Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 02 सप्टेंबर 2026

    September 2, 2026

    वजाबाकी

    September 1, 2026

    कहाणी एका घटस्फोटाची!

    September 1, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, September 2
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 02 सप्टेंबर 2026
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 02 सप्टेंबर 2026

    Team AvaantarBy Team AvaantarSeptember 2, 2026No Comments6 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, पंचांग, दिनविशेष, Panchang, Dinvishesh, दर्शन कुलकर्णी, कुंडली, राशीभविष्य, आजचे राशीभविष्य, ज्योतिष
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दर्शन कुलकर्णी

    • आज, दिनांक : 02 सप्टेंबर 2026; वार : बुधवार
    • भारतीय सौर : 11 भाद्रपद शके 1948; तिथि : षष्ठी 28:26; नक्षत्र : भरणी 25:42;
    • योग : ध्रुव 21:11; करण : गरज 17:21;
    • सूर्य : सिंह; चंद्र : मेष; सूर्योदय : 06:23; सूर्यास्त : 18:54;
    • पक्ष : कृष्ण; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव;
    • शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128

    बुधपूजन

    वेद कन्सल्टन्सी / 9987433660


    दिनविशेष

    वनस्पती शास्त्रज्ञ शंकर पुरुषोत्तम आघारकर

    टीम अवांतर

    वनस्पतींवर अपार प्रेम करणारा बंडखोर वैज्ञानिक अशी ओळख असणाऱ्या शंकर पुरुषोत्तम आघारकर यांचा जन्म 18 नोव्हेंबर 1884 रोजी मालवण येथे झाला. वडील सरकारी नोकरीत असल्याने बदली होणं आणि नवीन ठिकाणी जम बसवणे या कुटुंबाच्या अंगवळणी पडले होते. त्यामुळे आघारकर यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणही खारेपाटण, रत्नागिरी, बेळगाव, धारवाड अशा अनेक ठिकाणी झाले. त्यामुळे मराठी सोबतच कन्नड भाषाही ते शिकले.

    पश्चिम घाट पालथा घालून तिथल्या श्रीमंत वन्य जीवनाचं नुसतं सौंदर्य न्याहाळायचं नाही, तर प्रत्येक झाडाची ओळख करून घ्यायची, त्याचे विशेष गुण, दोष आणि औषधी उपयुक्तता पारखून घ्यायची, नव्या वनस्पती शोधून त्यांची मनात नोंद करून ठेवायची हा त्यांचा बालपणातील आवडता उद्योग होता. तरूणपणी ते वनस्पतींबरोबरच अनेक प्राण्यांचेदेखील अभ्यासपूर्ण संशोधन आणि निरीक्षण करू लागले. आपल्या जंगल सफरींवर टिपणं काढायला लागले.

    हेही वाचा – गणरायाचे डोळे रंगविण्याचे कौशल्य

    पुढे आपल्या छंदालाच त्यांनी आयुष्याचे ध्येय बनवले. आपलं महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी मुंबईच्या एलिफिन्स्टन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. त्याठिकाणी ते वनस्पतीशास्त्र आणि प्राणीशास्त्राचा सामायिक अभ्यास करू लागले. 1909 साली त्यांनी आपले पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. पुढे त्याच संस्थेत जीवशास्त्र विषयाचे प्राध्यापक म्हणून आघारकर रुजू झाले. याच काळात त्यांच्यातील संशोधकवृत्ती वाढू लागली. आगरकर यांनी जर्मनीतील बर्लिन विद्यापीठातून वनस्पतीशास्त्र विषयात पीएचडी पदवी मिळवली. ‘भारतीय कोरडवाहू भागात उगवणार्‍या वनस्पतींचा स्वप्रसार व त्यांचे मूळ स्थान’ या विषयावर आधारित त्यांचे संशोधन होते. याशिवाय आंबा, केळी, भाताचे पीक इत्यादींविषयी संशोधनही केले.

    त्यांची निसर्गातील वेगवेगळ्या गोष्टींवर  शोधयात्रा चालू असताना त्यांना एका नव्या जातीच्या जेली फिशचा शोध लागला. आणि या प्राण्याने  आघारकर यांचे जीवनच बदलून टाकलं,  या प्राण्यावरील संशोधनामुळे जागतिक स्तरावर त्यांना विशेष कीर्ति आणि संशोधक अशी ओळख मिळवून दिली.

