Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    शिवच्या बंगल्याबाहेर गाडी उभी राहिली… पण आरू घरात येईना!

    May 3, 2026

    काळानुसार बदलत गेलेली सहजीवनातील समृद्धता!

    May 3, 2026

    हसत रहा, हसत रहा… निरोगी रहा!

    May 3, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Sunday, May 3
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » शिवच्या बंगल्याबाहेर गाडी उभी राहिली… पण आरू घरात येईना!
    ललित

    शिवच्या बंगल्याबाहेर गाडी उभी राहिली… पण आरू घरात येईना!

    शोभा भडकेBy शोभा भडकेMay 3, 2026No Comments7 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीआर्टिकल, मराठीलेख, मराठीकथा, मी मराठी, अभिजात मराठी, प्रेमकथा, शिव आराधना, राम आराधना, राम सिया, शिव सिया, राम सिया विवाह, शिव आराधना विवाह, शिव आरू विवाह, आरुची पाठवणी, सियाची पाठवणी, आरूने शिवला बाजूला केले, शिव आणि राममध्ये मैत्री,
    फोटो सौजन्य - चॅटजीपीटी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    भाग – 24

    शिवने पुढे होऊन सियाला मिठीत घेतलं, तसं तिला जास्तच भरून आलं. आरू त्याच्याकडेच पाहात होती आणि आता आपल्या राम दादाचा चेहरा पाहून तिलाही वाईट वाटू लागलं… वहिनी रडतेय म्हणूण दादाला त्रास होतोय ते पाहून तिने स्वतःचं रडणं आवरतं घेतलं आणि सियाजवळ आली…

    “ओ, काय चाललंय तुमचं? आमच्या वहिनीला रडवताना काहीचं कसं वाटत नाही तुम्हाला?  लई झालं, व्हा बाजूला… वहिनी बास हां आता, अजिबात रडायचं नाही… तुम्हाला रडताना पाहून माझा दादा पण रडेल काही वेळाने!” आरू सियाचे डोळे पुसत हसत म्हणाली.

    आरूने सियाचा मूड तर फ्रेश केला… वरून सगळयांना हसवलंही! तिने स्वतःला तर केव्हाच सावरलं होतं. आता भावूक झालेल वातावरण निवळल होतं. सुधा यांनी पुढे होऊन सियाला हळद-कुंकू लावलं आणि कलावती यांनी आरूला हळद-कुंकू लावलं. मग राम सियाच्या शेजारी उभा राहिला आणि शिव आरूच्या… आणि दोन्ही जोड्यांनी पुन्हा मोठ्यांचे आशीर्वाद घेतले.

    शिव आणि आरू दोघे गाडीजवळ जाऊन उभे राहिले. राम समोर येत शिवला हात जोडून पण जरबयुक्त आवाजात म्हणाला, “माझ्या काळजाचा तुकडा तुझ्या हवाली केलाय… लक्षात ठेव!”

    हेही वाचा – शिव आणि आरूचं लग्न झालं, पण….

    त्याने अजूनही आरूकडे पाहिलं नव्हतं… शिव मान हलवत ‘हो’ असं म्हणाला आणि पुढे होऊन त्याने आरूसाठी दार उघडून तिला बसण्याचा इशारा केला. पण तिचं सारं लक्ष रामकडे होतं. ती तशीच चालत समोर आली आणि म्हणाली, “बघणार नाहीस ना माझ्याकडे? नको बघूस… कारण, मला पण तुझ्या डोळ्यांत पाणी नाही पाहायचंय…. तू जगातला बेस्ट दादा आहेस! तू मला सगळं काही न मागता दिलंय आणि कधीतरी मला तुझ्यासाठी काही करायची संधी मिळाली तर ती मी गमवावी? अजिबात नाही! मी जे केलंय त्याचा मला अजिबात  पश्चाताप नाहीये दादा…” असं म्हणत बाजूला उभ्या असलेल्या पवनच्या गळ्यात पडून रडू लागली…

    पवनने पण तिला जवळ घेत तिच्या पाठीवरून हात फिरवला… त्याच्या पण डोळ्यात पाणी होतं. राम पण त्याच्या डोळ्यांतील पाणी अडविण्याचा अतोनात प्रयत्न करत होता… पण शेवटी ओघळलंच… आणि तो मान फिरवून घेत रडू लागला… आरु तशीच मागे फिरून गाडीत जाऊन बसली… आणि शिव पण तिच्या बाजूला जाऊन बसला. भावना तिच्या सोबत जाणार होती… ती पुढे बसली ड्रायव्हिंग करायला जीवन होताच. जीवनने गाडी सुरू केली आणि ते निघाले…

