरण-भाताच्या वासात आई शोधताना…

    June 18, 2026

    Dnyaneshwari : गाईची तृषा हरूं, कां व्याघ्रा विष होऊनि मारूं

    June 18, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.