    जर्मनीत शिक्षण घेत असताना त्यांनी अनेक ब्रिटिश आणि युरोपियन उद्यानांंना भेट दिली. अनेक पर्वत शिखरांवर गिर्यारोहण केले, अनेक दुर्मिळ प्रजातींचे संकलन केले. हे संकलन 1920 साली कलकत्ता विद्यापीठासमोर प्रस्तुत केले. आघारकरांच्या माहितीमधील सुसूत्रता, मुद्देसूदपणा, निरीक्षणांमधील अचूकता पाहून त्यांच्या अद्वितीय संशोधनासाठी त्यांना कलकत्ता विद्यापीठात प्रोफेसर सी. व्ही. रमण यांच्या  शिफारशीवरून प्राध्यापकाची नोकरी मिळाली.

    आघारकरांच्या काळात कलकत्ता विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र विभागाचा मोठा विकास झाला. तिथे होणाऱ्या वनस्पतींवरील संशोधनाने जागतिक मापदंड प्रस्थापित केला. पुढे आघारकरांनी इंग्रज सरकारला कोलकाता येथील शिबिपुर येथील राष्ट्रीय वनस्पती संकलन केंद्रातील वनस्पतींच्या प्रजातींना इंग्लंडच्या रॉयल बोटॅनिकल गार्डनमध्ये घेऊन जाण्यापासून रोखले होते. त्यांनी त्या प्रजाती भारतात ठेवल्या म्हणून बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडिया यासारख्या संस्थेकडे भारतीय वनस्पती प्रजातींचे संकलन करणे शक्य झाले आहे.

    1946 साली आघारकरांनी कलकत्ता विद्यापीठातील पदाचा राजीनामा दिला. त्यांनी मुंबई विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकवण्यास सुरुवात केली. त्याच वेळी पुण्याच्या इंडियन लॉ सोसायटीने आघारकरांची भेट घेऊन पुण्यात एका वनस्पती संशोधन संस्थेची स्थापना करण्याची मागणी केली. महाराष्ट्र असोसिएशन फॉर द कल्टिवेशन ऑफ सायन्स रिसर्च इन्स्टिट्यूटची यामुळेच स्थापना झाली. आज हीच संस्था आघारकर इन्स्टिट्यूट म्हणून प्रसिद्ध आहे. 2 सप्टेंबर 1960 रोजी या ऋषीतुल्य संशोधकाचे निधन झाले.


    आजचे राशिभविष्य

    मेष – आजच्या दिवसात करिअरमध्ये एक नवीन टप्पा गाठण्याची शक्यता आहे. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेले एखादे महत्त्वाचे काम अखेर पूर्ण झाल्याने मोठा दिलासा मिळेल. कौटुंबिक प्रेम आणि एकोपा टिकून राहील. नवीन वाहन खरेदी करण्याची कल्पना प्रत्यक्षात येऊ शकते. स्वतःच्या आरोग्याबाबत निष्काळजीपणा टाळा. अनोळखी लोकांवर जास्त अवलंबून राहणे टाळा, कारण ते तुमचा गैरफायदा घेण्याची शक्यता आहे.

    वृषभ – आजचा दिवस जरी सामान्य वाटत असला तरी, त्यात अनेक नवीन संधी दडलेल्या असू शकतात. नवीन नोकरीची संधी आकर्षक वाटू शकते, पण सध्या तरी तुमच्या आताच्याच नोकरीत राहणे तुमच्यासाठी अधिक चांगले ठरू शकते. वरिष्ठांकडून मिळणाऱ्या पाठिंब्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. अनपेक्षित खर्चामुळे काही चिंता निर्माण होऊ शकते. तुमच्या मेहनतीमुळे हळूहळू तुमची एक नवीन ओळख निर्माण होईल. एखाद्या प्रभावशाली व्यक्तीला भेटणे भविष्यात फायदेशीर ठरू शकते.