    आरूने गाडीच्या खिडकीतून मागे फिरून सगळ्यांवर नजर फिरवली आणि पुढे बघितलं… त्यांची गाडी निघून गेली. राम ती गाडी दिसेनाशी होईपर्यंत पाहात होता… डोळ्यातून अविरत अश्रू ओघळत होते… सियाने त्याच्या खांद्यावर हात ठेवत त्याला डोळ्यांनीच दिलासा दिला.

    त्यानंतर दोघांचीही पाठवणी करण्यात आली. सियासोबत पूर्वी गेली. आता मागे राहिलेले सगळे एकमेकांचा निरोप घेऊन निघाले…

    0000

    शिव आणि आरूची गाडी एका आलिशान घरासमोर येऊन थांबली. तसं ती दचकून जागी झाली…

    “घर आलंय आपलं… उतरायला हवं… हात सोडतेस का माझा?” शिव तिच्या डोळ्यात पाहात म्हणाला.

    “हात… मी कशाला तुमचा हात धर…” असं म्हणत तिने हाताकडे पहिलं तर तिचे पुढचे शब्द तोंडातच राहिले… आणि ती गडबडून बाजूला झाली.

    तिला प्रवासात झोपायची सवय असल्याने गाडी सुरू झाल्याबरोबर तिचे डोळे पेंगू लागेल होते आणि नेहमीच्या सवयीने तिने बाजूला बसलेल्या शिवला राम समजून त्याच्या हाताला विळखा घालून त्याच्या खांद्यावर मान टाकत डोळे बंद केले… खूप थकल्यामुळे आणि खिडकीतून येणाऱ्या गार हवेमुळे तिला लगेचच झोप लागली… शिव तर तिच्या असं अचानक जवळ येण्याने शॉक झाला होता… त्याने तिच्याकडे पाहिलं तर ती डोळे मिटून झोपली होती… मस्त त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून!

    तो तिच्याकडेच पाहात होता. रडून रडून मलूल पडलेला चेहरा… मेकपअप आणि केस अस्ताव्यस्त झालेले… तिच्या चेहऱ्यावर थकवा दिसत होता… पण तरीही ती त्याला खूप सुंदर दिसत होती! तिची निरागसता तिच्या चेहऱ्याची सुंदरता वाढवत होती… शिव एकटक तिच्याकडे पाहात होता. दिवसभरात तिने त्याच्याकडे एक नजर देखील पाहिलं नव्हतं…. त्याला इग्नोर करून ती आपला राग दाखवत होती.

    तिच्या स्वभावाचा अंदाज त्याला बऱ्या पैकी आला होता. ती गप्प बसणाऱ्यातली नव्हती. पण तिने काहीच रिॲक्ट केलं नव्हतं, त्यामुळे जरा बुचकळ्यात पडला होता. ती भेटल्यापासूनच्या सगळ्या गोष्टी त्याला आठवत होत्या… सिया दिला झालेला त्रासा आणि त्यामुळे अस्वस्थ झालेल्या मनाला तिच्या नाजूक आवाजाने घातलेली फुंकर… जणू त्याचं मन प्रफुल्लीत करून गेली होती… तिला पाहता क्षणी तो स्वत:ला हरवून गेला होता… त्या गुलाबी रंगाच्या अनारकली ड्रेसमध्ये गुलाबाचं टवटवीत फुल दिसत होती ती… अगदी पाहिल्या नजरेत प्रेमात पडला होता तो तिच्या!

    तो एकटक तिच्याकडे पाहात साऱ्या गोष्टी आठवत होता आणि गालातल्या गालात हसत होता… ती मात्र त्याच्या खांद्यावर डोक ठेऊन शांत झोपली होती… गाडी थांबल्याने तो भानावर आला होता आणि त्यासोबत आरूही दचकून जागी झाली. तो तिच्याकडेच पाहात होता… दोघांची नजरानजर झाली… काही क्षणासाठी हरवले होते एकमेकांच्या नजरेत… तिच्या डोळ्यात पाहात हसत म्हणाला होता, “घर आलंय आपलं, उतरायला हवं… हात सोडतेस का माझा?”…

    आणि ती “हात… मी कशाला तुमचा हात धरू….” अस म्हणतच हाताकडे पाहून गडबडून बाजूला झाली  होती.

    गाडी थांबल्यावर भावनाने पण मागे वळून पाहिलं… त्यांचा हा नजरेचा खेळ आणि आरूचं असं गडबडून जाणं पाहून गाल्यातल्या गालात हसत डोअर ओपन करून खाली उतरली.

    जीवनने उतरून शिवच्या बाजूचा डोअर ओपन केला तसा शिव बाहेर आला आणि त्याने वाकून आरूला हात देत तिला खाली उतरायला मदत केली. तिनेही खाली मान घालून त्याच्या हातात हात दिला आणि खाली उतरली… ती त्याच्या शेजारी खाली मान घालून उभी होती.

    तोच भावना तिच्याजवळ आली आणि हळूच तिच्या कानात म्हणाली, ” आरू… जरा मान वर करून समोर बघ तरी!”

    तसं आरूने आधी भावनाकडे पाहिलं आणि मग आजूबाजूला… भावनाच्या चेहऱ्यावर आश्चर्य होतं. तिने इशाऱ्याने पुढे पाहायला सांगितलं तेव्हा आरूने समोर पाहिलं… आणि तिने गोंधळून बाजूला उभ्या शिवकडे पाहिलं.

    तिच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उमटलं होतं… त्याने डोळ्यांनीच तिला “काय?” असं विचारलं.

    पण ती मात्र रागात मोठ्याने म्हणाली, “कुठे घेऊन आलात तुम्ही आम्हाला?”

    शिव तिच्याकडे गोंधळून पाहू लागला… बाजूला उभा असलेला जीवनसुद्धा शॉकमध्ये डोळे मोठे करून पाहू लागला. पण थोडा वेळच… कारण तिच्या असं वागण्यावर आपल्या बॉसची काय प्रतिक्रिया असेल, हे लक्षात आलं आणि तो नॉर्मल झाला…

    “आरू काय बोलतेस? …आणि जरा हळू बोल ना! जिजूंना असं ओरडून बोलल्याचं मामीला कळलं तर मार खाशील,” भावना तिला दटावत म्हणाली.

    “तू गप गं ताई, आईला सांगितलं नाही तर काय कळणार आहे?” आरूने तिलाच ऐकवलं आणि पुन्हा शिवकडे पाहून रागात म्हणाली, “कुठे घेऊन आलात तुम्ही आम्हाला? हे बघा…” आरू बोलत होती, तोच त्याने मधेच तिला थांबवत… “आपलंच घर आहे ते… आणि मी तुला घरीच घेऊन आलोय,” असं सांगितलं.

    ते ऐकून आरूचे डोळे मोठेच्या मोठेच झाले… अगदी शॉक बसल्यासारखी ती शिवकडे पाहात होती. जणू ती त्याला नजरेनेच प्रश्न विचारत होती की, ‘आत्ता जे काही म्हणालात ते खरंच का? की माझे कान वाजलेत?’ असेच भाव उमटले होते तिच्या चेहऱ्यावर!

    0000

    इकडे राम आणि सियाची गाडी सरू आत्याच्या दारात उभी राहिली होती. त्यांना गावी जायला सकाळ झाली असती आणि दिवसभर लग्नाच्या दगदगीमुळे प्रवासात जास्तच थकवा आला असता म्हणून मग सिया आणि रामचा गृहप्रवेश सरू आत्याच्या घरीच करून उद्या  तिच्या माहेरी परतावणी करून ते परवा आरूला सोबत घेऊन गावी जाणार होते… आणि बाकीचे घरचे उद्या गावी निघणार होते.

    0000

    आरू आणि शिव घरी पोहचले होते. त्यांची गाडी गेटच्या आत दारात उभी राहिली त्यातून ते दोघे खाली उतरले होते. “आपलंच घर आहे ते… आणि मी तुला घरीच घेऊन आलोय,” असं शिवने तिला सांगितलं.

    “कायSSS काहीही… वेड्यात काढत आहात का?” आरूचे डोळे आश्चर्याने विस्फारले होते. समोरच्या घराला पाहून थक्क झाली होती ती! तिचा विश्वास बसला नाही, त्याच्या बोलण्यावर…

    “आरू, काय चाललंय तुझं?” भावना तिला समजावत हळू आवाजात, पण जरा चिडून म्हणाली.