    मिथुन – आज आर्थिक व्यवहारांमधील निष्काळजीपणा महागात पडू शकतो, म्हणून प्रत्येक व्यवहार काळजीपूर्वक करा. जबाबदाऱ्यांपासून दूर पळण्याऐवजी, आत्मविश्वासाने त्यांचा सामना करा; त्यामुळे यश अधिक जवळ येईल. आज जोडीदारासाठी एक छोटेसे सरप्राईज प्लॅन कराल. वाढलेल्या सुखसोयी आणि चैनीच्या वस्तूंसोबतच, गुंतवणुकीच्या माध्यमातून चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे.

    कर्क – आज तुमच्या आयुष्यात एक सकारात्मक बदल घडून येऊ शकतो. संततीच्या वागणुकीमुळे थोडी चिंता वाटू शकते, पण संयम आणि प्रेमाने तुम्ही परिस्थिती नियंत्रणात आणाल. आज तुमचा राग तुमची सर्वात मोठी कमजोरी ठरू शकतो, म्हणून स्वतःवर नियंत्रण ठेवा. भावंडांसोबतचे जुने वाद चर्चेद्वारे मिटवण्यासाठी हा एक चांगला काळ आहे. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेले सरकारी काम पूर्ण झाल्याची बातमी तुम्हाला मोठा दिलासा देऊ शकते.

    सिंह – आज धावपळ आणि जबाबदाऱ्यांमुळे तुम्ही व्यस्त राहाल, पण तुमच्या मेहनतीचे चांगले फळ मिळेल. एक नवीन व्यावसायिक भागीदारी भविष्यासाठी फायदेशीर ठरू शकते. कुटुंबात एखाद्या जातकाच्या लग्नाशी संबंधित अडथळे दूर झाल्याने घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. कामाच्या दबावामुळे संध्याकाळपर्यंत थकवा किंवा डोकेदुखी जाणवू शकते, म्हणून अधूनमधून विश्रांती घ्या. गरज असली तरीही पैसे उधार घेणे टाळा, कारण यामुळे भविष्यात तुमच्यावरचा आर्थिक भार वाढू शकतो.

    कन्या –  तुमच्या यशाची गुरुकिल्ली म्हणजे तुमची जबाबदारी आज वेळेवर पूर्ण करणे. वडीलधाऱ्यांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्या, त्यांच्या गरजांकडे दुर्लक्ष करू नका. राजकारण किंवा सामाजिक क्षेत्रात असलेल्यांसाठी आजचा दिवस खूप अनुकूल असू शकतो. तुमची लोकप्रियता आणि जनसमर्थन वाढेल. नवीन पद, जबाबदारी किंवा सन्मान मिळण्याचे संकेतही आहेत. जर तुम्हाला प्रवास करायचा असेल, तर घाई टाळा आणि स्वतःच्या सुरक्षेला प्राधान्य द्या.

    तुळ – आज तुमच्यासाठी आर्थिक संतुलन राखणे महत्त्वाचे ठरेल. उत्पन्न चांगले असू शकते, परंतु खर्चावर नियंत्रण ठेवले नाही, तर ताण वाढू शकतो. वैयक्तिक कौटुंबिक समस्या सोडवताना बाहेरील सल्ला घेणे टाळा. नोकरीत एखाद्या वरिष्ठ किंवा अनुभवी व्यक्तीचा सल्ला तुम्हाला योग्य दिशा दाखवू शकतो. आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यास लहान-सहान समस्या वाढू शकतात. ऑफिसमधील कामावर लक्ष केंद्रित करा, अन्यथा वरिष्ठांच्या नाराजीला सामोरे जावे लागेल.

    वृश्चिक – आजचा दिवस आनंद, नवीन भेटीगाठी आणि सकारात्मक बदल घेऊन येणारा ठरेल. दूर राहणाऱ्या प्रिय व्यक्तीसोबत अचानक झालेल्या भेटीमुळे आनंद होईल. घराची सजावट, दुरुस्ती किंवा नूतनीकरणाचा खर्च वाढू शकतो, पण त्यामुळे घरातील वातावरण अधिक प्रसन्न होईल. व्यवसायात आर्थिक समस्या सुटल्याने रखडलेल्या कामांना गती मिळेल. आईच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करण्याऐवजी, तो काळजीपूर्वक ऐकणे अधिक चांगले ठरेल.

    हेही वाचा – कहाणी एका घटस्फोटाची!

    धनु – तुमच्यासाठी प्रगतीचे अनेक मार्ग आज खुले होऊ शकतात. व्यवसाय उंचावण्याची योजना अपेक्षेपेक्षा चांगले परिणाम देऊ शकते. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने तुमचा ताण कमी होईल. संततीच्या कर्तृत्वामुळे तुम्हाला अभिमान वाटेल. आज एखाद्या खास व्यक्तीला भेटल्याने किंवा एखादा सुंदर क्षण अनुभवल्याने दिवस अविस्मरणीय होऊ शकतो. नोकरीच्या शोधात असलेल्या जातकांना चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे.

    मकर – आज तुमची प्रगती वेगाने होईल आणि तुमची मेहनत इतरांना दिसून येईल. मात्र काही लोकांना तुमचा वेग आणि यश कदाचित आवडणार नाही, ज्यामुळे मत्सराची भावना निर्माण होऊ शकते. राजकारण किंवा समाजकार्यात प्रत्येक पावलाचा काळजीपूर्वक विचार करणे महत्त्वाचे आहे. शासकीय कामात यश मिळण्याची शक्यता आहे. इतरांवर जास्त अवलंबून राहणे टाळा, कारण कोणीतरी जाणूनबुजून तुमच्या कामात अडथळा आणू शकते.

    कुंभ – आजचा दिवस तुमच्यासाठी शांती, आनंद आणि कौटुंबिक प्रेम घेऊन येऊ शकतो. घरात एकोपा आणि सकारात्मक वातावरण राहील. संततीच्या परीक्षेतील सकारात्मक निकालामुळे तुमची चिंता कमी होऊ शकते. जोडीदाराला मिळणारी बढती घरात अभिमान आणि आनंद घेऊन येईल. एक महत्त्वाचा निर्णय घेण्यासाठी भावंडांचा सल्ला उपयुक्त ठरेल. कुटुंबासोबत एक छान वेळ घालवाल, मात्र एखाद्या सदस्याच्या तब्येतीबद्दल थोडी चिंता वाटू शकते.

    मीन – आज थोडासा निष्काळजीपणासुद्धा समस्या निर्माण करू शकतो, त्यामुळे प्रत्येक पाऊल काळजीपूर्वक टाका. कामाच्या ठिकाणी वाद होण्याची शक्यता आहे, म्हणून रागाच्या भरात असे काही बोलणे टाळा ज्याचा तुम्हाला नंतर पश्चात्ताप होईल. व्यवसायातील एक योग्य गुंतवणूक भविष्यात मोठा नफा मिळवून देऊ शकते. भागीदारीचा प्रस्ताव स्वीकारण्यापूर्वी, समोरच्या पक्षाची माहिती आणि अटी यांचे सखोल पुनरावलोकन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 01 सप्टेंबर 2026

    September 1, 2026 पंचांग आणि भविष्य

    वैदिक ज्योतिषशास्त्र : 100 महत्त्वपूर्ण सिद्धांत – गृहसौख्य, कलागुण, संशोधन

    August 31, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 31 ऑगस्ट 2026

    August 31, 2026 पंचांग आणि भविष्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 01 सप्टेंबर 2026

    By Team AvaantarSeptember 1, 2026

    दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 01 सप्टेंबर 2026; वार : मंगळवार भारतीय सौर : 10…

    वैदिक ज्योतिषशास्त्र : 100 महत्त्वपूर्ण सिद्धांत – गृहसौख्य, कलागुण, संशोधन

    August 31, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 31 ऑगस्ट 2026

    August 31, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 30 ऑगस्ट ते 05 सप्टेंबर 2026

    August 30, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 02 सप्टेंबर 2026

    September 2, 2026

    वजाबाकी

    September 1, 2026

    कहाणी एका घटस्फोटाची!

    September 1, 2026

    गणरायाचे डोळे रंगविण्याचे कौशल्य

    September 1, 2026

    शुक्राचे अध्यात्म

    September 1, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : उपनिषदांकडे न वचे, योगशास्त्र न रुचे

    September 1, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 417
    • अवांतर 206
    • आरोग्य 142
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 561
    • फिल्मी 65
    • फूड काॅर्नर 253
    • मैत्रीण 28
    • ललित 889
    • शैक्षणिक 86
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 02 सप्टेंबर 2026

    September 2, 2026

    वजाबाकी

    September 1, 2026

    कहाणी एका घटस्फोटाची!

    September 1, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.