    “अगं बघ ना किती मोठं घर… नाही, नाही… खूप मोठा असा बंगला आहे. मी कधी लांबून पण बघितला नाही, असा हा महाल! …आणि हे म्हणत आहेत आपलंच आहे. कोण विश्वास ठेवील? वेड लागलंय का मला? हां, मला महितीय की, हे लई श्रीमंत आहेत… पण एव्हढे! काहीही…” समोरच्या दिव्यांनी झगमतगत असलेल्या त्या बंगल्याला पाहून आरू म्हणाली.

    “आरू, खरंच जिजू खूप श्रीमंत आहेत… त्यांच्याकडे खूप पैसा आहे… खूप मोठ्या कंपनीचे ते मालक आहेत… हा एक काय, अजून दोन-चार बंगले ते खरेदी करू शकतात…” भावना तिला शिवच्या श्रीमंतीची माहिती देत म्हणाली. तिने शिवबद्दल पवनकडून ऐकलं होतं आणि पवन त्यांच्याच कंपनीत जॉब करतो, हे पण माहीत होतं.

    आरू मात्र डोळे मोठे करून तिच्याकडे पाहात होती, डोळ्यात अविश्वास साफ झळकत होता…

    क्रमश:
    Avatar photo
    शोभा भडके

    मूळ गाव कांबी, जिल्हा बीड. मूळ राहण्याचे ठिकाण बीड. मी लेखनाला सुरुवात करायच्या आधी फक्त एक वाचक होते. म्हणून प्रतिलिपी ॲपवर कथा वाचनच करत होते. तेव्हा ध्यानीमनीही नव्हतं मी एखादी स्टोरी लिहू शकेन. पण वाचन करत करता मनात आलं आणि लिहू लागले. लिहिलेलं वाचकांना आवडत गेलं, तसं माझा लिहिण्याचा हुरूप वाढत गेला... आज लेखनामुळे आर्थिकदृष्ट्या पण स्वावलंबी झाले आणि स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली.

    Related Posts

    काळानुसार बदलत गेलेली सहजीवनातील समृद्धता!

    May 3, 2026 ललित

    आदिची भेट झाली अन् गौरीला तिचं वळण सापडलं…

    May 2, 2026 ललित

    घुसमट… मेसेजला श्रीकडून रिप्लायच नाही!

    May 2, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    काळानुसार बदलत गेलेली सहजीवनातील समृद्धता!

    By माधवी जोशी माहुलकरMay 3, 2026

    नुकताच एक लेख वाचनात आला, ज्यामध्ये स्वयंपाकघर, स्त्री-पुरुषांमधील कामाची विभागणी आणि पुरुषांचा घरकामातील सहभाग यावर…

    आदिची भेट झाली अन् गौरीला तिचं वळण सापडलं…

    May 2, 2026

    घुसमट… मेसेजला श्रीकडून रिप्लायच नाही!

    May 2, 2026

    जजने ठोठावली 10 डॉलर्स दंडाची शिक्षा, पण…

    May 1, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    शिवच्या बंगल्याबाहेर गाडी उभी राहिली… पण आरू घरात येईना!

    May 3, 2026

    काळानुसार बदलत गेलेली सहजीवनातील समृद्धता!

    May 3, 2026

    हसत रहा, हसत रहा… निरोगी रहा!

    May 3, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 03 ते 09 मे 2026

    May 3, 2026

    Dnyaneshwari : तुझें रूप वय कैसें, तुजपैलीकडे काय असे

    May 3, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 03 मे 2026

    May 3, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 286
    • अवांतर 185
    • आरोग्य 107
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 405
    • फिल्मी 47
    • फूड काॅर्नर 202
    • मैत्रीण 18
    • ललित 601
    • शैक्षणिक 78
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    शिवच्या बंगल्याबाहेर गाडी उभी राहिली… पण आरू घरात येईना!

    May 3, 2026

    काळानुसार बदलत गेलेली सहजीवनातील समृद्धता!

    May 3, 2026

    हसत रहा, हसत रहा… निरोगी रहा!

    May 3, 2026
    Most Popular

    शिवच्या बंगल्याबाहेर गाडी उभी राहिली… पण आरू घरात येईना!

    May 3, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.